Telegram Web Link
Live stream finished (1 hour)
Telegram, FOMO, Mental Peace
Niranjan's Blog☘️
➡️Flow of information

➡️Fear of Missing Out(FOMO)

➡️Classes/Batches/Courses and our mentality

➡️Discipline

➡️Your habits decide your future

➡️Commitment

➡️Self-Image

💙Mental Peace
Just for your reference👆
Forwarded from Niranjan's Blog☘️
Comparison ही खतरनाक गोष्ट आहे. Comparison च्या नादात भल्याभल्यांना आपल्या strengths चा विसर पडतो. प्रत्येकाच्या आपल्या स्वतःच्या म्हणून काही strengths असतात. त्यांची जाणीव होणं, जपणूक होणं गरजेचं आहे. हे नाही झालं तर आपण copy paste culture चा भाग होऊन जातो. गर्दीत हरवून जातो. स्वतःच्या strengths ओळखणे, जपणे जमायला लागलं की आपसूकच आपल्यातल्या weakness वरही काम करता येतं. ही प्रक्रिया सतत सुरू राहते. Success ही खूप व्यापक संकल्पना आहे. परीक्षेत पास होणं, पोस्ट मिळवणं त्यातला एक भाग आहे. नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे, परंतू तरीही फक्त पोस्ट मिळवणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं नक्कीच नाही. यशाचे अनेक आयाम असतात ते हळूहळू कळू लागतात. कुणालाच एकाचवेळी सर्वच आयामांवर काम करणं शक्य होत नाही. मला वाटतं ते गरजेचही नाही. एक एक आयाम सुधारता आला पाहिजे. Priorities ठरवता आल्या पाहिजे. सर्वच वेळी, सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशाच असाव्यात हा अट्टाहास उपयोगाचा नाही. एका वेळी एक पाऊल पुढे जाता आलं म्हणजे म्हणजे आपण जिंकत असतो. आयुष्यात चढ-ऊतार असतातच. कुणाचाही प्रत्येक दिवस happening वगैरे नसतो. कित्येकदा अनेक दिवस, महिने, वर्षे खूप त्रासदायक असतात आणि हे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाचंच असतं. आयुष्य खूप काही देत असतं आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. चालताबोलता जमेल तसं आपल्यासोबतच इतरांचंही जगणं सुंदर करता आलं पाहिजे.

~निरंजन🌿

@niranjan_blog☘️
लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया
Worst is yet to come!

ऑफिस मधून परत येता येता आज दोन जणांचे फोन आले.. एक होता जो म्हटला सर आपण दोन वर्षांपूर्वी शेवटचं बोललो होतो आणि तेव्हा तुम्ही मला अभ्यासात चालढकल करतो म्हणून खूप झापलं होतं. त्यानंतर मात्र मी खूप मन लावून अभ्यास केला आणि आज मला सरळसेवेतून एक पोस्ट मिळाली आहे तसेच अजून माझ्या दोन सरळसेवा पोस्ट कन्फर्म आहेत. जब जागो तब सुबहा म्हणतात तसं एकदा जाणीव झाली की पुन्हा मागे वळून पहायचं नाही आणि जोरदार मेहनत घ्यायची.. जी जान लगा देणा म्हणतात तसं कामाला लागलं आयुष्य घडविण्यासाठी गरजेचं असतं.. ते म्हणतात ना, "कौण सुधरा है सिर्फ बातो से यहा.. हर किसी को इक हादसा जरूरी है"
असा टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येत असतो तिथून पुढे आपलं आयुष्य कसं असेल हे आपल्या निर्णयांवर आणि आपल्या मेहनतीवर ठरणार असतं..

त्यानंतर अजून एका मित्राचा फोन आला. जवळपास सहा-सात वर्षे झाले अभ्यास सुरू आहे पण अजूनही हाती काहीच नाही.. क्लर्कची एवढी मोठी जाहिरात होती पण मेन्स होऊनही टायपिंग टेस्टच्या वेळी घरच्या एका मोठ्या अडचणीमुळे qualify होण्यात अडचण आली.. एवढ्या सगळ्या सरळसेवेच्या परीक्षा झाल्या पण तरीही हाती काही लागलंच नाही.. एवढ्या सगळ्या पसाऱ्यात अवसान गळून गेलेला तो बरंच काही सांगत होता.. त्यात एक गोष्ट बोलून गेला.. "मित्र म्हणतात म्हणे, आयुष्यात अभ्यासाशिवाय दुसरं काही आहे की नाही?" ....जाहिरात, जागा, प्री आणि मेन्सच्या वाऱ्या यांच्यात पिचलेल्या आणि जीवतोड मेहनत घेणाऱ्या प्रत्येकालाच एक तर हे कधीतरी ऐकावं लागतं किंवा कधीतरी स्वतःलाच तसा प्रश्न पडतो... पण खरं सांगायचं झालं तर सत्य खरंच खूप कडवट असतं.. खूप जास्त कडवट.. आणि सत्य हेच आहे की तुम्ही तयारीला लागून चार वर्षे झाल्यानंतर तुमच्या आयुष्यात अभ्यासाशिवाय खरंच काहीच नसतं.. तुम्हाला कितीही, काहीही आणि कसंही वाटलं तरीही... कारण या अभ्यासाच्या धक्क्यानेच अपयशाच्या गाळात अडकलेली आयुष्याची गाडी पुढे जाणार असते.. या सगळ्यात टिकून राहणं रोजच्या रोज एक आव्हान म्हणून समोर उभं राहतं पण तरीही रहायचं टिकून... सर्वायव्हल ही फार चिवट गोष्ट असते.. छोट्यातल्या छोट्या जीवातही ती असते.. आपल्यातही ती खच्चून भरलेली असते म्हणूनच तर आपण टिकून आहोत आणि राहणारही आहोत.. कितीही अडचणी असल्या.. आयुष्याने कितीही किचकट परिस्थितीमध्ये आपल्याला नेऊन टाकलं असलं तरीही भिडावं लागतं परिस्थितीला.. कालपरवाच एका मित्राशी बोलत होतो.. असाच काहीतरी विषय बोलता बोलता तो म्हटला होता ते Best is yet to come असतं ना त्यापेक्षा worst is yet to come असं म्हणत काम करायचं म्हणजे आहे ती परिस्थिती बरी वाटू लागते🙆
तर असा हा सगळा आयुष्य नावाचा पसारा असतो.. सावरावा तेवढं कमीच असतं त्यामुळे जसं तसं स्वीकारायचं आणि पुढे जात रहायच.. कधी Best is yet to come म्हणायचं अन् कधी अगदीच वैताग आला तर मग worst is yet to come म्हणायचं...

~निरंजन🌱
डोळे उघडे असतात तेव्हा "कसं होईल?" आणि "गोष्टी कशा आहेत?" याबद्दल आपण विचार करत असतो... जेव्हा आपण डोळे मिटून घेतो आणि खोलवर श्वास घेतो तेव्हा ही विचारांची साखळी जरा खंडित होते आणि "कसं व्हावं?" आणि "गोष्टी कशा असाव्यात?" याबद्दल आपण विचार करू शकतो.. हे कसं शक्य आहे याबाबत विचार न करतं मला काय हवं आहे याबद्दल विचार करता येऊ शकतो.. असा दिवसातला दोन-तीन मिनिटांचा pause आपल्याला खूप उर्जा देऊन जाऊ शकतो.

#Meditation💙
बहुप्रतिक्षीत लाडकी परीक्षा योजना जाहीर😍
परीक्षा तिमाही

1 डिसेंबर
5 जानेवारी
2 फेब्रुवारी

दिवाळी-दसरा आता सगळं विसरा
रिव्हिजण करा पक्की आणि अभ्यासात खूश रहा😄
मनःपूर्वक शुभेच्छा❤️😊
2025/07/01 15:59:37
Back to Top
HTML Embed Code: