Telegram Web Link
📚महाप्रश्नसंच

✍️सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश विरोधात लोकसभेत प्रस्ताव मांडण्यासाठी किती सदस्यांची सही आवश्यक असते?
Anonymous Quiz
13%
45 सदस्य
30%
72 सदस्य
22%
80 सदस्य
36%
100 सदस्य
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यनिहाय वेगळे असते?
Anonymous Quiz
32%
विधानसभा सदस्य
22%
लोकसभा सदस्य
15%
राज्यसभा सदस्य
30%
वरील सर्व बरोबर
अब हल्की नींद आते ही, सो जाते हैं
डर लगता हैं, बाद में नींद नहीं आई तो रात कैसे गुजरेगी!

Good Night
📚महाप्रश्नसंच

✍️राज्यविधी मंडळाची सत्रसमाप्ती व विसर्जन ही तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
8%
कलम 172
38%
कलम 174
39%
कलम 176
15%
कलम 178
📚महाप्रश्नसंच

✍️कलम 275 अंतर्गत दिले जाणारे अनुदान आणि त्यांचे प्रमाण खालीलपैकी कोणाकडून निश्चित केले जाते?
Anonymous Quiz
38%
वित्त आयोग
37%
निती आयोग
11%
आरबीआय
14%
केंद्र सरकार
📚महाप्रश्नसंच

✍️विधानसभेचे सभापती किंवा उपसभापती यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव विचारधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही ही तरतूद कोणत्या कलमांतर्गत आहे?
Anonymous Quiz
17%
कलम 179
33%
कलम 180
34%
कलम 178
16%
कलम 181
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत संसद भारताच्या संपूर्ण भूभागासाठी कायदा करू शकते?
Anonymous Quiz
15%
कलम 242
44%
कलम 245
32%
कलम 247
8%
कलम 244
संविधान सभा

एकूण जागा - 296
निवडणूक - जुलै-ऑगस्ट 1946
काँग्रेस विजयी - 208 जागा
मुस्लिम लीग विजयी - 73 जागा
अपक्ष विजयी - 8 जागा

7 पक्षांना प्रत्येकी 1 जागा👇

1) युनियनिस्ट पार्टी
2) युनियनिस्ट मुस्लिम
3) युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट
4) कृषक प्रजा पार्टी
5) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
6) शीख
7) कम्युनिस्ट

296 जागा पैकी 15 जागा महिलांना मिळाल्या

👉जॉइन - { @polity4all }
📚महाप्रश्नसंच

✍️सिक्कीम या राज्याला सहकारी राज्याचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने देण्यात आला आहे?
Anonymous Quiz
22%
36 वी घटनादुरुस्ती
34%
34 वी घटनादुरुस्ती
32%
35 वी घटनादुरुस्ती
12%
37 वी घटनादुरुस्ती
📚महाप्रश्नसंच

✍️मुबंई आणि मद्रास या ठिकाणी क्रांती कायदेमंडळाची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Anonymous Quiz
15%
1909 चा कायदा
39%
1858 चा कायदा
26%
1813 चा कायदा
20%
1861 चा कायदा
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेतील सदस्य संख्या 525 वरून 545 इतकी वाढवण्यात आली?
Anonymous Quiz
13%
37 वी घटनादुरुस्ती 1975
30%
34 वी घटनादुरुस्ती 1973
35%
36 घटनादुरुस्ती 1974
21%
31 वी घटनादुरुस्ती 1972
📚महाप्रश्नसंच

✍️राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान संसदेला राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्राप्त आहे?
Anonymous Quiz
9%
कलम 250
56%
कलम 252
21%
कलम 250
14%
कलम 249
संविधान हत्या दिवस 2025
आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण

25 जून, 2025
आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात आणीबाणी लागू झाली, त्या घटनेला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. 19 महिन्यांच्या कालखंडाने शिकवलेल्या धड्यांचे स्मरण.

राज्यघटनेमधील आणीबाणीचे 3 प्रकार
1) राष्ट्रीय आणीबाणी - कलम 352
2) राज्य आणीबाणी - कलम 356
3) आर्थिक आणीबाणी - कलम 360

👉जॉइन - { @polity4all }
MPSC-UPSC Katta:
गढीवरून...
Another side of the coin
आणीबाणी अपरिहार्य का होती?
*
उद्या 25 जून! भारतात आणीबाणी जाहीर झाली त्याला 50 वर्ष झालीत. त्यानिमित्त पूर्वसंध्येला घेतलेला हा आढावा.
*
25 जुन 1975 या दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. त्याचे तात्कालिक कारण काय होते? तर दि. बारा जुन 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने ( न्यायाधीश जगमोहनलाल सिन्हा) इंदिरा गांधींच्या विरोधात दिलेला निर्णय. हा खटला राजनारायण या विरोधी उमेदवाराने दाखल केलेला होता ज्यात इंदिराजी यांना विजयी घोषित करण्यात आले होते. 1971 च्या निवडणुकीत राजनारायण हे इंदिरा गांधींच्या विरुद्ध तब्बल एक लाख मतांनी पराभूत झाले होते.
गुन्हा काय होता? काय गैरप्रकार झाले होते या निवडणुकीत? ते आज वाचले तर चक्क हसायलाच येईल. 258 पानी निकाल आहे हा. 12 जूनला बरोबर 10 वा. कोर्टाने फक्त Operative part वाचला तो असा,
"The petition is allowed."
दहा वाजून दोन मिनिटांनी पंतप्रधान कार्यालयातील टेलिप्रिंटरवर मेसेज झळकला,
" MRS GANDHI UNSEATED"
रायबरेलीतील त्यांच्या निवडणूक प्रचाराचे काम यशपाल कपूर या सरकारी कर्मचाऱ्याने केले होते. तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी व्यासपीठ बांधण्याच्या कामाचे सुपरव्हीजन व वीज, लाऊडस्पीकर व्यवस्था चोख आहे की नाही हे पाहीले. सरकारी कर्मचाऱ्यांची ही कामे नव्हेत, या आरोपांखाली इंदिरा गांधींना पुढील सहा वर्षे निवडणुकीतून बाद करण्यात आले. याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी वीस दिवसांची मुदत देण्यात आली. त्यासाठी नानी पालखीवाला यांनी वकीलपत्र घेतले, परंतु ती मुदत संपण्याच्या आतच 25 जूनला आणीबाणी घोषित करण्यात आली. यांत इंदिरा गांधींना हा सल्ला देणारे होते... बॅ.सिद्धार्थ शंकर राय! ( प. बंगालचे माजी मुख्यमंत्री)
*
वर्तमानपत्री व संसदीय निंदानालस्ती म्हणजे राजकारण नव्हे. भारतासह कोणताही देश हा जागतिक राजकारणात चाललेल्या उलथापालथींपासून वेगळा राहू शकत नाही. इतिहास घडविणाऱ्या सुप्त शक्तींचा व प्रवाहांचा शोध घेणे म्हणजे राजकारण. त्याकाळात घडलेला घटनाक्रम बघू यात.
1) 1972-74 चा दुष्काळ इतका भयानक होता की देशाचे कंबरडेच मोडले. गावे ओसाड झाली. शेतकरी, शेतमजूर देशोधडीला लागले. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठवाडा, गुजरात, मध्य प्रदेश येथुन आलेले गरीब लोक पथार्या टाकून पडलेले. ते भीक मागत नसत तर खायला मागत.
महाराष्ट्रात रोहयो सुरू झालेली. एकाच वेळी पंधरा लाख लोक रस्त्यावर खडी फोडायला, पाझर तलाव खोदायला वा रस्ते करायला कामावर उतरले. सर्व राज्यांनी केंद्राकडे आर्थिक व धान्याची मदत मागितली. देश आर्थिक गर्तेत गेला.
2) डिसेंबर 71 चे भारत पाक युद्ध: या युद्धात भारताने पाकिस्तानवर मात करून बांगलादेश वेगळा केला खरा पण अमेरिकेन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी बाईला धडा शिकवायचा ठरवले. कारण " अमेरिकेच्या सातव्या आरमाराला मी भीक घालत नाही" असे बजावून इंदिराबाईंनी पाकिस्तानवर चढाई सुरूच ठेवली. (त्याचवेळेस अमेरिकेची व्हिएतनाममध्ये नामुष्की झालेली.) अमेरिका, ब्रिटनने भारताला कोंडीत पकडायचे ठरवले. कारण अमेरिका व ब्रिटनचा पाकिस्तान हा तळ उधळला जात होता. युद्धामुळे एक कोटी बांगलादेशी निर्वासित व एक लाख युद्ध कैदी भारतात होते. याचा प्रचंड बोजा भारतावर पडला.
3) 73 साली अरब-इस्त्रायल युद्ध झाले. या युद्धाच्या खर्चामुळे अरब राष्ट्रांनी तेलाच्या किमती वाढवल्या. सुमारे 93 टक्के तेल आयातीवर होणारा खर्च चौपट झाला व महागाई प्रचंड प्रमाणात वाढली.
*
अशा बिकट वेळी विरोधी पक्षांनी आपल्याला साथ द्यावी अशी बाईंना अपेक्षा होती. जे शक्य नव्हते.
अशा संकटातच जाॅर्ज फर्नाडिस यांनी रेल्वे संपाची घोषणा केली. मे 1974 ला संपाचे आव्हान देताना जाॅर्ज म्हणाले,
" कामगार बंधूंनो, तुम्ही संपावर गेलात तर सात दिवसांत देशातील सर्व औष्णिक विद्युत केंद्र बंद पडतील. पोलाद कारखाने बंद पडतील. देशभराचा अन्न पुरवठा बंद पडेल. उपासमार होईल व सरकार चालवणे अशक्य होईल. सरकारला पोलीस व सैन्याची हलवाहलवही करता येणार नाही."
देशातील अराजकाची ही नांदी होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर दि. 12 जुन ते 25 जुन या तेरा दिवसात विरोधी पक्षांनी देशभर वादळ उठवले. इंदिरा हटाव मोहीम सुरू झाली. ही मोहीम सरकारविरोधात नाही तर फक्त बाईंविरूदध होती. विरोधी पक्षीयांनी आवाहन केले,
" सरकारशी संपूर्ण असहकार करा, विद्यार्थ्यानी शाळा बंद कराव्यात, कामगारांनी कारखाने बंद करावेत, पंतप्रधान निवासाला घेराव घाला, गोळीबार होईल हटू नका, पोलीसांनी व सैन्यानेही सरकारचे अनैतिक आदेश पाळू नये." या चळवळीला दुसरे स्वातंत्र्ययुद्ध संबोधले गेले. जगजीवनराम व यशवंतराव चव्हाण यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची विनंती करण्यात आली. जयप्रकाश नारायण सक्रिय झाले.
गुजरातमध्ये व बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलने सुरू झाली.चिमणभाई पटेल यांना चिमणचोर म्हटले गेले व या हिंसक आंदोलनात 95 जण ठार झाले.काँग्रेस आमदारांना घराबाहेर खेचून मारले.तर काही जणांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले गेले. याचे लोण बिहारमध्येही पसरले. संपूर्ण क्रांतीचा नारा दिला गेला. संपूर्ण देशात अराजक सदृश परिस्थिती निर्माण झाली.
आता बाईंसमोर दोनच पर्याय होते. To quit or.... इंदिरा गांधींनी दुसरा दुर्दैवी पर्याय निवडला... आणीबाणी. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय हे तात्कालिक कारण होते.
@@@@@
संदर्भ: 1)Indira Gandhi, the emergency and Indian democracy : P. N. DHAR
2) The judgement : kuldeep nayyar
3) महाराष्ट्र टाइम्सचे लेख : 25 जून, 2 जुलै, 9 जुलै व 16 जुलै 2000. ( कुमार केतकर)
*
तळीरामाची टीप:
आणीबाणीत सर्व सरकारी कर्मचारी वठणीवर आलेले. सर्व जण वेळेच्या अगोदरच पंधरा मिनिटे कार्यालयात येत. लोकांची कामे तत्परतेने होत. सगळ्या रेल्वे वेळापत्रकानुसार चालत.
त्या काळातील सरकारी कार्यालयातील खूपच किस्से आहेत. ते परत कधीतरी...
भारतातील 1975 ची आणीबाणी
घटनाक्रम 👆👆
हिंदी राष्ट्रभाषा की राजभाषा
सध्या मराठी × हिंदी वाद सुरु आहे त्यामुळे काही गोष्टी वाचून घ्या.
1975 च्या आणीबाणीच्या काळात
सरकारने केलेले बदल 👆👆
2025/07/01 14:47:06
Back to Top
HTML Embed Code: