Telegram Web Link
आरोग्य खात्यात मेगाभरती

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील गट 'क' व 'ड' संवर्गातील विविध रिक्त पदांसाठीच्या पदभरतीकरीता दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. सदर पदभरतीबाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सदरच्या पदभरतीचा सविस्तर तपशिल https://nrhm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरदेखील Public Health Department Recruitment २०२३ for Group C & D या लिंकवर उपलब्ध आहे. उमेदवारांना सदर संकेतस्थळावरदेखील ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
बॅंकेत नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबरी आहे. ज्यांना नोकरी करायची असेल तर भारतीय स्टेट बॅंकेत ( SBI ) नोकरीची चांगली संधी चालून आली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत देशभरात सहा हजाराहून अधिक अप्रेंटिसच्या भरतीचे नोटीफिकेशन जारी केले आहे. यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रतिक्रीया सुरु झाली आहे. उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 21 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात. तर पाहा काय आहे प्रक्रीया
एसबीआय अप्रेंटिस भरती 2023 नोटीफिकेशननूसार ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. उमेदवारांना 21 सप्टेंबरपर्यंत किंवा त्याच्या आधीच अर्ज करु शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीद्वारे देशभरात बॅंकात एकूण 6160 रिक्त जागा भरल्या जातील. उमेदवार आधिकारिक वेबसाइट्स nsdcindia.org/apprenticeship या apprenticeshipindia.org किंवा bfsissc.com किंवा Bank.sbi/careers किंवा www.sbi.co.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतील.

एसबीआय अप्रेंटिस नोटीफिकेशनची तारीख : 31 ऑगस्ट 2023
2024/06/16 05:28:18
Back to Top
HTML Embed Code: