Telegram Web Link
Live stream started
Live stream finished (1 hour)
डोंगराच्या कुशीत उगम पावणारा एखादा झरा पाहिलाय का कधी.. अनेकांपैकी एखादा झरा पुढे जाऊन मोठी नदीही बनतो.. पण कित्येक झरे डोंगराच्या पायथ्याशी येता येताच कुठेतरी लुप्त होतात किंवा एखाद्या नदीला जाऊन मिळतात.. कुठल्याही नावाविना.. कुठल्याही ओळखीविना.. नदीचा मार्ग ठरलेला असतो, पात्र निश्चित असतं, पाण्याचा पुरवठा निश्चित असतो.. झऱ्याला मात्र सगळं स्वतः निर्माण करायचं.. एखादा अडथळा आला तर त्याला वळसा घालून झऱ्याचा प्रवाह पुढे पुढे जात असतो.. अडथळ्यांना भिडणं त्याला परवडणारं नसतं त्याला पुढे जात राहणं गरजेचं असतं.. वाट मिळेल तसं तो प्रवाह पुढे जात राहतो.. आपल्या आयुष्याचही बहूदा असंच काहीसं असतं.. काहींना नदीसारखं आयुष्य मिळतं ज्यात सगळं काही आधीच सुनिश्चित असतं तर कुणाला झऱ्यासारखं आयुष्य मिळतं ज्यात सगळं काही नव्याने तयार करायचं असतं.. अडथळ्यांना वळसा घालून पुढे जात रहायचं असतं.. अवघड वाटांवर टिकून रहायचं असतं.. असं हे आयुष्य ज्याचं त्याचं वेगळं असतं.. कुणाचं संथ आणि सखोल नदीसारखं तर कुणाचं खळाळत्या झऱ्यासारखं.. अहमद फराज म्हणून गेलाय ना,

किसी को घर से निकलते ही मिल गई मंज़िल
कोई हमारी तरह उम्र भर सफ़र में रहा
|

~निरंजन🌿
👍246151💯46😍6
There is no Success without peace of Mind..!❤️

#SubconsciousMind
💯304125👍34😇3
 “When each day is the same as the next, it's because people fail to recognize the good things that happen in their lives every day that the sun rises.”

#TheAlchemist
💯15439👍37
"The edge is in the inputs.
The person who consumes from better sources, gets better thoughts. The person who asks better questions, gets better answers. The person who builds better habits, gets better results.
It's not the outcomes. It's the inputs."

~James Clear
160💯40👍33
💯14269👍37
"Clarity isn't about knowing what you want to do with your life, it's about knowing what you want to do this week.
You don't need to have it all figured out. You just need to know your next step."

~James Clear
💯156👍6247
81💯17👍11
Forwarded from Niranjan's Blog☘️
प्रिय पालकांनो,

आपल्या मुलामुलींसाठी तुम्ही खूप काही करता त्याबद्दल तुमचे अभिनंदन! यासोबतच करीयरच्या वेगवेगळ्या संधींबद्दल माहिती होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा. आपण विद्यार्थ्यांना तुमच्या आवडीचं ते करा हे म्हणतो खरं परंतू त्या आवडी निर्माण होण्यासाठी विविध संधीची माहिती हवी..

विविध करीयर संधींची माहिती व्हावी म्हणून प्रयत्न व्हावेत, पालकच नाही तर शाळा-महाविद्यालयांनीही यासाठी प्रयत्न करायला हवेत. नुसतच एमपीएससीच्या नादाला लागु नका म्हणून सांगणं पुरेसं नाही.. इतरही खूप चांगले पर्याय आहेत ते कळत्या वयात विद्यार्थ्यांना माहिती व्हायला हवेत..

आपल्या परीसरातील यशस्वीतांकडून विद्यार्थी खूप प्रेरित होतात हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपल्या तालुका-जिल्ह्यातील विविध क्षेत्रात मोठं यश मिळवलेल्या लोकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलवायला हवं. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा..

कला, क्रिडा, कायदा, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय संस्थांतील विविध संधी अशा कित्येक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीत. त्यामुळे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नाहीतर मग आजचे विद्यार्थी हे उद्याचे राजकीय पक्षांचे समाजमाध्यमी समर्थक किंवा असंच काहीतरी होत राहतील.


@niranjan_blog☘️
💯5014👍9
Niranjan's Blog☘️
प्रिय पालकांनो, आपल्या मुलामुलींसाठी तुम्ही खूप काही करता त्याबद्दल तुमचे अभिनंदन! यासोबतच करीयरच्या वेगवेगळ्या संधींबद्दल माहिती होईल यासाठी नेहमी प्रयत्न करत रहा. आपण विद्यार्थ्यांना तुमच्या आवडीचं ते करा हे म्हणतो खरं परंतू त्या आवडी निर्माण होण्यासाठी…
कुठलीही विद्याशाखा चांगली किंवा वाईट नाही. याउलट सर्वच विद्याशाखा महत्त्वाच्या आहेत. आपण कितीही नाकारलं तरीही आजचं शिक्षण आपल्या कमावते होण्याशी, अर्थार्जनाशी अनिवार्यपणे जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आपली आवड आणि रोजगाराच्या संधी या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन 10 वी, 12 वी नंतर काय या प्रश्नाकडे पहायला हवे. विशेषतः पुढे UPSC/MPSC करायचं आहे म्हणून Arts ला जायचं ही गोष्ट मला फारशी पटत नाही. अर्थात, कला शाखेची आवड असणं त्यात पुढे काहीतरी करीयर करणं हे ठीक आहे परंतू फक्त स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये मदत होईल म्हणून कला शाखेला जाणं, किंवा घरबसल्या पदवीचं शिक्षण घेणं या गोष्टी बिलकुलच पटत नाहीत(काहींना नाईलाजाने मुक्त विद्यापीठांतून शिकावं लागतं ही बाब वेगळीआहे आणि अर्थात ते गरजेचं आहेच.) पदवी शिक्षणाचं स्वतःचं एक महत्व असतं, त्या काळात अनेक कौशल्ये आपण विकसित करायचे असतात. दुसरं म्हणजे आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही रोजगार संधीही उपलब्ध व्हायला पाहिजेत. भलेही आपल्याला पुढे चालून स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असली तरीही पदवी शिक्षण रोजगार उपलब्ध करून देणारं असलेलं कधीही चांगलं. स्पर्धा परीक्षांमधली अनिश्चितता तीन-चार attempts नंतर अगदी जीवघेणी वाटू लागते. अर्थात काही सन्माननीय अधिकाऱ्यांनी 10 वी, 12 वी नंतर ठरवून कला शाखेला प्रवेश घेतला होता, अगदी पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षांमध्ये यशाला गवसणी घातली होती. परंतू आपण ही गोष्ट पाहताना अशा अधिकारी वर्गाचे शैक्षणिक आलेख तसेच त्यांचे महाविद्यालय वगैरे या गोष्टीही पहायला हव्यात. अगदी exceptional academic background, reputed colleges मध्ये शिक्षण इ. गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. त्यामुळे हे सर्व पाहता सारासार विचार करून निर्णय घ्या हे पालकांना आणि 10 वी, 12 च्या टप्यावरील विद्यार्थी मित्रमैत्रीणींना हे आवर्जून सांगणं राहील. आणखी एक म्हणजे स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रत्येकानेच आज एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दिवसेंदिवस आपली थेट स्पर्धा ही खूप चांगल्या academic background मधून येणाऱ्याआणि highly professional लोकांसोबत होणार आहे. या सर्व गोष्टींची स्पष्ट जाणीव आपल्याला पाहिजे. ती जाणीव आपल्या तयारीत परावर्तितही व्हायला पाहिजे.

-निरंजन कदम,
सहायक राज्यकर आयुक्त
👍97💯219😍4
👍5227
आयुष्यात आपल्या सोईनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत. अगदी पुढच्या क्षणाला आपल्या समोर काय मांडून ठेवलं असेल याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. अशात पुढे कसं होईल? या प्रश्नात अडकून पडायचं की जे होईल ते पाहून घेऊ म्हणत जे शक्य आहे त्यावर काम करीत रहायचं ही निवड आपल्याला करायची असते. एखादी विपरीत गोष्ट घडली तरी पुन्हा सोडून द्यायचं की कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन काम सुरु ठेवायचं ही सुद्धा आपली निवड असते. आयुष्य आपल्याला जेवढं नशीबाचा खेळ वगैरे वाटतं त्यापेक्षा जास्त ते आपल्या निवडींचा परिणाम असतं. ही गोष्ट आपण जेवढं लवकर स्वीकारू आणि जेवढं खुल्या दिलाने स्वीकारू तेवढं आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं बनविण्यासाठी आपले प्रयत्न लवकर आणि व्यवस्थितपणे सुरू होऊ शकतात.
👍262💯113103
Niranjan's Blog☘️ via @like
Photo
It is just on a lighter note.. सर्वांना संधी योग्य मिळणे ही चांगली बाब आहे..

आपल्यासाठी महत्त्वाचं काय तर तांत्रिक बाबींमुळे परीक्षा गेली आहे, पण आपला अभ्यास पुढे जायला नको. Just stick to your schedule. 6 जुलै ला परीक्षेची रंगीत तालीम व्हायला पाहिजे.
💯105👍2711
Privileged class च्या पलीकडे मोठ्ठं जग आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारं.. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या गर्दीतल्या प्रत्येकाची स्वतःची म्हणून एक कहाणी असते.. कष्ट असतात, संघर्ष असतो.. पण ही story जोपर्यंत success story होत नाही तोवर जगाला कळत नाही.. जगाला फक्त success stories आवडतात.. आजच एक वाचलं होतं, "लोकांना तुम्ही काय मिळवलं आहे याचा हेवा वाटतो, मिळवण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतलेत याचा नाही." असो.. struggle आपल्याला चुकलेला नाही. तो केलाच पाहिजे. तोच एकमेव मार्ग आहे गर्दीतून वाट काढत पुढे जाण्याचा...
214👍48💯48😍13
Live stream started
2025/07/08 22:03:28
Back to Top
HTML Embed Code: