नमस्कार साहित्य जागर. जागर लेखमालेत आज वाचूया ,
“दोष हा कुणाचा?” –

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..!
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात.
पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्या तोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात.
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का?
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो.
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!

समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तरी ‘अच्छे दिन’ नक्कीच येतील...!

©️मयुरेश डंके
यावर तुमची प्रतिक्रिया लिहा 😊
सॅनिटरी पॅड (खूप सुंदर गोष्ट नक्की वाचा)

माणूस मेडिकल जाऊन बिनधास्तपणे कंडोम मागू शकतो
तर मग स्वतःच्या पत्नीसाठी पॅड मागायला कसली लाज वाटते .


पहाटेचे अडीच वाजायला आले होते, अमोली उठून बाथरूमला गेली, परत येऊन तिने बेडरूमची छोटी लाईट चालू केली आणि तिच्या कपड्याच्या कपाटात ती काहीतरी शोधू लागली. तिची शोधाशोध बराच वेळ चालू होती.
हळूहळू माझ्या डोळ्यावरची झोप कमी होत होती. मला त्या लाईटच्या प्रकाशाचा ञास होऊ लागला. मी चिडून तिला म्हणालो. ” आग झोप ना, काय करतं बसली आहेस एवढ्या रात्री?” त्यावर ती माझ्याकडे पहात. ” काही नाही रे !” एवढंच बोलली, आणि परत कपड्याच्या ढीगाऱ्यात काहीतरी शोधू लागली. सगळीकडे शोधून झाल्यावर हताश होऊन तिने कपाटाचे दारं बंद केले आणि बेडजवळ येऊन मला म्हणाली.
“वेदू अरे मला पीरियड आली आहे.” अमोलीच ते वाक्य कानावर पडल्या बरोबर मी प्रश्नार्थक नजरेनी तिला पाहत ” मग? ” एवढच म्हणालो. ती अपराधीपणे माझ्याकडे पाहत मला म्हणाली. “अरे पॅड नाही घरात एक पण, प्लीज रोडवरच्या मेडिकलवर जाऊन घेऊन येतोस का?“ मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला म्हणालो. “अमोली आग किती वाजले आहेत बघ जरा ! सॉरी यार मी नाही जाऊ शकत.” एवढं बोलून मी खाली सरकलेली चादर अंगावर ओढली आणि अमोली कडे पाठ फिरवली.
पीरियडमुळे अवघडलेली अमोली क्षणभर विचार करतं जागेवरच थांबली. मी हेतुपुरस्सर तिच्याकडे दुर्लक्ष केलं.पुन्हा ती तिच्या कपाटाकडे जाऊन काहीतरी उचकपाचक करतं असल्याच मला जाणवलं. कांही वेळानी कात्रीने कापड कापल्याचा आवाज माझ्या कानावर पडला, साधारण पाच मिनिटाचा अवधी निघून गेला. तिने काय केलं मला काही कळलं नाही, लाईट बंद करून ती माझ्या बाजूला येऊन झोपली.
माझी पाठ तिच्या बाजूला होती. ती माझ्या पाठीलाच बिलगली आणि आपले ओठ माझ्या कानाजवळ आणून हळू आवाजात मला म्हणाली. “वेद प्लीज मला जवळ घे ना !” झोप अर्धवट झाल्यामुळे माझी चिडचिड झाली होती. माझ्या अंगावरचा अमोलीचा हात बाजूला करतं मी जरा चिडक्या स्वरातच तिला म्हणालो “अमोली झोपू दे यार मला, बाजूला हो !” अमोली निमूटपणे माझ्यापासून बाजूला झाली आणि आपल्या दोन्ही हाताची बोटं छातीवर एकमेकात गुंफून छताकडे पाहत तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला.
माझ्या डोळ्यावरची झोप आता पूर्णपणे नाहीशी झाली होती . उगीच डोळे बंद करून झोपेची वाट बघत होतो . एकदम अमोलीच्या विव्हळण्याचा आवाज आला म्हणून मी कूस बदलून तिच्याकडे पाहिलं , आता तिची पाठ माझ्याकडे होती . गुडघ्यात पाय दुमडून तिने आपलं पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होत . शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर अमोली शांत पहूडली होती .
मधेच पोटावरचा तिचा हात कंबरेवर फिरतं होता.ती आपल्याच हाताने कंबरेवर दाब देत होती . हळू - हळू पिरियड चा त्रास तिला जाणवत होता . तिचं विव्हळणं चालूच होत . अमोलीच्या या दुखण्याला मी काय करणार ! असा विचार करून , मी आपला गुपचूप डोळे लावून पडून राहिलो . ती पुन्हा माझ्या जवळ आली आणि वेद sss वेद , म्हणून मला दोन वेळेस आवाज दिला . मी आपलं झोपेतून उठल्याच सोंग केलं तेंव्हा अमोली खालावलेल्या स्वरातच मला म्हणाली , “ माझी कंबर खूप दुखतेय दाबून देतोस का ?
मी कपाळावर आठ्यांच जाळं पसरून अमोलीकडे पाहत तिला म्हणालो , " अमोली sss , सकाळी ऑफिस आहे मला . झोपूदे ना शांततेत . माझ्या त्या उत्तराने अमोली अबोल झाली . तिच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा मला अंधारातही स्पष्ट दिसून आल्या . मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःला चादरीत गुंडाळून घेतले .
माझ्या मोबाईलवर सहाचा अलार्म वाजला तशी मला जाग आली . मी उठून बेडवर बसलो आणि माझं लक्ष अमोलीवर गेलं . समोरच दृश्य बघून मला गरगरल्या सारखच झालं . मागच्या बाजूने अमोलीचा गाऊन रक्ताने ओलाचिंब झाला होता , खालच्या बेडशीटलाही रक्त लागलं होत . अमोली मात्र गाढ झोपेत होती . माझी नजर तिच्या चेहरयावर स्थिरावली , तिचा चेहरा निस्तेज दिसत होता .
पहाटे तिला बराच त्रास झाला असावा , कदाचित तिला आताच शांत झोप लागली असेल . असा विचार माझ्या मनात चालू होता पण समोरचे रक्ताचे डाग बघून अमोलीचा रागही आला होता . मी अमोली sss म्हणून जरा रागानेच तिला आवाज दिला . शांत झोपलेली अमोली माझ्या आवाजाने दचकून जागी झाली . रक्ताने डागाळलेल्या बेडशीट कडे हात दाखवून , ” हे काय आहे ? " म्हणून मी तीला विचारले . अमोलीने ते बेडशीटवरचे रक्ताचे डाग , स्वतःचा गाऊन सगळं पाहिलं , ते बघून तिला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं . कशीतरी माझ्या नजरेला नजर देत ती म्हणाली , मी काय करू वेद मला नाही रे कापड घेता येतं , तुला म्हटलं होतं मला पॅड आणून दे . जा ना प्लीज आता तरी घेऊन ये ! " तिच्या या बोलण्यावर माझं डोकंच सरकलं , जवळ जवळ मी तिच्या अंगावरच जात तिला म्हणालो , मुर्खासारख काहीही काय काम संगतीयेस ग ? तुझं तू घेऊन ये ना जाऊन , तुला ह्या असल्या गोष्टी जरा आधी आणून ठेवायला काय होतं ?
डेट्स माहिती नसतात का स्वतःच्या स्वतःला ? " अमोली शांतपणे बेडशिट काढतं होती . मी कसलाही विचार न करता फाडफाड बोलून टॉयलेट मध्ये निघून गेलो . दहा मिनिटांनी परत आलो तेंव्हा बेड आणि अमोली दोघेही चकचकीत झाले होते आणि अमोली किचन मध्ये माझा टिफिन तयार करत होती . मी माझ्या तोऱ्यातच अंघोळीला निघून गेलो . सगळं आटोपून रोजच्यासारखं जाऊन डायनींग टेबल वर बसलो . अमोलीन गरमागरम उपीट पुढ्यात आणून ठेवलं . ते पोटात ढकलून मी जायला निघालो , टिफिन घायला किचन मध्ये गेलो अमोली पोळ्या करतं होती . ती पाठमोरी उभी होती .
मी काहीतरी घ्यायला म्हणून सहजचं खाली वाकलो तेंव्हा माझं लक्ष तिच्या पायावर आलेला रक्ताच्या ओघळाने वेधून घेतलं . अमोलची टाच त्या रक्ताने लालबुंद झाली होती . पुन्हा माझा रागाचा पारा चढला , मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतं घराबाहेर पडलो .
ऑफिसला आलो होतो पण मन लागतं नव्हतं . परत - परत अमोलीचा चेहराच समोर येतं होता . किती विश्वासाने तिने माझ्याशी लग्न केलं होतं . केवळ दोनच वर्ष झाली होती आमच्या लग्नाला . ती माझी कित्ती काळजी घेते . मला काय हवं , काय नको हे तिला चांगलं ठाऊक आहे . आजपर्यंत ती कधीच माझ्या मनाच्या विरुद्ध वागली नाही . माझ्या तब्बेतीची तर माझ्यापेक्षा तीलाच जास्ती काळजी असते .
आजही चांगला आठवतोय मला मागच्या वर्षीचा एक किस्सा . किती पाऊस पडतं होता त्या रात्री , मी तापाने फणफणत होतो , रात्र बरीच झाली होती . अमोली सारखं माझं अंग थंड पाण्यानी पुसत होती . मधेच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती . तिची नुसती तगमग चालू होती . पाऊस काही उघडायचं नावं घेत नव्हता . ती त्या पावसात मी आलेच म्हणून घराबाहेर पडली आणि तेवढ्या रात्री जाऊन तिने माझ्यासाठी मेडिकल वरून औषध आणली होती . औषध देऊन मला लहान मुलासारखं जवळ घेऊन झोपली होती . मलाही तिच्या उबदार कुशीत तेंव्हा चांगली झोप लागली होती .
हे सगळं मला आठवतं होतं . मी आमोली सोबत रात्री पासून असा का वागलो याच उत्तर मात्र मला सापडतं नव्हतं . केवळ तिने मला सॅनिटरी पॅड आणायला सांगितले म्हणून तर नाही ना आपण असे वागलो तिच्याशी ? हा प्रश्न मी माझ्या अंतरमनाला विचारला तेंव्हा आतून त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं . हो तिने तुला पॅड आणायला सांगितले म्हणूनच तुझा पुरुषी अहंकार दुखावला . पॅड आणणे हे काय पुरुषाचे काम आहे का ? परत तो पुरुषी अहंकार मला हेच सांगत होता . मी क्षणात त्याला बाहेर ओढला आणि पायाखाली घालून कचकच तुडवला . अमोलीचा निस्तेज चेहरा मला समोर दिसत होता . रात्री तिला मी पॅड आणून दयायला पाहिजे होते . तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं , तिची कंबर दाबून दयायला पाहिजे होती . सकाळी किती ब्लडींग झालं होतं तरीही तिने मला नास्ता , टिफिन दिलाच ना , पण मी तिच्यासाठी जाऊन पॅड नाही आणू शकलो , मग खरंच मी नक्की पुरुष आहे का ? हाच मला प्रश्न पडला .
कसली लाज होती मला जाऊन पॅड मागायला .
मेडिकल मध्ये स्त्री असली तरी वर तोंड करून मी तिला कंडोम मागतोय की . मग पॅड मागायला कसली लाज होती .
अमोलीला थोडंच माहित होतं आज पिरियड येणार आहेत म्हणून , बरं असेलही कदाचित तिची तारीख . घरात पॅड आहेत म्हणून आणायचे विसरली असेल ती . डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता . अमोली काही नजरेसमोरून बाजूला जात नव्हती , बॅग घेतली आणि तडक घराकडे निघालो . जाता - जाता एका मेडिकलवर थांबलो आणि तिथून एक भला मोठा सॅनिटरी पॅड चा पॅक घेतला .
तेवढा मोठा पॅक माझ्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसतं होते . तर बायकांचा प्रतिसाद संमिश्र मिळत होता . कुणाला माझा हेवा वाटतं होता , तर कुणाच्या चेहऱ्यावर बायकोचा बैल असं स्पष्ट दिसतं होतं . मी सगळ्यांना दुर्लक्षित करून डोअर बेल वाजवली . अमोलीने दार उघडलं . ती खूप थकली होती . मी तो भला मोठा पॅक सोफ्यावर ठेऊन अमोलीला जवळ घेतलं प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या माथ्यावर एक चुंबन घेऊन तिला ' सॉरी अमोली " म्हणालो तेंव्हा तिच्या डोळ्यातले आनंदाश्रू मोत्यासारखे माझ्या छातीवर पडतं होते .
अमोलीने तो सोफ्यावरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्या जवळ घेतला . मी मनाशी ठरवून टाकलं . या चार दिवसात अमोलीला कसलाच त्रास द्यायचा नाही . तिचं अंग चेपून द्यायच , जेवढं जमत तेवढ आपण तिला खायला करून द्यायच . शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल . जोडीदार असतो कश्याला ? एकमेकांची सुखदुःख वाटून घायलाच ना ? माझी ही कथा वाचून एक जरी पुरुष त्या चार दिवसात स्त्रीला जपू लागला तर ही कथा लिहिण्यामागचा माझा हेतू संपन्न झाला असे मी समजेन .

लेखक( अज्ञात )
*"मृत्यु" महत्वाचा संदेश पूर्ण वाचा, नाहीतर "मृत्यू" अटळ आहे फक्त पुढील ३ वर्ष.*

▶️ होय मी इथे "मृत्यू" हा शब्द वापरत आहे कारण ते सत्य आहे ग्लोबल वॉर्मिंग घेत आहे आपल्या पिढीचा वेध मित्रांनो सांगण्यास दुःख होत आहे की पुढील तीन वर्षांमध्ये भारताच्या वातावरण मध्ये प्रचंड असा बदल होणार आहे आणि तोच बदल ठरणार आहे भावी पिढीच्या मृत्यूला कारण.

▶️ सोबत मी एक इमेज जोडली आहे त्यामध्ये आपण बघू शकतो वातावरणातील बदल आणि ह्या आठवड्यामध्ये जगामध्ये भारताचे तापमान हे तिसऱ्या स्थानावर सर्वात आधिक आहे ते म्हणजे 44.5°C. म्यानमार, थायलंड यांसारख्या छोट्या देशांनंतर भारतासारखा मोठ्या देशांमध्ये ही अवस्था असणे म्हणजे अतिशय धोक्याची घंटा आहे. त्यामुळे वरती जसा मी बोललो की मृत्यू अटळ आहे आणि ते सत्य आहे.

▶️ सदर इमेज मध्ये आपण आपला भारत देश पूर्णतः उष्णतेमुळे गडद लाल झाला आहे त्यामुळे जगाच्या पाठीवर सर्वात जास्त तापलेलं देश म्हणजे भारत आणि वेळेत जागे झालो नाही तर तो रंग जो दिसत आहे तो पुढील तीन ते चार वर्षांनंतर भारतातील स्मशानामध्ये पाहायला मिळेल.

▶️ आता आपण बोनस जीवन जगत आहोत कारण तापमान वाढ ही धोक्याची पातळी ओलांडलेली आहे अजून देखील पुढील तीन वर्ष आपल्याजवळ वेळ आहे त्या वेळेत जर आपण अधिक वृक्ष, जंगल, पर्यावरण संवर्धन याकडे जर लक्ष दिले तरच पुढील तीन वर्षानंतर आपले जीवन जगणे शक्य आहे.

▶️ तीन वर्षांमध्ये आपण जर पर्यावरणाशी होणारी हानी रोखली नाही तर भविष्यामध्ये प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे वृक्षांच किंवा शेतीमधील पिकांचे बिजांकुरण होणार नाही आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पॉलिहाऊस शीवाय पर्याय राहणार नाही. तसेच प्रचंड तापमान वाढीमुळे पाण्याची देखील मोठी समस्या निर्माण होणार आहे.

▶️ आपण कितीही श्रीमंत असलो तरी निसर्गापुढे आपण निमित्त मात्र आहोत हे आपल्याला समजायला हवे आणि त्यानुसार विचार करायला हवा. वारे माप संपत्ती आपण जमवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत पण जर निसर्ग आणि पर्यावरण संतुलित नसेल तर आपल्याला ऑक्सीजन देखील मिळणार नाही आणि वातावरणातील तापमानामुळे त्यांच्यासाठी संपत्ती कमवत आहात त्यांनाच जगणे मुश्किल होणार आहे. आर्थिक संपत्ती पेक्षा ही हरित संपत्ती कडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे.

▶️ मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आपल्या देशाच्या वातावरणामध्ये प्रचंड बदल झाला आहे तापमान हे दहा अंश सेल्सिअसणे वाढल आहे. मागील दहा पंधरा वर्षांपूर्वी हेच तापमान 37-38 सेल्सिअस एवढे असायचे. आता काही शहरांमध्ये 50 अंश सेल्सिअस येवढी तापमान वाढ नोंदवली जाणार आहे. याला कारणीभूत आहे तो फक्त स्वार्थी वृत्तीचा मनुष्य प्राणी. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असलेली वृक्षतोड तसेच अवैध जंगलतोड.

▶️ जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चढाओढ करण्या च्या शर्यतीमध्ये देशातील पर्यावरणाचा पूर्णतः बिमोड होत आहे. नद्यांच्या गटारी झाल्या आहेत, शहरांमध्ये श्वास घेणे मुश्किल झाला आहे सर्वत्र प्रदूषणाने विळखा घातला आहे.

▶️ या सर्वांची प्रचिती म्हणजे विविध प्रकारची रोगराई, शेती साठी पूरक वातावरण नाही , पाऊस वेळेवर होत नाही. आत्ताच जर आपण जागे झालो नाही तर पाच वर्षानंतर मृत्यू अटळ आहे.

▶️ देशातील परिस्थिती बघितली तर पर्यावरण सारखी प्रमुख बाब दुर्लक्षित आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कितीतरी अवैध उद्योगधंदे आहेत त्यामधून हवेचे तसेच नद्यांचे देखील प्रचंड प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे.

▶️ दुसरी बाजू म्हणजे नागरिकांना देखील सदर विषयाची म्हणावी तेवढी जाणीव नाही. पर्यावरणाचे संवर्धन केले तरच निरोगी व संपन्न जीवन होईल. आपल्या संतांनी पाचशे वर्षांपूर्वी देखील सांगितले आहे.
👇👇
*जागे व्हा, मृत्यू अटळ आहे.*
🌲🌿🌳🌳

*वरील पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी, या सामाजिक कार्यात आपलाही हातभार लागेल धन्यवाद* 👏👏
🔵🔴🟢🟠♥️♥️🔥🔥👇👇👇

आपल्या चॅनलवरील सर्व सदस्यांना एक महत्त्वाची सूचना आपल्या चॅनलवर जेवढी पुस्तके आहेत त्यातली आपली आवडती पुस्तके जास्तीत जास्त फॉरवर्ड करून किंवा आपल्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवा कारण काही कारणास्तव आपल्याला पुस्तके डिलीट करावे लागत आहेत आपल्या मागणीनुसार पुन्हा अपलोड केली जातील तर लवकरात लवकर सर्वांनी पुस्तके आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा तसेच जतन करून ठेवा.
अति महत्वाचे! एक वेळ अवश्य वाचा!

यावर आपले मत, प्रतिक्रिया,सुचना, काही सुधारणा असल्यास जरूर कमेंट करा.

नमस्कार मंडळी,
साडेसात हजार पेक्षा जास्त सदस्यांचा आपला ग्रुप आहे. आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण विविध सुंदर सुंदर संकलित लेख प्रसारित करत असतो. हे लेख वाचून आपल्या ज्ञानात भर पडत असते.

तसेच आपल्या देशात महत्त्वाचं म्हणजे लैंगिक शिक्षणाचा खुपचं अभाव आहे. याचं कारण म्हणजे लैंगिक विषयावर उघडपणे चर्चा केली जात नाही त्याबद्दल बोलले जात नाही. लैंगिक शिक्षण काळाची गरज आहे. ती गरज का आहे त्याचं कारण म्हणजे लैंगिक संबंधाविषयी अज्ञान या अज्ञानामुळे होणारे विविध आजार आणि त्याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम.

खरंतर या विषयावर लिहायला भरपूर प्रमाणात आहे पण आपण त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार केले आहे.

लैंगिकतेवर आपल्याला पडणारे विविध प्रश्नांचे समाधान आपल्याला मिळावे यासाठी हा प्रयत्न.

लैंगिकतेविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून चॅनल जॉईन करा.

https://www.tg-me.com/sexeducationalinfo
*🙏वारी!🙏*

आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले.
मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली होती.
डॉक्टर गोडबोले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर.
कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं.
आणि डेक्कनला बंगला.
प्रॅक्टिस जोरात चालली होती.
आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच.
या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली.
दोघांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही.
माणूस एकदम उमदा. 
एवढा यशस्वी डॉक्टर असूनही
अहंकाराचा स्पर्श नाही.
एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात तसा.
त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला.
एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करावं लागलं.
त्यावेळी या माणसाला
अजून जवळून पाहता आलं.
हसत खेळत, मिश्किल टिप्पण्या करत आलेल्या पेशंटचा अर्धा आजार पळवून लावत ते.
हॉस्पिटल मध्ये
दोन बेड राखीव ठेवले होते.
अगदी गरीब रुग्णांसाठी.
उगीच महागड्या चाचण्या नाही.
अव्वाच्या सव्वा बिल नाहीत.
सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला.
वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत.
हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी, दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत.
जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत.
गरजूंवर मोफत उपचार करत.
शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत.
या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहत.
त्यांच्यात बसून जेवत खात.
गप्पा मारत.
हे सगळं मला
त्यांच्या मदतनिसाने सांगितलं.
म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं.
फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली.

माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो.
गप्पांच्या ओघात मी म्हणालो,
"डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे.
इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची ते ही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोप्पं नाही.
परत या कानाची त्या कानाला खबर नाही.
खरंच ग्रेट आहात तुम्ही!"
डॉक्टर हसले. म्हणाले,
"यामागे काही कारण आहे.
तुला इच्छा असेल तर ऐकवतो."
मी म्हणालो,
"सांगा ना डॉक्टर.
मला खूप उत्सुकता आहे."
डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.
"दहा वर्षांपूर्वी मी असा नव्हतो.
प्रॅक्टिस चांगली चालली होती.
भरपूर पैसा कमवत होतो.
फार्म हाऊस, फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो.
हॉटेलिंग,  परदेश वाऱ्या, मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिम्बॉलच्या मागे धावत होतो.
फोटो काढायचे.
त्यांचं प्रदर्शन भरवायच.
वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची.
आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या हे आयुष्य होतं माझं.
अशातच डोक्यात आलं
वारीच्या मार्गावर फोटो काढावेत. 
माझा महागडा कॅमेरा घेऊन
मी गाडी घेऊन निघालो.
रस्त्यात अनवाणी चालणारे, पावसात भिजणारे, मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी,
असे वेगवेगळे फोटो काढत होतो.
ते वारकरी माझ्याशी
गप्पा मारायला बघायचे.
मला त्यांच्यात जेवायला बोलवायचे.
भजनाला बोलवायचे.
पण त्या गरीब फाटक्या माणसांमध्ये मिसळण माझ्या स्टेटसला शोभणार नव्हतं.
मी त्यातल्या त्यात एखादं
चांगलं हॉटेल बघून जेवायचो. झोपायचो.
अशाच एका मुक्कामी मला
*आबा पाटील* भेटले.
सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत,
गप्पा मारत, अभंग म्हणत त्यांच्या बरोबरीने पडतील ती कामं करत होते.
मी फोटो काढत असताना
ते माझ्याजवळ आले.
स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा आग्रह करू लागले.
मी झिडकारून लावल्यावरही
न रागावता माझ्याशी बोलत राहिले.
पण मी फार प्रतिसाद दिला नाही.
नंतरही अधून मधून
ते भेटत राहिले मला.
शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुंवाधार पाऊस सुरू झाला. आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली.
मी पावसात उभा राहून
काही करता येतय का ते बघितलं.
पण गाडी काही सुरू झाली नाही.
मी मात्र चिंब भिजलो होतो.
शेवटी कॅमेरा गाडीत ठेऊन गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो.
गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो.
कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत.
त्यामुळे तसच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं.
थंडी वाजून ताप भरला. 
गावाकडे यायच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं.
तसाच कुडकुडत बसलो होतो.
तेवढयात आबा पाटील देवळात शिरले.
माझी अवस्था
बघून माझ्याजवळ आले.
म्हणाले कपडे तरी बदलून घ्या.
म्हटलं गाडीत आहेत.
तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो.
पण विचार केला कोण
कुठला अडाणी माणूस हा ! 
याला गाडीची चावी कशी देऊ ?
त्यांना माझे विचार कळले असावेत.
त्यांनी त्यांच्या गाठोड्यातला
सदरा आणि धोतर काढून दिलं.
म्हणाले हे घाला. ओले बसू नका.
मी नाईलाजाने कपडे बदलले.
त्यांनी त्यांच्याकडची
तापाची गोळी दिली.
मी जेवलो का याची चौकशी केली.
मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला.
मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यानी चूल पेटवली होती.
त्यातच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली.
खाऊन गोळी घेतल्यावर
मला थोडं बरं वाटलं.
पाटील बाजूलाच बसून राहिले होते.
आता मला
त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली.
कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो किती वर्ष वारी करताय?
तर म्हणाले आई बापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून.
एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी.
माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती.
त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो,
“मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलंत.”
ते हसले आणि म्हणाले,
“आज साठ पासष्ट वर्ष वारी करतो आहे. अशा कारणांवरून रागावलो तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची.
वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो.
*इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो.*
*माणसं कळायला लागतात.*
*आपण कुठे आहोत ते समजतं.*
*एकमेकाशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात.*
*मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते.*
*दुसऱ्याला सांभाळून*
*कसं घ्यायचं हे कळतं.*
*वारी म्हणजे*
*माणुसकीची शाळा असते.*
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
*अहंकार गळून जातो.*
*मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात रहात नाही.*
आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना !
*इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात.*
*दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते.*
*आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.”*

त्यांचं हे बोलणं ऐकून
मी खजील झालो होतो.
आता परत
ताप चढायला लागला होता.
घरी जाणं गरजेचं होतं.
पण गाडी चालवायची
ताकद माझ्यात नव्हती.
आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला.
मग मला म्हणाले रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची.
मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले
माझा मुलगा येतोय गाडी घेऊन. मी म्हणालो,
“तुमच्याकडे गाडी आहे ?”
ते हसायला लागले.
म्हणाले,
तीन आहेत.
भली मोठी शेती आहे.
फळबागा आहेत.
एक मुलगा आणि सून डॉक्टर आहेत.
गावातच  प्रॅक्टीस करतात.
दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवेनवे प्रयोग करतो.
तो आल्यापासून पिकं जोमदार येतात. फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो”.
माझं तोंड अजूनच वासलं.
*एवढं सगळं असूनही तुम्ही या लोकांबरोबर राहता खाता?*
ते म्हणाले,
*“अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत. स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं”*
रात्री गाडी आली.
मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले.
मी म्हणालो,
“अहो उद्या तुम्हाला दर्शन
घ्यायचं आहे पांडुरंगाचं.
तुम्ही कशाला येता.
वारी अर्धवट राहील तुमची.
पांडुरंग रागवेल.”
तसे खोखो हसत म्हणाले,
*“अहो देव आहे तो.*
*रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा?*
मुलगा गाडी चालवेल.
तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल? म्हणून येतो.
आणि दर्शनाच म्हणाल तर
*तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही.*
तुम्ही निर्धास्त रहा.
मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बाप लेक लगेच घरी निघाले.
आग्रह करूनही थांबले नाही.
दोन दिवसांनी त्यांचा फोन आला.
माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले,
*“तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला.”*
मी स्तब्ध झालो.
*त्या एका वारीनी माझं आयुष्य माझी मतं संपूर्ण बदलून टाकली.*
माझ्या विचारांची मलाच
लाज वाटायला लागली.
तेव्हापासून मी बदललो.
आणि दरवर्षी वारीत जाऊन त्या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो.
*जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली.”*

डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो.
नकळत पांडुरंगाला हात जोडले.
बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला. 
*विठ्ठल विठ्ठल !!*
*विठ्ठल विठ्ठल !!*


*आपणा प्रत्येकाच्या जीवनात कठीण प्रसंगी पांडुरंग हजर असतोच, आणि याची जाणीव आपल्याला काही काळानंतर होत असते!*
🙏🌿🛕🌿🙏
तुम्हाला जे पुस्तक पाहिजे त्या पुस्तकाची मागणी करा उपलब्ध असल्यास अवश्य मिळेल
मागणी करण्यासाठी डिस्कशन ग्रुप जॉईन करा किंवा इथे मेसेज करा 👉
@Pdfbooks00bot
पुस्तकाची मागणी करण्यासाठी खालील फॉरमॅट वापरा
# Request

पुस्तकाच नाव-

लेखक - 

प्रकाशन - 

भाषा -

Format - pdf or epub
मराठी पुस्तके📚हिंदी पुस्तके📚📚 English Books pinned «पुस्तकाची मागणी करण्यासाठी खालील फॉरमॅट वापरा # Request पुस्तकाच नाव- लेखक -  प्रकाशन -  भाषा - Format - pdf or epub»
👇👇👇❗️❗️❗️❗️❗️⚠️⚠️⚠️

सर्व सदस्यांना महत्वाची सूचना चॅनलवर टाकण्यात येणारी पुस्तके लवकरात लवकर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा किंवा आपल्या मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करून ठेवा कारण ती इथून डिलीट करावी लागतात कॉपीराईटमुळे.
Messages in this channel will be automatically deleted after 1 day
👇👇👇❗️❗️❗️❗️❗️⚠️⚠️⚠️

सर्व सदस्यांना महत्वाची सूचना चॅनलवर टाकण्यात येणारी पुस्तके लवकरात लवकर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा किंवा आपल्या मित्रांना मैत्रिणींना फॉरवर्ड करून ठेवा.


👇👇👇❗️❗️❗️❗️❗️⚠️⚠️⚠️

अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे, एकाच पुस्तकाची वारंवार मागणी होत असते, एकाच पुस्तकाची तीन-तीन, चार-चार वेळा मागणी होत असते तर आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध राहून आपल्या आवडीची पुस्तके आपल्या मोबाईल मध्ये जतन करून ठेवा किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवून ठेवा जेणेकरून ती आपल्याकडे कायमची राहतील.
Messages in this channel will be automatically deleted after 1 day
एक सत्यकथा ऐकली. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला एक फोन आला. तुमच्या मुलाला पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली ताब्यात घेतले आहे, लवकरच अटक होणार आहे. फोन मुलाच्या हाती दिला. त्यानेही रडत वडिलांना सांगितले मी इथे अडकलोय. शिक्षणासाठी अन्य शहरात राहणाऱ्या मुलाचा रडवेला आवाज ऐकून अधिकारी कासावीस झाला.

फोन करणारा म्हणाला ताबडतोब तीन लाख रूपये पाठवा. बाहेर मिडिया जमलाय. पैसे मिळाले तर मुलाला सुखरूप बाहेर काढेन.

अधिकारी गडबडला. तातडीने पैसे पाठवले.

नंतर पत्नीला कळवले. तिने मुलाला फोन लावला. तो तर होस्टेलमध्ये होता. पोलिस वगैरे सगळी बतावणी लक्षात आली आणि गाळण उडाली. इकडे तीन लाख रूपये गेले होते. ते कोणत्या भामट्याने घेतले याचा थांगपत्ता लागे ना. उच्चपदस्थाने आपल्या ओळखी वापरल्या. पोलिस वर्तुळातील बड्याबड्यांना कळवले.

इथे भामट्याने काही तासातच पैसे एका खात्यातून दुसऱ्या आणि दुसऱ्यातून तिसऱ्या चौथ्या पाचव्या खात्यात टाकत लंपास केले व भारताबाहेर पाठवले होते. भामटा तर भारतातही नव्हता तो भलत्याच देशात बसला होता. त्याला पकडणे पोलिसांच्या हाती नव्हते आणि पैसेही दूरवर पोचले होते.

पैसे स्वेच्छेने पाठवले होते म्हणजे हा सायबर क्राइम नाही असे म्हणत बँकेने हात झटकले!!

मुलाच्या रडवेल्या आवाजातला फोनवर ऐकवलेला संदेश खरा वाटणारा होता म्हणजे तो AI artificial intelligence वापरून बनवण्यात आल्यामुळे तंतोतंत खरा वाटणारा होता. 

सावध रहा. तुमच्या मुलांचे फोटो - त्यांचे बोबडे बोल - गाणी तुम्ही किती सहजरीत्या फेसबुक इन्स्टाग्राम ट्वीटरवर टाकता? स्त्रिया देखील हे सहजतेने करतात.

पण AI वापरून तुम्हाला गंडवणारे तुमच्या आसपास वावरतायत हे विसरू नका.

लहान मुलांना नको ती प्रसिद्धी देऊ नका. ते त्यांच्या आणि तुमच्याही हिताचे नाही!!!

Swati Durbin
2025/07/01 12:20:31
Back to Top
HTML Embed Code: