Media is too big
VIEW IN TELEGRAM
एक हात मदतीचा या उपक्रम दुसरा टप्पा
स्वराज्य परिवारातर्फे दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला या अंतर्गत नवभारत विद्यालय सीना दारफळ या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यानिमित्त सामाजिक जबाबदारी म्हणून चिमुकल्या माझ्या लहान बहिण भावांना शैक्षणिक साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले यामध्ये 300 बॅग, तसेच 600 वही सोबत स्टेशनरी कंपास संच माझ्या लहान बहिण भावापर्यंत पोहोचविण्यात आले. यामध्ये स्वराज्य चे विद्यार्थी मित्र, पवन सर, सचिन मोरे, प्रमोद/प्रभाव सर(100 बॅग) व सर्व स्वराज्य परिवार तर्फे ही मदत पोहोचविण्यात आली खूप खूप धन्यवाद💐💐💐

❤111👍15🙏6🥰3🔥2
2526/) बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' व्यतिरिक्त आणखी कोणते मासिक सुरू केले?
Anonymous Quiz
5%
केसरी
19%
ज्ञानोदय
70%
दिग्दर्शन
5%
लोकहितवादी
👍16❤10
2527) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याबद्दल सत्य नाही?
Anonymous Quiz
6%
त्यांनी 1832 मध्ये 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केले.
15%
ते महाराष्ट्रातील पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात.
51%
त्यांनी 1834 मध्ये 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केले.
28%
शून्यलब्धी नावाचा त्यांनी ग्रंथ लिहला
❤23👍4🥰1
2528) विवेकवादाचे अध्वर्यु म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous Quiz
10%
गोपाळ कृष्ण गोखले
47%
गोपाळ गणेश आगरकर
21%
लोकहितवादी
22%
बाळशास्त्री जांभेकर
❤26🔥3👍2
2529) गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत?
Anonymous Quiz
11%
केसरी
13%
मराठा
25%
सुधारक
51%
ज्ञानप्रसारक
👍19❤8🙏1
2530) खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव 'उलगुलान' म्हणून ओळखला जातो?
Anonymous Quiz
21%
संथाल बंड
59%
मुंडा उठाव
15%
कोल उठाव
5%
फकीर उठाव
👍23❤7🙏1
2531) 1921 चा मोपला उठाव जो ब्रिटिश राजवट आणि हिंदू जमीनदारांविरुद्ध होता, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
Anonymous Quiz
43%
केरळ
29%
उत्तर प्रदेश
26%
बंगाल
2%
मुंबई
👍15❤6🙏4
2532) ब्रिटिशांच्या कोणत्या धोरणाने आदिवासींच्या जमिनीच्या मालकी हक्कावर मोठा परिणाम केला आणि आदिवासींमध्ये व्यापक असंतोष निर्माण केला, ज्यामुळे बंडांना चालना मिळाली?
Anonymous Quiz
7%
धार्मिक हस्तक्षेप
80%
वन कायदे आणि जमीन करार
8%
तैनाती फोज
5%
दत्तक वारस नामंजूर धोरण
❤22👍5
भारताचा शोध ज्याला घ्यायचा आहे, त्याने अहमदनगर( अहिल्यानगर) नावाचे थोर गाव पाहायला हवे.
नेहरूंना इथेच तर भारत सापडला. इथल्याच किल्ल्यात त्यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहिला. साने गुरूजींनी त्याचा मराठी अनुवाद लगोलग केला. एवढा महान, महाकाय ग्रंथ नेहरूंनी तुरूंगात लिहिला, तेव्हा त्यांच्याकडे संदर्भासाठी आवश्यक असणारी पुस्तकं नव्हती. केवळ स्मरणशक्ती, विलक्षण आवाका, व्यापक आकलन आणि अफाट प्रतिभेच्या बळावर नेहरूंनी हे थक्क करणारे पुस्तक लिहिले. नेहरूंचे बरेचसे लेखन तुरुंगात झाले. ते सतरा वर्षे पंतप्रधान होते, हे आपल्याला ठाऊक असतेच. मात्र, स्वातंत्र्यलढ्यात अकरा वर्षे ते तुरुंगात होते. तुरुंगात जाताना ते गंमतीने म्हणायचे, ‘चला! आता नवं काही लिहून होईल!’
“काय नेहरू, नवं काय लिहिताय?”, असं कोणीतरी विचारल्यावर एकदा ते म्हणाले होते, “खूप दिवस तुरुंगात नाही गेलो. त्यामुळं वेळच नाही मिळाला.”
नेहरूंना ब्रिटिशांनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनानंतर अहमदनगर किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. त्यांच्यासोबत सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत आणि इतर नेते होते. हे सर्वजण १९४५ पर्यंत म्हणजे सुमारे तीन वर्षे अहमदनगर किल्ल्यात कैदेत होते.
तिथे नेहरूंनी हा ग्रंथ लिहिला. अहमदनगर किल्ल्यातील एका छोट्याशा खोलीत बसून तो लिहिला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आणि अन्यत्रही त्यांनी अहमदनगरविषयी खूप भावनिक उल्लेख केले आहेत.
नेहरू लिहितातः
“The old fort of Ahmednagar, ancient and massive, surrounded by deep moats and high walls, has become our residence and our world for some time to come.”
अहमदनगर हे, आपला जन्मदिन माहीत असलेले एकमेव ऐतिहासिक शहर. अहमदनगर शहराची स्थापना इ.स. १४९० मध्ये, २८ मे रोजी अहमद निजामशहा पहिला याने केली. त्या दिवशी त्याने याच भुईकोट किल्ल्याच्या परिसरात नवी राजधानी उभारली आणि तिचे नाव स्वतःच्या नावावरून ‘अहमदनगर’ असे ठेवले. बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निजामशाही या स्वतंत्र सत्तेचा उदय झाला. निजामशाही काळात हे शहर शिक्षण, कला, संस्कृती, व्यापार आणि प्रशासन यांचे केंद्र बनले. अहमदनगरचा किल्ला या काळातल्या कैक घटनांचा साक्षीदार आहे.
अहमदनगर आणि औरंगाबादच्या इतिहासात मलिक अंबरचे स्थान खूप महत्त्वाचे. इथिओपियातला हा मुलगा. गुलाम म्हणून विकला जातो. भारतात येतो आणि सम्राट होतो! निजामशहा मुर्तजा दुसरा अल्पवयीन असताना, मलिक अंबरने राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला आणि निजामशाहीचे पुनरुज्जीवन केले. मुघलांच्या विशाल फौजांना धूळ चारली. डोंगर-दऱ्यांचा उपयोग करून शत्रूला फसवण्याचे, गनिमी काव्याचे तंत्र वापरले. मुघल सम्राट अकबर आणि त्याचा मुलगा जहांगीर या दोघांना त्याने अनेकदा पराभूत केले.
रयतवारीचा पाया अहमदनगरमध्येच रचला गेला. जमिनीची मोजणी करून प्रत्यक्ष उत्पादनावर आधारित करप्रणाली इथे सुरू झाली. शेतकर्याचा खूप बारकाईने विचार मलिक अंबर करत असे. जलसंधारण आणि सिंचनाच्या योजना इथे आखल्या गेल्या. मलिक अंबरने अनेक तलाव, बंधारे आणि कालवे बांधले. या काळात अहमदनगर आणि आसपासची शेती समृद्ध झाली. याच काळात अहमदनगर हे शिक्षण, संस्कृती, व्यापार आणि कारागिरीचे केंद्र बनले. धर्म, जात वा वंश असा भेद न करता, मलिक अंबरने प्रजेला समान वागणूक दिली. मलिक अंबर असेपर्यंत मुघलांना अहमदनगर कधीच जिंकता आले नाही.
तेव्हाच्या त्या पायावर आजचे अहिल्यानगर दिमाखात उभे आहे!
निजामशाही गेली. मग मुघल आले. औरंगजेबाचा अखेरचा काळ अहमदनगरमध्ये गेला. तो १७०७ मध्ये अहमदनगरजवळच गेला. त्यामुळे मुघल साम्राज्याच्या अखेरच्या श्वासांशीही अहमदनगर जोडले गेले.
मुघल सत्तेनंतर मराठ्यांनी अनेकदा अहमदनगरवर सत्ता मिळविण्याचे प्रयत्न केले. पेशवाईच्या काळात हे ठिकाण महत्त्वाचे ठाणे बनले. नंतर ब्रिटिशांनी मराठ्यांना पराभूत करून १८१७ मध्ये अहमदनगर आपल्या ताब्यात घेतले. या ब्रिटिश काळात किल्ल्याचा वापर कारागृह म्हणून झाला. तिथे नेहरूंनी भारताचा शोध घेतला!
-संजय आवटे

❤154👍11🙏7🔥6
15 ऑक्टोबर हा दिवस जगभर “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा केला जातो. तसेच भारताचे “मिसाईल मॅन” आणि “लोकप्रिय राष्ट्रपती” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस.
कलाम साहेबांचे संपूर्ण आयुष्य हे विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी प्रवास होते.
गरीब घरातून सुरुवात करून, त्यांनी विज्ञान, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मिती यांना समर्पित जीवन जगले. ते म्हणायचे 💬,
> “स्वप्न ते नसते जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते असते जे आपल्याला झोपू देत नाही.”
त्यांच्या दृष्टीने प्रत्येक विद्यार्थी हा भारताचा भविष्यदूत होता. त्यांच्या विचारांनी आजही विद्यार्थ्यांना मोठं स्वप्न पाहण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏

❤103🥰5🙏4🎉2