Telegram Web Link
त्याने अठरावर्षा नंतर मिळालेल्या स्वप्न पूर्तीसाठी अकरा लोकाचा जीव घेतला.... उत्सव उन्मादाने साजरा करायचा नसतो तो सन्मानाने आपोआप साजरा होत असतो.... देवा जाधवर !!!
या प्रोफेसर माधवी लता आहेत. या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत.

प्रोफेसर माधवी लता यांचे 70+ संशोधन पेपर्स जगभरातील नामांकित जर्नल्स मध्ये प्रकाशित झाले आहेत.
चिनाब नदीवरील रेल्वे पूल तयार करण्यामागे जिथे अनेक इंजिनीअर्सची टीम होती, तिथे माधवी लता यांच्या भूमिकेचा एक खास ठसा आहे. पुलाचा पाया, रचना आणि सुरक्षा याची अत्यंत जटिल जबाबदारी त्यांच्यावर होती. भूस्खलन, भूकंप प्रवण भाग, उंच खोऱ्यांमधील हवेचा वेग, अश्या सगळ्या अडचणींवर त्यांनी विज्ञान, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर मात केली.

तब्बल 17 वर्षे या प्रकल्पावर सातत्याने काम करून, त्यांनी भारतीय रेल्वे आणि संपूर्ण देशाला गर्वाचा क्षण मिळवून दिला. प्रोफेसर माधवी लता यांच्या कार्याला मी सॅल्युट करतो!
ऑक्टोबर 2019 ते मार्च 2025 - सर्वाधिक एफडीआय राज्य
1. महाराष्ट्र
2. कर्नाटक
3. गुजरात
4. दिल्ली
5. तामिळनाडू


सर्वाधिक एफडीआय देश
1. सिंगापूर
2. अमेरिका
3. नेदरलँड
4. जपान
5. ब्रिटन

सर्वाधिक एफडीआय क्षेत्र
1. सेवा
2. सॉफ्टवेअर/ हार्डवेअर
3. ट्रेडिंग
4. टेलिकम्युनिकेशन
5. ऑटोमोबाईल
🚂 भारत गौरव टुरिस्ट ट्रेन - 9 जून 2025
👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारं शुभारंभ
आता पिन कोड ऐवजी डीजी पिन 📌
कतरिना कैफ बनली मालदिवची ॲम्बेसेडर

🟢अभिनेत्री कतरिना कैफ मालदिवची अॅम्बेसेडर बनली आहे. मालदीवमधील पर्यटन वाढावे या हेतूने कतरिनाला मालदिवची 'ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

🟢 याबाबत आज मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (MMPRC) ने याबाबत घोषणा केली. कतरिना मालदीवची ब्रँड अॅम्बेसेडर असणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे एमएमपीआरसीचे व्यवस्थापकीय संचालक थोयिब मोहम्मद म्हणाले आहेत.
‼️ रा. शाहू महाराज पुरस्कार जाहीर

🏆 2023 - डॉ अभय बंग & राणी बंग (37 वा )
🏆 2024  - पन्नालाल सुराणा (38 वा)
🏆 2025 - जब्बार रझाक पटेल (39 वा)

💰 स्वरूप - 1 लाख रु, स्मृतिचिन्ह व मानपत्र
जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज - MSC इरिना विझिंगम बंदरावर दाखल.👆
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1223 पदांच्या सुधारित आकृतीबंध मान्यता .🔥

राज्य उत्पादन शुल्क विभाग
2025/07/05 15:00:47
Back to Top
HTML Embed Code: