Telegram Web Link
नमस्कार,

आर्थिक साक्षरतेसंबंधी अजून काही sessions व्हावेत अशी अपेक्षा बऱ्याच जणांनी व्यक्त केली होती. श्री. भगवंत चेचे सर हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. हे sessions आपण एका स्वतंत्र telegram channel वर घेऊ, इच्छुकांनी channel join करावे तसेच आपले मित्र-कुटुंबिय यांनाही लिंक पाठवावी.

https://www.tg-me.com/arthyog2024
👍4311😍1
यशासारखं सुंदर काहीच नसतं असं म्हणतात ते अगदी खरंय...🌿
315💯58👍17😇1
43👍16💯12
Forwarded from अर्थयोग (Bhagwant Cheche)
अर्थयोग

भाग 3

आरोग्य विमा मुदत विमा यांनतर emergency fund यातील गुंतवणूक हि वैयक्तिक आर्थिक नियोजनाचा अत्यंत महत्वाचा पैलू ...
कारण आपल्या जिवनात येणाऱ्या आगंतुक वा आकस्मिक खर्चासाठीची तरतूद जर आपण करून ठेवली तर आपली मुख्य गुंतवणूंक जी बाजाराधिष्टित आहे .शेयर किंवा रोखे बाजारातील अशा साधनामध्ये असणार आहे ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जोखीम आहे आणि कमी कालावधीमध्ये चढ उतार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा साधनामध्ये शक्यतो करावयाची गुंतवणूक हि दीर्घ मुदतीसाठी करायला हवी .
आपल्या मुख्य गुंतवणूकीचे उद्दिष्ट जरी दीर्घकालीन असले तरी वैयक्तिक, कौटुंबिक अडीअडचणी ज्या आकस्मिक उद्धवतात जसे की वैयक्तिक वा कुटुंबातील सदस्यांचे आजारपण, घर दुरुस्ती, वाहन दुरुस्ती, छोटे मोठे समारंभ इत्यादी करिता जर वेगळी तरतूद केली गेली नाही तर आपल्या मुख्य गुंतवणुकीतून अशा प्रकारचा खर्च होऊन ज्या मूळ उद्दिष्टासाठी आपण गुंतवणूक केलेली असेल अशा उद्दिष्टाला हरताळ फासू शकते. असे केल्यास आपल्या गुंतवणुकीचा उद्देश सफल होत नाही.(Compounding gets interrupted (
अशा परिस्थितीत आपल्या मुख्य गुंतवणुकिस धक्का लागू नये यासाठी आपण (emergency fund )आकस्मिक निधी ची तरदुद करायलाच हवी.

Emergency fund किती असावा?

साधारणपणे आपल्या कुटुंबाची वार्षिक खर्चाची रक्कम जेवढी असेल तेवढा किंवा कुटुंबाचे सहा महिन्याचे उत्पन्न यापैकी जी रक्कम अधिक असेल एव्हढा निधी आपण emergency fund म्हणून ठेवायला हवा.
म्हणजे जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये असेल तर 2.5 लाख रुपये आणि कुटुंबाचा वार्षिक खर्च 3 लाख रुपये असेल तर आपण तीन लाख रुपयांची तरतूद Emergency fund म्हणून करणे हे आपले पहिले आर्थिक उद्दिष्ट हवे.
कुठल्याही बजारधिष्टित गुंतवणुकीस हात घालण्यापूर्वी ही रक्कम आपल्या गाठीशी असणे हे आरोग्य विमा, मुदत विमा नंतर चे तेवढेच महत्वाचे पावुल असेल.
अशा प्रकरच्या गुंतवणुकीमधून जे आर्थिक सुरक्षितता आपल्या व आपल्या कुटुंबाला मिळणार आहे त्यातून लांबच्या कालावधीसाठी करायच्या गुंतवणुकीतूचा पायाच बळकट होणार आहे.

Emergency fund कूठे गुंतवावा ?

Emergency fund हा अशा साधनांमध्ये गुंतवायला हवा जिथून आपल्याला तो विनासायास आपल्या गरजेनुसार उपलब्ध व्हावा.
यासाठीचा एक पर्याय म्हणजे बँकेतील सेविंग्ज अकाउंट ..किंवा आपल्या बँकेतील फिक्स्ड डेपोसीट .
आजकाल या दोन्ही साठी आपल्याला प्रत्यक्ष बँकेत जाण्याची आवश्यकता नाही इंटरनेट बँकिंग चा वापर करून या दोन्ही सुविधा काही क्लिक्स च्या अंतरावर आहेत. यावर आपल्याला आपल्या मुदत ठेवी वर साधारणपणे 5 ते 6 टकके तर सेवींग्ज अकाउंट मध्ये 3 ते 4 टक्के एवढा परतावा मिळू शक्यतो..अर्थातच तो महागाई ज्या दराने वाढतेय तेवढा देखील नाही परंतु या साधना मधली आपली गुंतवणूक ही आपला मुद्दल सुरक्षित राहावे याकरिता आहे. यामधून मिळणार परतावा हे आपल्या गुंतवणुकीचे दुय्यम उद्दिष्ट आहे. त्यामुळे emergency fund हा जास्तीत जास्त तरल (liquid).. सहजी उपलब्ध होणाऱ्या साधनांमध्ये असावा.

दुसरा पर्याय म्हणजे रोखे म्युच्युअल फंड प्रकारातील लिक्वीड फंड.

रोखे बाजारातील सरकारी किंवा निमसरकारी रोख्यामध्ये जे म्युच्युअल फंडस् आपले पैसे गुंतवतात त्यांना रोखे म्युच्युअल फंड(Debt mutual funds)असे म्हणतात.
एका ठराविक मुदतीसाठी ठराविक व्याज दराने सरकार आणि कॉर्पोरेट कंपन्या रोखे विक्रीच्या माध्यमातून निधीची उभारणी करत असतात.
रोख्यांचा कालावधी, रोखे विक्री करणारी कंपनी किंवा सरकार यांची बाजारातील पत, यानुसार रोख्याचा परताव्याचा दर निश्चित होत असतो.
वेगवेगळ्या रेटिंग एजंजिस जसे की CRISIL(Credit Rating Information Services of India Limited ),
ICRA( Investment Information and Credit Rating Agency of India Limited)
या रोख्यांचे व समभाग तसेच रोखे म्युच्युअल फंडाचे त्यांच्या जोखिमेनुसर वर्गीकरण करून त्यांचे संस्थांना क्रेडिटयोग्यतेसाठी रेट करते.
लिक्वीड फंडस् शक्यतो अश्या सरकारी रोख्यामधे पैसे गुंतवतात; ज्यांचा कालावधी 90 दिवसापेक्षा कमी असतो.
90 दिवसांनंतर त्या कंपनीला किंवा सरकारला ठरलेल्या परताव्यासह परत करावा लागतो.त्यामुळे अशा लिक्वीड फंडात होणारी गुंतवणूक ही अत्यंत तरल (liquid ) असते.
लिक्वीड फंडातील परतव्याचा दर हा सेविंगस अकाउंट आणि बँकेतील मुदत ठेविपेक्षा नक्कीच सरस असतो.
साधारणपणे फंड चालवण्यासाठी लागणारा एक्स्पेंस रेशो(.20 ते .30 टकके) वजा जाता 6 ते 7 टक्क्यांपर्यंत परताव्याची अपेक्षा लिक्वीड फंडाद्वारे आपण करू शकतो.
👍282
Forwarded from अर्थयोग (Bhagwant Cheche)
त्याचबरोबर आणि लिक्वीड फंडातील गुंतवणूक ही अधिक करकार्यक्षम सुध्दा आहे...कारण जोपर्यंत लिक्वीड फंडातील गुंतवणूक आपण काढून घेत नाही तोपर्यंत होणाऱ्या नफ्यावर आपल्याला कर पात्रता येत नाही. याउलट सेवींगस अकाउंट वा मुदत ठेवी वर मात्र तुम्हाला होणाऱ्या नफ्यावर प्रत्येक वर्षी अधिकचा कर भरावा लागतो.

लिक्वीड फंडातील गुंतवणूक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या म्युच्युअल फंड सेवा पुरवठादार जसे की Kuvera, ET Money
MF Central, Grow यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चया माध्यमातून करू शकतो..
सर्व असेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजेच म्युच्युअल फंड कंपन्या आपापले लिक्वीड फंडस् चालवतात.

यातील चांगला फंड हाऊस तसेस उत्तम रेटिंग असणाऱ्या लिक्वीड फंडात आपण आपली emergency फंडाची रक्कम गुंतवायला हवी.
बऱ्याच जणांना अधिकच्या परताव्याच्या मोहापोटी आपला emergency fund सहकारी किंवा मल्टिस्टेट सहकारी सोसायटी यामध्ये ठेवण्याचा मोह होऊ शकतो परंतु...अशा सोसायटी ची पत त्याचे नियमन, तरलता या सर्व बाबितली अनिश्चितता या गोष्टींचा विचार करता आपले मुद्दल थोड्या अधिकच्या परताव्याची अपेक्षा करून अशा ठिकाणी अजिबात ठेऊ नये..यामध्ये आपल्याला मुद्दल सुद्धा वेळेवर मिळेलच याची खात्री देता येत नाही.
कारण वॉरन बफे म्हणतात तसे गुंतवणुकीचे दोन नियम आहेत
1.Don't lose your capital
2.Never forget the rule number in one
त्यामुळे आपले मुद्दल सुरक्षित ठेवून आपल्या उद्दिषटपूर्तीसाठी आपण काम करायला हवे.
रोखे व शेयर बाजारातून अधिकाधिक गुंतवणुक करून अधिकाधिक परतावा मिळण्यासाठी हा भक्कम पाया असणार आहे.

भगवंत चेचे
👍331
परीक्षेची तारीख माहिती नसताना अभ्यास करणं हे खूप आव्हानात्मक असतं.. माणसाला target oriented काम करणं कदाचित फारसं आवडत नसेल परंतू तरीही जेव्हा आपण target oriented काम करीत असतो तेव्हा आपली efficiency खूप जास्त असते. Targets हे time bound असतात आणि time bound targets साठी deadlines गरजेच्या असतात. परीक्षेची तारीख ही आपली supreme deadline असते आणि आजच्या घडीला आपल्याला तीच माहिती नाही. तरीही हे असं सगळं असलं तरीही आपल्याला अभ्यास करावाच लागेल कारण आपल्यातले काही लोक self disciplined असतात, ते स्वतःहून time bound targets ठरवतात, त्यानुसार नियोजन करतात आणि ते काटेकोरपणे पाळतातही. तुम्ही तुमच्या आजुबाजुला पाहिले असतील असे काही लोक, कदाचित तुम्ही स्वतःही असाल यापैकी. एकूण काय तर तुम्ही असे self disciplined असाल किंवा नसालही परंतु एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा आपली खरी स्पर्धा अशा self disciplined लोकांसोबत आहे, जे परीक्षेची तारीख पाहून नाही तर merit list मधील desired rank साठी लागणाऱ्या score कडे पाहून नियोजनबद्ध पध्दतीने अभ्यास करीत असतात. उठसूट मैदान सोडत नाहीत.. टिकून राहतात..

मुठभर जागांसाठी जाहिरात असते आणि लाखो लोक स्पर्धेत असतात.. यशस्वी होणारे लोक वेगळं काय करतात हा वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. मला वाटतं यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत तर ते त्याच त्याच गोष्टी खूप वेळा करतात, स्वतःच्या चुका शोधून शोधून त्या दुरूस्त करतात आणि पुन्हा हीच सुधारणेची सायकल रिपीट करत राहतात. केवळ सातत्य नाही तर सातत्यपूर्ण सुधारणा हा त्यांचा मार्ग असतो.

खूप शुभेच्छा

~निरंजन🌿
👍21784💯33😍2
123💯40👍24
Happy Civil Services Day to all the Civil Servants and the Civil Servants to be💐💐💐
164👍29
जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐

यानिमित्ताने एवढ्यात वाचलेल्या किंवा सध्या वाचत असलेल्या पुस्तकाबद्दल सांगा comments मध्ये, इतरांनाही कळतील चांगली पुस्तकं.. फोटो शेअर करता आला तर अधिक उत्तम..
38👍19
पुस्तकं, वाचनवेड आणि विचारविश्व

- डॉ. सचिन लांडगे

आज पुस्तक दिन आहे, पुस्तकांचे आभार मानण्याचा दिवस..

अवांतर वाचनाची सवय मला अगदी लहानपणापासून लागली. आज्जीला पेपरात येणारे महाभारत वाचून दाखवायचो तेंव्हा मी दुसरीत असेन. मग रामायण महाभारतातील गोष्टीची पुस्तकं वाचायला लागलो. मग गावातल्या लायब्ररीतून चांदोबा आणून वाचायचो.. चांदोबा कडून गाडी अकबर बिरबल, विक्रम वेताळ , तेनालीरामा अशी भटकत होती.. मग साने गुरुजी सापडले. गोप्या, स्वर्गीय ठेवा, श्यामची आई वाचले..

माझ्या आईला पुस्तकं वाचायची आवड होती.. आमच्या त्या छोट्याश्या खेड्यात दुपारची सामसूम झाल्यावर लोळत पडायच्या ऐवजी ती वर्तमानपत्राच्या पुरवण्या वाचत असे, आणि आम्हालाही (मला आणि बहिणीला) वाचायला देत असे. शाळेच्या लायब्ररीतून वडील पुस्तकं आणत आमच्यासाठी वाचायला. सुट्टीच्या दिवसात आम्ही तिघंही दोन तीन दिवसांतच फडशा पाडत असू एका पुस्तकाचा.. घरी टिव्ही नसल्याचं लहानपणी फार वाईट वाटत असे, पण आता मात्र 'नव्हता तेच खूप बरं झालं' असं वाटतं.. आठवीत मृत्युंजय वाचलं, मग स्वामी, छावा, पानिपत अशा सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या झाल्या.. दहावी अकरावी बारावी रोजचे पेपर सोडून विशेष काही वाचलं नाही..
आमच्याकडं कुणीतरी दिलेली ओशोंच्या प्रवचनाची कॅसेट्स होती, ती आवडली होती म्हणून बारावीच्या सुट्टीत आजोळच्या जैन लायब्ररीत जाऊन ओशोंबद्दल वाचले.. बरंचसं डोक्यावरून गेलं, पण मनात खळबळ उडवून गेलं..

वय आणि वाचन वाढेल तसं आपण वाचनाचे विषय आणि लेखक बदलले पाहिजेत हे मला जरा लवकरच कळलं.. आपलं बौद्धिक वय वाढवायचं असेल तर ऐतिहासिक कादंबऱ्यात किंवा त्याच-त्याच वाचन प्रकारात अडकून पडायचं नाही हे मनाशी ठरवलं.

एमबीबीएस चं पहिलं वर्ष संपल्यानंतर लायब्ररी लावली. लायब्ररीत पुलं देशपांडे, वपु काळे, विस खांडेकर यांना खूप डिमांड होती, त्यांची पुस्तकं फक्त वशिलेबाजांनाच मिळत.. म्हणून मग मी शंकर पाटील, गंगाधर गाडगीळ, आचार्य अत्रे, जवळ केले. त्यातच एके दिवशी मला 'जी ए कुलकर्णी' नावाचं रत्न सापडलं. त्यांचं 'सांजशकुन' वाचून झपाटून गेलो. मग मी आणि माझा मित्र सगळी लायब्ररीतली सगळी कपाटं पालथी घालून आपल्याला हवी ती पुस्तके शोधायचो, आणि तत्त्वज्ञानाच्या कपाटात लपवून ठेवायचो, दर दिवसाआड येऊन ते घेऊन जायचो, अन तिथं दुसरं पुस्तक लपवून ठेवायचो.. नंतर नंतर आमच्या लक्षात आलं, इतरही बरेच जण चांगली चांगली पुस्तकं शोधून तिथंच लपवून ठेवताहेत. मग तर आमचे स्वतः शोधण्याचे कष्टही कमी झाले.. जी ए कुलकर्णींचे तर एकूनएक पुस्तक वाचले, शिवाय त्यावर मित्राबरोबर चर्चाही केल्या..

तत्वज्ञानाचं कपाट शोधता शोधता तत्त्वज्ञानाची पुस्तकंही मोठ्या कष्टानं वाचली. नंतर नंतर थोडं समजायला लागलं.. मग 'भारतीय तत्त्वज्ञान: वैचारिक आणि सामाजिक संघर्ष' असली बोजड नावं असलेली काही पुस्तकं वाचली. सॉक्रेटिस वाचलं. शरद बेडेकर, अरुण सारथी, अशा अनवट लेखकांनी काही दिवस डोकं खाल्लं.. 'गीता' वाचून नास्तिक झालो. त्याला अजून पुष्टी मिळावी म्हणून मग पोथ्या-पुराणे देखील वाचली.

कथा, कादंबऱ्या यासोबतच कविताही वाचल्या.. सुरुवात 'झेंडूची फुले' याने झाली होती. मग ग्रेस , मंगेश पाडगावकर, सुरेश भट, रवींद्रनाथ टागोर, एमिली डिकिन्स, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे अशांच्या कविता, आणि शायरी, गझल्स आणि चारोळ्याही वाचल्या. ग्रेस आणि कुसुमाग्रजांच्या कवितांनी तर obsessच केलं..

एमबीबीएस चं दुसरं आणि तिसरं वर्ष जास्तीत जास्त पुस्तकं वाचली, मोफत असलेली नाटकं पहिली आणि नाष्ट्याचे पैसे वाचवून पिक्चर पाहिले.. मग परीक्षा तोंडावर आल्यावर रात्रंदिवस जागून अभ्यास केला..

इंटर्नशिप मध्ये वपु काळे आणि उरलेले ग्रेस वाचले..

पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वर्षांत एक पानही वाचायला वेळ मिळाला नाही.. त्यानंतर मात्र स्टीफन हॉकिंग्ज, तस्लिमा नसरीन, अँन फ्रॅंक, अच्युत गोडबोले यांची पुस्तकं वाचली.. अच्युत गोडबोलेंमुळे माझ्या वाचनाचा स्पेक्ट्रम आता 'सायन्स'कडं शिफ्ट झाला होता.. जॉबच्या सुरुवातीच्या काळात सायन्स आणि सायन्सफिक्शन वरची पुस्तकं वाचली.. चेतन भगत आणि पाउलो कोअलो पण वाचले.. प्रॅक्टिसच्या सुरुवातीला मानसशास्त्रात आवड वाढली.. म्हणून मग सायकियाट्री आणि सायकॉलॉजी यावरची सिगमंड फ्राऊड पासून अल्बर्ट एलिस पर्यंतची पुस्तकं वाचली.. डोटोव्हस्कीचं 'ब्रदर्स कारमाझव्ह्फ' वाचलं.. ब्रट्रॉंड रसेल च 'Conquest of happiness' आणि unpopular essays वाचलं.. रिचर्ड डॉकिन्स आणि युआल नोव्हा हरारी वाचायचेत अजून.. खूप पुस्तक waiting list वर आहेत..

खूप पुस्तकं आणि खूप लेखक मेन्शन करायचे राहिले.. काही फालतू पुस्तकंही वाचली, तर काही पुस्तकं अर्ध्यातच सोडली.. पण तरी अजून खूप पुस्तकं वाचायचियेत असं सारखं वाटत राहतं.. माझ्या पर्सनल लायब्ररीत वेगवेगळ्या विषयांवरची आता शेकडो पुस्तकं आहेत.. असो..
👍8928💯3
माझ्या एका मित्राने माझं वाचनवेड पाहून मला विचारलं होतं, "पुस्तकं वाचून तुला काय मिळतं बरं?"
तेंव्हा मी त्याला उत्तर दिलं होतं, "मला त्यातून विचार मिळतात"..
मग तो मला म्हणाला, "माणसाला विचारांपेक्षा भाकरीची जास्त गरज असते, भाकरीची सोय करणाऱ्या शिक्षणाची पुस्तकं वाचली तरी बस्स होतंय की! बाकी नसते विचार मिळवून मनातला गोंधळ कशाला वाढवून घ्यायचाय?"

मला तेंव्हा लक्षात आलं की , एखाद्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला असं वाटू शकतं म्हणजे आपल्या शिक्षणातच त्रुटी आहे.. एकतर आपल्याकडे वाचनाचा छंद अगदीच कमी लोकांना आहे, त्यात बऱ्याच जणांचं वाचन मृत्युंजय, छावा, पानिपत, यापुढे जातच नाही.. बऱ्याच जणांची पुलं, वपु यांची इयत्ता पार होतच नाही..
आणि अलीकडे तर वाचन म्हणजे चेतन भगत, पाउलो कोअलो नाहीतर गेलाबाजार शिव खेरा, अब्दुल कलाम वगैरे, असंच सूत्र बनलं आहे.. असो..

डोकं गहाण ठेऊन मेंढरू म्हणून जगण्यासाठी तुम्हाला वैचारिक बैठक असण्याची काही गरज नसते, आणि विशेष म्हणजे रोजच्या जगण्यात ते नसल्यानं तुमचं काही बिघडत देखील नाही.. अशी अशिक्षित/सुशिक्षित/उच्चशिक्षित निर्बुद्ध मेंढरं समाजात ढिगानं भरलीयेत.. मग कोणीही येतं आणि त्यांना आपल्या बाजूनं हाकतं.. कोणताही बाबा बुवा अथवा कोणताही दादा भैय्या किंवा कोणताही नेता त्यांना हाकू शकतो, हायजॅक करू शकतो..

आपल्याकडे कॉमर्स आणि सायन्स साईड घेणाऱ्याला (अभ्यासक्रमात नसल्याने) समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानव्यशास्त्र वगैरे शिकण्याचा दुसरा मार्ग नाही, त्यात अवांतर वाचनही नाही.. त्यामुळे बरेच जण व्हाट्सएप युनिव्हर्सिटी वरच पोसले जातात.. आजूबाजूच्या पोलराईज्ड बातम्यांतूनच आपलं मत बनवतात.. आपल्या सभोवतालच्या समाजालाच 'पूर्ण भारत' समजायची चूक करतात.. आपल्यावरूनच जग ओळखतात.. 'आपली मतं हीच सगळ्यांची मतं असणार आहेत' असा समज करून घेतात.. आपली संस्कृती / आपला इतिहास / आपलं ज्ञान हेच महान आहे, अशा भ्रमात असतात.. आणि असेच विचार असणाऱ्यांच्या अशा कंपूत तळ्यातल्या बेडकाप्रमाणे मश्गुल जगतात.. हे इथलं वास्तव आहे..

तुमची स्वतःची योग्य विचारांची बैठक नसेल, तर कोणीही तुमचं वैचारिक अपहरण करू शकतो.. आणि तुमचं विचारविश्व समृद्ध नसेल किंवा वैचारिक दृष्टिकोन ब्रॉड नसेल तर तुम्ही अयोग्य आयडिओलॉजीच्या आहारी पण जाऊ शकता..

कारण तलवारीपेक्षा विचार घातक असतात. विचारांच्या अंमलाने आजवर जितका रक्तपात झाला आहे, तितका तर पोटाच्या भुकेमुळेही झालेला नसेल!
आपण असं म्हणतो की, 'विचार हे माणसाला प्रगतीकडे नेतात!' पण हे अर्धसत्य आहे. विचारांच्या तुरुंगाइतका इतका दुसरा अभेद्य तुरुंग नाही. We are victim of our own mind! जर एखाद्या व्यक्तीला एका ठिकाणी साखळदंडाने बांधून ठेवले तर तो तिथून सुटण्याची हरएक धडपड करेल.. पण या कामासाठीच तुझी निवड झाली (किंवा प्रत्यक्ष प्रभू/अल्ला/येशू यांनीच केली) आहे, असा विचारांचा तुरुंग त्याच्या मनात निर्माण करता आला, तर त्याला तिथं बसविण्यासाठी साखळदंडाची गरज भासणार नाही, तो स्वतःच ते त्याचं भूषण समजेल, अन वर आणखी दहा जणांना तिथं बसण्यासाठी प्रेरित करेल! असो..

अशा सगळ्याच बऱ्या वाईट विचारांच्या आयडिओलॉजीची पण पुस्तके असतात.. तुम्हाला वर आणणारी जशी पुस्तकं असतात, तशी तुम्हाला खड्ड्यात घालणारीही पुस्तकं असतात! म्हणून योग्य पुस्तकांची निवड आपल्याला जमली पाहिजे.. त्यासाठी विषयवैविध्य आणि सातत्य हवं..
म्हणून , 'किती वाचतोय' यापेक्षा 'काय वाचतोय' हे खूप महत्त्वाचे आहे..

- डॉ. सचिन लांडगे
👍21045💯38🤩1
136💯47👍21😍2
आज आपल्या @Niranjan_blog ला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. जोडले गेलेल्या सर्वांचे खूप आभार. तुमच्या स्वप्नपुर्तीच्या प्रवासात जमेल तसं विविध विषयांवर बोलत राहूयात.. पुनश्च सर्वांचे आभार💐💐
383👍51💯34😍9
तृतीय वर्षपूर्ती निमित्ताने..
💯2814👍11
मातीची लेकरं आपण.. छोटी छोटी स्वप्नं आपली.. स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत रहायचं.. यातच मजा आहे.. स्वप्नपूर्तीसाठी कित्येकदा खूप वेळ लागतो.. अगदी नाकीनऊ येतात पण टिकून रहायचं असतं.. ज्याला रूजता येतं, ऊन, वारा, पावसात टिकून राहता येतं एवढंच नव्हे तर याच ऊन, वारा, पावसाचा उपयोग करून वाढता येतं त्याच बिजाचा वृक्ष होतो.. हीच मातीची शिकवण आहे🌿

@niranjan_blog☘️
389💯61👍42😍14
“Tell your heart that the fear of suffering is worse than the suffering itself. And that no heart has ever suffered when it goes in search of its dreams, because every second of the search is a second's encounter with God and with eternity.”

(The Alchemist)
204👍25💯16😍7
6 July🔥❤️

All the best💐💐💐
110👍25💯5😍3
Niranjan's Blog☘️
6 July🔥❤️ All the best💐💐💐
आज रात्री 10 वाजता बोलूयात थोडावेळ राज्यसेवा prelims 2024 बद्दल
👍11222😍10
2025/07/08 19:21:26
Back to Top
HTML Embed Code: