*☘️सुविचार☘️*

*विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नातं म्हटलं की त्यात तीन गोष्टी प्रामुख्याने येतात. पहिली म्हणजे विश्वास, सहवास आणि समजूतदारपणा. जर विश्वासाचा पाया भक्कम असेल तर नात्याची इमारत उभी राहते. सहवासाचं कोंदण असेल तर नाते फुलते आणि समजूतदारपणा असेल तर संशय निर्माण होत नाही. समजूतदारपणा ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये आपण आपल्यापेक्षा समोरच्याच्या मनाचा जास्त विचार करतो. या मध्ये दोन शक्यता असतात. त्यातली पहिली अशी की आपला समंजस स्वभाव हा कोणालाही आपलासा वाटतो आणि दुसरी शक्यता अशी असते, काही गोष्टी या पटल्या जरी नाही तरी सोडून द्याव्या लागतात. या वर आपले व.पु. म्हणतात, " शेवटी ज्या माणसाजवळ जास्त understanding आहे, त्यालाच आपला अट्टाहास काही प्रमाणात सोडावा लागतो.." अहो, नातं महत्वाचं असेल, व्यक्ती महत्वाची असेल तर या गोष्टी ओघाने कराव्याच लागतात. आपल्याला नेहमी वाटते, सर्व माणसं सुखात असावीत, त्या साठी आपण प्रयत्न देखील करतो पण प्रत्येकाची सुखाची, आयुष्य जगण्याची व्याख्या ही वेगळीच असते ना!! ती जर आपल्या व्याख्येनुसार नसेल तर तिथे मात्र आपला अट्टाहास सोडणं भाग असतं..
विवाह हा असा संस्कार आहे, ज्यामध्ये फक्त मुलगा मुलगीच नाही तर दोन कुटुंबं एकत्र येतात. जशी हाताची पाच बोटे सारखी नसतात तसंच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. त्यामुळे रुसवे फुगवे, मतभेद हे होत असतातच. पण मन सांभाळताना जेव्हा स्त्री किंवा पुरुष हे कात्रीत सापडतात तेव्हा समजूतदारपणा कुठे दाखवावा हा प्रश्न पडतो. स्त्रीच्या बाबतीत विचार केला तर तिला दोन्ही घरातील माणसं जपावी लागतात. या वर देखील व.पुं.नी मांडलेला विचार खरच चिंतनीय आहे, " ज्या व्यक्तीला दोन्ही पक्षांचं प्रेम हवं असतं, त्यांचं घर कायम वणव्यात बांधलेलं असतं. आयुष्यभर होरपळणं.." आपण म्हणतो, समजूतदारपणा हा स्वभावात असावा, पण तो इतकाही असू नये की मनाने दिलेला कौल देखील ऐकू येणार नाही. समंजस व्यक्ती या बऱ्याचदा शांत असतात. पण त्यांची शांतता ही समजून घ्यावी लागते. व.पुं.नी हे जे काही लिखाणाचे भांडार आपल्यासाठी खुले केले आहे त्यामध्ये समजूतदारपणा म्हणजे काय? तो नात्यात किती असावा याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
समजूतदारपणा सोबतच संसार कसा यशस्वी होतो या वर देखील व.पुं.नी अतिशय साजेसे विचार व्यक्त केले आहेत. दिवसभरात कितीही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या किंवा अपमानाचे प्रसंग आले तरी त्या गोष्टी त्याच दिवशी संपवून दुसरा दिवस हा नवी आशा घेऊन उगवतो हे या विचारावरुन पटते, " एकमेकांना गुड नाईट म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मनानं स्वागत करायचं. संसार यशस्वी करण्यासाठी आणखी वेगळं काहीच करावं लागत नाही.."
कष्टाच्या पैशाला आनंदाचा सुगंध येत असतो, पण तो फक्त ज्याचा त्यालाच अनुभवता येतो...
आयुष्यात जेवढा कशाचा त्रास होत नाही तेवढा चांगले वागण्याच्या त्रास होतो.


.............................The Gs***
2024/04/28 19:20:56
Back to Top
HTML Embed Code: