Telegram Web Link
25 जून - संविधान हत्या दिन....
🏆 नीरज चोप्राने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या "गोल्डन स्पाईक अँथलेटिक्स मीट स्पर्धेत" सुवर्णपदक जिंकले आहे.

🥇 नीरज चोप्राने 85.29 मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले.
🖊️ 'ॲक्सिऑम-4'

◾️ भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी 'ॲक्सिऑम-4' मोहिमेअंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर 25 जून 2025 रोजी अवकाशात उड्डाण केले.
◾️ 1984 साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले 'गगनवीर' राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत.
◾️ 'नासा' आणि 'इस्रो'च्या सहकार्याने 'ॲक्सिऑम-4' मोहीम होत आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी अवकाश केंद्रातून 'स्पेस-एक्स'च्या 'फाल्कन-9' या प्रक्षेपणयानातून प्रक्षेपण झाले.

⚫️ ॲक्सिऑम-4चे अंतराळवीर
👉 ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, भारत (इस्रो) हे मोहिमेचे सारथ्य करतील.
👉 स्लावोझ उइनान्स्की, पोलंड, (युरोपीय अवकाश संस्था)
👉 टिबर कापू, हंगेरी
👉 पेगी व्हिटसन, अमेरिका
सतत फक्त NEET आणि JEE च्या मागे लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रवासमार्ग…
डॉक्टर इंजिनिअर च्या पलीकडेही करिअर चे खूप मोठे विश्व आहे आणि त्याचीच निवड केलीय आपल्या भारतातल्याच केवळ १९ वर्षाच्या तरुणीने चंद्र आपला पाठलाग करतोय असं समजून आज चंद्रापलीकडचे स्वप्न उराशी बाळगत खऱ्या अर्थानं आकाश गाठलं आहे. फक्त १९ व्या वर्षी, जहान्वी दांगेती हिने पोलंडमध्ये पार पडलेलं १२ दिवसांचं Analog Astronaut मिशन पूर्ण करणारी भारतातील सर्वात तरुण व्यक्ती बनण्याचा मान मिळवला आहे. आणि आता तिच्या या अवकाशयात्रेच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. कारण २०२९ मध्ये होणाऱ्या Titans Space च्या पहिल्यावहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी ती अधिकृतरीत्या Astronaut Candidate म्हणून निवडली गेली आहे. तिच्या या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
जान्हवी दांगेती हिचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्वल भवितव्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

#IndiaToSpace #WomenInSTEM #KalpanaChawlaLegacy #SmallTownBigDreams #FutureAstronaut #TitansSpace #SpaceDreams #ZeroGravityJourney #FromIndiaToOrbit #STEMGirls #AstronautInTheMaking #SpaceHeroine #ChasingTheMoon #YoungIndianIcons
2025/07/01 00:25:34
Back to Top
HTML Embed Code: