Telegram Web Link
माणूस म्हणजे मशीन असतो यांच्यासाठी. माणसांकडून यंत्रवत व्यवहाराची अपेक्षा हे लोक करत असतात. मी अमुक तमुक झालो आहे तर आता माझ्या मुलांनी सुध्दा असंच काहितरी होऊन दाखवलं पाहिजे. नाहीतर माझे नाव खराब होईल. असं यांना वाटत असतं. ही मुलांची काळजी नसून स्वतः बद्दलची जास्त असते. पण खरं म्हणजे आपण कोण आहोत हेच यांना उमगलेले नसते.

या सृष्टीच्या विशाल अशा कालचक्रामधे आपण धुळीचा एक कण देखिल नाही आहोत हे कळायला खूप अक्कल असावी लागते. ती यांच्या ठिकाणी नसते. स्वतः बद्दल भयंकर गैरसमज करून घेऊन हे लोक जगत राहतात.

"मला शिक्षणा बद्दल तुम्ही एवढं सांगता तर मग तुम्हीच का नाही कलेक्टर झालात? मास्तर होऊन का थांबलात?" असा सवाल मरण्याच्या अगोदर त्या मुलीने या मुख्याध्यापकाला केला होता म्हणे. तर यावर तो जास्तच चिडून मारझोड करायला लागला. कारण मुलगी बोलली ते सगळं खरं होतं. खऱ्याचा राग जास्त येतो माणसाला.

मागच्या पिढीत जे मास्तर झाले, प्राध्यापक झाले तेंव्हां आताच्या एवढी तीव्र स्पर्धा नव्हती. माझ्या आजी-आजोबांच्या काळात साधे चौथी पास झाला तरी त्याला सरकारी शाळेत शिक्षक म्हणून घेतले जात असे. कारण तेवढेही कोणी शिकत नसे. "उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी". असे त्या काळातील लोक म्हणत. त्यामुळे नोकऱ्या भरपूर असायच्या पण तिला महत्व नव्हते.

आता ढीगभर पीएचडी वगैरे गोळा करून सुध्दा नोकरी मिळत नाही. कारण स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे या मुलांकडून किती अपेक्षा करायची आणि या जीवघेण्या स्पर्धेत यांना किती पळवायचं याचंही भान पालकांनी ठेवावं. आणि त्यांच्यापुढे स्वतःच्या "यशाची" टिमकी वाजवणे बंद करावे.

"थ्री इडियट" मधे तो एक मुलगा हातात गिटार घेऊन गाणं म्हणतो,-

"Give me some sunshine, give me some rain, give me another chance, I wanna grow up once again.."

हे गाणे मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा दरवेळी काळजात कुठेतरी कालवाकालव होते. आणि असं वाटतं की खरंच, माणसाच्या जिवापेक्षा हे यश-अपयश, स्टेटस् वगैरे यांना एवढं अवास्तव महत्त्व का दिलं जात असेल या व्यवस्थेमधे? त्याशिवाय माणसाचे काही अस्तित्व असू शकत नाही का? त्याला माणूस म्हणून जगता येणार नाही का?

आजवर कित्येक लोक इथे जन्माला आले.. मेले. राख झाली त्यांची. तेही असेच यशाच्या मागे पळाले होते. त्यांनीही कितीतरी पदव्या मिळवल्या. मान-सन्मान मिळवले. त्यांचीही शेवटी राखच बनली. इथेच या मातीत मिसळून गेली. आज त्याच मातीवर आपण पाय ठेवून उभे आहोत. उद्या भविष्यात आपल्या मातीवर असंच कुणितरी उभं राहील. आणि त्या मातीच्या कणाची साधी ओळख देखिल नसेल.

जीवनाच्या नश्वरतेची ही जाणिव ज्याच्या मनात असेल केवळ त्याचे मन या जीवना विषयी अपार करुणेने भरलेले असेल. आणि या करुणेचे, ममतेचे दर्शन एखाद्या अडाणी समजल्या गेलेल्या मेंढपाळाच्या झोपडीत अगदी सहजरित्या होऊन जाईल. पण मोठी मोठी पदके, पारितोषिके, सन्मानचिन्हे वगैरे स्वतःच्या घरात भिंतीला अडकवून त्यांचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडून बसलेल्या तथाकथित विद्वान महाशयांकडे ही करुणा मिळेलच याची खात्री देता येत नाही.

त्यामुळे, एखाद्याच्या नावापुढे पदव्या वाढत गेल्या म्हणजे शहाणीव देखिल तशीच वाढली असेल असे त्याच्याबद्दल मुळीच समजू नये!

- तानाजी तुकाराम शेजूळ.
दिनांक: २८/०६/२०२५
#keep
5_6271593541487564541.pdf
14.6 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर क्रमांक 2

सामान्य अध्ययन (GS)
💐 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 

👉 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.

१ जुलै :-
👉 राज्य कृषी दिन..
We are excited to offer you a FREE hardcopy of our Previous Year Question Booklet, which includes questions from 1994 to 2024. (Collect your copy from office)

This booklet will be a valuable resource to help you prepare for your exam effectively. You can now order your FREE hardcopy online via our Krushi Praboshini Application.

Application link: https://krushiprabodhini.akamai.net.in/new-courses/7

Note: You will only need to pay ₹70 for courier charges.

Order now and get ready for success.

Join: @Krushiprabodhini
लिपिक टंकलेखक 2023 नियुक्तीचा मुद्दा!
EWS & SEBC आरक्षण मुद्दा!
2025/07/04 09:39:41
Back to Top
HTML Embed Code: