Never expect.Never assume. Never ask.And Never demand.Just let it be,if it's meant to be, it will happen.

*❝तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच
अर्थ घेतील या भ्रमात मुळीच राहू नका,*
     *तुम्ही कितीही चांगलं बोला*
*तुमच्या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण*
*त्यांच्या स्वभावानुसारच घेत असतो❞*
            
*🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏*
_*आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायच आहे, लोकांना नाही.*_

#sm
Open your eyes, look within. Are you satisfied with the life you are living?
speak less, listen more
react less, observe more
Sorry mi khup divsan pasun active nahi hoto pan aata roj sandhya kali post etil
Anonymous Poll
57%
Ok
43%
Harkat nahi
Sometimes we waste too much time to think about someone who doesn't think about us for one second.

🍀🍁जेव्हा जग तुम्हाला कमजोर
समजायला लागतं...

तेव्हा जिंकणं गरजेच असतं !🍂🌿

#Good_Night😊😍☺️
     
आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूच देत असतो.



😍😍 शुभ रात्री 😍😍
Aplya channel varchya post kashya vat tat
Anonymous Poll
27%
Changlya
70%
Khup chhan
3%
Nahi
🍀🍁उम्र थका नहीं सकती,
        ठोकरें गिरा नहीं सकती,
        अगर ज़िद हो जीतने की,
         तो हार हरा नहीं सकती।🍂🌿

#Good_Night😊😍☺️
Be grateful for what you already have while you pursue your goals.
*बुद्धीच्या जोरावर "श्रीमंत" होता येतं. पण श्रीमंतीच्या जोरावर "बुद्धीमान" होता येत नाही. ..!*

*वेळ निघून गेली की*
*प्रत्येकालाच जाणवतं.... जपलं असतं तर*
*संपल नसतं!*

*🌹 शुभरात्री🌹*
(आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र श्री.पराग पोतदार यांचे ह्रदयस्पर्शी विचार)

बॅड पॅच!... आला तर येउद्या !!

आयुष्यात कधी ना कधी तरी 'बॅड पॅच' येतोच !
शांत सुरळीत सुरु असतं सगळं पण अनपेक्षितपणे काहीतरी निमित्त पुरतं आणि बसलेली सगळी घडी विस्कटते.

हे कधी करियरच्या बाबतीत होतं तर कधी नात्यांच्या.
तर कधी वरवर सगळं आलबेल दिसत असतं आणि आत मात्र उलथापालथ सुरू असते.
कधी व्यवहारांची गणितं चुकतात तर कधी अंदाज फसतात.
कधी आपला काहीही दोष नसताना अपयशाचे फास आवळले जातात.
आणि बऱ्याचदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
मग चहुबाजूनी जी कोंडी होते त्यालाच आपण म्हणतो बॅड पॅच !

असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात किती काळ राहील हे सांगता येत नाही मात्र एकदा आला की आयुष्य नकोसं करुन सोडतो...कधी कधी जगण्याला फूल स्टॉप द्यावा असंही वाटून जातं.

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच कधीतरी येतोच. आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

पण बॅड पॅच जगण्याचा भाग असेल तर नाकारून कसं चालेल. यायचा तर येउद्या.
आपण दोन गोष्टींची मानसिक तयारी ठेवली तर त्यातील त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. एक म्हणजे आपला दृष्टिकोन आणि स्वीकारण्याची मानसिकता.
आहे ही परिस्थिती जशीच्या तशी मनापासून स्वीकारली की निदान त्या परिस्थितीविषयीच्या तक्रारी कमी होऊन जातात. आणि मगच त्यावर मात करण्याच्या काही आशा निर्माण होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा दृष्टिकोन! आपण पाहतो कसं हे फार महत्त्वाचं. दृष्टिकोन जितका सकारात्मक ठेवू तेवढं लढण्याचं, जगण्याचं बळ मिळतं.

बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त आणि फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!
आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो, काय करतो, काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते. हा वाईट काळ खूप काही काही शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो.

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या हातात असतं... ते मात्र आत्मसात करायला हवं.

आपला बॅडपॅच आहे हेच नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि आंधळेपणाने स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच......
प्रयत्न आणि अनुभव शिकवत राहतात बरंच काही. सगळं संपलंय असं कधीच नसतं आयुष्यात. कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.

तेव्हा बॅड पॅच आले तर येउद्या..
ते भल्याभल्याना चुकलेले नाहीत. मग तो सचिन असो वा अमिताभ !
त्या काळात वागायचं कसं, दृष्टिकोन कसा ठेवायचा आणि स्वतःला आणखी तावून सुलाखून बाहेर कसं काढायचं हे त्यांनी पाहिलं. आपल्याही हातात तेवढंच असतं.

प्रतिकूलतेत संधी अधिक असतात हे लक्षात ठेवून प्रयत्न करणं सोडायचं नाही. आज ना उद्या या दिवसांतून बाहेर येऊच आणि फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेऊ हे मनात ठेवायचं.. या काळात संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, अडवले, थांबवले, असे काहीही झाले तरी आपली वाट सोडायची नाही. तीच उद्या अनेक जण अनुसरणार असतात.

तेव्हा बॅड पॅच आला तर येउद्या..
त्यालाही सांगा मी तुझ्याही स्वागतासाठी सज्ज आहे... !

(मनाने खचलेल्या ज्ञात अज्ञात मित्रांसाठी...)

©️ Parag Potdar
नीरा....
✍️"नीरा म्हणजे काय? तर हे एक थंड द्रव्य आहे.. पुण्यात अनेक पानटपऱ्यावर हे मिळतं.हे थंड शीतपेय शरीराला पोषक असतं..या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे नीरा काढली जाते. नारळ, तेलताड ला येणाऱ्या फुलोऱ्यापासून नीरा काढल्या जाते.. त्यासाठी फुलोऱ्याजवळ कुऱ्हाडीने छेद पाडतात व त्याला मडके टांगून ठेवतात.. सूर्यास्त होण्यापूर्वी यामध्ये नीरा जमा होते हे पाणी खूप थंड असते.. नंतर यावर विविध प्रकिया करुन दुकानात विक्रीसाठी पाठवतात. नीरा जास्त काळ राहिली तर त्याच रूपांतर ताडीमध्ये (एक प्रकारची दारू )होतं. अलीकडे मी पुण्यात नीरा पिण्यासाठी एका दुकानात गेलो.. नीरा घेतली आणि दोन घोट पिले मला लगेंच त्याचा दारूसारखा वास आला.. मला कळलं की या निरेच रूपांतर ताडीमध्ये झालं आहे.. मी उर्वरित नीरा फेकून दिली..कारण नीरा जास्त काळ राहिली तर त्याची ताडी बनते.. आणि मी कोणतेही मद्य सेवन करत नाही.. त्यामुळे नीरा पिणाऱ्याला सुद्धा माझी सूचना आहे शक्यतोवर ताजी नीरा प्या. ती शरीराला पोषक आहे...नीरा म्हणून ताडी पिऊ नका..!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
लिखाण दि.23मार्च 2023
✍️संपर्क -:@ABCac1234
आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतर एक बहुमोल संपत्ती विकसित होते ती म्हणजे, आत्मविश्वास.


😍😍 शुभरात्री😍😍
2024/04/29 13:24:11
Back to Top
HTML Embed Code: