Forwarded from Niranjan's Blog☘️
2-3 वर्षे मेहनत घ्या म्हणजे पुढची 25-30 वर्षे आरामात रहाल ❌
2-3 वर्षे मेहनत घ्या म्हणजे पुढची 25-30 वर्षे चांगल्या पातळीवर तुम्ही मेहनत घेऊ शकाल✅
तात्पर्य एकच मेहनत आणि कष्ट चुकणार नाहीच आताही आणि नंतरही आत्ता मेहनत घ्यायची ती आपल्या मेहनतीचं काहीतरी चीज होईल अशा पातळीवर पोहोचण्यासाठी आणि पुढे मेहनत करायची ती प्रत्यक्ष तसं होण्यासाठी❗️
#आयुष्याचे_धडे
@niranjan_blog

👍3
जे तुम्ही समाज माध्यमांवर पाहता ते पुर्ण सत्य कधीच नसतं.. अवास्तव नसलं तरीही वास्तवाचं पुर्ण चित्र नसतं ते.. त्या चित्राशी स्वतःच्या आजच्या स्थितीशी तुलना करण्यासारखं घातक दुसरं काहीच नाही.. प्रेरणा प्रेरणेच्या मर्यादेतच ठीक असते.. त्यापलीकडे ते घातक ठरू लागतं.. आपण समाजमाध्यमांतून आपल्यापर्यंत काय पोहोचावं आणि काय नाही हे निवडू शकतो.. पोहोचलेल्या कोणत्या गोष्टीवर विचार करावा आणि कुठल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं, विचार केला तर नेमका कशा पद्धतीने विचार करावा हे सगळं नियंत्रण आपण दिवसेंदिवस हरवू लागलोय.. खरंतर प्रवाह ही चांगली गोष्ट असते परंतू तेव्हाच जेव्हा प्रवाहाची दिशा आपण विचारपुर्वक निवडलेली असते. ती दिशा समाजमाध्यमं ठरवत असतील तर मग मात्र अवघड आहे. बाकी आपण झालेल्या गोष्टी बदलू शकत नाही. त्यामुळे आधी काय झालं यावर काथ्याकूट किती करावा याला काहीतरी मर्यादा हवी नाहीतर गेलेल्या संधीचा शोक करायच्या नादात हाती असलेल्या संधी आपण गमावून बसू.. ज्याला पुढे जायचंय, प्रगती करायचीय त्याने या झगमगाटी प्रेरणेपासून जाणीवपूर्वक अलिप्त राहून स्वयंप्रेरणेने आपलं काम करायला हवं हे खूप कृत्रिम वाटू शकतं पण तेच खरं आहे.
👍2
माझ्यातला मी...
..माझं हे जे काही चाललंय आणि ज्याला मी लाईफ किंवा जगणं वगैरे म्हणतोय त्यात बरं चाललंय म्हणावं असं फारसं काहीही नाहीये... उलट गंडल्यासारखं वाटतंय सगळंच.. फेक वाटतंय सगळं.. येस.. सगळं फेक वाटतंय.. विचार, बोलणं, आशा, निराशा, अपेक्षा, स्वप्नं, वागणं, जगणं.. सगळंच.. पण या सगळ्यापेक्षा जास्त माझ्यातला 'मी' फेक वाटू लागलाय.. मला सगळं ठाऊक असतं.. सगळं कळतं.. कळूनही मी सोईनुसार कळून न कळल्यासारखं करत असतो.. कळतंय पण वळत नाही असं उगाच स्वतःचं सांत्वन करण्यासाठी म्हणत असतो.. खरंतर मला काही वळवून घ्यायचच नसतं मुळात.. कारण तेच माझ्या सोईचं असतं.. सोय जपली गेली की पुरेसं असतं मला.. सारं काही सोयीस्कर चाललेलं असतं माझं म्हणून माझ्यातला मी मला सर्वाधिक फेक वाटतो.. कबीर साहेब म्हणून गेलेत ना.. "जो दिल खोजा आपना, मुझसे बुरा न कोय ॥" तसंच काहीसं.. कधीतरी काय अगदी कित्येकदा वाटतं यात राम नाही.. सोडून द्यावं हे सगळं.. निघून जावं कुठेतरी..
हे सगळं असूनही.. हे सगळं कळूनही.. मी सगळं निभावून नेत असतो.. पुढे जात असतो.. एक निरर्थकता कळूनही अर्थाशिवाय अर्थ नाही म्हणत दुसऱ्या अर्थाच्या नादात का होईना मी पुढे जात असतो.. कदाचित रडत पडत जात असेल.. कदाचित अडखळत जात असेल.. कदाचित अजून काही असेल.. पण मी पुढे जात असतो.. या पुढे जात राहण्याच्या कौतुकापायी माझ्यातल्या फेक वाटणाऱ्या 'मी' ला आजवर खूप वेळा माफ केलं आहे.. पुढेही करत राहील.. कारण मला माझ्या पुढे जात राहण्याची निकड या सगळ्या विचार कलहापेक्षा मोठी वाटते.. यातही मला कबीर साहेब मदत करतात.. ते म्हणतात ना, "साईं इतना दीजिये, जा मे कुटुम समाय ।
मैं भी भूखा न रहूँ, साधु ना भूखा जाय ॥"
बस्स यासाठीच हे सगळं जगणं बाकी काय...
~निरंजन🌿
#जगणं

👍4❤3
एक लक्षात येतंय का? आजकाल आपल्याला सर्वांनाच मोटीव्हेशनल काहीतरी हवं असतं सततच.. माणसं जेवढी मोटीवेशन डिपेन्डन्ट कधीच नव्हती तेवढी आज होऊ लागली आहेत. तसं पाहिलं तर मोटीव्हेशनला काही जण नाकं मुरडतात पण ती लोकही कधी लॉ ऑफ एक्ट्रक्शन किंवा अजून काय मनाची एकाग्रता किंवा मग मनःशांती नाहीतर मग व्हॉईब्ज काय नि फ्रिक्वेन्सी काय किंवा मग अगदीच देवपूजा काय.. कशा न कशावर डिपेन्डन्ट होऊ लागली आहेत.. या सगळ्यात न बसणारी किंवा बसणारीही माणसं कुठल्यातरी सोशल मीडिया किंवा अगदी व्यसनांवरही डिपेन्डन्ट होऊ लागली आहेत... हे सगळं का होतंय? का होत असावं? डिप्रेशन नावाचं पँडेमिक तर पसरत नाहीये ना? कुणास ठाऊक.. पण माणसं डिपेन्डन्ट होऊ लागली आहेत हे मात्र नक्की.. तेही कधी नव्हती एवढी..
#असहज
#Niranjan_blog
#असहज
#Niranjan_blog
❤1
कुणी नव्याने स्पर्धा परीक्षा तयारी सुरु करतोय, कुठून सुरू करू असं विचारतं तेव्हा मी सर्वात आधी त्या त्या परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका पहायला सांगतो. अनुभव असा आहे की काही आठवड्यांतच आधी उत्साही असलेली मंडळी तेवढं पाहूनच आपण हे स्पर्धा परीक्षा वगैरे नको करायला म्हणून सोडून दुसरं काहीतरी करायला जातात. ते हा नाद लवकर सोडून देतात ते एक बरच आहे. दुसऱ्या बाजूला काही लोक मात्र हे काम व्यवस्थित करतात आणि मग पुढच्या अभ्यासाकडे वळतात.. हे असं करायचं कारण म्हणजे बाकी अभ्यासक्रम पाहिला तर आपल्याला हे जमू शकेल असं वाटणं शक्य आहे, स्टेट बोर्ड, काही पुस्तकं वाचली तर वाटतं हे तर खूप सोपं आहे शिवाय इंटरेस्टिंग पण वाटतं नवीन गोष्टी वाचायला पण पोस्ट मिळते ती परीक्षेतून आणि त्यासाठी परीक्षेत काय प्रकारचे प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांसोबत माझं जमतंय की नाही हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न पाहणे.. होय, निव्वळ पाहणे, वाचणे, सोडवणे वगैरे नाही हे सुरुवातीलाच व्हायला हवं.. हे काम खूप रटाळवाणं वाटतं करायला म्हणूनच यासोबत आपलं जमतंय की नाही हे पहायला हवं कारण पुढे एकच गोष्ट बऱ्याच वेळा वाचणे, नोट्स काढणे मग पुन्हा वाचणे, टेस्ट सोडवणे हे सगळे अधिक रटाळवाणे टप्पे येणार असतात तयारीत त्यामुळे स्वतःची मानसिक सज्जता कितपत आहे हे तपासायला हवीच. हे येथे सांगायचं तात्पर्य एकच की जुन्या प्रश्नपत्रिका पाहणे, PYQ ना आपला मित्र बनविणे हे या परीक्षांच्या तयारीतला एक अनिवार्य टप्पा आहे. तो जेवढा लवकर आपण पुर्ण करू तेवढी लवकर आपल्याला ही परीक्षा कळू शकते.
@niranjan_blog
@niranjan_blog
💯1
आजचा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 Cut off पाहून राज्यसेवा 2023 Mains ला असणाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असेल. स्पर्धेचा अंदाज आला असेलच तर आता वेळापत्रक वगैरेची वाट न पाहता लगेच अभ्यासात गती आणायला हवी.
राज्यसेवा 2024 साठी तयारी करणाऱ्यांनीही सज्ज व्हायला हवे आता लगेच.
राज्यसेवा 2024 साठी तयारी करणाऱ्यांनीही सज्ज व्हायला हवे आता लगेच.
आपले निर्णय आपल्याला खूप काही शिकवतात आयुष्यात.. आपण घेतलेले आणि न घेतलेलेही..
'चिंतामुक्त आणि भयमुक्त आयुष्य' हे आपल्या सर्वांचं प्राथमिक ध्येय असतं. जगाच्या आणि मनाच्या कलकलाटात दुसरी कुठली ना कुठली ध्येये आपल्याला खूप मोठी वाटू लागतात आणि त्यांची पुर्तता होईल की नाही याचीच आपल्या चिंता आणि भिती वाटू लागते. खरंतर भिती आणि चिंता मनावर ओझ बणून राहत असेल तर कुठलं ध्येय पूर्ण होणं तर दुरच राहिलं साधं रोजचं जगणंही अवघड होऊन जातं त्यामुळे कुठलंही ध्येय पुर्ण करण्यासाठी ते पुर्ण नाही झालं तर काय याबद्दल मनात असलेली भिती आणि चिंता बाजूला सारता आली पाहिजे. त्या भितीला ठामपणे सांगता आलं पाहिजे. ठीक आहे बघून घेऊ जे होईल ते पण आज मला शांतपणे आणि योग्य पद्धतीने त्यासाठी काम करायचं आहे. ते मी भयमुक्त आणि चिंतामुक्त राहून करणार आहे. मनाशी संवाद तसाही सतत सुरु राहतोच आपला तर त्याला जरा सृजनात्मक बनवायला हवं.
#मनसंवाद
#मनसंवाद
👍3❤1
उद्या 'वाचन प्रेरणा दिन' आहे. यानिमित्ताने उद्या एक वाचन विशेष सत्र आपण या माध्यमातून घेऊ. त्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांबद्दल आणि तुमच्या वाचन आवडीबद्दल बोलू शकता. तुम्ही सध्या काही वाचताय का? किंवा तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाबद्दल येथे सांगा जरा. जमल्यास पुस्तकाचा कव्हर फोटो शेअर करा. उद्या सविस्तर बोलूच.
चांगल्या पुस्तकाच्या संपर्कात येणे आणि ते आपल्याजवळ असणे, ही खरोखरच चिरंतन समृद्धी असते.
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
#वाचनप्रेरणादिन
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
#वाचनप्रेरणादिन
❤2👍2