Telegram Web Link
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2
"लवकर यशाची गुरुकिल्ली : योग्य पद्धत, नियोजन, मार्गदर्शन आणि PYQ विश्लेषण"

स्पर्धा परीक्षांच्या महासागरात काही जण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात आणि इतर अनेकजण वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही ध्येयाच्या अगदी जवळ जातात पण अंतिम यशापासून दूर राहतात. मग असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, "आपण का नाही लवकर यश मिळवू शकत?"

या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं, तर ते आहे – योग्य अभ्यास पद्धती, योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि PYQ चे अचूक विश्लेषण.

स्पर्धा परीक्षांमध्ये केवळ १०-१२ तास अभ्यास करून चालत नाही, तर तो अभ्यास योग्य दिशेने हवा. कोणते विषय आधी घ्यायचे, कसे समजून घ्यायचे, किती वेळ दिला पाहिजे, याचं नीट मूल्यांकन करणं गरजेचं आहे. अनेक वेळा आपण एका विषयातच अडकतो आणि दुसरे विषय दुर्लक्षित होतात. ही अडचण टाळण्यासाठी समतोल अभ्यास ही यशाची पहिली पायरी आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा एक कॉमन गुण म्हणजे त्यांचं दैनंदिन नियोजन ठाम आणि अचूक असतं. दररोज कोणता विषय किती वेळ दिला, कोणते टॉपिक किती दिवसांत पूर्ण करायचे, रिव्हिजनसाठी किती वेळ ठेवायचा, हे सर्व ठरवलेलं असतं. एक छोटंसं टाइमटेबल देखील आपली उत्पादकता दुप्पट करू शकतं.

MPSC-UPSC ही वाट खडतर आहे. योग्य  मार्गदर्श न मिळाल्या मुळे अनेक जण भरकटतात. त्यासाठी योग्य मार्गदर्शक हवा –सीनियर्स, किंवा विश्वसनीय अधिकारी मित्र यांची मदत घेतली पाहिजे. त्यांनी दिलेला अनुभव आपला वेळ आणि उर्जा वाचवतो. मार्गदर्शन हे यशाकडे नेणारी शॉर्टकट नसली तरी, योग्य दिशा दाखवणारी नक्कीच असते.

पूर्वीच्या प्रश्नपत्रिका (PYQ – Previous Year Questions) म्हणजे UPSC/MPSC आयोगाची "प्रवृत्ती" समजून घेण्याचं उत्तम साधन आहे. कोणते विषय वारंवार विचारले जातात? कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? किती खोलात विचारलं जातं? हे सर्व समजल्याशिवाय अभ्यास करत राहणं म्हणजे डोळे झाकून धावणं.

🔑
आज जे विद्यार्थी पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतात, ते बुद्धिमान किंवा भाग्यवान नसतात, तर ते प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेतलेले असतात.

त्यांचा अभ्यास हा सुशिक्षित असतो, नियोजन शिस्तबद्ध असतं, मार्गदर्शन अनुभवसंपन्न असतं आणि PYQ विश्लेषण हे युद्धातील शस्त्रासारखं असतं.

स्पर्धा परीक्षा म्हणजे धैर्य, चिकाटी, आणि स्मार्ट अभ्यास यांची परिक्षा आहे. "मी किती वेळा अपयशी झालो" हे महत्त्वाचं नाही, तर "मी दर वेळी कुठे चुका केल्या आणि त्या सुधारल्या का?" हे महत्त्वाचं आहे.

लवकर यश हवं असेल, तर "योग्य दिशा" निवडायलाच हवी. मेहनत तर सगळेच करतात, पण ती योग्य मार्गावरच असेल, तर यश तुमच्या दाराशी येण्यास वेळ लागत नाही.

"चुकीच्या पद्धतीने १० वेळा अपयशी होण्यापेक्षा, एकदाच योग्य पद्धतीने यशस्वी व्हा!"
✍️ सुशांत कुलकर्णी
(कक्ष अधिकारी मंत्रालय मुंबई)
@sushant_kulkarni_official
Insta ID @Dr.Sushant_4848
27
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2025/07/13 20:41:53
Back to Top
HTML Embed Code: