Telegram Web Link
🌿🌿क) अभ्यस्त शब्द :-    🌿🌿  

एखाद्या शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना 'अभ्यस्त शब्द' असे म्हणतात.     

घरघर, हळूहळू, शेजारीपाजारी, दगडबीगड, यासारख्या शब्दात एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती किंवा वित्व होऊन हे शब्द बनलेले असतात.        

अभ्यस्त म्हणजे वित्व किंवा दुप्पट करणे असा होतो.            

उदा.  

शेजरीपाजारी, किरकिर इ.  
👍1712
🌷अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार असतात.     

१) पूर्णाभ्यस्त शब्द :-          

एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येवून एक जोडशब्द बनतो तेंव्हा त्याला पुर्नाभ्यस्त शब्द असे म्हणतात.         

उदा.     

जो जो, क्षणक्षण, आतल्या आत, कळकळ, मळमळ, बडबड, बारीक बारीक, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.
👍162
🌿🌿२) अंशाभ्यस्त शब्द :-   🌿🌿 

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदाहरणार्थ  

अदलाबदल, उभाआडवा, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, दगडबिगड, घरबीर, शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्धामुर्धा, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडूकमिडूक, घरबीर, उद्याबिया इत्यादी      
👍113
कधी कधी पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून विरुक्ती होते.  

उदाहरणार्थ  

कागदपत्रे, कामगाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा इत्यादी            

फारसी + फारसी = अक्कलहुशारी, डावपेच, जुलूमजबरी  

फारसी + मराठी = अंमलबजावणी, कागदपत्रे, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट इत्यादी  

मराठी + फारसी = दंगामस्ती, थटामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज,
👍169🔥3
🌿🌿३) अनुकरणवाचक शब्द :-  

ज्या शब्दांमध्ये एखाद्या ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. काही शब्दात एखाद्या ध्वनीवाचक शब्दाची पुनुरुक्ती साधलेली असते.     

उदाहरणार्थ  

बडबड, किरकिर, गुटगुटीत, कडकडाट, गडगडाट, फडफड, खदखदून, तुरुतुरु, चूटचूट, गडगड, वटवट अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द असे म्हणतात. 
👍227🤔2👌1
ड) सामासिक शब्द :-

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्या शब्दाला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.         

उदा.  

देवघर, पोळपाट इ. 

 
👍368
1156)पुढीलपैकी कोणते दोन वर्ण जोडाक्षरे आहेत?
Anonymous Quiz
6%
1)ग ,घ
13%
2)ज,झ
10%
3)प,फ
72%
4)क्ष ,ज्ञ
👍4419🙏12👌9
1157)मराठी भाषेत मूळ सर्वानामे किती आहेत?
Anonymous Quiz
29%
1)12
55%
2)09
8%
3)15
7%
4)07
👍4116🤔4👌2
1158)सजातीय स्वर जोडी ओळखा?
Anonymous Quiz
65%
1) उ ऊ
18%
2)अ इ
10%
3)इ ए
7%
4)अ ई
👍3914🙏9👌6🔥1
1159)खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा
Anonymous Quiz
48%
1)प्
31%
2)ख्
14%
3)भ
7%
4)ध
👍2516👌14🤔11😢1
1160)अं आणि अःयाना काय म्हणतात?
Anonymous Quiz
65%
1)स्वरादी
22%
2)अनुस्वार
9%
3)स्वर
4%
4)मूलवर्ण
👍4014🔥5
🌷🌷अलंकार 🌷🌷

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात.  

अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.  

उदा.

ढगांशी वारा झुंजला रे

काळाकाळा कापुस पिंजला रे

आतां तुझी पाळी, वीज देते टाळी

फुलव पिसारा नाच !              
👍538🔥4
🌷🌷भाषेचे अलंकार :-🌷🌷

🌿भाषेला ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.  

🌷केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो.                

🌷केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.                
👍303🔥1🙏1
🌿भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार पडतात.     🌿     

१. शब्दालंकार  

२. अर्थालंकार         

🌺शब्दालंकार🌺         

शब्दालंकार अलंकाराचे तीन उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे

अ) अनुप्रास अलंकार :-  

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेंव्हा त्याला सौदर्य प्राप्त होते तेंव्हा अनुप्रास हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ            

गडद गडद निळे जलद भरुनी आले, 

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले.            

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।

गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।       
👍7019🤔8🔥6
🌿ब) यमक अलंकार :-

कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक या अलंकार होतो.          

उदाहरणार्थ              

राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी

फळा आली माय । मायेची पाठवणी
👍2210🙏5
🌿पुष्पयमक या यमकाचे उदाहरण

सुसंगती सदा घडो,  

सृजनवाक्य कानी पडो, 

कलंक मातीचा झडो, 

विषय सर्वथा नावडो
👍306
🌿दामयमक या यमकाचे उदाहरण

आला वसंत कवीकोकील हाही आला, 

आलापितो सुचवितो अरुणोदयाला
👍202
🌿क) श्लेष अलंकार :-         

वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो.

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेंव्हा शब्दचमत्कृती साधते तेंव्हा श्लेष हा अलंकार होतो.     

उदाहरणार्थ

मित्राच्या उद्याने कोणाला आनंद होत नाही.- अभंग श्लेष

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.- अभंग श्लेष          

ते शीतललोपचारे जागी झाले हळूच मग बोले

औषध नलगे मजला, परिसुनी माता बरे म्हणुनी डौले- अभंग श्लेष

श्रीकृष्ण नवरा मी नवरी  

शिशुपाल नवरा मी न-वरी- सभंग श्लेष  

कुस्करु नका ही सुमने  

जरी वास नसे तीळ यास, तरी तुम्हास अर्पिली सु-मने- सभंग श्लेष            

वरील ओळींमधील नवरी, न-वरी, सुमने, सु-मने, नलगे, न-लगे अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात या प्रकारच्या श्लेषाला सभंग श्लेष व एकच शब्द जसाच तसा ठेवून त्याचे दोन अर्थ संभवतात त्यास अभंग श्लेष म्हणतात.           

श्लेष हा शब्दालंकार आहे आणि अर्थालंकार ही आहे.
25👍24
🌺अर्थालंकार🌺

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

१) उपमा अलंकार :-

दोन वस्तूतील साम्य चमत्कृतीपूर्णरीतीने जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा हा अलंकार होतो.

उदाहरणार्थ  

अ) मुंबईची घरे मात्र लहान, कबुतराच्या खुराड्यासारखी 

आ) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी 

इ) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 
👍18🔥32
🌷२) उत्प्रेक्षा अलंकार :- 🌷

उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यातील एक म्हणजेच उपमेय हि जणू काही दुसरी वस्तूच म्हणजेच उपमानच आहे, अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा म्हणतात.

उदाहरणार्थ

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू.

अत्रीच्या आश्रमी, नेले मज वाटे, माहेरची वाटे, खरेखुरे

किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी मजेदार  

शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले  

अर्धपायी पंढरीशी विजार, गमे विहंगातीत बडा फौजदार
👍146🔥1
2025/07/13 16:45:11
Back to Top
HTML Embed Code: