Telegram Web Link
छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती कधी खडखडा घेऊन यायचे, तर कधी फोर्ड मोटार ! महाराज एखाद्याच्या घरासमोर गाडी थांबवायचे, कधी रस्त्यात थांबावायचे. स्वतःच मोठ्याने हाक मारायचे व म्हणायचे,"चल बस गाडीत!" महाराजांनी बस म्हटलं की बसायचं !
कुठे जायचंय? कधी परत यायचं ? असलं काही विचारायचं नाही. सोनतळीहून फोर्ड निघाली. स्वतः महाराज गाडी चालवत होते. गाडीमध्ये महाराज, डाकवे मेस्त्री, अरबशा, रसूल व मोहिद्दिन टकले असे पाचजण होते. गाडी शहरात आली. पोलिस स्टेशनजवळ गाडी थांबवून महाराजांनी म्हैसकर फौजदारांना गाडीत घेतले. त्यानंतर पापा परदेशी व आबालाल रहिमानला गाडीत घेतले, गाडीत आता लहान मुल बसण्याइतपतही जागा नव्हती. महाराजांसहीत सर्वजण खूपच दाटीवाटीने बसले होते. तोच महाराजांना खंडेराव बागल दिसले. महाराजांनी त्यांनाही गाडीत घेतले. गाडीतले लोक जवळपास एकमेकांच्या मांडीवरच बसले होते. गाडी नवीन राजवाड्याच्या दिशेने निघाली. वाटेतच छत्रपतींच्या नऊ सर्वोच्च जहागिरदारांचे बंगले होते. त्यांतील एका बड्या जहागिरदारदाराच्या बंगल्यात गाडी घेतली. महाराजांनी त्या जहागिरदाराला बोलावले, जहागिरदार पळतच बाहेर आला. महाराज म्हणाले,

"बाबा, तू चल बरोबर." बाबा गोंधळला, गाडीत कुठे बसावे बाबाला कळेना. महाराजांनी गाडी सुरु केली. बाबा गाडीच्या दाराला तसाच लटकला. गाडी तशीच दुसऱ्या एका जहागिरदाराच्या बंगल्यावर गेली.

तो जहागिरदार शाही पोषाखात कुठेतरी जाण्याच्या बेतात बाहेरच उभा होता, तोच महाराजांनी त्याला बोलावले,

"आप्पा तू पण चल रे जरा बरोबर."
आप्पालाही काही कळेना. दुसऱ्या जहागिरदाराला पाहून आप्पाही गाडीच्या मडगार्डवर उभा राहिला. गाडीला लोंबकळणारे हे दोन जहागिरदार प्रचंड मिजासखोर व रयतेला कस्पटासमान लेखणारे होते.

असे हे दोन बडे जहागिरदार शाही पोशाखात गाडीला लटकत उभे राहिलेले व गाडीच्या आत छत्रपती सोडले तर इतर सर्व गरीब व खालच्या समाजातील, फाटकातुटका पोषाख केलेली मंडळी. गाडी परत शहराच्या दिशेने रवाना झाली.

अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून जहागिरदारांचा नशा उतरविला. गंमत म्हणजे, त्यांना फिरवून फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर त्या जहागिरदारांची चांगलीच शोभा झाली. जनता कमी दर्जाची नाही. मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो हे कृतीने छत्रपतींनी त्यांना दाखवून दिले!

साभार:-- Karvir Riyasat📍
#लोकराजे छत्रपती शाहू महाराज.!!
अफाट कर्तृत्वाचा राजा : राजर्षी शाहू महाराज
सुधारकांचा दीपस्तंभ : शाहू महाराज
राजर्षी शाहू महाराज
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*पावसाळ्यात वीज कोसळणे ही गंभीर व जीवघेणी घटना ठरू शकते*🌧️
*तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण होण्यासाठी काही आवश्यक सूचना आहेत*

🎥 बघा हा माहितीपूर्ण व्हिडीओ!
👉 "पावसाळ्यात वीज पडल्यास कशी घ्याल काळजी?"

घरातच राहा, उघड्यावर उभं राहू नका
मोठ्या झाडांखाली थांबू नका
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा
मोबाईल वापरणे टाळा
सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या

📢 कृपया हा व्हिडीओ शेअर करा —
एक छोटी काळजी अनेकांचे प्राण वाचवू शकते! 🙏
महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या 1 हजार 351 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता!
Forwarded from Agricos
📔नोंदणी व मुद्रांक विभाग - सराव पेपर बॅच

📚 सराव पेपर बॅचची वैशिष्ट्ये

👼गट ड शिपाई भरती साठी सर्व पेपर CBT फॉर्मेट (ऑनलाइन) स्वरूपात होतील
👼नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व प्रश्न असतील.
👼एकूण 15 प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल
👼आपली रँक पाहण्याची संधी असेल
👼मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश केलेला असेल
👼वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल

🎁ऑफर फी - 149 /- (199/-)

❗️सराव पेपर बॅच जॉईन करण्यासाठी Play Store वरून Rudra Academy चे ऍप्लिकेशन डाउनलोड करा.❗️

📱आज च ॲप डाऊनलोड करून आपला प्रवेश निश्चित करा.💯✌️

🤵 मार्गदर्शक - तुषार शिरगीरे

📱 App Link ↪️
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz
https://play.google.com/store/apps/details?id=com.wfnboa.czfyfz

📞अधिक माहितीसाठी - 7350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
नोंदणी व मुद्रांक शुल्क परीक्षा काहीच दिवसात होत आहेत.🔥🔥

शेवटचे 04 दिवस बाकी...✌️

IBPS पॅटर्न परीक्षांसाठी वरील बॅच उपयुक्त आहे.

⭐️ खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच मी उपलब्ध करून दिली आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/07/05 03:07:12
Back to Top
HTML Embed Code: