Telegram Web Link
🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺
🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺

मराठी अर्थ
संपादन
आता विश्वात्मक देवाने, या माझ्या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान ( प्रसाद ) द्यावे. ॥ १ ॥
दुष्टांचे दुष्टपण नाहीसे होवो, त्यांना सत्कर्मे करण्या मध्ये स्वारस्य वाढो. सर्व प्राणीमात्रांमध्ये मित्रत्वाची भावना निर्माण होवो. ॥ २ ॥
पापी माणसाचा अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवो, विश्वात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय होवो. प्राणमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. ॥ ३ ॥
सर्व प्रकारच्या मंगलांचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ संत पृथ्वीवर अवतरत जावोत आणि प्राणिमात्रांना भेटत जावोत. ॥ ४ ॥
जे (संत) कल्पतरूंची चालती बोलती उद्याने आहेत, चेतनारूपी चिंतामणी रत्नांची जणू गावेच आहेत, अमृताचे बोलणारे समुद्रच आहेत, ॥ ५ ॥
जे कोणताही डाग नसलेले निर्मळ चंद्रच आहेत, तापहीन सूर्यच आहेत असे संतसज्जन सर्व प्राणिमात्रांचे मित्र होवोत. ॥ ६ ॥
तिन्ही लोकांनी सर्व सुखांनी परिपूर्ण होऊन अखंडितपणे विश्वाच्या आदिपुरुषाची सेवा करावी. ॥ ७ ॥
हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे, त्यांनी p या जगातील दृष्य आणि अदृष्य भोगांवर विजयी व्हावे. ॥८ ॥
यावर विश्वेश्वर गूरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा प्रसाद तुला लाभेल. या वराने ज्ञानदेव सुखी झाले. ॥ ९ ॥

🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺
🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆

*ऋणानुबंध...*

*आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की, वेदनेच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही...*🌹

🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺
🌱🌱⛳️⛳️🔆🌺🌺🔆🔆⛳️🌺🔆

पाण्यासारखं माणसाला राहता आलं पाहिजे कुणी जरी आलं त्या पाण्यामध्ये, काही जरी टाकले तरी त्याला सामावून घ्यायचं आणि त्याबद्दल कुठलीही तक्रार न करता फक्त वाहत राहायचं आधी शेवटी समुद्राला मिळायच.....

🌺🔆🔆🌺🌺🔆🔆🔆🔆🌺🌺🔆
🔆🌺🌺🌺🔆🔆🔆🌺🔆🔆🌺🔆

ज्याला सुखात देव आठवतो त्याचे एवढा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही दुःखात तर कोणाला पण देव आठवेल ,पण सुखातही आठवायला मात्र भाग्य लागते

🌱⛳️⛳️🌱⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
_*मोक्यावर साथ सोडणारी माणसं बऱ्याचदा तीच असतात ज्यांना कधी काळी आपण डोक्यावर घेऊन नाचलेलो असतो..!*_
*हाताने पायाला विचारलं तुझ्यावर सर्व जण डोकं ठेवतात माझ्यावर का नाही पायाने छान उत्तर दिले त्यासाठी जमीनीवर रहायला लागतं हवेत नाही.*

🌹🌹
*✍️ जगातील कोणतीही वस्तू कितीही महागडी का असेना .....*
*परंतु देवाने तुम्हाला दिलेली झोप, शांती आणि आनंद ह्या पेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नक्कीच नाही...*

😊 * 🙏🏻
*🕉️ राम 🕉️*

चेहरा फक्त नावाची ओळख देऊ शकतो पण व्यक्तिरेखा त्या माणसाची ओळख देते...!!!!

🌸🌸
💓💞 गोड बोलण्याचं सोंग करणारा माणूस कधीच हितचिंतक नसतो. मिठासारखे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो.
इतिहास साक्षीदार आहे की आत्तापर्यंत " मिठा " मध्ये किडे पडले नाहीत परंतु " मिठाई " मधे किड्या बरोबर आजारपणालाही निमंत्रण मिळते.
एक खरे सत्य
💓💞जीवनात संकटांचं येणं म्हणजे
"Part of life"
आणि...
त्या संकटांना हसत सामोरे जाऊन,
बाहेर पडणं म्हणजे
"Art of life" ...!





🌺🌺🌺 🌺🌺🌺
🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺🍀🌺

*संसार हा स्त्रीच्या दिसण्यावर नाही तर वागण्यातुन घडतो.*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
2025/06/27 06:00:11
Back to Top
HTML Embed Code: