Telegram Web Link
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) देशातील कोणत्या राज्यात इतर कोणत्याही राज्यापेक्षा लोकसभेच्या अधिक जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत?
- मध्य प्रदेश

🔹२) केंद्र व राज्ये यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे?
- वित्त आयोग

🔸३) प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कलम .... मध्ये स्पष्ट केले आहे.
- २१५

🔹४) भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंत प्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले?
- पं. जवाहरलाल नेहरू

🔸५) एक्याण्णवाव्या घटनादुरुस्तीनुसार सिक्कीम, मिझोराम यांसारख्या छोट्या राज्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या जास्तीत जास्त .... इतकी राहणार आहे.
- १२

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्त्वे देणारा पदार्थ....
Anonymous Quiz
10%
सफरचंद
74%
गाजर
8%
केळी
7%
संत्री
खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे होत
नाही ?
Anonymous Quiz
14%
कॉलरा
15%
हगवण
32%
टायफॉइड
39%
हिवताप
.                  🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) वाफाळ सल्फ्युरिक अॅसिडलाच आपण .... म्हणून ओळखतो.
- ओलिअम

🔹२) गॅमा किरणांचा वेग .... वेगाइतकाच असतो.
- प्रकाशाच्या

🔸३) पाम तेलातील प्रमुख घटक ....
- स्टिअरिक अॅसिड

🔹४) अनियंत्रित शृंखला अभिक्रियेचा- केंद्रीय विखंडनाचा- शोध लावला ....
- ऑटो हान व स्ट्रास्मान

🔸५) युरेनिअम व युरेनिअमनंतर क्रमाने येणारी मूलद्रव्ये ही .... मूलद्रव्ये होत.
- नैसर्गिक किरणोत्सारित

संस्करण-लेखन : के सागर
( PSI STO ASO पूर्व परीक्षा )
Purchase Link:-
🟥पुणे व पिंपरी चिचंवड मनपा
(PMC-PCMC) भरती परीक्षा
२१ आदर्श प्रश्नपत्रिका उत्तरांसह
Pune Va Pimpri-Chinchwad MaNaPa (PMC-PCMC)
Bharti Pariksha – 21 Adarsh Prashnapatrika
https://ksagar.com/product/pune-mahanagarpalika-pmc-bharti-pariksha-21-adarsh-prashnapatrika/
🟥पुणे व पिंपरी चिचंवड मनपा
PMC-PCMC भरती परीक्षा
Pune Va Pimpri-Chinchwad MaNaPa
(PMC-PCMC) Bharti Pariksha
https://ksagar.com/product/pune-mahanagarpalika-pmc-bharti-pariksha/

📖📘पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,📱9823121395
☎️02024483166,☎️02024453065
या क्रमांकावर संपर्क साधावा.
🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
📲पुस्तकाच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
*🎯आजपासून समूह साधन केंद्र समन्वयक पदाचे अर्ज करण्यास सुरवात होत आहे*

*📌 अर्ज नोंदणी करण्याची लिंक*
https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/

*🎯 जाणून घ्या, समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा -2025 नवीन वेळापत्रक, परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम*

*पुणे :* महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी "समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025" या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. 01/12/2025 ते 05/12/2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून 2410 पदांची भरती विविध जिल्हा परिषदेत भरण्यात येणार आहेत.

📌 *समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) वेतनश्रेणी :- एस १५ : ४१८००-१३२३००*

*📌शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताः-*
शासन अधिसूचना दि. १८ जुलै २०२५ मध्ये नमुद केल्याप्रमाणे अर्हता अनिवार्य असेल.
1. फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
2. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.
3. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए. / बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर किमान सहा वर्षे अखंडीत सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल.
4. दि.०१/०१/२०२५ रोजी अखंड नियमीत सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.
5. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्हयासाठी निवडीस पात्र राहील.
*6. वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार, वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पात्र होणे अनिवार्य आहे.*

*📌निवड प्रक्रिया स्वरूप:-*
लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल.
*परीक्षेसाठी अर्ज करण्याची पध्दतः-*
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरविण्यात आलेल्या https://www.mscepune.in या लिंकव्दारे दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी विहित अर्हता धारण करणारे उमेदवार विहित पध्दतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
*📌परीक्षेचे शुल्क :
१. सर्व संवर्गातील उमेदवारः रु. 950/-
२. दिव्यांग उमेदवारः रु. 850/-

*📌अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व कालावधी :-
२०२३ मध्ये परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी
*दि. ०८/१०/२०२५ ते दि. १८/१०/२०२५*
नवीन उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज
*दि. २५/१०/२०२५ ते दि. १०/११/२०२५*
ऑनलाईन परीक्षा दिनांक
*दि. ०१/१२/२०२५ ते दि. ०५/१२/२०२५*

*📌समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) 200 गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी*
केंद्र प्रमुख पदासाठी 200 गुणांची नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा असून दोन्ही पेपरचे एकूण 200 वस्तुनिष्ठ प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहेत.
* पेपर एक 100 प्रश्न 100 गुण आणि पेपर दोन 100 प्रश्न 100 गुण असणार आहे.*
*📌 पेपर क्रमांक एक - बुद्धिमत्ता व अभियोग्यता*
बुद्धिमत्ता व अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय चाचणी, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.या घटकांच्या संपुर्ण तयारीसाठी पुढील संदर्भ पुस्तके अत्यंत उपयुक्त ठरतील.
*केंद्र प्रमुख पेपर एक-महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स (MAHA TAIT व केंद्रप्रमुख परीक्षेसाठीचा विद्यार्थीप्रिय संदर्भ)*
*2. समूह साधन केंद्र समन्वयक समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक - के सागर*
3. शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)
4. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 7 सराव प्रश्नपत्रिका - डॉ.शशिकांत अन्नदाते
5. संपूर्ण मराठी - के' सागर (४९ वी आवृत्ती)
6. संपूर्ण इंग्रजी- के' सागर (४४ वी आवृत्ती)
*📌 पेपर - 2 शालेय शिक्षणातील नियम , अधिनियम , शैक्षणिक नव विचार प्रवाह अभ्यासक्रम*
1.भारतीय राज्यघटना शिक्षण विषयक तरतुदी , कायदे , नियम इत्यादी - 10 गुण
2. शिक्षण क्षेत्रातील घडामोडी , शैक्षणिक संस्था , कार्य व माहिती इत्यादी - 10 गुण
3.माहिती तंत्रज्ञान / संगणक वापर व शैक्षणिक सहसंबंध - 15 गुण
4 अभ्यासक्रम व मुल्यमापन , अध्ययन अध्यापन पद्धती , शैक्षणिक विचावंत व विचार इत्यादी - 15 गुण
5 माहितीचे विश्लेषण , मुल्यमापन , शैक्षणिक सहसंबंध इत्यादी - 20 गुण
6 वियषज्ञान , सामान्यज्ञान , इंग्रजी विषयज्ञान इत्यादी -15 गुण
7 संप्रेषण कौशल्य - 15 गुण
*एकूण - 100 गुण*
*केंद्र प्रमुख पेपर दोन महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. समूह साधन केंद्र समन्वयक परीक्षा : शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह-पेपर दोन संपूर्ण मार्गदर्शक- डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स, पुणे (सुधारित चौथी आवृत्ती)* सदर विद्यार्थिप्रिय संदर्भ पुस्तकातून पेपर दोन मध्ये समाविष्ट सर्व घटक, उपघटक व प्रमुख मुद्यांची परीक्षभिमुख तयारी करता येईल.
2. केंद्रप्रमुख पेपर 2 घटकनिहाय वस्तुनिष्ठ प्रश्नातून परीक्षाभिमुख तयारी - डॉ. शशिकांत अन्नदाते, स्वाती शेटे (नवीन अभ्यासक्रमानुसार) के सागर पब्लिकेशन्स
3. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ.शशिकांत अन्नदाते (अकरावी आवृत्ती)
4. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज - विनायक घायाळ
5. शालेय आशयज्ञान करिता शालेय 5 वी ते 12 वी पर्यंतची पुस्तके अभ्यासावीत.
*Best of Luck*
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*
Forwarded from K'Sagar Publications
*समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख ) भरती 2025 अत्यंत उपयुक्त संदर्भ*
🔰दक्षिण भारतातील पहिले पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे गाव. (देशातील दुसरे).

🔹स्थान: तेलंगणा, नागरकुर्नूल जिल्हा.
🔸क्षमता: एकूण स्थापित क्षमता 1,500 kW (1.5 MW).
🔹कव्हरेज: 514 घरे आणि 11 सरकारी इमारती पूर्णपणे सौरऊर्जेवर.
🔸फायदा (वीज बिल): घरातील वीज निर्मितीमुळे वीज बिल 'शून्य'. (3 kW सिस्टिम प्रति घर).
🔹फायदा २ (उत्पन्न): जास्तीची वीज ग्रीडला विकून उत्पन्न मिळवणारे गावकरी (ग्रीन उद्योजक).
🔸विक्री दर: ग्रीडला प्रति युनिट ₹5.25 दराने वीज विक्री.
🔹आदर्श गाव: शाश्वत ग्रामीण विकासाचा आणि अक्षय ऊर्जा वापराचा उत्तम नमुना (Model).
भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना पदावरून दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ?
Anonymous Quiz
9%
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष
73%
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
16%
भारताचे महान्यायवादी
1%
लोकसभेचे अध्यक्ष
खालीलपैकी कशाचा अवलंब करून सार्वजनिक हिताच्या बाबीकडे मंत्र्याचे लक्ष वेधले जाते ?
Anonymous Quiz
8%
अर्ध्या तासाची चर्चा
56%
लक्षवेधी सूचना
27%
अल्पकालीन चर्चा
9%
तहकुबीचा ठराव
भारतीय संसद मंत्रिमंडळाच्या कामकाजावर कोणत्या मार्गाने नियंत्रण ठेवते ?

(१) तहकुबी ठराव (२) प्रश्नोत्तराचा तास (३) पूरक प्रश्न
Anonymous Quiz
6%
फक्त १
32%
फक्त २ आणि ३
14%
फक्त १ आणि ३
48%
१, २ आणि ३
🔰K'Sagar Study hall

🔸Contact 9923102631

Location
https://g.co/kgs/BPBUevL

#punestudy #mpscpune #स्पर्धापरीक्षा #mpscexam #mpsc2025 #ksagar #ksagarpublication
Rajyaseva Pre & Mains Exam Syllabus 2025.pdf
8.8 MB
🔰राज्यसेवा पुर्व आणि मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
.                   🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम १४५ मधील तरतुदींनुसार ग्रामपंचायत विसर्जित करण्यात आल्यास नव्याने ग्रामपंचायतीची रचना होईपर्यंत ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा ताबा राज्य शासनाकडे येतो. हे विधान .....
- बरोबर आहे.

🔹२) ग्रामपंचायत विसर्जित झाल्याच्या दिनांकापासून ग्राम पंचायत सदस्यांना आपली पदे रिक्त करावी लागतात व ग्रामपंचायतीचे अधिकार व कर्तव्ये राज्य शासनाने वेळोवेळी नियुक्त केलेल्या व्यक्ती पाहतात. हे विधान महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील ....मधील तरतुदींना धरून आहे.
- कलम १४५

🔸३) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधि नियम, १९६१ .... या जिल्ह्यांव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रास लागू आहे.
- मुंबई शहर व मुंबई उपनगर

🔹४) महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमातील कलम .... अनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेची तरतूद करण्यात आली आहे.
- सहा

🔸५) जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खात्याचे प्रमुख हे .... वर्ग १ वा २ चे राजपत्रित अधिकारी असतात.
- राज्यसेवेतील

लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
दरडोई मासिक खर्चाच्या आधारे १९७९ मध्ये दारिद्र्य रेषेची जी व्याख्या केली गेली, तिच्या आधारे १९७३-७४ मधील किमती प्रमाणभूत मानता दरडोई..... पेक्षा कमी खर्च करणाऱ्या शहरी भागातील व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली येतात.
Anonymous Quiz
9%
४९ रुपये ०९ पैसे
51%
५६ रुपये ६४ पैसे
36%
४८ रुपये १५ पैसे
4%
८५ रुपये २३ पैसे
खालीलपैकी कोणती बाब भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणून निर्देशित करता येणार नाही ?
Anonymous Quiz
11%
उत्पन्नाचे असमान वाटप
38%
प्राथमिक क्षेत्रातील उत्पादन
28%
भांडवलनिर्मितीचा कमी वेग
24%
मुक्त अर्थव्यवस्था
रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

2025 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि ओमर एम. याघी यांना जाहीर झाला आहे.
[त्यांना 'मेटल-ऑर्गॅनिक फ्रेमवर्क' (MOFs) च्या विकासासाठी हा सन्मान मिळाला आहे.]

सुसुमु कितागावा : जपानमधील क्योतो विद्यापीठातील प्राध्यापक.
रिचर्ड रॉबसन : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठातील प्राध्यापक.
ओमर एम. याघी : अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्केले येथील प्राध्यापक.
MIDC निकाल खालील लिंकवर उपलब्ध आहेत

लिंक
https://recruitment.midcindia.org/Result23.aspx
2025/10/25 18:30:25
Back to Top
HTML Embed Code: