Telegram Web Link
कॅडबरी कंपनी चॉकलेट विकत नाही - आनंद, उत्सव विकते.

फरारी कंपनी कार विकत नाही - स्पीड, थ्रिल विकते.

रोलेक्स कंपनी घड्याळ विकत नाही - आत्मसन्मान, स्वाभिमान विकते.

या सगळ्या वरकरणी इमोशन्स - भावना - आहेत. पण त्या भावना आपल्याला जाणवण्यासाठी या सर्व ब्रॅंड्सने स्वतः भोवती अत्यंत परिणामकारक गोष्टी गुंफल्या आहेत.

सगळे यशस्वी बिझनेसेस झकास स्टोरी टेलिंगमुळे मोठे झालेले दिसतात.

गोष्टी सांगता यायला पाहिजे. बिझनेसमध्ये तर यायलाच पाहिजे. गोष्ट जितकी जास्त परिणामकारक - तितका अधिक समोरच्यावर प्रभाव - तेवढा अधिक विश्वास - तेवढं पक्कं नातं - तेवढा "सेल" अधिक.

पण या गोष्टी फक्त छान छान शब्दांनी तयार होत नाहीत. केवळ सुंदर स्क्रिप्ट जमून आली म्हणून विश्वास जिंकता आला असता तर कंपन्यांनी भरघोस पगार देऊन स्क्रिप्ट रायटर्स ठेवले असते दिमतीत.

या गोष्टींमधे मूल्य निर्मितीचा गाभा असावा लागतो.

सँट्रो घेण्याची ऐपत / इच्छा असणाऱ्याला फरारीची गोष्ट सांगून उपयोग नाही.

फरारीची ऐपत / इच्छा असणाऱ्याला कितीही पटवलं तरी - सँट्रो कधीच घ्यावी वाटणार नाही.

सॅंट्रोची गोष्ट वेगळी, फरारीची वेगळी.

म्हणजेच एखाद्या गोष्टीचं मूल्य केवळ त्या गोष्टीवर अवलंबून नसतं - ती गोष्ट "कोण" विकत घेणार आहे यावर ठरत.

गोष्ट लाकूडतोड्याची असो वा ससा कासवाची - मोठ्याना समजतेच की! पण नेहेमी लहानांनाच सांगितली जाते! टार्गेट ऑडियन्स बदलला की गोष्टी बदलत जातात.

म्हणजेच - "कुणाला" सांगायची आहे हे ओळखता यायला पाहिजे - त्यानुसार गोष्ट गुंफता यायला पाहिजे - आणि मग - योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे "सांगता" यायला पाहिजे.

ज्यांना हे जमत नाही त्यांना समोरच्याला पटवत बसावं लागतं, मागे लागावं लागतं, घासाघीस करून - रक्त आटवून - प्रॉफिट कमी करून मग कसंबसं विकावं लागतं!

ज्यांना हे जमतं - ते मात्र - आपला तगडा ब्रँड तयार करतात. नव्या लोकांना आकर्षित करतात. जुन्यांना कायमचं आपलंसं करून ठेवतात.

तुमचा नेहेमीचा टेलर असो वा कॅडबरी - या सगळ्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केलाय म्हणून ते तुमच्या लक्षात आहेत.

त्यांना परिणामकारक स्टोरी क्राफ्ट करून तुमच्यावर बिंबवता आली आहे - म्हणून तुम्ही त्यांना बांधले गेला आहात.

रोजच्या ऑपरेशनमध्ये अडकलेल्या बिझनेस ओनर्सनी जर असा ब्रँड तयार करण्याकडे लक्ष दिलं नाही तर कितीही मेहनत घेतली तरी ग्रोथ अशक्य आहे.

पर्सनल ब्रँड म्हणून महत्वाचा आहे.

आजच्या सर्वत्र गोंगाट असणाऱ्या जगात तर फारच!

चिअर्स!

ओंकार दाभाडकर
[email protected]
व्यावसायिकाने कॉलेज सॅक / बॅग पाठीवर लटकवून कधीच फिरू नये... तुम्ही कितीही चांगला वेष परिधान केलेला असो, कितीही टाईट फिट असो पण तुमच्या पाठीवर कॉलेज सॅक दिसली कि तुमचे व्यावसायिक इम्प्रेशन पूर्णपणे संपून जाते.

व्यवसायात आपली सोय कधीच बघायची नसते. हाताळायला सोपे, कागदपत्रे ठेवायला सोपे, गाडी चालवताना त्रास होत नाही म्हणून बरेच व्यावसायिक सॅक वापरायला प्राधान्य देतात पण यामुळे ग्राहकाच्या नजरेत आपले इम्प्रेशन खराब होत आहे हे लक्षात घेतले जात नाही. एक तर ती सॅक व्यावसायिकांसाठी नसतेच, दुसरे म्हणजे ती वापरून वापरून प्रचंड खराब झालेली असते, मळकी आणि जुनी झालेली असते, हेही फार खराब दिसतं...

पाठीवर लटकावयाची सॅक हि खरं तर फक्त कॉलेजसाठीच असायची पण हाताळायला सोपी म्हणून नोकरदार लोकांकडून तिचा वापर मोठ्या प्रमाण व्हायला लागला, आता तर ती नोकरदारांसाठी गरज झाली आहे, आणि त्यांना ती योग्य सुद्धा दिसते, पण व्यावसायिकांसाठी बिलकुल नाही. अशा पद्धतीने सॅक वापरणाऱ्या बहुतांशी व्यवसायीकांना ग्राहकाकडून एका मर्यादेपलीकडे महत्व दिले जात नसल्याचे दिसून येईल. ग्राहक प्रत्येक गोष्टीला एका ठराविक दृष्टिकोनातून बघत असतो. कर्मचाऱ्यासारखी व्यावसायिकाची वेशभूषा असेल तर व्यावसायिक सुद्धा कर्मचाऱ्यांप्रमाणे वाटायला लागतो, आणि त्याला मिळणारा प्रतिसाद सुद्धा तसाच असतो.

व्यवसायामध्ये आपली सोय कधीच बघायची नसते, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून योग्य वाटणाऱ्या गोष्टी महत्वाच्या असतात. व्यावसायिकांनी शक्यतो एकच पट्टा असलेली हँडबॅग वापरावी जी एका खांद्यावर तिरप्या पद्धतीने लटकवली जाते, किंवा तिला लहान पट्टा असतो ज्यामुळे ती एका हातामध्ये सहज धरता येते. हा professional look वाटतो. आसपास थोडे निरीक्षण करून बघा, पाठीवर लटकवलेली सॅक आणि एक पट्टा असलेली तिरप्या पद्धतीने लटकवलेली हँडबॅग या दोन्ही look मध्ये किती फरक आहे लक्षात येईल... अगदी, एवढ्या लहानश्या बदलामुळे देहबोली (body language) मध्ये सुद्धा खूप फरक पडत असल्याचे लक्षात येईल.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड
💲🔴💲"सर लोकांकडे एवढा पैसा येतो कुठून ??" 💲🔴💲

नवीन उद्योजक मित्रासोबतच्या मिटिंग मध्ये काल घडलेला किस्सा ..

प्रश्न खरंच महत्वाचा वाटला म्हणून खास त्याच्यातील आणि माझ्यातील संवाद तुमच्यासाठी लिहीत आहे ..

नक्की पूर्ण वाचा .

सर लोकांकडे एवढा पैसा येतो कुठून ?? 🤔🤭

प्रश्न तसा अवघड आणि तसाच सोपाही .

📌 लोक श्रीमंत होतात त्यामागे पहिल कारण असत त्यांनी "आऊट ऑफ द वे " म्हणजेच प्रवाहापेक्षा वेगळा केलेला विचार .

जास्त करून हि लोक "ध्येयवेड्या " प्रकारात मोडतात . ते कधीही पैसाच कमवायचा या उद्देशाने काम करत नसतात. पण त्यांनी निवडलेला मार्ग त्यांना दिलेल्या सेवेच्या बदल्यात बक्कळ पैसे कमावून देतो .

बरं यांचा प्रमुख उद्देश श्रीमंत बनून फिरण्याचा नसतोच बरं का . ते फक्त स्वतः ची आवड , ध्येय या गोष्टींना सांभाळतात आणि शेवटी मोठी होतात .

हा प्रवासही काही एक दिवसाचा नसतो .

तो प्रचंड चढ उतार , यश अपयश आणि अफाट कष्टानी भरलेला असतो . पण शेवटी तुमच्या आमच्यासारख्या लोकांना दिसतो तो फक्त पैसा ..

आता याच उदाहरण दिल कि तुम्हाला अगदी चित्र स्पष्ट दिसेल .

तुमच्या आसपास अथवा कुटुंबात कुणी डॉक्टर , इंजिनियर , चार्टरड अकाउंटंट , यशस्वी सुधारित शेतकरी अथवा कारखानदार नक्कीच असेल ती सर्व लोक या विभागात मोडतात .

तुम्ही काम करत असलेली कंपनी , ऑफिस अथवा व्यवसाय हे अशाच ध्येयवेड्या माणसाचं काम असत जे पुढं जाऊन अफाट रूप घेत .

काम जसा जसा वाढत तसा तसा श्रीमंतीचा लेख हि वाढत जातो .

📌 आता श्रीमंतीच्या दुसऱ्या प्रकारात मोडणारी मंडळी हि पहिल्या प्रकारापेक्षा अतिशय उलट विचार सरणीची असतात .

एकाचे दोन करण्यासाठी ह्यांच्याकडे अफाट मार्ग आणि इच्छा शक्ती असते .

"बर स्ट्रगल , कष्ट इथेही कॉमन आहेतच आ"..

फक्त इथे लोक "रिस्क " घेण्यावर जास्त विश्वास ठेवतात .

एक उत्पन्नाचा मार्ग हा फक्त आपल्या अन्न , वस्त्र व निवारा पूर्ण करण्यासाठी बनलेला असतो असा यांचा पूर्ण विश्वास असतो त्यामुळे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे मार्ग शोधण्यात हि मंडळी तरबेज असतात .

वेळेचं योग्य नियोजन , लोकांना जोडण्याची क्षमता, पैसे कमावण्याची ओढ याना जबरदस्त ऊर्जा देते .

यात प्रामुख्याने येतात मार्केटिंग प्रोफेशनल , कंसल्टंट्स , इस्टेट ब्रोकर्स आणि शेअर मार्केट ट्रेडर्स ..

"रिस्क है तो इश्क है " म्हणत हि लोक प्रचंड पैसे कमावतात आणि मोठे होतात .

आता यात सगळेच यशस्वी होतात का ?? तर नाही .

पण सगळेच अयशस्वी हि होत नाही . तुमची जशी भूक तेवढे पैसे तुम्ही कमावता .

हि लोक नव्या गोष्टी शिकताना घाबरत नाहीत . संधीच सोन करणं आणि प्रचंड आशावादी राहून यांचा प्रमुख गुण म्हणावा लागेल .

या प्रकारात येणारी मंडळी नोकरी सोबत अथवा एक व्यवसायासोबत अजून जोडव्यवसाय करण्यावर भर देते आणि पैसे कमावते .

📌 शेवटी येते पिढीजात श्रीमंत लोक ..

पिढ्यानपिढ्या पैसे कमावण्याची पद्धत सेट असल्यामुळे यांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत जाते .

हि लोक गुंतवणुकीवर जास्त भर देतात . त्यांना पैसे कमवण्याची आलेली कसलीही संधी ते सोडत नाहीत ..

बरं पैशाने पैसे वाढतात हे समीकरण यांना पूर्ण लागू होत .

यात पुन्हा मोठे कारखानदार , बँकर्स , यशस्वी व्यवसायिक यांचा प्रामुख्याने समावेश होतो .

म्हणून लक्षात घ्या , श्रीमंती हि तुमची आमची पैशाची भूक आहे जी सगळ्यांसाठी वेगळी असू शकते .

पण ती भूक असंण अत्यंत घरजेच आहे .

खर्च आणि कमाई एकसारखी असेल तर श्रीमंती कधीही तुमच्या घराचं ठोठावणार नाही .

म्हणून आऊट ऑफ बॉक्स विचार करायला घाबरू नका .

एकापेक्षा जास्त उत्पन्नाची साधन ठेवा.

रिस्क घ्या .

तुम्हाला वाटत असेल तुमची आवड एक दिवस मला पैसे कमावून देईल तर तिला फोल्लो करा कारण जे भविष्य तुम्हाला दिसेल तेच सर्वाना दिसणार नाही .

यशस्वी व्हा . श्रीमंत व्हा .

धन्यवाद

लेखन श्री मनोज इंगळे
संस्थापक - उद्योगमंत्र मराठी

Like | Share | Subscribe to उद्योगमंत्र मराठी

#udyogmantra #उद्योगमंत्र #मराठी #उद्योजक #udyogmantramarathi #motivation #bloggersofinstagram #blogger #FacebookPage #udyogmantramarathi
एक नवउद्योजक... तरुण वय... त्याच्या एका कस्टमरकडे त्याची भली २०-२५ लाख रुपये उधारी थकलेली. वर्षभर झाले तरी उधारी देईना, कॉल ला प्रतिसाद देईना...

शेवटी या नवउद्योजकाने आपल्याकडे काम करणाऱ्या पाचसहा जणांना घेऊन त्या ग्राहकाचे ऑफिस गाठले, सोबत लोखंडी रॉड घेऊन गेले. तिथे समोरासमोर थोडे वादविवाद झाले. याने लगेच आपल्या माणसांच्या सोबतीने त्या ऑफिसमधल्या सगळ्यांना रॉड, पाईपने मारहाण करायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये कामासाठी मुली सुद्धा होत्या. सगळाच गोंधळ.

त्या ग्राहकाने पोलिसांना बोलावले. याच्यावर आणि याच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, विनयभंग असे बरेच गुन्हे दखल झाले. हे पाच सहा जण थेट जेलमधे... नवउद्योजकाचा व्यवसायाचा मोबाईल सुद्धा जप्त झाला... वर्षभर आतमध्ये... मोबाईल जप्त असल्यामुळे संपर्क ठप्प, इकडे व्यवसाय सांभाळायला कुणी नाही. घरातल्यांनी व्यवसाय हाताळण्याचा प्रयत्न करून पहिला, पण त्यांना जास्त काही जमले नाही. थोडेफार जमले तरी कामाचा मोबाईल, गाडी जप्त असल्यामुळे आणि हा स्वतःच आत असल्यामुळे ७०-८०% व्यवहार ठप्प झाले.

वर्षभरानंतर बाहेर आल्यावर आता व्यवसाय तसाही संपल्यात जमा आहे. उधारी तशीच गेली, ती आता वसुलीच्या बाहेर गेली आहे... नवउद्योजक आता म्हणतोय, भाऊ व्यवसायात संयम पाहिजे...

१. उधारी वसुलीचे कौश्य असेल तरच उधारी करावी. मार्केटमध्ये ८०% व्यवहार उधारीचेच आहेत, त्यामुळे त्याला आपण टाळू शकत नाही. पण उधारी करताना समोरच्या ग्राहकाची मार्केट मधील प्रतिमा सुद्धा तपासून घेणे आवश्यक असते. यासोबतच चांगले संबंध ठेवणे, पाठपुरवठा करणे अशा गोष्टींची आवश्यकता असते.
२. उधारी वसूल होत नसल्यास कायदेशीर कारवाईचा पर्याय असतो. (उधारी संबंधी उद्योजक मित्र च्या वेबसाईटवर एक दोन लेख आहेत)
३. मोठ्या उधारीवेळी चेक घेऊ ठेवता आल्यास उत्तम
४. उधारी वसुलीचे सर्व व्यावसायिक मार्ग संपल्यानांतर सुद्धा समोरचा प्रतिसाद देत नसेल तर त्याचा उद्देश उधारी फेडण्याचा नाही हे लक्षात येते
४. एकदा समोरच्याचा उधारी फेडण्याचा उद्देश नाही असे लक्षात आल्यावर मग चांगला वकील गाठावा, व फौजदारी आणि दिवाणी कारवाईला सुरुवात करावी.
५. उगाच काठ्या घेऊन हाणामारीला सुरुवात करू नये. आपण व्यावसायिक आहोत, गुंड नाही. कॉलेजमधे गुंडगिरी केली, मारामाऱ्या केल्यात म्हणून पुढेही तोच प्रकार चालून जातो या भ्रमातून बाहेर या. कॉलेज जीवन आणि कॉलेजनंतरचे जीवन यात फरक असतो.
६. कोणतेही व्यवहार करताना लिखापढी ठेवावी. पर्चेस ऑर्डर, बिल, डिलिव्हरी चलन जपून ठेवावेत. बिल ईमेल वर सुद्धा पाठवावे. डिलिव्हरीचे कन्फर्मेशन घ्यावे. उधारीचे पाठपुरवठा तसेच इतर जी काही चर्चा करायची असेल ती ईमेल वर किंवा WhatsApp वर करावी. शक्यतो ईमेल ला प्राधान्य द्यावे.
७. या चर्चेवेळी आपल्याला गरज पडल्यास पुढे कायदेशीर कारवाईत कामी येतील अशा शब्दांचा विचारपूर्वक प्रयोग करावा.
८. सुरुवातीला गोडगोड बोलूनच उधारी वसुलीला प्राधान्य द्यावे. न जमल्यास विनंती करून चेक घेण्याचा प्रयत्न करावा, भलेही तो दूरच्या तारखेचा असेल. आणि हेही जमले नाही तर पुढील कायदेशीर कारवाईचा विचार करावा...
९. व्यवसायात संयमाला पर्याय नाही. इथे चुकीला माफी मिळत नाही. एक चुक सुद्धा व्यवसायाला संपवू शकते. त्यामुळे संयम महत्त्वाचाच आहे.
१०. आपल्याला सगळं कळतं हा विचार कधीच करू नका. योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची मदत नेहमी घ्यावी.

व्यवसाय साक्षर व्हा...

© श्रीकांत आव्हाड

===========
https://www.tg-me.com/+bUyOR79tPHw1N2Y1

मराठी वाचक आणि साहित्य

#पुस्तके #साहित्य #वाचन
बुके बनवून विकण्याचा बिजनेस करणे, हा अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये करण्याचा बिजनेस आहे. याला फार खर्च लागत नाही.

एखाद्या Sweet shop (मिठाईचे दुकान), Cake Shop च्या आवारात, व्हरांड्यात हा बिजनेस करण्यासाठी तुम्ही जागा मिळवू शकता. त्याचे थोडेफार भाडे दिले की तो दुकानदार तुम्हाला एक टेबल आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आवश्यक असलेले material ठेवण्यासाठी जागा देऊ शकतात.

लोक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाच्या दिवशी, कुणाची भेट घेण्याकरता बुके विकत घेतात. त्यामुळे cake shop, Sweet shop मध्ये येणारे ग्राहक बुके घेण्यासाठी तुमच्याकडे वळू शकतात.

शिवाय गल्लीगल्लीत झालेले युवानेते, भाऊ, दादा, शेठ त्यांच्या आवडत्या नेत्यांना बुके देतच खुश करण्याचा प्रयत्न करत असतात.

बुके कसे बनवायचे , याचे लाखो व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत, तिथून तुम्ही मोफत प्रशिक्षण घेऊ शकता.

हा बिजनेस अत्यंत चालणारा आहे. शिवाय सध्या लोकांना लहान मोठ्या प्रसंगाचा इव्हेंट करण्याची सवय लागली आहे. त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याची लोकांना घाई असते, त्यामुळे सध्याचा काळ बुके विकण्याचा व्यवसाय करण्यासाठी अत्यंत पूरक आहे.

करून तर पाहा.
धक्कादायक! AnyDesk हॅक झाला, युजर्सनी लगेच पासवर्ड बदलावे.
#AnyDeskHacked

मित्रानो, सध्या वापरली जाणारी लोकप्रिय रिमोट डेस्कटॉप ऍप्लिकेशन AnyDesk ची ही सिस्टम हॅक झाल्याचा धक्कादायक वृत्ता समोर आली आहे.

*काय झालं?*

AnyDesk Software GmbH ने शुक्रवारी संध्याकाळी हे कबूल केलं की त्यांच्या प्रोडक्शन सिस्टमवर सायबर हल्ला झाला आहे.

या हल्ल्यामुळे कंपनीची डेटाबेस किंवा इतर संवेदनशील माहिती चोरी झाली का हे अद्याप स्पष्ट नाही.
या हल्ल्याशी संबंधित तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेले नाही.

*युजर्स काय करायचं?*

AnyDesk ने युजर्सना तातडीने त्यांचे पासवर्ड बदलण्याची विनंती केली आहे.
29 जानेवारी 2024 रोजी रिलीज झालेलं AnyDesk व्हर्जन 8.0.8 वापरत असाल तर ते अपडेट करा कारण हे नवीन व्हर्जन नवीन सिक्युरिटी सर्टिफिकेटसह येतं.
दुसऱ्या एंटी-व्हायरस सॉफ्टवेअरने तुमचा सिस्टम स्कॅन करा.

*काळजी घ्या!*

जुन्या पासवर्ड पुन्हा वापरू नका आणि मजबूत, युनिक पासवर्ड वापरा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम करा.
फिशिंग ईमेल आणि संशयास्पद लिंक टाळा.

#cybersecurity #dataprotection #staysafeonline
व्यवसाय करणे आणि प्रयोगशाळेत प्रयोग (Experiment) करणे सारखेच आहे :
किती तरी अपयशी प्रयत्नानंतर प्रयोगात यश मिळते. मात्र प्रयत्नांत सातत्य ठेवावे लागते. तेव्हा कुठे प्रयोग यशस्वी होतो.
यश मिळत नाही, साध्य सिध्द होत नाही, तोपर्यंत विविध प्रयोग करतच राहावे लागतात, तेव्हा कुठे 'कधी तरी' यश मिळते. प्रयत्नांत सातत्य ठेवणे हीच व्यवसायातील यशाची गुरुकिल्ली असते. येथे निर्धार फार महत्त्वाचा असतो. साध्याचा पाठपुरावा करणे आवश्यक असते. ते करत करत रोज आपण चुका करत करत उत्तरोत्तर विकसित होत असतो. अनेक गोष्टी केल्यानंतर कळते की हे नव्हते करायचे, पुढे ते टाळले जाते. आधी अंधारात चाचपडत राहावे लागते. मात्र हळूहळू उजेड होऊ लागतो आणि वस्तू लख्ख दिसायला लागतात. आणि मग काय करायचे ते कळते, काय करायचे नाही ते अपयशी प्रयत्नांनी शिकवलेले असतेच.
ज्याला पोहता येत नाही त्याने कुणा पोहता येणाऱ्याच्या देखरेखीखाली तलावात उडी मारली तरी त्याच्या नाकातोंडात पाणी जातेच जाते, त्याला घाबरायला होते. त्याला माहिती नसते की ह्या पाण्याला कसे हाताळायचे. मात्र प्रयत्नाने, प्रशिक्षणाने त्या पोहणे शिकणाऱ्या व्यक्तीला, पाण्याला कसे हाताळायचे, कसे हातपाय मारायचे, विशेष म्हणजे हातपाय कसे नाही मारायचे हे समजते. आणि काहीच दिवसांत ती व्यक्ती उत्तम पोहू लागते.
माझ्या व्यवसायाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मागे वळून पाहताना आठवते की मी व्यवसाय मिळवण्यासाठी (मार्केटमधून काम मिळविण्यासाठी) इतके सारे प्रयोग केले आहेत, त्यातले नव्वदपेक्षा जास्त टक्के प्रयोग अयशस्वी झाले आहेत. मात्र एक दोनच प्रयोग यशस्वी झाले नी मला उत्तम काम मिळू लागले, अजूनही मिळत आहे. आजही नवनवीन प्रयोग चालूच असतात.
प्रयत्नांत सातत्य ठेवले म्हणून यश आले. अन्यथा नसते आले.
व्यवसायातील प्रयोग सर्व व्यवसायांसाठी सारखे नसतात. मला जो प्रयोग करून ग्राहक मिळवता आले, ते सारख्याच प्रयोगाने दुसऱ्याला मिळतीलच असे नाही. हे सारे म्हणजे 'मेलडी खाओ, और खुद जान जाओ', असे प्रकरण आहे.
- निलेश अभंग, कल्याण
व्यवसायात Reference ने कामे मिळतात. अधिकाधिक reference ते लोक देतात ज्यांनी आपली Service वा product घेतले आहे. ज्यांना आपल्या सेवेचा वा उत्पादनाचा उत्तम अनुभव आला आहे.
त्यामुळे जो ग्राहक मिळाला आहे, त्याचे उत्तम पद्धतीने काम करून देणे, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे, संपर्कात राहणे (फोन उचलणे) अतिशय महत्त्वाचे आहे.
नवख्या माणसावर कोणी विश्वास ठेवत नाही, ओळखीच्या माणसाला वा कुणी तरी Refer केलेल्या माणसाला लोक काम देतात.
कारण Refer करून काम व्यवस्थित पार पडले तर कोणी शाबासकी देत नाही, मात्र काही चुकीचे झाले की ज्याने Refer केले होते त्याला बोल लावले जाऊ शकतात, की कसा माणूस दिला म्हणून.
आम्ही गेली आठ वर्षे Online Rental agreement ची सेवा देत आहोत, हजारो ग्राहकांना जगभर सेवा दिली आहे, त्यामुळे Reference मधून आणि ज्यांनी याआधी सर्व्हिस घेतली आहे, ते लोक Leave and License registration Service साठी फोन करत असतात. त्यांचे Renewal साठी पुन्हा फोन करणे म्हणजे त्यांना आमचे काम आवडल्याची पोचपावतीच असते.
कामात जरी कधी गैरसमजाने, Communication Error मुळे आमच्या बाजूने काही चूकभूल झाली असली तरी ती आम्ही स्वखर्चाने दुरुस्त करून दिली आहे, अशा वेळी ग्राहकाला टाळत त्याला वाऱ्यावर सोडून दिलेले नाही. कारण आपण त्याला टाळले की आपल्याला तीच सवय लागते आणि मग अशा असंतुष्ट ग्राहकांची साखळी वाढत जाऊन, हीच साखळी आपल्या व्यवसायाचा गळा आवळते, याची आम्हाला कल्पना आहे.
- निलेश अभंग, कल्याण
#businesspost
#randomthoughts
कल्पना करा की २००८ साल चालू आहे. IPL चे पाहिले वर्ष आहे.

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, रवींद्र जाडेजा हे खेळाडू नसून शेअरमार्केट मधील स्टॉक्स आहेत.

आणि तुम्हाला त्यांच्यापैकी एका स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची आहे.

तर तुम्ही कोणता स्टॉक निवडणार आणि का ?

निर्णय घेणे तुम्हाला सोपे जावे म्हणून या सर्व खेळाडूंसाठी २००८ मधील IPL मधील त्या त्या संघानी मोजलेली किमंत (Stock Price) सांगतो.

महेंद्रसिंग धोनी - 6 cr

विराट कोहली - 12 Lakh

रोहित शर्मा - 4.8 cr

दिनेश कार्तिक - 2.1 cr

रवींद्र जाडेजा - 10 lakh

पुढे वाचण्यापूर्वी एक गुंतवणूकदार म्हणून यापैकी कोणता शेअर तुम्ही विकत घेणार याचा विचार करा. तुमचे उत्तर ठरले की पुढे वाचा….

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

-

चला आता तुमचे उत्तर ठरले आहे असे मी समजतो. आता या खेळाडूंना १६ वर्षांनंतर मिळालेली IPL Salary म्हणजे २०२४ ची आकडेवारी पाहूया. थोडक्यात तुम्ही निवडलेला शेअर किती वाढला आहे ते पाहूया.

(लेखापुरता IPL salary गृहीत धरली आहे. प्रत्यक्षात जाहिराती, स्पॉन्सरशिप आणि पार्टनरशिप मधून त्यांची कमाई वेगळी असू शकते. आता सोपं करण्यासाठी केवळ IPL मध्ये त्यांना मिळालेली बोली (IPL Salary) धरूया.)

महेंद्रसिंग धोनी -
2008 - 6 cr
2024 - 12 cr

विराट कोहली -
2008 - 12 Lakh
2024 - 15 cr

रोहित शर्मा -
2008 - 4.8 cr
2024 - 16 cr

दिनेश कार्तिक -
2008 - 2.1 cr
2024 - 5.5 cr

रवींद्र जाडेजा -
2008 - 10 lakh
2024 - 16 cr

सगळ्यात जास्त वाढ कोणत्या शेअर मध्ये दिसली ? तुम्ही निवडलेला शेअर मनाप्रमाणे वाढलेला दिसला का ?

प्रत्येक शेअरची वार्षिक दरवाढ (CAGR) पाहूया -

महेंद्रसिंग धोनी - 4.43%
विराट कोहली - 35.22%
रोहित शर्मा - 7.82%
दिनेश कार्तिक - 6.20%
रवींद्र जाडेजा - 37.33%

IPL मधील सर्वात भरवशाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी या शेअरची वाढ FD च्या दरापेक्षा कमी झाली आहे.

विराट कोहली या २००८ मधील नवख्या पण आशादायक खेळाडूने ३५% वार्षिक अशी भरघोस दरवाढ नोंदवली आहे.

रोहित शर्मा या तेव्हाच्या नवख्या पण धडाडीच्या फलंदाजाने सुरुवात तर चांगली केली होती पण पुढे म्हणावी तशी वाढ नोंदवलेली नाही.

दिनेश कार्तिक ची सुरुवात चांगली झाली मात्र सतत टीमच्या आतबाहेर असण्यामुळे त्याला म्हणावी तशी वाढ मिळाली नाही.

रवींद्र जाडेजा सुरुवातीला एकदम नवखा खेळाडू होता , संघात त्याची जागा गोलंदाज म्हणून होती पण प्रयत्नपूर्वक तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनला. आणि टीमसाठीचे त्याचे मूल्य सतत वाढवत नेले त्यामुळे स्वतःचीही किंमत वाढवत नेली. या यादीमधील इतर खेळाडूंपेक्षा सर्वाधिक CAGR वाढ नोंदवत तो एक मल्टिबॅगर खेळाडू बनला.

तर मित्रहो, सांगायचा मुद्दा हा की कोणता स्टॉक किती वाढेल हे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. मोठे चांगले (Blue Chip large Cap) स्टॉक फार वाढतील असे नाही. Growth Stocks वेगाने वाढले तरी ते सातत्याने वाढतील का सांगता येत नाही. आणि मल्टिबॅगर म्हणून ज्यांच्यावर विश्वास ठेवू ते सर्वच लहान स्टॉक वाढतील हे ही सांगता येत नाही.

आणि तरीही वरील सर्व खेळाडू २००८ ते २०२४ पर्यंत खेळले म्हणून खूप Valuable बनले. एवढ्या आव्हानात्मक स्पर्धेत “दीर्घकाळ टिकून राहणे” हेच त्यांचे सगळ्यात मोठे यश आहे.

गुंतवणूकदार म्हणून आपल्याला यापासून काय शिकता येईल ?

Diversified Portfolio -

कोण्या एका जबरदस्त स्टॉकवर पैसे लावणे योग्य नाही. पोर्टफोलिओ आपल्याला या धोक्यापासून वाचवतो. आणि पोर्टफोलिओ बॅलन्सड असेल (Mix of Large cap, Mid Cap, Small Cap, Value & Growth) तरच तो गुंतवणूकदाराला सर्वाधिक फायदा मिळवून देऊ शकतो.

Consistency of Performance

या लेखापुरता आपण १६ वर्षांचा point to point डेटा पहिला. प्रत्यक्षात दर वर्षीचा प्रत्येक स्टॉकचा परफॉर्मन्स पहिला तर प्रत्येक वेळी सर्वाधिक कमाई केलेले शेअर्स वेगळे असतात हे लक्षात येईल. एका वर्षाचा परफॉर्मन्स बघून त्यात गुंतवणूक केली तर त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती पाहायला मिळेल असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये फक्त वाढ न बघता , वाढीतील सातत्य पाहणे अधिक महत्वाचे ठरते !

Risk Analysis

सुरुवातीला भरवशाचे वाटलेले कितीतरी खेळाडू IPL च्या ३-४ हंगामांनंतर दिसेनासे झाले. काहींचा परफॉर्मन्स खराब होता, काहींना दुखापतीने ग्रासले तर काहींचे केवळ नशीब खराब म्हणून निवडच झाली नाही. आपल्या पोर्टफोलिओ मधील काही शेअर्स सोबत पण हेच होऊ शकते. म्हणून शेअरच्या किमतीचा अभ्यास करण्याइतकाच त्यामागील कंपनीचा (Fundamental) अभ्यास करणे देखील आवश्यक ठरते.

Market Conditions
समजा IPL जेवढी चालली तेवढी चाललीच नसती किंवा काही कारणाने IPL चे अर्थकारण गडबडले असते किंवा एखादी टीम बॅन झाली असती तर आपण निवडलेला खेळाडू चांगला असूनही नुकसान झाले असते. म्हणजेच आपल्या गुंतवणुकीला बाहेरील परिस्थीचा फायदा/तोटा होऊ शकतो याची जाणीव ठेवून हुशार गुंतवणूकदाराने शेअर बाजाराबाहेरही गुंतवणूक केली पाहिजे. उदा. रिअल इस्टेट, सोने, debt म्युच्यअल फंड इत्यादी.

IPL ची फायनल कालच संपली आहे. महाराष्ट्रात निवडणुका पण संपल्याच आहेत. आता मोकळा वेळ मिळाला असेल आणि चर्चेचे आवडते विषय संपले असतील….तर जरा गंभीरपणे “पोर्टफोलिओ ऍनालिसिस” करायला घेऊया ! नेटभेटचे फेसबुक पेज, युट्युब चॅनेल आणि व्हाट्सअँप चॅनेल मध्ये याबद्दल बरच शिकायला मिळेल. तुम्हाला फक्त follow करायचं आहे ! कराल ना ?

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
2024/06/03 06:13:38
Back to Top
HTML Embed Code: