Telegram Web Link
Forwarded from Vinayak Bhise
देवा तिच्या वाटेचं दुःख,
त्रास, वेदना सारं काही
तु मला दे

माझ्या वाट्याला जे सुख
आनंद, समाधान ते तिला दे

ती हसताना दिसो नेहमी
तिच्या सर्व इच्छा अपेक्षा
स्वप्ने पूर्ण होवो

तिच्या डोळ्यात कधीच
चुकणं पण दुःखाचे
एक थेंब अश्रू न येवो

माझ्या नशिबात जरी अश्रू असले
तरी ते तिच्यापर्यंत न पोचू दे

तिच्या पावलांना काटे
कधी न लागो
तिचा मार्ग नेहमी सुकर असो

माझ्या आयुष्यात भले
काट्यांचा सडा असो

पण तिचे जीवन
फुलांसारखे टवटवीत राहो

देवा, एकच प्रार्थना आहे माझी
तिचे निरोगी आयुष्य
आनंदाने भरलेले असो

प्रत्येक क्षणी तिला सुखी ठेव
देवा बस एवढंच कर

विनायक भिसे, बारामती
Mo.- 7798150143
Forwarded from Vinayak Bhise
सखे प्रेम न करता ही
आपण सोबत राहू

सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी सोबत राहू,
हातात हात धरून चालू
एकमेकांना साथ देऊ

हृदयात ओलावा
नसो प्रेमाचा खरा,

नकोत शपथा,
नकोत वचने ती खोटी,
नको भावनांची ती बंधने

आपुलकीचा धागा,
तोही पुरेसा आहे,
जीवनाच्या वाटेवर,

कधीतरी उगाचच,
एकमेकांना हट्ट मिठी मारावी
तर कधी हातात हात शांत बसू

मनात येईल ते करू
सर्व काही गोष्टी बिंदास
पने कोणताही विचार न करता

सुखाच्या क्षणात
नसलो जरी जवळ,
दुःखात मात्र होऊ
एकमेकांचे बळ
सोबत राहून नी
साथ देऊ

नात्याला नको नाव,
नको कोणते बंधन,
फक्त सोबत राहू,
हेच आहे समाधान

प्रेमाविना ही जगणे,
तेही सुंदर असते,
सखे हे आपण
जगाला दाखवू

कोणत्याही वचनाविनाही,
आपण सोबत राहू,
आयुष्याच्या शेवटापर्यंत,
एकमेकांसोबत जगू

सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी कायम सोबत राहू,
एकमेकांच हात हातात धवूनी
साथ देऊ

एकमेकांना आयुष्यभर
जिवापाड जपू

विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
अहिल्यादेवी होळकर
🍃प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे.. राजा आणि प्रजा यांचे संबंध आईं-पुत्राप्रमाणे असतात.. ज्या रुढी अंधाराकडुन प्रकाशाकडे नेतात तेच मला मान्य आहे..🍃
🙏-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर..🚩

🍃दिनदुबळ्याच्या कैवारी.. अनिष्ट-विकृत प्रथा मोडीत काढून रयतेला लेकराप्रमाणे जपणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांना त्रिवार वंदन..🍃🚩
Forwarded from ओम sm शेळके
शरीराला झालेली जखम प्रत्येकाला दिसते मात्र  मनाला झालेल्या जखमा कोणालाचं का? दिसत नाहीत हेचं माणसाला पडलेलं एक कोडं मात्र याचं उत्तर शोधले तर खूप थोड आहे मग अडलं नेमकं कुठे घोडं एकमेकांना समजून घ्या की राव थोड आयुष्य होणार की मग आपोआपच गोडं,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
*कितीही वेळा वाचली तरी परत परत वाचायला आवडेल असा लेख..!* 
        
         *कर्माचा सिद्धांत..!*
*यालाच जीवन म्हणतात..!*

                            *एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.*

*पण ती ज्या ठीकाणी बसलेली असतें तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.*

*एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.*

*सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.*

*तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो..!*
*वाघ जोरात झेप घेतो...*
*आणि तितक्यात वीज चमकते...*
*त्या शिकाऱ्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो..!*

*आणि*

*या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते..!*

*माणसाचं आयुष्य हे असंच असतं..!*

*त्याच्या हातात काहीच नसतं..!*

*आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची..!*

*कर्ता करविता असतो तो ईश्वर..!*

*असंच एक एक विचार येत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही..!*

*मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच..!*

*कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं..!*

*'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'*

*आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं.. दोन्ही एकाच  रथाची चाकं..!*

*कुठल्या खड्डयात अडकणार आणि कुठल्या  संकटावर वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच..!*

*'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?*

*'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, ३० तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'..!*

*त्याला  त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?*

*'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'*
*तिला दरीत ढकलणारं कोण असतं? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?*

*एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो..! त्यामुळे तो वाचतो...*

*ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?*

*त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?*
*कोण सांगेल?  सांगेल कोण??*
*कुणीच नाही...*
*हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं.. प्रेमाने सावरलेलं...* *आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...*
*ईश्वराने लिहीलेलं... आपलं आयुष्यं...!*

*मोर नाचताना सुद्धा रडतो.. आणि..*
*राजहंस मरताना सुद्धा गातो..!*

*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..!*
*आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.*

*यालाच जीवन म्हणतात.*

*किती दिवसाचे आयुष्य असते?*
*आजचे अस्तित्व उद्या नसते,*
*मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!*
*नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..!* 
*कोणाचा  अपमान करू नका आणि* *कोणाला कमीही लेखू नका..!*
*-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,*
*पण वेळ ही तुमच्यापेक्षाही जास्त शक्तिशाली आहे..!*
*- कोणी कितीही महान झाला असेल,*
*पण निसर्ग कोणाला कधीच* *लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..!*
*स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..!*
*देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं..!
Forwarded from Vinayak Bhise
सखे प्रेम न करता ही
आपण सोबत राहू

सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी सोबत राहू,
हातात हात धरून चालू
एकमेकांना साथ देऊ

हृदयात ओलावा
नसो प्रेमाचा खरा,

नकोत शपथा,
नकोत वचने ती खोटी,
नको भावनांची ती बंधने

आपुलकीचा धागा,
तोही पुरेसा आहे,
जीवनाच्या वाटेवर,

कधीतरी उगाचच,
एकमेकांना हट्ट मिठी मारावी
तर कधी हातात हात शांत बसू

मनात येईल ते करू
सर्व काही गोष्टी बिंदास
पने कोणताही विचार न करता

सुखाच्या क्षणात
नसलो जरी जवळ,
दुःखात मात्र होऊ
एकमेकांचे बळ
सोबत राहून नी
साथ देऊ

नात्याला नको नाव,
नको कोणते बंधन,
फक्त सोबत राहू,
हेच आहे समाधान

प्रेमाविना ही जगणे,
तेही सुंदर असते,
सखे हे आपण
जगाला दाखवू

कोणत्याही वचनाविनाही,
आपण सोबत राहू,
आयुष्याच्या शेवटापर्यंत,
एकमेकांसोबत जगू

सखे, प्रेम नाही जरी
आपल्यात रुजले,
तरी कायम सोबत राहू,
एकमेकांच हात हातात धवूनी
साथ देऊ

एकमेकांना आयुष्यभर
जिवापाड जपू

विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
अहिल्यादेवी होळकर
🍃प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हाच माझा धर्म आहे.. राजा आणि प्रजा यांचे संबंध आईं-पुत्राप्रमाणे असतात.. ज्या रुढी अंधाराकडुन प्रकाशाकडे नेतात तेच मला मान्य आहे..🍃
🙏-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर..🚩

🍃दिनदुबळ्याच्या कैवारी.. अनिष्ट-विकृत प्रथा मोडीत काढून रयतेला लेकराप्रमाणे जपणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यामाई होळकर यांना त्रिवार वंदन..🍃🚩
Forwarded from ओम sm शेळके
शरीराला झालेली जखम प्रत्येकाला दिसते मात्र  मनाला झालेल्या जखमा कोणालाचं का? दिसत नाहीत हेचं माणसाला पडलेलं एक कोडं मात्र याचं उत्तर शोधले तर खूप थोड आहे मग अडलं नेमकं कुठे घोडं एकमेकांना समजून घ्या की राव थोड आयुष्य होणार की मग आपोआपच गोडं,,,✍🏻

एकमन#लेखक
@Ommshelke
Forwarded from Vinayak Bhise
सखे मला तुझ्यापायी
पूर्ण बरबाद व्हायचं आहे

सखे मला तुझ्यापायी
पूर्ण बरबाद व्हायचं आहे

प्रत्येक श्वासात फक्त
सखे तुलाच आठवायचं आहे

माझ्या डोळ्यात
फक्त सखे तुच दिसावी

माझ्या ओठांवर
फक्त सखे तुझं नाव असावं

माझ्या विचारांत
फक्त सखे तुझं अस्तित्व असावं

माझ्या भावनांत
फक्त सखे तुझं प्रेम असावं

सखे मला तुझ्यापायी
पूर्ण बरबाद व्हायचं आहे

तुझ्याशिवाय सखे
दुसरं काहीच नकोसं आहे

माझं आयुष्य सखे तुझ्या
चरणी समर्पित व्हावं

माझ्या मरणा नंतरही
सखे तुझं नाव राहावं

सखे मला तुझ्यापायी
पूर्ण बरबाद व्हायचं आहे

सखे मला फक्त
तुझंच होऊन जगायचं आहे

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
Forwarded from Vinayak Bhise
तिच्या पाई जिंदगीची
मी राख रांगोळी केली
तिने मात्र माझ्या उगड्या
डोळ्याने भर दिवसा
स्वप्नांची होळी पेटवली

मी विझलो दिवा होऊन
ती उजळली पहाट
माझ्याच रक्ताने
तिच्या आयुष्याची मांडली वाट

काय प्रेम? काय निष्ठा?
काय हे? काय ते ?
सारेच होते बहाणे

मी वेडा, तिच्यासाठी गेलो
स्वता:लाच जाळून
आता उरली फक्त राख
तीही वाऱ्याने उधळली

माझ्याच प्रेमाची गाथा
माझ्याच डोळ्यां देखत विझली

नाही अश्रू आता नाही त्रास
ना कोणत्याच वेदना
नाही कुठली खंत
हा विद्रोह आहे
माझ्या तुटलेल्या मनाचा अंत

तिच्या पाई जरी
मी झालो बरबाद
माझी राख ही बोलेल

" तु प्रेमाच्या नावाखाली
केला माझा घात "

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo - 7798150143
*नात्यांच्या उपमा एकदा ऐका*
                   

*आई - वडिलांच्या प्रेमाला*
               *श्रीफळाचा मान*
*प्रसाद समजुन घ्यावे*
       *ठेऊन त्यांचा मान .*

*बहीण -भावाच्या प्रेमाची*
            *गंमतच न्यारी*
*एक आहे आंबा ,*
           *तर एक आहे कैरी .*

*भावा -भावांच्या प्रेमाची*
        *रीत थोडी वेगळी*
*जणु एकाच बागेतली*
         *फणस नि पोफळी .*

*बहिणी -बहिणींच्या प्रेमाला*
     *कशाचीच नाही तोड*
*एक आहे संत्री तर*
      *एक मोसंबी गोड .*

*नवरा -बायकोच्या प्रेमाची*
      *इमली खट्टी- मिठी ,*
*प्रेम आहे आत तरी*
       *शब्द नाही ओठी .*

*नणंद - भावजयीचे प्रेम*
      *आहे थोडे चटकदार ,*
*हळू -हळू मुरावा*
        *जसा लोणच्यात खार*

*जावा -जावांच्या प्रेमाची*
         *गोडीच भारी*
*जशा एकाच करंडीत*
       *हापूस , केशर, पायरी .*

*सासु -सासऱ्यांच्या प्रेमाला*
     *तिखट , आंबट, तुरट झाक ,*
*सगळं पचवायला* 
            *लागतोच ना आले पाक ..*

*मैत्रीच्या नात्यात*
  .        *नाही हेवा -दावा ,*
*चोखून- चाखून घ्यावा*
           *ऊसाच्या रसाचा गोडवा .*

*नात्यांची चव*
        *हळू हळू चाखावी,*
*आंबट - गोड फळांप्रमाणे*
*आयुष्याची लज्जत वाढावी.*
@natemanache

*नात्यांमध्ये योग्य अंतर ठेवल गेल तर आणि तरच नात जोपासल जातं.  योग्य अंतर ह्याचा अर्थ  नातच* *झिडकारण किंवा नात्यात कोरडेपणा  येणं असा नसतो, तर ओलावा जिवंत ठेवायचा पण त्याचा चिखल होऊ द्यायचा नाही.* 
*गरज आणि सल्ला मागितला जाईल तिथेच द्यायचा. आपला अनुभव म्हणजे मॕगी न्यूडल्स नाहीत जे दोन मिनटात  समोरच्याला देता येतात.  अनुभव हा  ज्याचा त्यानेच जाणवून घ्यायचा असतो.*
*नेमक हेच विसरल  जातं आणि आपल्या  अनुभवांनी  दुसऱ्याला समृद्ध करणं  वैगरे आपण आपल कर्तव्य समजतो, किंबहुना  आपण आपला आपलेपणा ह्यानेच दाखवता येतो हे गृहीतच धरलेल असत.*
*नेमकं  इथूनच नात्यात बिनसायला सुरवात होते, आपल्याला टाळलं जायला लागतं किंवा  दुर्लक्ष  केल जातं आणि आपल्याला समजतच नाहि की नक्की  आपल चुकल कुठे?*
*पण आपण समोरच्याला गरज नसताना मदत करतोय किंवा सल्ले देतोय   त्यामुळे नातं विरत चाललय हे आपल्या लक्षातच येत नाहि आणि  स्वतःला त्रास करून घेण्याच्या एका मार्गावरून आपण चालायला लागतो.*

*म्हणून नात्यात योग्य अंतर. बस इतकच....*
Forwarded from Anil Bhagwan Chavan (ABC )
सायकल.. ❤️
✍️"खरं तर आज जागतिक सायकल दिवस आहे सायकलच्या फोटोवरून आठवलं की,2008मध्ये मी नुकतात 7वी पास होवून 8वी मध्ये गेलो होतो.आणि 8वी साठी येवता गावाच्या बाजूला असणाऱ्या बेराळा याठिकाणच्या महाराणा प्रताप विद्यालयात जाण्यासाठी मी 2008मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जावून 1500रुपये कमवले होते. 150रुपये रोज होता. त्या पैशातील 250रुपयात एका नातेवाईकांकडून एक जुनी बंद पडलेली सायकल घेतली होती. आणि त्याला अजून 500रुपये खर्च करून व्यवस्थित सुरु केली.. ती सायकल 3वर्ष मी वापरली 3वर्षात ती सायकल खूप कमी वेळा बिघडली. आमच्या गावाला जाताना 2किमी उतार आहे एकदा सायकल टेकडीवरून सुरु झाली तर घरापर्यंत जाईपर्यंत पँडल मारायच काम नव्हतं.3वर्ष बंगाट सायकल पळवली आणि 2011मध्ये 1200रुपयामध्ये विकून टाकली..जीवनातील अविस्मरणीय आणि सुंदर आठवणी आहेत त्या..आज 3जून जागतिक सायकल दिवसांच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा..🌹🌹🌹
✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
(लेखक, कवी, शिक्षक जि. बुलढाणा)
लिखाण 3जून 2023
(Repost)
प्रतिक्रिया नक्की कळवा...
✍️संपर्क -:
@ABCs1432
मो. न.-8806379959
Forwarded from Vinayak Bhise
ये ऐक ना सखे
आपण आताचा
प्रत्येक क्षण बेफिकीर
होऊन आनंदात जगू

मोकळ्या श्वासांनी
हातात हात घेऊन
आभाळाकडे पाहत फिरू

ना आता कोणत्याच
ओझ्याखाली दबून
का राहायचं?

सखे आपण आताचा
प्रत्येक क्षण सुखाचा
तो भरभरून जगू

आज आहे हा दिवस
उद्याचं कोण जाणे
नशिबाचे खेळ सारे
कुणाला काय कळे ?

अपेक्षांचे ओझे नको
नको कोणतीही धांदल
आपल्याच धुंदी
आपण मस्त होऊन जायचं

कधीतरी सोडून
देऊ भूतकाळाची भीती
उद्याच्या भविष्याची चिंताही
दूर लोटू सारी

वर्तमानात रमून
आपण एकमेकांसोबत
आनंदात जगू

बेभान होऊन
गाणी नव्याने गाऊ या
सोबत राहून एकमेकांना
साथ देऊ या

कुणी काही म्हणू दे
कोणी काही बोलू दे
त्याचा विचार न करता

आपली ही दुनिया
आपणच आपल्या
हाताने रंगीन बनवू

नाही कसली पर्वा
नाही कसलाच तो ताण
नाही कोणतीच भीती

सखे आपण आताचा
प्रत्येक क्षण एकमेकांसोबत
बेफिकीर होऊन आनंदात जगू

विनायक भिसे, बारामती
Mo.7798150143
कधी तुम्हाला खूप प्रश्न पडत असतील  
         की उद्या कस होईल, हे मला जमेल का, 
         आज काय चूका झाल्या, हे विचार
         तुम्हाला झोपू देणार नाही, पण काय
         असतं ना काही गोष्टी आपणच
         संपवायच्या असतात की जे होईच 
         होत ते झाल, आणि जे होणार आहे  
         त्याला अजून वेळ आहे,
            होईल सगळं ठीक....
💥  Good_Night  💥
Forwarded from B K
खरच सगळ्यांचे डोळे पाणावले ह्या व्यक्तीच्या कष्टाचे आनंदाश्रु पाहून🥹अनेक वर्षाचा संघर्ष,खूप जणांचे टोमणे,प्रचंड मेहनत करूनही अपयश,खूप slowl खेळतो,कमी strikerate,अनेक वर्ष ट्रॉफी नाही असे म्हणून ह्या व्यक्तीला अनेकदा हिणवले,कर्णधारपदही गेले तरीही एकाच टीमशी कायम एकनिष्ठ राहून अनेकदा अपयश पचविले.18व्या वर्षी 18 नंबरच्या जर्सीच्या हातात शेवटी ट्रॉफी आली,एक वनवासपर्व संपले..विराटकडून सगळ्यांनी संयम आणि एकनिष्ठता ह्या गोष्टीचा आदर्श घेण्याजोगा आहे,नाहीतर वाईट वेळ पाहून बदलणारे खूप असतात..
.............🦋🌺🙏............
लेखन-B.S.Kendre(stu)
Telegram-
@Bskendre5
Con-
7218160575 (Whats)
Insta id- bharat_53_
प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास शेयर करा
*जीवनात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या* *वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे.*

🌹🌹🌹🌹🌻🌻🌹🌹🌹🌹
*🙏🏻🌹 शुभ प्रभात🌹🙏🏻*
"एक साधं कौतुक…" एक जादुई शब्द "

"अगं सुनबाई, तांदूळ थोडे कमी घे , कालचा भात उरलाय अजून," सासूबाई म्हणाल्या, ओट्यावर भांडी आहॆ ते पण लावून ठेव.

"हो आई, लक्षात ठेवलंय."
सुनबाईने सौम्य हसून उत्तर दिलं.

ती अजूनही स्वयंपाकघरात फुरसतीनं स्थिरावत नव्हती. चार महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. नवीन घर, नवीन माणसं, आणि त्या सगळ्यांच्या सवयी समजून घेताना ती आपल्याच विचारात हरवून जात होती.

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ती स्वतःसाठी थांबत नसे. स्वयंपाक, आवराआवरी, सासूचं सासऱ्याचं वेळवर जेवण , नवऱ्याची तयारी, सगळं सुरळीतपणे व्हावं म्हणून ती धडपडत राहायची.

पण ह्या सगळ्यात एक गोष्ट कायम जाणवत राहायची — कोणीच तिचं कौतुक करत नव्हतं.
नविन जवाबदाऱ्या. नविन घर सगळ व्यवस्थित सांभाळाचा प्रयत्न करत होती. तिच्यासाठी सगळ नवन.

त्या दिवशी सकाळी चहा करताना, गॅसजवळ उभी असताना तिला आईच्या शब्दांची आठवण झाली —
"मुली, घरच्यांचं कौतुक शोधायचं नसतं. स्वतःचं समाधान महत्त्वाचं."

ती हसली. पण मनात काही तरी चुटपुटत राहिलं.

तितक्यात सासूबाई मागून आल्या आणि म्हणाल्या,
"सुनबाई, कालची आमटी अगदी छान झाली होती… मी म्हटलं, सांगावं जरा."

सुनबाईचे डोळे क्षणभर विस्फारले.
"म्हणजे… खरंच?"

"हो गं! हलकीशी तिखट पण मस्त, अगदी माझ्या आईसारखी चव होती."तूझ्या हाताला चव आहॆ. तुझी आई सुगरणच आहे ना?

ती काही बोलली नाही, फक्त गालातलं हसू लपवत राहिली.

पहिल्यांदा, एवढ्या दिवसांत पहिल्यांदा, कुणीतरी तिच्या केलेल्या गोष्टीचं कौतुक केलं होतं.

त्या एका वाक्यानं तिला काहीतरी शिकवलं.
"माझं काम कुणीच ओळखत नाही," ही तक्रार एका क्षणात विरून गेली. कारण, आज ज्या एका छोट्याशा वाक्यानं तिचा दिवस सुंदर झाला, तेच दुसऱ्यालाही द्यावं, हे तिला जाणवलं.

त्या दिवशी दुपारी, सासूबाई घराच्या ओट्यावर माठातून पाणी भरत होत्या. त्यांच्या पाठ थोडी वाकली होती,सुनबाईने लगेच धावत येऊन त्या पाण्याचे घागर स्वतः उचलली .

"आई, किती सुंदर पद्धतीनं तुम्ही ओटा स्वच्छ करता! माझा तर दमछाक होतो, पण तुमचं हातपाय चाललेत बघा, हे खरंच कौतुकास्पद आहे."

सासूबाई एक क्षण स्तब्ध झाल्या. मग त्या हसल्या.
"अगं, मी ते काय विशेष करते, इतकी वर्षं केलंय म्हणून सवय झालीये."

"सवय म्हणून केली तरी त्यात मेहनत आहे ना, आई? मी दररोज पाहते तुम्हाला – तुम्ही थकत नाही, कुरकुर करत नाही. तुमचं बघून मला शिकावं वाटतं."

सासूबाईंच्या चेहऱ्यावर लाजलेलं हसू आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसली.

त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी स्वतःहून चहा करून सुनबाईसमोर ठेवला.
"घे गं, तुझ्यासाठी. आज तू मला माझंच काम वेगळ्या डोळ्यांनी दाखवलंस."

कौतुकाचा हा खेळ दोघींमध्ये सुरू झाला.सुनबाईने एक दिवसशेजराच्या मुलाला गणित शिकवणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,
"इतकं संयम ठेऊन शिकवतोस तू… खरंच, माझ्यासारखं घाईघाईनं ओरडून काही झालं नसतं. मुलाच्या आयुष्यात तू शिक्षकासारखं वागतोस!"

तो थोडा गोंधळला. पण हसला. आणि पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात कौतुकामुळे चमक होती.

दुसऱ्याच दिवशी, सासूबाईंनी तिच्या सुनबाईच्या हस्तकलेच्या कुंड्या पाहिल्या.
मातीच्या एका भांड्यात तिनं क्ले वर्क केलं होतं.
सासूबाईंनी भांडं हातात घेत म्हणाल्या,
"तुझ्या हातात जादू आहे गं! माझ्या आईसारखी नक्षी आहे ह्या रंगांत."
ते ऐकून सुनबाईचं मन फुलून आलं.
ती एक क्षण मागे गेली — लहानपणी रंगकाम केलं की आई गोड बोलायची, "तुझं रंगसंगतीचं कौतुक करावं असं आहे!"

आणि एक संध्याकाळ…
सासरे जुन्या वहीत एक कविता शोधत होते.
अर्धवट लिहिलेलं होतं काहीसं…
सुनबाईच्या एका वाक्याने —
"बाबा, तुमची कविता किती गोड आहे! शेवट पूर्ण केलात, तर ती खरंच सुंदर वाटेल!"
त्यांनी खळखळून हसत पेन उचलला,
ती कविता त्यांनी त्या रात्री पूर्ण केली.

हळूहळू घरात एक नवीन वळण आलं होतं…
जिथं टीका नव्हे, तर प्रोत्साहन ऐकू येत होतं.
जिथं चुकांवर नाही, तर प्रयत्नांवर लक्ष दिलं जात होतं.
जिथं प्रत्येक वाक्यात "मी सांगितलं होतं" ऐवजी, "मस्त केलं!" असं ऐकायला यायचं.

घरात एक नवीन वळण आलं होतं.
घरातलं वातावरण जरा जास्त जिव्हाळ्याचं झालं होतं.

एका संध्याकाळी दोघी गच्चीत बसल्या होत्या. सायंकाळी गुलाबी ऊन आणि गार वारा.
सासूबाई म्हणाल्या,
"सुनबाई, मी तुला एक गोष्ट सांगते का?"

"सांगा ना आई!"

"मी लग्न होऊन ह्या घरात आले, तेव्हा तुझी आजचे सासू म्हणजे माझ्या सासूबाई, फार कठोर होत्या. मी काहीही केलं, ते कधीच योग्य वाटलं नाही त्यांना. मी कितीदा आमटी चांगली केली, घर स्वच्छ ठेवलं, सण सजवले… पण कधीच त्यांनी एक शब्दही कौतुकाचं नाही म्हटलं."

"मग तुम्ही काही बोललात नाही त्यांना?"

"नाही गं. तेव्हा असं वाटायचं – 'आपलं काम हे आपलं कर्तव्य आहे, त्याचं कौतुक नको.' पण आताशा वाटतं, त्या जर एकदाच म्हटलं असतं – ‘छान केलंय गं’ – तर माझ्या थकव्यात जरा जीव मिळाला असता."
सुनबाई शांत झाली.

सासूबाई पुढे म्हणाल्या,
"म्हणून मी ठरवलं, मी माझ्या सुनेचं कौतुक करणार. कारण ‘कौतुक’ हा शब्द नाही… तो आधार आहे. हक्काचं असावं, पण अचानक मिळालं की जास्त गोड लागतं."

त्या रात्री, सुनबाईनं आपल्या डायरीत लिहिलं:
“कौतुक ही भावना नसून ती संस्कृती आहे…
ती पुढच्या पिढीकडे देणं ही माझी जबाबदारी आहे."

काही दिवसांनी, शेजारच्या वहिनी त्यांच्या मुलीला घेऊन आल्या.
"ताई, माझी गोजिरी कॉलेजात पहिल्यांदाच कविता लिहिलीये. ऐका ना."

गोजिरी थोडीशी घाबरत होती. पण सुनबाई हसून म्हणाली,
"अगं बाई, कविता करायला धाडस लागतं. तू आधीच कौतुकास पात्र आहेस."

मग गोजिरीने कविता वाचली, थोडी वळणदार, थोडीशी चाचपडलेली.
सुनबाईने तिला जवळ घेतलं.
"अगदी मनापासून लिहिलंयस गं! शब्द थोडे अजून वळणावर येतील, पण तुझी भावना स्पष्ट पोचते. खरंच, छान वाटली."

गोजिरीचे डोळे चमकले.

सासूबाई आतून हसत बाहेर आल्या –
"बघ, आता तुझं कौतुक दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतंय."

त्या घरात आता रोज काही तरी छोटंसं कौतुक ऐकू यायचं –
“तू छान केलंस…”
“अगदी बरोबर वेळेवर आलास…”
“आजच्या जेवणात प्रेमाची चव होती…”
“तू हसलीस, म्हणून दिवस उजळला…”

कौतुकाचं ते वातावरण…
कुठलीच मोठी गोष्ट नव्हती, पण माणसं जरा जास्त सजग, प्रेमळ आणि एकमेकांमध्ये गुंतलेली वाटायची.

कारण त्या घरात आता "कौतुक" ही नित्यनेमाची परंपरा झाली होती."कौतुक – एक जादुई शब्द…"

कौतुक म्हणजे केवळ एखाद्याच्या कामावरची स्तुती नाही.
कौतुक म्हणजे समजून घेतलेली नजर, ओळखलेली भावना, आणि दिलेलं एक हलकंसं थोपटणं.
एक साधं "वा!", "छान केलं!", "तुझ्यामुळे जमलं!" असं म्हणणंही, कधी कधी एखाद्याच्या थकलेल्या जीवाला नवा श्वास देतं.
ते शब्द नसतात… ते आश्वासक साक्षी असतात —

म्हणून जमलं तर कौतुक करा. कौतुक करायला पैसे लागत नाही. फक्त दोन शब्द लागतात. ते दोनच शब्द. जगणं बदलतं.
माणूस फुलतो.
कारण कौतुकाचा तो क्षण…
तो कुणाच्या आयुष्यात वळण घालतो — हलकासा, पण खोलवर उमटणारा क्षण असतो.

तृप्ती देव 🅒︎🅟︎copyright
कथाविश्व - गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
Forwarded from Vinayak Bhise
सखे मला तुझ्या
आठवणीत नाही गं
तुझ्यासोबत प्रत्यक्षात
प्रत्येक क्षण जगायचं

प्रत्येक श्वासात
प्रत्येक पावलात
प्रत्येक क्षण
तुझा सहवास मला
अनुभवायचा आहे

सखे गेलेले क्षण
आठवून काय करू?
उद्याचा भविष्याची
चिंता कशाला करू?

आजचा आत्ताचा क्षण आहे
खरा आपला
तो मला तुझ्यासोबत जगायचं

डोळ्यात डोळे घालून
हात हाती घेऊन
आपल्या आपण दुनियेत जगू

हासू, बोलू, रुसू-फुगू,
सर्व काही करू
पण प्रत्येक क्षणात
आपण एकमेकांसोबत राहू

नको ती आठवण जुनी,
नको उद्याची ती स्वप्नं नवी
आज, आत्ता, या क्षणात
मला तुझ्यासोबत राहायचं

तुझ्यासोबत प्रत्यक्षात
प्रत्येक क्षण जगायचं

✍🏻विनायक भिसे, बारामती
Mo. 7798150143
2025/07/02 00:48:44
Back to Top
HTML Embed Code: