Telegram Web Link
"The three big decisions - what you do, where you live, and who you’re with."

Naval Ravikant
Success isn’t handed to you, it’s earned through relentless effort.

No matter how difficult it seems, every hour you invest in your growth is one step closer to your dreams.

Stay disciplined, wake up early, and build the future you’ve always wanted.

The grind leads to greatness.
सगळं कधीच संपत नसतं पण तरीही सगळं संपल्यासारखं वाटणं फार त्रासदायक असतं... रस्त्यात अडकून पडलो असताना रस्ताच बंद झाला तर आता पुढे काय? किंवा माझं कसं होईल? या चिंतांनी डोक्याचा भुगा होणं प्रचंड त्रासदायक असतं... यातून सुटणं गरजेचं असतं... चालता चालता कुठे तरी अधेमध्ये अडकून पडलेलं असताना अचानक हक्काची वाटच हरपून गेली, रस्ताच बंद पडला तरीही चालणं बंद होऊ शकत नाही... राजमार्ग सुटला तरीही मिळेल त्या वाटेने चालत जायचं असतं.. थिजून जाण्यापेक्षा दिसेल त्या आणि शक्य वाटेने चालत राहणं चांगलंच.. ठेचा लागलेले पाय कणखर होत जातात.. रस्त्यावरच्या धुळीत कुठेतरी हरवून गेलेली आसवं कुणाच्याही नजरेस येत नसली तरीही ती आसवं चालणाऱ्याला आधार देत असतात... अनेकदा अन् अनेकांच्या आयुष्यात फुललेल्या फुलांमागे अशाच एकांतात डोळ्यांत भरून आलेल्या अज्ञात आसवांचं सिंचन असतं... अश्रू ताकद देतात चालणाऱ्याला... अश्रू वाट करून देतात कुढत कुढत जगताना मनाच्या कोपऱ्यांमध्ये कितीतरी काळ साचून पडलेल्या भावनांच्या अडगळीला....अश्रू सारवण घालतात मनाच्या भिंतींना... त्या लखलखीत होत जातात आसवांच्या सारवणाने... पुन्हा तयार होतात नव्या जोमाने पुढे जाण्यासाठी अन् कितीतरी आघात सोसण्यासाठी...

~निरंजन🌱

#जगण
स्वप्नं जगणं आणि आपलं जगणं यातलं अंतर पार करून जाता जाता जगणं मागे पडू लागतं...

#जगण
कधीतरी संथपणे पुढे जाणारं किंवा अगदीच थबकून गेलेलं आयुष्य कधीतरी झपाट्याने पुढे जाऊ लागतं.. एवढं झपाट्याने की त्या वेगाशी जुळवून घेताना धाप लागावी अन् अशातच कधीतरी ठेच लागून आपण जायबंदी झाल्यासारखं झालं की माणसाला गहन आणि गंभीर प्रश्न पडू लागतात... आयुष्य खरंतर असंच असतं.. ते कधीच आपल्या सोईनुसार नसतं तरीही अपेक्षा संपत नाहीत... पुढे मागे अपेक्षा आटून गेल्या तरीही आशा कधीच संपत नाही... कारण बहूदा आशा संपली तर सगळंच संपल्यासारखं वाटू लागतं... त्यामुळेच आशा संपत नाही... अगदी नैराश्याच्या खोल खोल काळोखात अडकून पडलेल्या माणसातही आशेचा अंश असतो... निष्पर्ण झालेल्या झाडाला कधीतरी पालवी फुटून यावी तसं नैराश्याच्या काळोखातही आशेचे किरण कधीतरी उगवतात अन् म्हणूनच आशा आहे तोवर आपण असतो, आयुष्य असतं.. जगणं असतं.. पुढे जात राहणं असतं...

#जगण
Best wishes to all the CPTP-10 Officers for the 2 year CPTP training program starting from today💐💐💐
जागतिक पुस्तक दिनानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा💐💐💐

सध्या काय वाचताय? अलीकडे वाचलेल एखाद आवडलेलं पुस्तक याबद्दल सांगाल comments मध्ये, पुस्तकाचा फोटो असल्यास शेयर करू शकता.
Niranjan's Blog☘️
https://www.livemint.com/news/trends/man-dissatisfied-after-cracking-upsc-i-earn-1-lakh-per-month-but-11745566023838.html
या बातमीला जोडून हे पण पाहाल… एकूण काय तर सगळं काही रिलेटीव आहे. ज्याचं त्याचं जग वेगळं आहे, परिस्थती वेगळी आहे.

संत तुकोबाराय म्हणतात ना,

“आपला आपण करावा विचार, तरवाया पार भवसिंधु !”
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मीडियाने अनावश्यक आणि बेजाबदारपणे बहाल केलेली भ्रामक प्रसिद्धी स्वतःहून नाकारून खरी परिस्थिती मांडली याबद्दल बिरदेव सरांचे खूप अभिनंदन🌿

#upsc
आज आपल्या @Niranjan_blog ला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. जोडले गेलेल्या सर्वांचे खूप आभार. तुमच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासात जमेल तसं विविध विषयांवर बोलत राहूयात.. पुनश्च सर्वांचे आभार💐💐

#4years
2025/06/29 15:39:38
Back to Top
HTML Embed Code: