This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
१२ जुलै १६६०
राजांचं हुबेहूब रुप लाभवं, थोरल्या धन्यांची कापडं अंगावर चढवायला मिळावी, ज्या पायांवर उभा हिंदुस्थान नतमस्तक होतो त्या पायांतील मोजड्या घालाया मिळाव्या, आणि भलेही शिवराय म्हणून जन्मला येता नाही आलं पण काही क्षणांसाठी राजं म्हणून जगता याव, छातीचा कोट करून ताट मानाने "शिवराय" म्हणून मराता यावं.... सांगा यापेक्षा मोठे काय पाहिजे माणसाला!
१२ जुलै १६६०
प्रति शिवराय, नरवीर, शिवरत्न, शिवरक्षक शिवा काशिद यांचा बलिदान दिन 🥺 🚩
म्या पाहिले माझे मरण माझ्या डोळा...
माझ्या राजीया साठी जीव झाला गोळा....
राजं तुम्हा पुढं या जीवाचा काय मेळा...
शिवा बनून परत सिद्दीला भेटेन हजार वेळा...
नरवीर शिवा काशिद यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩 😞🙏🏼⚔️🇮🇳

🙏14❤8
एका एका मावळ्यावर एक एक खंड लिहावा.. इतकी निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांवर होती.. तोंड दाखवू नका म्हणल्या बरोबर.. मरेपर्यंत लढणारे मावळे ते..
गेलो तर तो जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही.. हे माहिती असूनही राजेंच्या जागेवर तो जायला तयार झाला.. शिवा काशीद म्हणावे अशा वाघराला...❤️
#आदर
गेलो तर तो जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही.. हे माहिती असूनही राजेंच्या जागेवर तो जायला तयार झाला.. शिवा काशीद म्हणावे अशा वाघराला...❤️
#आदर
❤19
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीला आत्ता साज आला..❤️
❤14
राष्ट्राचा गौरव ‘छत्रपती शिवाजी महाराज’
लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
आज भारताच्या गौरवाची चर्चा देश-विदेशात झपाट्याने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या खऱ्या इतिहासाची पुनःस्थापना प्रभावीपणे होत आहे. जनमानसाने इतिहासातील सत्य घटनांना नव्याने उजाळा दिला असून, इतिहासात केवळ ३% गोष्टींचा उल्लेख झालेला आहे. उर्वरित ९७% गोष्टी अजूनही अंधारात आहेत.
या उपेक्षित इतिहासाच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय निश्चितच शिवनेरीच्या तटबंदीवर उमटलेल्या बाल शिवाजीच्या सिंहगर्जनेला जाते. ज्यांनी स्वराज्याचा संकल्प करत परकीय सत्तेला आव्हान दिले. त्यांच्या विचारांमधून केवळ तलवार नाही, तर शौर्य, नीतिमत्ता, न्याय आणि लोककल्याणकारी राज्यकारभार निर्माण झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ शौर्याच्या जोरावर नव्हे, तर सुशासनाच्या तत्त्वांवर आधारलेले स्वराज्य उभे केले. लोकांची गरज, सुरक्षितता, न्याय, शिक्षण, धर्मनिरपेक्षता आणि स्त्रियांचा सन्मान या मूल्यांवर आधारित शासन पद्धती त्यांनी प्रस्थापित केली.
शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले, दुर्ग, जलदुर्ग यांची उभारणी केली, जलसेनेची स्थापना केली. भविष्यातील धोके लक्षात घेऊन त्यांनी प्रत्येक किल्ल्याचे स्थान, संरचना आणि युद्धनिती अभ्यासपूर्ण पद्धतीने निश्चित केली. युद्धनितीचे स्पष्ट नियम तयार केले. व्यापाराला चालना देण्यासाठी सुरक्षित व्यापारी मार्ग उभारले.
त्यांचे शासन हे केवळ युद्धावर आधारित नव्हते, तर समाजकारण, अर्थव्यवस्था, विज्ञान, शेती, जलसंधारण, शिक्षण, संस्कृती, आणि लोककल्याण यांचा समावेश असणारे होते. त्यांनी स्वतःहून तंत्रज्ञान, नवोन्मेष व आधुनिक दृष्टी स्वीकारली.
त्यांच्या राजवटीत भारताच्या आर्थिक व सामाजिक पुनर्जागरणाची पायाभरणी झाली. जलव्यवस्था, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आंतरराष्ट्रीय व्यापार या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
शिवाजी महाराजांनी केवळ शत्रूंना पराभूत केले नाही, तर जनतेला सन्मान आणि स्वाभिमान दिला. त्यांनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्यात धर्मनिरपेक्षता होती, न्याय होता, लोकसामर्थ्य होतं.
आजच्या काळात त्यांच्या आदर्शांवर आधारित शासनप्रणाली अभ्यासण्याची आणि आत्मसात करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे भारताच्या आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी दिशादर्शक तारा आहे.
"छत्रपती" हा केवळ एक किताब नाही, तर तो एक विचार आहे —
एक आदर्श, एक प्रेरणा, एक सत्तेच्या मर्यादा ओळखणारा लोकहितवादी राजा !
"माझं सौभाग्य आहे की मी ‘हिंदवी स्वराज्य’ संकल्पनेचा विचार करू शकलो. या छत्रपतींच्या भूमीत जन्म घेतला.
राष्ट्रध्वजाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असावं, अशी प्रेरणा त्यांच्या कार्यातून मिळते."
जय भारत।
जय शिवाजी।
जय महाराष्ट्र।
✍️ लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव
(संचालक – राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
❤13🔥2👌2
धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....
राष्ट्राचा गौरव ‘छत्रपती शिवाजी महाराज’ लेखक : नी३ प्रमिला दिलीप अहिरराव आज भारताच्या गौरवाची चर्चा देश-विदेशात झपाट्याने सुरू आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या खऱ्या इतिहासाची पुनःस्थापना प्रभावीपणे होत आहे. जनमानसाने इतिहासातील…
माझा लेख आवडला असेल तर तूफान (सर्वत्र) शेयर करा...❤️❤️❤️
❤12👍1
जो इतरांना संपविण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे.
माणसाला दुसऱ्याची वाट लावता-लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा,
माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकती वरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो . चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही....🙇♂️❤️

❤43
मला आवडतं म्हणुन तुलाही आवडायला हवं..
ऐवजी..
तुला आवडतं म्हणुन मलाही आवडतं..
असं म्हणणारं कुणीतरी हवं..!
©️®️✍️ शैलजा ❤️ शब्दशैली
@Shabdshailee
ऐवजी..
तुला आवडतं म्हणुन मलाही आवडतं..
असं म्हणणारं कुणीतरी हवं..!
©️®️✍️ शैलजा ❤️ शब्दशैली
@Shabdshailee
❤3