Telegram Web Link
Success is hidden in your daily routine!
शरीराला आणि मनाला शीण येईल, असे कष्ट दे आणि घाण्याला जुंपून ठेव 🙌

शोधयात्रा-अरूण साधू
आज पुण्यात या सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला. मराठी गझल-कविता विश्वात ही नव्या पिढीची तरूणाई नवनव्या प्रयोगांसहीत पुढे येत आहे. विशेष म्हणजे यातील विशाल बुलढाण्याचा, आकाश नाशिक येथील तर यामिनी या मुंबई येथील आणि यांचा कार्यक्रम पुण्यात झाला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा सशुल्क कार्यक्रम होता तरीही हाऊसफुल्ल होता. प्रेम, विरह, वंचना, वेदना, अध्यात्म ते अगदी देशभक्ती पर्यंतच्या विविध विषयांवर या कार्यक्रमात रचना सादर करण्यात आल्यात. विशालच्या संध्याकाळ... दुरावा.. बाया नुसत्या दळत राहिल्या या रचना मनाला विशेष भावल्या. आकाश यांच्या रचनांमधला तुकोबा आणि विठ्ठलाचा संदर्भ खूप आवडला.. गझल म्हणजे... हे ही फार आवडलं.. यामिनी यांनी सादर केलेली पुरुष ही रचना मन जिंकून गेली... एकुणच एक सुंदर कार्यक्रम आहे हा.. ❣️
कधी कधी वाटतं,

"व्यस्तता हे वरदान आहे."

#जगण
आज एका विवाह सोहळ्याला उपस्थित रहायचा योग आला. याबद्दल आवर्जून लिहावं आणि शेअर करावंसं वाटलं त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. नवरा मुलगा IAS अधिकारी तर नवरी मुलगी सहायक गटविकास अधिकारी असलेल्या या जोडीने नोंदणी पद्धतीने (Registered Marriage) विवाह केला. पुण्यात अगदी मोजके पाहूणे आणि मित्रपरीवार यांच्या उपस्थितीत हा देखणा विवाह सोहळा पार पडला. ना कुठली घाई-गडबड ना कुठला गोंधळ ना गर्दी ना गोंगाट.. उलट कुमार सानू, ए आर रहेमानची गाणी होती सोबतीला..  "Big Fat Indian Wedding" काळात या उच्च पदांवर कार्यरत अधिकारी जोडप्याने तरूणाई साठी आदर्श निर्माण केला आहे असे म्हणायला हरकत नाही. एकूणच लग्न म्हटलं भरपूर उधळपट्टी वगैरे आजकालचा ट्रेंड झाला आहे. त्यातही अधिकारी लोकांची लग्नं हा तर एक मोठाच विषय झाला आहे सध्याच्या काळात. या सर्व गोष्टीना फाटा देऊन या अधिकारी जोडीने घेतलेल्या निर्णयासाठी ते खरेच अभिनंदनासाठी पात्र आहेत. अशी उदाहरणं अगदी अपवाद म्हणून राहत असली तरीही असे लोक आहेत आपल्या आजुबाजुला जे अपवाद म्हणून जगण्याची हिम्मत करतात.

(या बाबतीत लिहावं एवढी माझी पात्रता आहे की नाही हे माहिती नाही परंतू तरीही ती हिम्मत करतोय, कारण मी आणि माझी पत्नी, आमच्या दोघांची इच्छा असुनही एवढं तर नाही करू शकलो, परंतू आम्ही कमीतकमी नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये एका मंदिराच्या सभागृहात लग्न केले आहे.)
कमावते झालेल्या लोकांनी गुंतवणूक, विमा, आर्थिक नियोजन याबद्दल चर्चा करण्यासाठी सुरू केलेल्या 'अर्थयोग' या channel ला नक्की join व्हावे. या channel वर आत्तापर्यंत झालेल्या सर्व sessions च्या recordings आहेत त्या नक्की ऐकाव्यात. या platform बद्दल इतरांनाही कळवा.

https://www.tg-me.com/arthyog2024
"Opt out करा" हे "सांगायला लागतं" ही शोकांतिका आहे.
मर मर मेहनत करून, कष्ट करून टिकून रहायचं असतं आपल्याला ते मुळात का आणि कुठून येत असेल ही ऊर्जा.. कितीतरी वेळा, पुनःपुन्हा अपयश हाती येऊनही एवढंच काय तर सगळं सोडून द्यावं असं वाटूनही आपण सोडून देत नाही.. टिकून राहतो.. उलट अधिक जोमाने पुन्हा उभारी घेतो.. हा आपला चिरंतन स्वभावगुण आहे. सर्व्हायवल ही अगदी बेसिकपण कमालीची चिवट गोष्ट आहे.. सारं काही समष्टीसाठी असतं की नाही माहिती नाही परंतू "सारं काही सर्व्हायवलसाठी" नक्कीच असतं.. टिकून राहणं ही काही फक्त एखाद्या परीक्षेपुरती किंवा स्पर्धेपुरती मर्यादित गोष्ट नाहीये तर ती खरंतर एक लाईफ फिलॉसॉफी आहे असं म्हणायला हरकत नाही. तसं पाहिलं तर या जगात मेहनत कुणालाच सुटली नाहीये.. अगदी गडगंज श्रीमंत असलेल्यांनाही काही ना काही प्रकारची मेहनत असेलच की.. पण त्यांचं राहू देत बाजूला.. आपल्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला मेहनत कधीच सुटली नाही... आणि हो ती पुढेही सुटणार नाही.. होय तुम्ही अधिकारी होण्याचं स्वप्नं पहात असाल तर एक अधिकारी म्हणून अनुभवातून सांगतो.. अधिकारी झाल्याने मेहनत सुटत नाही तर ती अधिक वाढते.. तुम्ही अधिकाधिक व्यस्त होता.. कमालीचा ताणतणाव तुमच्या आयुष्यात ठाण मांडून बसतो.. रोज नवनवीन समस्या तुमच्या समोर उभ्या ठाकतात.. असं बरंच काही असतं.. पण तरीही ती मेहनत worth म्हणावी अशी असते.. कारण त्यातून आपल्या ज्ञानाच्या, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक क्षमतांच्या कक्षा रूंदावतात.. नवनवीन गोष्टी कळताय, शिकायला मिळतात... अधिकारी होणं म्हणजे मेहनत सुटणं नाही तर अधिकारी होणं म्हणजे एका चांगल्या स्तरावर पोहोचून मेहनत घेणं हाच काय तो एक अर्थ यात सापडतो त्यामुळे अधिकारी होण्याच्या प्रक्रियेत मेहनत घेताना कुचराई करायची नाही.. सारं काही सर्व्हायवलसाठी म्हणत टिकून रहायचं🙌

#जगण
"The three big decisions - what you do, where you live, and who you’re with."

Naval Ravikant
Success isn’t handed to you, it’s earned through relentless effort.

No matter how difficult it seems, every hour you invest in your growth is one step closer to your dreams.

Stay disciplined, wake up early, and build the future you’ve always wanted.

The grind leads to greatness.
सगळं कधीच संपत नसतं पण तरीही सगळं संपल्यासारखं वाटणं फार त्रासदायक असतं... रस्त्यात अडकून पडलो असताना रस्ताच बंद झाला तर आता पुढे काय? किंवा माझं कसं होईल? या चिंतांनी डोक्याचा भुगा होणं प्रचंड त्रासदायक असतं... यातून सुटणं गरजेचं असतं... चालता चालता कुठे तरी अधेमध्ये अडकून पडलेलं असताना अचानक हक्काची वाटच हरपून गेली, रस्ताच बंद पडला तरीही चालणं बंद होऊ शकत नाही... राजमार्ग सुटला तरीही मिळेल त्या वाटेने चालत जायचं असतं.. थिजून जाण्यापेक्षा दिसेल त्या आणि शक्य वाटेने चालत राहणं चांगलंच.. ठेचा लागलेले पाय कणखर होत जातात.. रस्त्यावरच्या धुळीत कुठेतरी हरवून गेलेली आसवं कुणाच्याही नजरेस येत नसली तरीही ती आसवं चालणाऱ्याला आधार देत असतात... अनेकदा अन् अनेकांच्या आयुष्यात फुललेल्या फुलांमागे अशाच एकांतात डोळ्यांत भरून आलेल्या अज्ञात आसवांचं सिंचन असतं... अश्रू ताकद देतात चालणाऱ्याला... अश्रू वाट करून देतात कुढत कुढत जगताना मनाच्या कोपऱ्यांमध्ये कितीतरी काळ साचून पडलेल्या भावनांच्या अडगळीला....अश्रू सारवण घालतात मनाच्या भिंतींना... त्या लखलखीत होत जातात आसवांच्या सारवणाने... पुन्हा तयार होतात नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी अन् कितीतरी आघात सोसण्यासाठी...

~निरंजन🌱

#जगण
स्वप्नं जगणं आणि आपलं जगणं यातलं अंतर पार करून जाता जाता जगणं मागे पडू लागतं...

#जगण
कधीतरी संथपणे पुढे जाणारं किंवा अगदीच थबकून गेलेलं आयुष्य कधीतरी झपाट्याने पुढे जाऊ लागतं.. एवढं झपाट्याने की त्या वेगाशी जुळवून घेताना धाप लागावी अन् अशातच कधीतरी ठेच लागून आपण जायबंदी झाल्यासारखं झालं की माणसाला गहन आणि गंभीर प्रश्न पडू लागतात... आयुष्य खरंतर असंच असतं.. ते कधीच आपल्या सोईनुसार नसतं तरीही अपेक्षा संपत नाहीत... पुढे मागे अपेक्षा आटून गेल्या तरीही आशा कधीच संपत नाही... कारण बहूदा आशा संपली तर सगळंच संपल्यासारखं वाटू लागतं... त्यामुळेच आशा संपत नाही... अगदी नैराश्याच्या खोल खोल काळोखात अडकून पडलेल्या माणसातही आशेचा अंश असतो... निष्पर्ण झालेल्या झाडाला कधीतरी पालवी फुटून यावी तसं नैराश्याच्या काळोखातही आशेचे किरण कधीतरी उगवतात अन् म्हणूनच आशा आहे तोवर आपण असतो, आयुष्य असतं.. जगणं असतं.. पुढे जात राहणं असतं...

#जगण
2025/07/06 22:40:08
Back to Top
HTML Embed Code: