Telegram Web Link
मुघल साम्राज्य खिळखिळे झालेले असताना, भारतावर राज्य करण्यासाठी इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांच्यात जुंपली होती. यापैकी कोणीतरी भारतावर राज्य करणार, हे पक्के होते. व्यापारी म्हणून ते आले असले, तरी त्यांची आकांक्षा लपून राहिली नव्हती. या तिघांनीही भारतावर तसे राज्य केलेच. इंग्रजांनी तर पूर्ण भारत पादाक्रांत केला. पोर्तुगीजांनी गोवा आपल्या ताब्यात ठेवला. भारत स्वतंत्र झाला, तरीही पुढची दीड दशके गोवा काही पोर्तुगीजांनी सोडला नव्हता. फ्रेंचांनी पॉंडिचेरी आणि तो परिसर आपल्या ताब्यात ठेवला होता. या तिघांनाही भारतावर राज्य करायचे होते. शिवाय, डचही होतेच. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात मुख्य संघर्ष होता. ‘इस्ट इंडिया कंपनी’ जशी इंग्रजांची होती, तशीच फ्रेंचांची ‘फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी’ होती. या दोघांचा मुख्य संघर्ष होता. प्लासीच्या लढाईत इंग्रज विरुद्ध फ्रेंच असा मुकाबला होताच. कारण, बंगालच्या नवाबाला फ्रेंचांचा पाठिंबा होता. मात्र, तोपर्यंत फ्रेंचांची ताकद कमी झाली होती. फ्रेंचांचा निर्णायक पराभव इंग्रजांनी केला, तो अर्कोटच्या लढाईत. अर्कोट तामिळनाडू राज्यात, वेल्लोर जिल्ह्यात आहे. चेन्नईपासून शंभरेक किलोमीटर.

ती लढाई फार इंटरेस्टिंग होती. अठराव्या शतकात दक्षिणेत इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात कर्नाटकी युद्धं पेटली होती. भारतातील व्यापार आणि राजकीय वर्चस्वासाठी तीव्र संघर्ष सुरू होता. या स्पर्धेत जोसेफ फ्रान्स्वा ड्युप्ले हा फ्रेंचांचा महत्त्वाचा सेनानी आणि प्रशासक होता. फ्रेंचांच्या बाजूने चंदासाहिब आणि इतर होते. इंग्रजांचा नेता रॉबर्ट क्लाईव्ह होता. त्याच्या बाजूने अर्कोटचा नवाब होता. १७५१ मध्ये क्लाईव्हने अर्कोटचा किल्ला जिंकला. चंदासाहिबने तो परत मिळवण्यासाठी मोठा वेढा घातला.

वेढ्यात इंग्रजांची संख्या फार कमी होती, पण ते शिस्तबद्ध लढत होते. अवघे काहीशे सैनिक होते इंग्रजांकडे. याउलट फ्रेंचांकडे मात्र हजारो. क्लाइव्हचा हा विजय ब्रिटिशांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. याच लढाईतून इंग्रजांची प्रतिष्ठा उंचावली आणि भारतात ब्रिटिश साम्राज्याची पायाभरणी झाली. त्यानंतर रॉबर्ट क्लाइव्हचे मनोबल एवढे उंचावले की, त्याने सहजपणे प्लासीची लढाई जिंकली. रॉबर्ट क्लाइव्ह हा सेनापती नव्हता. मात्र, तो अट्टल आणि मुत्सद्दी राजकारणी होता. फोडाफोडीच्या राजकारणाचा तो सम्राट होता. प्लासीच्या लढाईत नवाब सिराजउद्दौला याला त्याने पराभूत केले. त्याच्या जवळची माणसे लाच देऊन फोडली. नवाबाकडे मोठे सैन्य होते. त्याचा मेव्हणा मीर जाफर. त्याने इंग्रजांशी गुप्त करार केला. त्यामुळे नवाबाचा पराभव झाला आणि इंग्रजांचा विजय झाला. कुठे कोणाचा उपयोग करायचा, याचे क्लाइव्हला भान होते. मुख्य म्हणजे, त्याला इंग्रज सरकार आणि इस्ट इंडिया कंपनीचा जोरदार पाठिंबा होता. त्यामुळेच मराठा फौज फ्रेंचांना नाही, तर आपल्यालाच मदत करेल, याची काळजी त्याने घेतली असणार.

क्लाइव्हने अर्कोटमध्ये हा जो विजय मिळवला, त्याचे खरे कारण होते मुरारीराव घोरपडे. मुरारीरावांचे राज्य गुट्टी परिसरात होते. (आजचे आंध्र प्रदेश) घोरपडे घराण्याने अनेक पिढ्यांपासून कर्नाटकी भागात सत्ता गाजवली. शौर्य, घोडदळ आणि कठोर शिस्त यामुळे त्यांना वेगळं स्थान मिळालं. या मुरारीराव घोरपडे यांचा त्या अर्थाने ब्रिटिशांशी अथवा फ्रेंचांशी काही संबंध नव्हता. दोघांनीही त्यांना मदत मागितली होती. मात्र, मुरारीराव घोरपडेंनी रॉबर्ट क्लाइव्हला मदत करण्याचा निर्णय घेतला. महाभारतात ज्याप्रमाणे चक्रव्यूह आहे, तसे युद्धतंत्र फ्रेंचांकडे होते. त्याला ‘हॉलो स्क्वेअर’ असे म्हणतात. ज्याला आपण वेढा घातला असं म्हणू शकतो. फ्रेंचांनी वेढा घातल्यानंतर तो चक्रव्यूह भेदून बाहेर पडणे इंग्रजांना अशक्य होते. एक तर, इंग्रजांना हे युद्धतंत्र माहीत नव्हते. रॉबर्ट क्लाइव्ह हा त्या अर्थाने सेनापती नव्हता. इंग्रजांकडे सैनिक आणि साधने अत्यल्प. मात्र, पराक्रमी मुरारीराव घोरपडे यांनी रॉबर्ट क्लाइव्हला मदत केली आणि इतिहास पूर्णपणे बदलून गेला.

क्लाइव्हच्या विजयाचे खरे सूत्रधार होते, आपले मुरारीराव घोरपडे. तशा ओझरत्या नोंदी ब्रिटिश इतिहासकारांनी केल्या आहेत. त्या नोंदींवरून आणि उपलब्ध कागदपत्रांवरून एक विलक्षण पुस्तक इंग्रजीत आकाराला आले आहे. ‘मुरारीराव घोरपडेः द ॲक्सिडेंटल कॅटलिस्ट बिहाइंड रॉबर्ट क्लाइव्हज् मार्च ओव्हर इंडिया’

माझ्या स्नेही रीटा गुप्ता यांनी हे विलक्षण पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे इतिहास आहे. ऐतिहासिक पुराव्यांसह लिहिलेले असे पुस्तक. मात्र, इतिहास मुळातच एवढा नाट्यमय असतो की, तो वाचताना एखाद्या कादंबरीचा अनुभव वाचकांना येतो. कल्पनेच्या भराऱ्या न मारता दस्तावेज आणि कागदपत्रे यातून इतिहास किती उत्तम पद्धतीने मांडता येतो, याचा पुरावा म्हणजे हे पुस्तक.
65🔥8👍3
मुरारीराव घोरपडे हे संताजी-धनाजी जोडीतील संताजी घोरपडे यांचे नातू. मुरारीरावांचे सातवे वंशज इंद्रजित घोरपडे यांनी या पुस्तकासाठी पुढाकार घेतला. घोरपडे मंडळी दक्षिण भारतात गेली. त्यामुळे त्यांचे वंशजही आता तिकडेच असतात. हे सगळे पुरावे एकत्र करणे, कागदपत्रे सांभाळून ठेवणे, त्याचे दस्ताऐवजीकरण करणे हे कठीण काम इंद्रजित घोरपडे यांनी केलं. त्यातून हे विलक्षण पुस्तक इंग्रजीत आलं आहे. ‘इकडून बोलावणं कसं आलं नाही…’, अशा प्रकरणाला आपण इतिहास म्हणतो. डॉक्युमेंटेशन करून, संशोधन करून इतिहास लिहिला गेला, तर काळाचा केवढा मोठा तुकडा समोर येईल! रीटाने फारच मोठे काम केले आहे.

मुरारीराव घोरपडे नसते, तर कदाचित भारतावर फ्रेंचांनी राज्य केलं असतं. किंवा, डचांनीसुद्धा. कारण, प्लासीच्या लढाईनंतर क्लाइव्हला डच आक्रमणाला तोंड द्यावं लागलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजांनी डचांनाही पाणी पाजलं. पुढं हे घडू शकलं, याचं एकमेव कारण म्हणजे मुरारीराव घोरपडे.

एक गंमत बघा. ज्या क्लाइव्हने ब्रिटिशांना भारत जिंकून दिला, त्याला प्लासी जिंकल्यानंतर लंडनमध्ये जाऊन आत्महत्या करावी लागली. तर, ज्या जोसेफ फ्रान्स्वा ड्युप्लेने भारतात फ्रेंच साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्लासीच्या पराभवानंतर फ्रान्सने अतिशय अवमानकारक वागणूक दिली. निराशेच्या खाईत तो पॅरिसमध्ये मरण पावला!

- संजय आवटे
62🙏4🔥3👍1
प्रयत्नांची किंमत ते करणाऱ्यालाच असते.......
इतरांसाठी फक्त निकाल महत्वाचा असतो.......



Good Morning..😊💐💐


@history188
175👍25🎉6
बापू...❤️❤️❤️🙏🙏🙏
106🙏10🥰3🔥2🎉2
आजच्या वर्तमानपत्रातील लेख💐💐💐💐
37
तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे मला आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत झाली....
सर्वांचे खूप खूप धन्यवाद...❤️❤️❤️🙏🙏🙏
🔥12278👍3🎉3🙏3
UPSC उत्तरे जाहीर करणार..
16👍4
प्र 2512) साताऱ्याचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होते?
Anonymous Quiz
22%
प्रबुद्ध भारत
27%
स्वतंत्र भारत
21%
बहिष्कृत भारत
29%
तरुण भारत
31🔥1
2513) खालील पैकी कोणत्या व्यक्तीने 'तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती?
Anonymous Quiz
31%
क्रांतिसिंह नाना पाटील
21%
जी डी बापू लाड
45%
नागनाथ अण्णा नायकवडी
3%
यशवंतराव चव्हाण
29🔥3
2514) खालील पैकी कोणी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला?
Anonymous Quiz
13%
महात्मा फुले
19%
शाहू महाराज
33%
केशवराव जेधे
34%
क्रांतिसिंह नाना पाटील
36👍3🔥2
2515) गोपबंधु चौधरी आणि आचार्य हरिहर दास यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या प्रांतात मीठ सत्याग्रह करण्यात आला
Anonymous Quiz
11%
आसाम
50%
ओरिसा
28%
तमिळनाडू
11%
महाराष्ट्र
11🙏6🔥3
2516) दांडी यात्रेच्या सत्याग्रहाबद्दल खालील पैकी कोणी
उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया ही कविता लिहिली
Anonymous Quiz
22%
ग दि माडगूळकर
34%
आचार्य अत्रे
14%
बालगंधर्व
30%
कवी कुंजविहारी
23🔥3
2517) कळंबुसरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे आदी गावातील हक्काच्या जंगलावरील लाकडे तोडण्यास गावकऱ्यांस विरोध केला
वरील सर्व ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात येतात
Anonymous Quiz
14%
रायगड
39%
रत्नागिरी
37%
यवतमाळ
10%
सातारा
16🔥2👍1🎉1
2518) महादू कातकरी, धाकू गवत्या फोफेरकर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी , रामा बामा कोळी, परशुराम रामा पाटील इ हे सर्व कोणत्या सत्याग्रहात सहभागी झाले होते
Anonymous Quiz
15%
वडाळा मीठ सत्याग्रह
44%
बिळासी जंगल सत्याग्रह
32%
पुसद जंगल सत्याग्रह
9%
चिरनेर जंगल सत्याग्रह
8👍5🔥1
2519) इंग्रज सरकारविरुद्ध भारतातील पहिला जंगल सत्याग्रह 10 जुलै 1930 रोजी.................. तालुक्यातील बेलगव्हाण घाटातील जंगलात झाला होता
Anonymous Quiz
28%
बिळाशी
39%
पुसद
24%
चिरनेर
9%
शिरडोण
👍95
2520) बिहारमधील ..........जवळ पहिली निळीची वखार सुरू झाली?
Anonymous Quiz
16%
पूर्णिया
21%
चितगाव
54%
चंपारण्य
9%
मोतिहारी
👍106
2521) बंगालमधील विचारवंत हरिश्चंद्र मुखर्जी यांनी त्यांच्या ..................या वर्तपतत्रातुन गरीब शेतकर्‍यांच्या दु:खाचे वर्णन करून त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडली
Anonymous Quiz
7%
बंगाली
61%
द हिंदू पॅट्रीयट
26%
आनंद बजार पत्रिका
6%
तत्वकौमुदी
👍126
2522] बंगाल मधील पबना भागात झालेल्या उठावाचे नेतृत्व त्यांनी केले, त्यांना 'विद्रोही राजा' म्हणूनही ओळखले ते खालील पैकी कोण होते
Anonymous Quiz
30%
दिगम्बर विश्वास
34%
इशानचन्द्र रॉय
20%
अली मुस्लियार
17%
स्वामी सहजानंद सरस्वती
👍135
2025/10/26 02:49:52
Back to Top
HTML Embed Code: