Telegram Web Link
From Marathi Mhani app:

आगीतून फुफाट्यात जाणे.

Meaning:
लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात जाणे.
12🔥2😁1
From Marathi Mhani app:

आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला.

Meaning:
इच्छाच खूप प्रत्यक्षात काही नाही.
14
@Marathi

🔹अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द:

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
_________________________
जॉईन करा आमचे @marathi चॅनेल
47👌9
From Marathi Mhani app:

आचार भ्रष्टी, सदा कष्टी.

Meaning:
ज्याचे आचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो.
19
From Marathi Mhani app:

आज अंबारी, उद्या झोळी धरी.

Meaning:
कधी वैभव तर कधी दैन्य.
19👍2
आजा मेला, नातू झाला.

Meaning:
एखादे नुकसान व्हावे आणि त्याचवेळी दुसरी फायद्याची गोष्ट होणे.
____________________________________
अधिक माहितीसाठी आमचे मराठी व्याकरणाचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा @marathi .
29👍4👌3
From Marathi Mhani app:

आठ हात लाकूड, न‌ऊ हात धलपी.

Meaning:
अत्यंत मुर्खपणाची अतिशयोक्ती.
👍123
From Marathi Mhani app:

आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार?

Meaning:
जे मुळातच नाही त्याची थोडीसुद्धा अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
16👍5
From Marathi Mhani app:

आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगे.

Meaning:
संकुचित वृत्तीचा विशालतेचा विचार सांगतो.
12🔥3
From Marathi Mhani app:

आत्याबा‌ईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.

Meaning:
न होणाऱ्या गोष्टीबद्दल चिकित्सा करु नये.
😁188
From Marathi Mhani app:

आधणातले रडतात, सुपातले हसतात.

Meaning:
जे लोक आज सुखात आहेत, त्यांना उद्या दु:खाचे दिवस येणारच असतात.
👌105
From Marathi Mhani app:

आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.

Meaning:
आधी मूर्खासारखे बोलायचे आणि नुकसान झाल्यावर रडायचे, त्याचा काहीच उपयोग नसतो.
14👍8
From Marathi Mhani app:

आधी जाते बुद्धी, मग जाते लक्ष्मी.

Meaning:
आधी आचरण बिघडते मग वाईट दशा प्राप्त होते.
5
From Marathi Mhani app:

आधी पोटोबा मग विठोबा.

Meaning:
आधी स्वार्थ मग परमार्थ.
14
From Marathi Mhani app:

आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास.

Meaning:
आधीच हौस आणि त्यात अनुकूल परिस्थितीची भर.
20
कुसुमाग्रज यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

कविता संग्रह :

अक्षरबाग (१९९९)
किनारा(१९५२)
चाफा(१९९८)
छंदोमयी (१९८२)
जाईचा कुंज (१९३६)
जीवन लहरी(१९३३)
थांब सहेली (२००२)
पांथेय (१९८९)
प्रवासी पक्षी (१९८९)
मराठी माती (१९६०)
महावृक्ष (१९९७)
माधवी(१९९४)
मारवा (१९९९)
मुक्तायन (१९८४)
मेघदूत(१९५६)
रसयात्रा (१९६९)
वादळ वेल (१९६९)
विशाखा (१९४२)
श्रावण (१९८५)
समिधा ( १९४७)
स्वगत(१९६२)
हिमरेषा(१९६४)

निबंध संग्रह :

आहे आणि नाही (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
प्रतिसाद (पुस्तक) - लघुनिबंध संग्रह
नाटक
ऑथेल्लो
आनंद
आमचं नाव बाबुराव
एक होती वाघीण
कौंतेय
जेथे चंद्र उगवत नाही
दिवाणी दावा
दुसरा पेशवा
दूरचे दिवे
देवाचे घर
नटसम्राट
नाटक बसते आहे
बेकेट
मुख्यमंत्री
ययाति देवयानी
राजमुकुट
विदूषक
वीज म्हणाली धरतीला
वैजयंती

कथासंग्रह :

अपॉईंटमेंट (कथासंग्रह)
काही वृद्ध काही तरुण (कथासंग्रह)
फुलवाली (कथासंग्रह)
बारा निवडक कथा (कथासंग्रह)
सतारीचे बोल (कथासंग्रह)

कादंबरी :

कल्पनेच्या तीरावर (कादंबरी)
जान्हवी (कादंबरी)
वैष्णव (कादंबरी)
59
मराठी व्याकरण:

परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके -

 पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव

*प्लेईंग टू विन - सायना नेहवाल

*हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे

*टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख

*हाफ गर्लफ्रेंड- चेतन भगत

*प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर

*आय डेअर - किरण बेदी

*ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा

*इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद

*सनी डेज - सुनिल गावस्कर

*द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग

*झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्‍वास पाटील

*छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत

*श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई

*वाट तुडविताना - उत्तम कांबळे

*अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे

*एकच प्याला - राम गणेश गडकरी

*कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे

*यमुना पर्यटन - बाबा पद्मजी

*पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे

*सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर

*गिताई - विनोबा भावे

चल्या - लक्ष्मण गायकवाड

*उपरा - लक्ष्मण माने

*एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर

*भिजली वही - अरूण कोल्हटकर

*नटसम्राट - वि.वा.शिरवाडकरमाझी जन्मठेप - वि.दा.सावरकर

*श्यामची आई - साने गुरूजी

*धग - उध्दव शेळके

*ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर

*एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्‍वास बेडेकर

*गोतावळा, झोंबी - आनंद यादव

*जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर

&ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

*बलूतं - दया पवार

*बारोमास - सदानंद देशमुख

*आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे

*शाळा - मिलींद बोकील

*चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके

*बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर

गोलपीठा - नामदेव ढसाळ

जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल

*मी कसा झालो - प्र.के.अत्रे

*मी कसा घडलो - आर.आर.पाटील

*सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर

*ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील

*उनिकी - सी. विद्यासागर राव

*मुकुंदराज - विवेक सिंधू

*दासबोध, मनाचे श्‍लोक - समर्थ रामदास

*बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर -सावित्रीबाई फुले

*गीतारहस्य - लोकमान्य टिळक

*बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे

माझे विद्यापीठ, सनद, जाहिरनामा - नारायण सुर्वे

*फकिरा - अण्णाभाऊ साठे

*रामायण - वाल्मीकी

*मेघदूत - कालीदास

*पंचतंत्र - विष्णू शर्मा

*मालगुडी डेज - आर.के.नारायण

*माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी

*महाभारत - महर्षी व्यास

*अर्थशास्त्र - कौटील्य

*अन् हॅपी इंडीया  - लाला लजपतराय

*माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी

*रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद

*प्रकाशवाटा - प्रकाश आमटे

*आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव

*दास कॅपीटल - कार्ल मार्क्स

*एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दालद.

*गाईड - आर.के.नारायण

*हॅम्लेट - शेक्सपिअर

*कर्‍हेचे पाणी - आचार्य अत्रे

*कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण

*ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी

*शतपत्रे - भाऊ महाजन

*प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण

*माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर

*निबंधमाला - विष्णुशास्त्री चिपळूणकर

*दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम

*स्पीड पोस्ट - शोभा डे

*पितृऋण - सुधा मूर्ती

*माझे गाव माझे तीर्थ - अण्णा हजारे

*एक गाव एक पानवटा - बाबा आढाव

*लज्जा - तस्लीमा नसरीन

*मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग

*कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ

*गोल्डन गर्ल - पी.टी.उषा

*राघव वेळ - नामदेव कांबळे

*आकाशासी जुळले नाते - जयंत नारळीकर

*गोईन - राणी बंग

*सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
105🔥3👍2🤔2👌1
🔹महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे -



कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नवे:

१)यशवंत दिनकर पेंढारकर-यशवंत

२)मोरोपंत रामचंद्र पराडकर-मोरोपंत

३)नारायण सूर्याजीपंत ठोसर-रामदास

४)दत्तात्रय कोंडो घाटे-दत्त

५)चिंतामण त्र्यंबक खानोलकर-आरती प्रभू

६)नारायण मुरलीधर गुप्ते-बी

७)गोपाल हरी देशमुख-लोकहितवादी

८)शंकर काशिनाथ गर्गे-दिवाकर

९)माधव त्रंबक पटवर्धन-माधव जुलियन

१०)दिनकर गंगाधर केळकर-अज्ञातवासी

११)आम्ताराम रावजी देशपांडे- अनिल

१२)कृष्णाजी केशव दामले-केशवसुत

१३)सौदागर नागनाथ गोरे- छोटा गंधर्व

१४)रघुनाथ चंदावरकर-रघुनाथ पंडित

१५)हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-कुंजविहारी

१६)दासोपंत दिगंबर देशपांडे-दासोपंत

१७)सेतू माधवराव पगडी-कृष्णकुमार

१८)नारायण वामन टिळक-रेव्हरंड टिळक

१९)माणिक शंकर गोडघाटे-ग्रेस

२०)वसंत ना. मंगळवेढेकर-राजा मंगळवेढेकर

२१)कृष्ण शास्त्री चिपळूणकर-मराठीचे जॉन्सन

२२)केशवसुत-आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक

२३)बा.सी. मर्ढेकर-मराठी नवकाव्याचे/कवितेचे जनक, निसर्गप्रेमी

२४)सावित्रीबाई फुले-आधुनिक मराठी कवितेच्या जननी

२५)संत सोयराबाई- पहिली दलित संत कवयित्री

२६)त्रंबक बापुजी ठोंबरे-बालकवी

२७)ना.धो.महानोर-रानकवी

२८)यशवंत दिनकर पेंढारकर-महाराष्ट्र कवी

२९)ना. चि. केळकर-साहित्यसम्राट

३०)न. वा. केळकर-मुलाफुलाचे कवी



३१)ग. त्र.माडखोलकर-राजकीय कादंबरीकार

३२)शाहीर राम जोशी-शाहिरांचा शाहीर

३३)दादोबा पांडुरंग तर्खडकर -मराठी भाषेचे पाणिनी

३४)वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज

३५)राम गणेश गडकरी-गोविंदाग्रज/बाळकराम

३६)प्रल्हाद केशव अत्रे-केशवकुमार

३७)काशिनाथ हरी मोदक-माधवानुज

३८)विनायक जनार्दन करंदीकर-विनायक

३९)विष्णुशास्त्री चिपळूणकर-मराठी भाषेचे शिवाजी


*महत्वाचे *
कृष्णाजी केशव दामले -
केशवसुत

गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमारराम

गणेश गडकरी - गोविंदाग्रज

विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम


माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन

चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू

आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
105👍7👌4😁2🤔2
वर्णमाला

वर्ण - आपल्या तोंडावाटे पडणार्‍या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात.

      मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
1. स्वर 
2. स्वरादी
3. व्यंजन 

1. स्वर : ज्यांचा उच्चार करतांना जिभेचा मुखातील कोठल्याही अवयवांशी स्पर्श होत नाही त्यांना स्वर असे म्हणतात.
         अ, आ, इ, ई, ल्र, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, ऋ

    स्वरांचे मुख्य प्रकार दोन आहेत.
1. र्‍हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्‍हस्व स्वर असे म्हणतात.
              अ, इ, ऋ, उ


2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.
         आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

    स्वरांचे इतर प्रकार
1. सजातीय स्वर : एकाच उच्चार स्थांनामधून जाणार्‍या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
                 अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ 

2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणार्‍या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
                  अ-ई, उ-ए, ओ-ऋ

3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणार्‍या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात.
               याचे 4 स्वर आहेत.
               ए - अ+इ/ई
               ऐ - आ+इ/ई
               ओ - अ+उ/ऊ
               औ - आ+उ/ऊ

2. स्वरादी :  ज्याचा उच्चार करण्याअधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात.
            स्वर + आदी - स्वरादी
            दोन स्वरादी - अं, अः
            स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो.
  दोन नवे स्वरदी : ओ, औ
  हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत.
  उदा. बॅट, बॉल

3.व्यंजन : एकूण व्यंजन 34 आहेत.
          ज्याचा उच्चार करतांना जिभेचा कंठ, टाळू, मुर्धा, दात, ओठ, या अवयवांशी स्पर्श होतो त्यांना व्यंजन असे म्हणतात. 
          व्यंजनाचे पाच प्रकारात वर्णन केले जाते.
1. स्पर्श व्यंजन (25)
2. अर्धस्वर व्यंजन (4)
3. उष्मा, घर्षक व्यंजन (3)
4. महाप्राण व्यंजन (1)
5. स्वतंत्र व्यंजन (1)
93👌8👏2🤔1
1. स्पर्श व्यंजन : एकूण व्यंजन 25 आहेत. 
                ज्याचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडतांना टाळू, कंठ, मुर्धा, दात, व ओठ यांचा स्पर्श 
                करून बाहेर निघते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजन म्हणतात.
                उदा. क, ख, ग, घ, ड
                    च, छ, ज, झ, त्र
                    ट, ठ, ड, द, ण
                    त, थ, द, ध, न
                    प, फ, ब, भ, म
     स्पर्श व्यंजनाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
1. कठोर वर्ण 
2. मृदु वर्ण 
3. अनुनासिक वर्ण 

1. कठोर वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार करण्यास जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण असे म्हणतात.
              उदा. क, ख
                  च, छ
                  ट, ठ 
                  त, थ 
                  प, फ

2. मृद वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार सौम्यपणे होतो त्यांना मृद वर्ण असे म्हणतात. 
            उदा. ग, घ
                ज, झ
                ड, ढ
                द, ध
                ब ,भ

3. अनुनासिक वर्ण - ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थानासोबत काही अंशी नाकातूनही केल्या जातो त्यास अनुनासिक असे म्हणतात. 
                  उदा. ड, त्र, ण, न, म      
43🙏9🔥5👏4
2025/10/31 09:38:12
Back to Top
HTML Embed Code: