Telegram Web Link
From Marathi Mhani app:

अघळ पघळ अन् घाल गोंधळ.

Meaning:
मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते.
17
From Marathi Mhani app:

अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.

Meaning:
क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.
15
From Marathi Mhani app:

अती उदार तो सदा नादार.

Meaning:
आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते.
21
From Marathi Mhani app:

अनोळखी उपाख्या आणि नऊ पट होम.

Meaning:
अपरिचित माणसाशी केलेल्या व्यवहारात नुकसानच होते.
16🙏3
From Marathi Mhani app:

अन्नछत्रात जेवण वर मिरपूड मागणे.

Meaning:
फुकट तर जेवायचे वर पुन्हा मिजास दाखवायची.
20
From Marathi Mhani app:

अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही.

Meaning:
सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो.
19👌4
From Marathi Mhani app:

अपमानाची पोळी, सर्वांग जाळी.

Meaning:
स्वाभिमानी माणूस स्वत:चा अपमान कधीही सहन करीत नाही.
21👌6
From Marathi Mhani app:

अळी मिळी गुपचिळी.

Meaning:
आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे.
18👏3
From Marathi Mhani app:

असतील शिते तर जमतील भूते.

Meaning:
एखाद्या माणसाजवळ पैसा असेल किंवा त्याच्याकडून फायदा होणार असेल त्याच्याभोवती माणसे गोळा होतात.
34
From Marathi Mhani app:

असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती.

Meaning:
नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.
25
From Marathi Mhani app:

असेल माझा हरी, तर दे‌ईल खाटल्यावरी.

Meaning:
स्वत: काहीही उद्योग न करता दैवावर विसंबून सर्व सुखांची अपेक्षा करणे.
35
From Marathi Mhani app:

असेल माझा हरी, तर दे‌ईल खाटल्यावरी.

Meaning:
स्वत: काहीही उद्योग न करता दैवावर विसंबून सर्व सुखांची अपेक्षा करणे.
16🤔3
From Marathi Mhani app:

अस्तुरीचा बात अन् इड्याले नको काथ.

Meaning:
मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात.
18👍1
From Marathi Mhani app:

आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.

Meaning:
अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा चुथडा होतो.
14🤔1
From Marathi Mhani app:

आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते.

Meaning:
परिश्रम एकाचे, फायदा दुसऱ्याचा.
17😢2👌1
From Marathi Mhani app:

आंधळ्या बहिऱ्याची गाठ.

Meaning:
कर्तृत्वहीन मनुष्य एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असतो.
13👍1
From Marathi Mhani app:

आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना

Meaning:
दोन्हीही बाजूंनी अडचण.
12😢3
From Marathi Mhani app:

आकारे रंगती चेष्टा.

Meaning:
बाह्य चिन्हांवरुन अंतर्गत स्वरुपाचे ज्ञान होते.
12🙏3
From Marathi Mhani app:

आखाड्याच्या मेळाव्यात पहेलवानाची किंमत.

Meaning:
योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उपयोग.
12👏2👍1
From Marathi Mhani app:

आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी.

Meaning:
गरज असलेल्या माणसाला मदत न करता, ज्याला गरज नाही त्याला मदत करणे.
16🔥2
2025/10/28 11:27:10
Back to Top
HTML Embed Code: