Telegram Web Link
_*आळंदीच्या इंद्रायणी नदीच्या काठावर एक आजी शांतपणे बसलेल्या होत्या. त्या क्षणांच चित्र त्यांच्या आठवणीत साठवून ठेवायचं होतं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि जवळच उभ्या असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यांना विनंती केली.*_

*“एक फोटो काढाल का?”*

_*ते अधिकारी काही साधे पोलीस नव्हते, तर थेट तीन स्टार असलेले सहा. पोलीस निरीक्षक होते. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, कोणताही अभिमान न बाळगता, मनापासून त्या आजींचा मोबाईल घेतला आणि फोटो काढला.*_

_*फोटो घेतल्यावर त्यांनी प्रेमाने सांगितलं, “आज्जी, उभ्या रहा, फोटो अजून छान येईल!”*_

_*"ते ऐकताच आज्जीही आनंदाने उठल्या आणि हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी उभ्या राहिल्या. हा प्रसंग पाहून एक गोष्ट मनात ठसते महाराष्ट्र पोलीस हे केवळ २४ तास कर्तव्य बजावत नाहीत, तर सामान्य माणसाच्या भावना समजून घेणारा आणि त्यांना मान देणारा संवेदनशील माणूसही असतो. हा क्षण त्याचं एक सुंदर उदाहरण ठरतो.*_
आधुनिक_भारताचा_इतिहास.pdf
18.7 MB
🪴यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ - आधुनिक भारताचा इतिहास
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना :

👉 सुरुवात - 17 सप्टेंबर, 2023

👉 उद्देश - भारतातील कारागीर समुदायाच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली.

👉 ही योजना कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते.

👉 स्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25
◾️'ॲक्सिऑम-4' ◾️

◾️ भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'ॲक्सिऑम-4' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले.
◾️ 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले 'गगनवीर' राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत.
◾️ 'नासा' आणि 'इस्रो'च्या सहकार्याने 'ॲक्सिऑम-4' मोहीम होत आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून 'स्पेस-एक्स'च्या 'फाल्कन-9' या प्रक्षेपणयानातून प्रक्षेपण झाले.

⚫️ ॲक्सिऑम-4चे अंतराळवीर
👉 ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो) हे मोहिमेचे सारथ्य करतील.
👉 स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
👉 टिबर कापू, हंगेरी
👉 पेगी व्हिटसन, अमेरिका
_*अध्यात्म म्हणजे फावल्या वेळेतील पोथीवाचन नव्हे किंवा म्हातारपणातील करमणूक नव्हे..! किंवा वार्धक्यातील निर्माल्य, निस्तेज जीवनावर गुलाबदाणीचा शिडकावा नव्हे..! अध्यात्म हे समग्र जीवनाला ताजेपणा व प्रसन्नता देणारे रसायन आहे.*_
शेतकरी ओळख क्रमांक बाबत
छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे. स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत!" महाराजांनी बस म्हटलं की बसायचं !
कुठे जायचंय? कधी परत यायचं ? असलं काही विचारायचं नाही. सोनतळीहून फोर्ड निघाली. स्वतः महाराज गाडी चालवत होते. गाडीमध्ये महाराज, डाकवे मेस्त्री, अरबशा, रसूल व मोहिद्दिन टकले असे पाचजण होते. गाडी शहरात आली. पोलिस स्टेशनजवळ गाडी थांबवून महाराजांनी म्हैसकर फौजदारांना गाडीत घेतले. त्यानंतर पापा परदेशी व आबालाल रहिमानला गाडीत घेतले, गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन राजवाड्याच्या दिशेने निघाली. वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते. त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली. महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले, जहागिरदार पळतच बाहेर आला. महाराज म्हणाले,

"बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला, गाडीत कुठे बसावे बाबाला कळेना. महाराजांनी गाडी सुरु केली. बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला. गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.

तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले,

"आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
आप्पालाही काही कळेना. दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.

असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर सर्व गरीब व खालच्या समाजातील, फाटकातुटका पोषाख केलेली मंडळी. गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.

अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला. गंमत म्हणजे, त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली. जनता कमी दर्जाची नाही. मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले!

साभार:-- Karvir Riyasat📍
#लोकराजे छत्रपती शाहू महाराज.!!
2025/07/07 11:11:47
Back to Top
HTML Embed Code: