Telegram Web Link
पुस्तक : फॉलींग फॉरवर्ड
लेखक : जॉन मॅक्सवेल

यश कसं मिळवावं, यशासाठी काय करावं यावर बरीच पुस्तकं आहेत, पण यशासोबतच अपयश देखील आलाच, त्यासाठी कसं तयार राहावं आपण काय चुका करतो ज्या टाळता येतील यावर हे पुस्तक या पुस्तकातील ७ अतिशय महत्त्वाच्या शिकवणी. पूर्ण थ्रेड नक्की वाचा आणि शेअर करा.


१. अपयश नाकारणे
एखाद्या गोष्टीमध्ये खूप प्रयत्न करून देखील अपयश आल की बरेच लोक ते मान्य करत नाही, हे कसं झालं शक्यच नाही मला हे मान्यच नाही म्हणून दुःख करत बसतात, दुःख होण साहजिकच आहे पण त्यात डुंबून जाणं हा पर्याय नाही, अपयश नाकारू नका, ते स्वीकारा आणि ते का आल, कुठे चूक झाली यावर अभ्यास करा, आणि पुन्हा प्रयत्नांना सुरुवात करा.

२. दुसऱ्याकडे बोटे दाखवू नका
👉🏻 जेव्हा कधी लोक त्यांच्या आयुष्यात अपयशी होतात तेव्हा ते त्यांच्या यशाच्या अभावासाठी इतरांना दोष देऊ लागतात, पण इतरांकडे बोट दाखवून ते स्वतःचेच नुकसान करून घेतात कारण अपयश दुसऱ्यावर ढकलून त्यातून ते काहीच शिकत नाहीत, आणि चुकीची मानसिकता बनते.

३. अपयश हे तात्पुरते आहे
🔁 साध्य करणार्‍यांना समस्या तात्पुरत्या दिसतात म्हणून ते त्यांच्या समस्यांशी कधीच चिकटून राहत नाहीत.
तुम्ही अपयशाला क्षणिक घटना म्हणून पाहिले पाहिजे, ते आयुष्यभराचे लक्षण म्हणून पाहू नये.

४. वास्तववादी अपेक्षा सेट करा
🍀आपल्या सर्वांना माहित आहे की परिपूर्णता किंवा परफेक्शन हे एक मिथक आहे.
📍 या जगात कोणीही असे म्हणू शकत नाही की ते त्यांच्या जीवनात अयशस्वी झाले नाहीत म्हणून अडचणींची अपेक्षा करा कारण ते सामान्य आहे आणि त्यास सामोरे जाण्यासाठी स्वतःला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या तयार करा.

५.सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करा
🧠 आपण आपल्या ताकदीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, दोषांवर दुःख करत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण आपला वेळ आपल्या ताकदीवर गुंतवावा, आपण यासाठीच जन्माला आलो आहोत जेणेकरून आपण आपली प्रतिभा जगासोबत शेअर करू शकू. यावर पूर्ण विश्वास ठेवा.

६. उपलब्धींसाठी दृष्टीकोन बदला
👤 जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्षात काम करणारा मार्ग सापडत नाही आणि तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळत नाही तोपर्यंत तुम्ही विविध मार्गांनी प्रयत्न केले पाहिजेत.

७. पुन्हा उभे रहा
ज्या लोकांची ही मानसिकता साध्य होते त्यांच्याकडे अपयशच्या फक्त आठवणी आणि शकवणी असतात म्हणजे ते त्या अडथळ्यांना आणि नकारात्मक भावनांना लवकर विसरतात आणि त्यांच्या यशाच्या दिशेने पुढे जातात.
*वेळ काढून वाचावे ही विनंती.*



मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, "या मुलाला घरी घेऊन जा, स्पेन्ड टाइम विथ हिम. आम्ही आता काहीही करू शकत नाही."

ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो पण जो आपलं, आपल्या माणसांचं अन् या जगाचं भवितव्य बदलू शकतो असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात.

असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, "माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत?"

डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यूच होईल असे सांगितले.

माझ्या आईने त्या ९६% कडे न पाहता उरलेल्या ४% कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली.

त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आईने डॉक्टरांना तात्काळ होकार दिला.

पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली. काही दिवसात अजून ४ गेली. मी एकटा उरला होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून देत असत.

इंग्लिश डिक्शनरीतल्या Love या शब्दापेक्षा Hope हा शब्द जास्त पावरफुल आहे असे मला नेहमी वाटते.

लोकांना वाटते मी वाचलो कारण मी लकी होतो. पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले.

ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती.

मग तो दिवस उजाडला आणि डॉक्टरांनी मला, मी बरा झालोय अशी बातमी दिली.

पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, "हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही, याने आपले टीन एज पाहिले तरी तो एक चमत्कार असेल."

पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच.

मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकायचो. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले.

मग एक दिवस मी आईला म्हणालो, "आई माझे एक स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार!"

मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही. पण तुम्ही काय करू शकणार नाही हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा, मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्टअटॅक आला तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो.

लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो.

वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो.

एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटत.

ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८ व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत 'अनफेअर' वागते आहे असे मला वाटायला लागले.

मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता आणी मला मृत्यू येत नव्हता.

पण परत एकदा मला माझा परमेश्वर इथेच भेटला आईच्या रुपात. तिने मला या नैराश्यातून बाहेर काढले.

नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली.

एक दिवस एक उंचापुरा माणूस जो आमच्या बँकेचा सीइओ होता त्याचे मला बोलावणे आले. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, "डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील?"

मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, "तुमच्या खुर्चीत!"

मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली, मला त्रास द्यायला लागला.

पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो.

वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो.

वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० ब्रांचेस सांभाळत होतो.

माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सच घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती.

पण हे यश मटेरियलास्टिक होते. आपण ज्या जगात राहतो त्या जगाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण त्या जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का?
हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे.

मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अश्या माझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी ७ वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अश्या आविर्भावात मी आईला विचारले होते. आई डॉक्टर काय म्हणाले? त्यावर आई म्हणाली होती, "काही नाही, सर्व ठीक होईल."

मला पहिला हार्टअटॅक आला तेंव्हाही आई म्हणाली होती, सर्व ठीक होईल. "सर्व काही ठीक होईल" हे तिचं वाक्य माझ्यावर ऋण होते. पण दैव बघा, यावर्षी मला तिचे हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली.

आईच्या घश्यात ४ ट्युमर डिटेक्ट झाले. आईने विचारले, "डॉक्टर काय म्हणाले?" मी म्हणालो, "सर्व काही ठीक होईल."

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगले याला महत्व नाही, इथे असतांना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे.

तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्वाचे आहे.

आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे.

आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

Michael Crossland is an Author of the best seller book,

Everything will be Ok: A story of Hope, Love and Perspective. (Post Courtesy : Prashant Pawar)

*#वाचनकट्टा, कोल्हापूर*
पाडव्याच्या दिवशी माझ्या शॉप मधील एकही वस्तू विकली गेली नव्हती... पहिल्या व्यवसायाचा पहिलाच अनुभव...

माझा पहिला व्यवसाय, MTS टेलिकॉम फ्रँचाईजी, आणि या व्यवसायाची पहिली दिवाळी (2010)... पाडव्याला लोक शुभमुहूर्तावर खरेदी करतात म्हणून पाडव्याच्या दिवशी मी सेल्स एक्झिक्युटिव्ह ला सकाळी लवकर बोलावले होते. आणि संध्याकाळी उशिरापर्यंत थांबावे लागू शकते असेही सांगितले होते. गर्दी वाढली तर मी सुद्धा येईल आणि ऑफिस मॅनेजर सुद्धा असेल असेही सांगून ठेवले होते. कंपनीने दिवाळीचे डेकोरेशन करून ठेवलेले होते, बाहेर बॅनर, कमान लावलेले होते. सगळं काही सेट होतं... आम्ही ग्राहकांच्या गर्दीला हाताळण्याच्या तयारीत होतो आणि झालं उलटंच...

त्या दिवशी आमचे एकही प्रोडक्ट विकले गेले नाही. फक्त दोन जण आले माहिती घेऊन गेले, पण खरेदी नाही. आमचे सर्वात चांगले खपणारे इंटरनेट मोडेम साठी सुद्धा कुणीही विचारायला सुद्धा आले नव्हते... पाडव्याचा दिवस आमच्यासाठी जरा धक्क्यातच गेला.. तो दिवसच निराशेत गेला... पण पुढे भाऊबीज, ख्रिसमस, नवीन वर्ष, संक्रात प्रत्येक वेळी हाच अनुभव आला. एखाददोन बिल व्हायचे फक्त. मग थोडा विचार केल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या.

थोड्या निरीक्षणाअंती लक्षात आले कि ग्राहक आशा महत्वाच्या सणांवेळी महत्वाच्या खरेदीलाच प्राधान्य देतो. ७००-८०० चा साधा मोबाईल किंवा १५०० चे मोडेम हे त्याच्यासाठी सामान्य प्रोडक्ट आहे, तो प्राधान्य देतो १०-१२-५० हजारपेक्षा जास्तीच्या खरेदीला. TV, फ्रिज, दागिने, गाडी, मोबाईल अशा जास्त किमतीच्या वस्तू खरेदी कारण्यासाठी ग्राहकाने असे दिवस राखून ठेवलेले असतात. या दिवशी ग्राहकाला इतर सामान्य प्रोडक्ट खरेदी करण्यात रस नसतो आणि वेळही नसतो. ग्राहकाच्या दृष्टीने ज्या कित्येक वर्षांतून एकदाच घ्यायच्या वस्तू आहेत त्यांना मुहूर्तावर प्राधान्य द्यायचे असते, ज्या गोष्टींचा संबंध सतत येणार आहे त्यांना मुहूर्ताचे महत्व देण्याची गरज नसते.

यानंतर आम्ही पुढे येणाऱ्या प्रत्येक सणावेळी हाच अनुभव घेतला. ग्राहक येतंच नव्हते, आणि इतर दिवशी मात्र बसायला जागा मिळणार नाही इतकी गर्दी होत असे. कधीकधी सेल्समन, ऑफिस मॅनेजर आणि मला स्वतःला सुद्धा काउंटर सांभाळावे लागत असे. ग्राहकाची मानसिकता ओळखण्यासाठी मला मिळालेला हा एक उत्तम अनुभव होता.
लोकांची मानसिकता प्रोडक्टनुसार, व्यवसायानुसार, परिस्थितीनुसार, वातावरणानुसार, परिसरानुसार, प्रांतानुसार बदलत असते. ग्राहक कधी काय विचार करत असेल याचा अभ्यास करणे म्हणूनच आवश्यक ठरते. यांनतर मात्र आम्ही सणवार सोडून दिले औपचारिकता म्हणून डेकोरेशन करायचो, पण निवांत असायचो.. इतर दिवशी मात्र भरपूर कॅम्पेन करण्याला प्राधान्य दिले. ऑफर्स अशा असायच्या आणि अशी विक्री व्हायची कि आमचे सेल्स मॅनेजर कॉल करून मी काही फेक ऍक्टिव्हेशन करतोय कि काय विचारायचे, कारण त्यांना हेड ऑफिसकडून विचारणा व्हायची कि नगरसारख्या लहान शहरात मुंबई पुण्याच्या मार्केटसारखी विक्री कशी होत आहे म्हणून...
ग्राहकाची खरेदीविषयीची मानसिकता लक्षात घेऊनच व्यवसाय करणे यामुळेच महत्वाचे असते... नाहीतर टेन्शन येतं, मी एवढी जोरदार तयारी करून सुद्धा दिवसभरात एकही कस्टमर कसा नाही आला?

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड
2024/05/20 20:40:16
Back to Top
HTML Embed Code: