Telegram Web Link
59👍10👌5😁1🤔1
46🤔32👍7🙏6👏3👌3😁1
48👍11👏2😁1
🌷उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार🌷

· 🌿        दोन शब्द किंवा दोन वाक्यात जोडणार्‍या शब्दांना 'उभयान्वयी अव्यय' म्हणतात. 

·🌿         उभायान्वयी अव्ययाचे 2 प्रकार पडतात.

1.     समानत्वदर्शक / प्रधानत्वसूचक उभयानव्यी अव्यय   

2.     असमानत्वदर्शक / गौणत्वसूचक उभयानव्यी अव्यय

🌿🌿उभयान्वी अव्यव🌿🌿
46🔥5
🌷समानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय/ प्रधानत्वसूचक :🌷

·         जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्य हे समान दर्जाचे असतात म्हणजे ती वाक्य स्वतंत्र असतात ते एकमेकांवर असलंबून नसतात. अशी वाक्य म्हणून येतात.

·         यांचे पुढील 4 प्रकार पडतात.

🌷🌷समानत्वदर्शक उभयान्वी अव्यव🌷🌷
37👌6🙏1
1. समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय -

·🌿         ही उभयान्वयी दोन स्वतंत्र वाक्यांना जोडतात तसेच पहिल्या विधानात/ वाक्यात आणखी भर टाकण्याचे काम करतात.

·         उदा. व, अन्, आणि आणखी, न, शि, शिवाय, आणिक इत्यादी.

1.     घरी पाहुणे आले आणि लाईट गेली.

2.     राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला.

3.     आज डब्यात भाजी, पोळी आणली अन् लोनचेण आहे.

4.     चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
48👍2
2. विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय -

·         ही उभयान्वयी अव्यये वाक्यातील दिलेल्या गोष्टीपैकी एकालाच पसंती दर्शवतात.

·         उदा. अथवा, वा, की, किंवा, अगर इत्यादी.

1.     तुला चहा हवा की कॉफी ?

2.     करा किंवा मरा.

3.     सिनेमाला येतोस की, घरी जातोस ?
39
3. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय -

·         पहिल्या वाक्यातील कमीपणा किंवा उणीव दर्शवणारे वाक्य या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात.

·         उदा. परंतु, पण, बाकी, किंतु, परी इत्यादी.

1.     मरावे, परी किर्तीरूपी उरावे.

2.     लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते.

3.     त्याने अभ्यास केला, परंतु नापास झाला.
47👍1
4. परिणामबोधक उभयान्वयी अव्यय -

·         पहिल्या वाक्यातील एखाधा गोष्टीचा परिणाम हा समोरील वाक्यात दर्शवण्यासाठी परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरतात.

·         उदा. म्हणून, याकरिता, सबब, यास्वत, तेव्हा, तस्मात इत्यादी.

1.     तू गृहपाठ करीत नाहीस म्हणून तुला शिक्षक रागवतात.

2.     ती नेहमी अभ्यास करते याकरिता ती नेहमी प्रथम येते.

3.     गोडी येतांना बंद पडली, सबब मला उशीर झाला.
42👏4👌3
 🌷🌷असमानत्वदर्शक किंवा गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय :🌷🌷

·         उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यांपैकी एक वाक्य प्रधान व त्याच्या तुलनेत दुसरे वाक्य गौण असते तेव्हा अशा अव्ययांना 'असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय' असे म्हणतात.

·         यांचे पुढील 4 प्रकार पडतात.
33
1. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय -

·         या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे स्वरूप दुसर्‍या वाक्यात कळते.

·         उदा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी.

1.     एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर

2.     तो म्हणाला, की मी हरलो.

3.     मी मान्य करतो की, माझ्याकडून चुकी झाली.

🌷🌷स्वरूपबोधक अव्यव🌷🌷
50
2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय -

·         या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.

·         उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.

1.     चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला गेला.

2.     चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.

🌿🌿उद्देशबोधक अव्यव🌿🌿
39👍3
2. उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय -

·         या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचा उद्देश/हेतु हा गौण वाक्यात कळतो.

·         उदा. म्हणून, सबब, यास्तव, कारण,की इत्यादी.

1.     चांगले उपचार मिळावेत, यास्तव तो मुंबईला गेला.

2.     चांगले गुण मिळावेत, म्हणून ती खूप अभ्यास करते.

🌷🌷उद्देश बोधक अव्यव🌷🌷
36
3. करणबोधक उभयान्वयी अव्यय -

·         या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्याचे कारण हे दुसर्‍या वाक्यामध्ये कळते.

·         उदा. कारण, का, की इत्यादी.

1.     त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत घेतली.

2.     मला गृहशास्त्राची माहिती नाही, कारण की, माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता.

🌷🌷कारणबोधक अव्यव🌷🌷
43👍5
4. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय -

·         या उभयान्वयी अव्ययामुळे एखादी कृती घडण्यामागे विशिष्ट अट सूचित असते. गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम झालेला दिसतो.

·         उदा. जर-तर, जारी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी

1.     जर दळण आणल तर स्वयंपाक होईल.

2.     नोकरी मिळविली म्हणजे गाडी घेऊन देईल.

3.     तू घरी आला की, आपण सिनेमाला जाऊ.       

🌷🌷संकेत बोधक उभयान्वी बोधक🌷🌷
66
2025/07/13 01:29:49
Back to Top
HTML Embed Code: