Telegram Web Link
संयुक्त राष्ट्रांने 2026 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केले
शाळांच्या पटसंख्येवर होऊ लागला विपरीत परिणाम!
_वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, ती आत्म्याची परिक्रमा आहे._

*#वारी_२०२५*
_*प्रणव साखदेव यांचे नवे पुस्तक 'के कनेक्शन्स'*_

कुमारवयातल्या मुलांचे वेगवेगळे नातेसंबंध म्हणजे आई-वडील, भावंडे, आजी-आजोबा, शेजारी, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, मित्रांचे आई-वडील, वयाने मोठे मित्र, आवडणाऱ्या मुली हे सर्व यात हजेरी लावतात. सायकल, पतंग, क्रिकेट यांसारखे जिव्हाळ्याचे खेळ, नेहमीच्या वावराच्या परिसरातल्या दुकानांमध्ये आणि बाजारांमध्ये भेटणारी माणसे, आवडता खाऊ, वयात येतानाचे पौगंंडावस्थेतले अवघडलेपण अशा सर्व 'कनेक्शन्स'ना ह्या कथा स्पर्श करतात. कुमारचं अनुभवविश्व, विचारविश्व आणि भावविश्व आपल्यापुढे उभं करतात.

ऋचा मुळे
उद्या होणाऱ्या कम्बाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा! 💐💐

विजयी भव:
Group B Mains Paper 1 .pdf
8.5 MB
#MPSC
♦️आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 पेपर..

👉 पेपर क्रमांक 1 मराठी व इंग्रजी..
"परीक्षेत मुलीला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळवता आले म्हणून एका मुख्याध्यापक बापाने आपल्या मुलीला एवढी जबर मारहाण केली की त्यामुळे त्या मुलीचा जीव गेला." अशी एक बातमी होती. या बातमीखाली एका जणाने कॉमेंट केली. तो म्हणाला, हे मास्तर, प्राध्यापक वगैरे लोक असेच एकजात बेअक्कल असतात.

खरं म्हणजे असं सरसकट सगळ्या शिक्षक, प्राध्यापक लोकांना बेअक्कल म्हणणे चुकीचे आहे. परंतु, ही घटनाच एवढी वेदनादायक असल्याने आपण त्या कमेंटकर्त्या व्यक्तीच्या शब्दांमागच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्याचे शब्द जरी अतिरेकी वाटत असले तरी यात थोडेसे तथ्य देखिल आहे. तेही नाकारून चालणार नाही. त्यामुळे समाजासाठी तळमळ असणारे चांगले शिक्षक, प्राध्यापक मंडळी बाजूला करून त्या कमेंटकर्त्याला अभिप्रेत असलेला जो एक "सुशिक्षित बेअक्कल" वर्ग आहे त्या वर्गाचा आपण समाचार घेऊ.

माझ्या स्वतःच्याच परिवारात (भावकीत वगैरे) बरेच प्राध्यापक, स्वतः शिक्षक असून समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार, इंजिनीयर वगैरे लोक आहेत. त्यामुळे या लोकांचं वर्तन मला जवळून बघायला मिळालं. आयुष्यात काहितरी अचिव्ह (Achieve) केलेले, आपापल्या क्षेत्रात ज्यांना दिग्गज म्हणता येईल असे हे लोक. यांची गणना सुशिक्षित वर्गात केली जाते. येताजाता हे दुसऱ्यांना आपल्या जवळील ज्ञान वाटत असतात. समाजात यांना मान सन्मानही भरपूर मिळतो. कारण लोकांच्या दृष्टीने हे एक आदर्श व्यक्ती असतात. पण स्वतःच्या घरातल्या लोकांसाठी मात्र हे लोक अतिशय त्रासदायक असतात असं यांच्या बाबतीत एक निरीक्षण आहे. (यांना काही लोक - "शिकेल तेवढे हुकेल" असं म्हणत असतात. आणि हे अजिबात खोटं नाही.)

यांनी स्वतः आयुष्यात जे काही थोडेबहुत मिळवले असेल त्याची यांना खूप घमेंड असते. यांच्या देहबोलीतून आपल्या ज्ञानाचा, संपत्तीचा अहंकार पदोपदी जाणवतो. हे स्वतःला खूप थोर ज्ञानी, विद्वान वगैरे समजत असतात. पण हे काही आत्मानुभूतीतून प्रकट झालेलं वगैरे खरं ज्ञान नसतं. तर नुसती पोपटपंची असते. चार पुस्तके वाचून, घोकंपट्टी करून मिळवलेलं ज्ञान. त्याची हे मिजास दाखवत फिरत असतात.

यांना स्वतःची प्रतिष्ठा खूप महत्वाची वाटत असते. प्रत्यक्षात यांना यांच्या गल्लीत सुध्दा कोणी ओळखत नसतं. पण ते समजण्याची यांची पात्रता नसते.

हे आत्ममग्न लोक स्वतःच्याच जगात मश्गूल असतात. बाहेरच्या जगापासून पूर्णपणे अनभिज्ञ. त्यामुळे जग कुठे गेले आहे याची खबरबात या लोकांना नसते.

पोटापुरते, पोट भरण्यापुरते ज्ञान मिळाले की यांचा आणि ज्ञानाचा संबंध यांनी कायमचा तोडून टाकलेला असतो. आणि मग एकदा मिळवलेले तेच तेच ज्ञान हे लोक आयुष्यभर उगाळत बसतात. काही काळ यांच्यासमवेत आपण व्यतीत केला की यांची कुपमंडुक वृत्ती आपल्या लक्षात येते.

खरं तर माणूस दुसऱ्याच्या सहकार्या शिवाय इथे काहीच करू शकत नाही. हे वास्तव आहे. पण यांना ते मान्य नसते. अगदी स्वतःच्या बापाला सुध्दा हे कुठल्या गोष्टीचे क्रेडिट द्यायला तयार नसतात. असा स्वभाव असतो या लोकांचा. त्यामुळे सगळीकडे नुसता मी मी मी डोकावत असतो यांच्या बोलण्यातून. मी हे केलं.. मी ते केलं..

आपण कुणितरी आहोत या जाणिवेतून हे लोक स्वतःची प्रतिमा जिवापाड जपण्याचा प्रयत्न करत असतात. पण यांच्या अशा वागण्याचा यांच्या जवळच्या माणसांना खूप मनस्ताप होत असतो. खासकरून यांच्या परिवारातल्या स्त्रियांना. पण याची कुठे वाच्यता करता येत नसल्याने त्या बिचाऱ्या आतल्या आत कुढत बसतात. आणि यांचा समाजातला तथाकथित मोठेपणा सांभाळण्याचा प्रयत्न करतात.

अशा हिटलरशाही वृत्तीच्या कुटुंबप्रमुखाच्या हाताखाली राहिल्याने प्रचंड घुसमट होऊन, मनाचा कोंडमारा वगैरे होऊन मागच्या पिढीतील अनेक स्त्रिया हिस्टेरियाच्या (Hysteria) शिकार झाल्या. मनोरुग्ण झाल्या.

"माझ्या पैशांवर, मी कमावलेल्या पैशांवर तुम्ही लोक जगताय, माझ्यामुळे तुम्ही आहात, हे घर आहे" वगैरे. असं हे लोक घरातील इतर सदस्यांना वारंवार बोलून दाखवत असतात. येताजाता याची जाणीव करून देत असतात. जेणेकरून सगळ्या लोकांनी माझ्यापुढे नतमस्तक व्हावे. खाली मान घालून असावे. माझ्या आज्ञेचे पालन करावे, अशी यांची अपेक्षा असते. इतरांच्या आत्म सन्मानाची किंवा भाव भावनांची मात्र यांना मुळीच पर्वा नसते.

यश, पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा वगैरे यातच हे लोक जीवनाची सार्थकता समजतात. त्यापलीकडे यांना जीवन माहिती नसते. आणि माहिती करून घेण्याची इच्छा देखिल नसते. अल्प ज्ञानामुळे यांचा स्वभाव हेकेखोर झालेला असतो. आपल्या कुटुंबात राहणाऱ्या माणसांना हे गुलामासारखी वागणूक देत असतात. स्वतःच्या (खोट्या) प्रतिष्ठेला बाधा येईल असे एखादेही कृत्य यांना चालणारे नसते. मागच्या काळात याच लोकांकडून ऑनर किलिंग सारखे प्रकार घडले. आजही कुठेकुठे घडत असतात!
2025/07/04 04:50:35
Back to Top
HTML Embed Code: