Telegram Web Link
Forwarded from MPSC Material Katta
मराठी_इंग्लिश_objective_राज्यसेवा.pdf
9 MB
♦️आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा पेपर..

भाषा पेपर 2 Objective मराठी-इंग्रजी..


जॉईन करा @MPSCMaterialKatta
19
🌷🌷वर्णांचे प्रकार🌷🌷

१. स्वर :-

स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करताना ओठांच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर.
39🤔2
🌷🌷२. स्वरादी :–🌷🌷

अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार  व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वार्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

अंगण, शंकर , किंकर, मन:स्थिती , दुःख

दोन नवे स्वरादी :- ओ, औ

हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.

उदाहरणार्थ-

बॅट, बॉल
44
🌷🌷अनुस्वार -🌷🌷

स्पष्ट व खणखणीत उच्चांराना अनुस्वार असे म्हणतात, तर ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.

अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत.

उदाहरणार्थ-

गंगा, घंटा, उंट, इंधन, इत्यादी

काही वेळा अनुस्वरांचा उच्चार अस्पष्ट, ओझरता होतो.

उदाहरणार्थ-

देवांनी, घरांमध्ये
39👍1
🌷🌷विसर्ग -🌷🌷

विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार 'ह' या वर्गाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे.
👍1712
🌷🌷३. व्यंजन :–🌷🌷

मराठी वर्णमालेतील क, ख,.......पासून ह, ळ पर्यंतचे वर्ण व्यंजन आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या साहायावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.
34🔥2🤔2👌1
🌷🌷अक्षरे :-🌷🌷

अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण. अ आ इ ई वगेरे स्वर पूर्ण उच्चारांचे आहेत. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात.

प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ हे दहा स्वर व अं, अ: यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो त्याला आपण बाराखडी किंवा बाराक्षरी असे म्हणतात.

आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात  'अ' हा स्वर मिसळुन आपण त्याचा उच्चार करतो.

उदा :-

क् + अ = क
33
🌷🌷स्वरांचे प्रकार🌷🌷

स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.

ह्रस्व स्वर व दीर्घ स्वर –

अ, इ, उ, ऋ, लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो, त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ह्रस्व स्वर असे म्हणतात.

आ, ई, उ, ऊ, ए, ए, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
48
🌷🌷स्वरांचे इतर प्रकार-🌷🌷

संयुक्त स्वर –

दोन स्वर एकत्र येवून बनलेल्या स्वरांना संयुक्त असे म्हणतात.

ए, ए, ओ, औ, हे संयुक्त स्वर आहेत.

ह्रस्व स्वरांचा उच्चार करण्यास जो वेळ लागतो त्याला एक मात्रा मानतात.

दीर्घ स्वर व संयुक्त स्वर यांचा उच्चार करण्यास दोन मात्रा मानतात.
29👍7👏4
🌷🌷सजातीय स्वर व विजातीय स्वर –🌷🌷

एकाच उच्चारस्थानातून निघणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

अ-आ , इ-ई, उ-ऊ 

भिन्न उच्चारस्थानातून निघणा-या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.

उदाहरणार्थ:-

अ-इ, अ-उ, इ-ए, ऊ-ए, अ-ऋ
48👍15
🌷🌷व्यंजनांचे प्रकार🌷🌷

व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.

१. स्पर्श व्यंजन (२५)

२. अर्धस्वर व्यंजन (४)

३. उष्मा, घर्षक व्यंजन (३)

४. महाप्राण व्यंजन (१)

५. स्वतंत्र व्यंजन (१)
52👍8👏5🤔2
🌷🌷स्पर्श व्यंजन :🌷🌷

एकूण व्यंजन २५ आहेत. ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.

उदाहरणार्थ:-

क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, द, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म
44🤔1
🌷स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.🌷

१. कठोर वर्ण 

२. मृदु वर्ण

३. अनुनासिक वर्ण  
36
🌷🌷१. कठोर वर्ण :–🌷🌷

ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात किंवा जे वर्ण उच्चारायला कठीण असतात, त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

उदाहरणार्थ:-

क, ख च, छ ट, ठ त, थ प, फ
33
🌷🌷२. मृदु वर्ण :–🌷🌷

ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार हळुवार असतो किंवा नाजूक असतो त्यांना मृदु वर्ण म्हणतात.

उदाहरणार्थ:-

ग, घ ज, झ ड, ढ द, ध ब ,भ
33
🌷🌷३. अनुनासिक वर्ण –🌷🌷

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात.

उदाहरणार्थ:-

ड, त्र, ण, न, म
25
🌷🌷अर्धस्वर व्यंजन -🌷🌷

य्,र्,ल्,व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ,ऋ,लृ,उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.

अर्धस्वर एकूण चार आहेत, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम य,व,र,ल असा आहे.
25🔥2🤔1
उष्मे, घर्षक व्यंजन-

श्,ष्,स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते,. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक व्यंजन असे म्हणतात.

🌷🌷महाप्राण व्यंजन-🌷🌷

ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.

उदाहरणार्थ-

ख् (क् + ह), घ् (ग् + ह), छ् (च् + ह), झ् (ज् + ह)

ख्,घ्,छ,झ्,ठ,ढ,थ्,ध,फ,भ्,श्,ष्,स, या वर्णात ह, या वर्णाची छटा असल्याने त्यांना सुध्दा महाप्राण असे म्हणतात. मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहीतांना H अक्षर वापरावे लागते त्या सर्व वर्णाना महाप्राण व्यंजने म्हणातात.

बाकीचे अल्पप्राण आहेत. क्, ग्, ङ, च्, ज्, त्र, ट, ड, ण्, त्, द, न्, प्, ब्, म्, य, र, ल्, व्, ळ या व्यंजनाना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात 'ह' ची छटा नसते.
58👌5👍3
🌷🌷स्वतंत्र व्यंजन -🌷🌷

ळ, हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो, तो इतर भाषेकडून घेतलेला नाही.

तालव्य :-

जेव्हा च, छ, ज आणि झ वर्गातील वर्णांस  'य' हा वर्ण लागून उच्चार होत असेल तर त्याचा समावेश तालव्य गटात होतो.

उदाहरणार्थ:-

चित्र, छत्री, जेवण, झेल
👍2213
🌷🌷दंत तालव्य :-🌷🌷

जेव्हा च, ज, झ वर्णांस  'अ' हा वर्ण लागून त्याचा उच्चार होत असेल तर त्याचा समावेश दंततालव्य गटात होतो.

उदाहरणार्थ:-

चटकन, चोर, जहाज, जमाव, झरा, झाड.

क्ष व ज्ञ मुलध्वनी आहेत असे वाटते प्रत्यक्षात ती संयुक्त व्यंजने आहेत म्हणून त्यांचा समावेश वर्णमालेत करत नाहीत.

च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्णं आहेत मात्र त्यांचा उच्चार य ने युक्त होतो.

उदाहरणार्थ:-

च्य, ज्य

च, छ, ज, झ यांचा उच्चार तालव्य व दंततालव्य असा दुहेरी होतो.
22👍17
2025/07/13 01:34:11
Back to Top
HTML Embed Code: