वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल.
@suvichar_marathi
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
@suvichar_marathi
प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात कारण हा निसर्गाचाच नियम आहे गोड साखर व्याधी निर्माण करते तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरले जाते.
@suvichar_marathi
आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं. पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो.
@suvichar_marathi
जीवनात हसतमुख माणसांचा सहवास हा अत्तराच्या दुकानासारखा असतो, कारण काहीही खरेदी केले नाही तरी मन मात्र सुगंधित व उल्हासित होते.
@suvichar_marathi
आयुष्यात नेहमी पडद्यामागे राहून कार्य करा कारण त्यामागे कुठल्याही प्रकारे लोभ, प्रसिद्धी नसते ना स्वार्थ असतो.
@suvichar_marathi
वाईट कोणीच नसतं, जीवनात अशीही वेळ येते की माणूस कितीही खरा आणि कितीही चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरलेला असतो.
@suvichar_marathi
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा, काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा, नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं, नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
@suvichar_marathi
आयुष्यात अशा व्यक्तीची गरज असणं गरजेचं असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगायला शब्दांची गरज पडणार नाही.
@suvichar_marathi
माणुस जन्मापासुनचं अनेक टप्प्यावर अपेक्षांच्या भोवऱ्यात अडकत जात असतो आणि जसजशा अपेक्षा पुर्ण होतात तशा नव्याने निर्माणही होतात म्हणुन अपेक्षा या आपल्या क्षमतेच्या प्रमाणातचं असाव्यात.
@suvichar_marathi
अनुभव मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं.
@suvichar_marathi
कुणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात पाहू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतात.
@suvichar_marathi
सरड्यामध्ये आणि माणसांमध्ये एवढाचं फरक आहे, सरडा धोका बघून रंग बदलतो आणि माणूस मोका बघून रंग बदलतो.
@suvichar_marathi
प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त दोन वेळाच समजते एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्या नंतर मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते.
@suvichar_marathi
कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत रहायचे यश नक्कीच मिळते.
@suvichar_marathi
परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज अन् जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज कधी वाटत नाही.
@suvichar_marathi
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे.
@suvichar_marathi
जगात दुसऱ्याला हसण्याइतके सोपे व दुसऱ्यासाठी रडण्याइतके कठीण काम दुसरे कोणतेही नाही.
@suvichar_marathi
2024/06/01 05:25:24
Back to Top
HTML Embed Code: