आजपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐
या आर्थिक वर्षात तुम्हाला हवा तो जॉब मिळून तुम्ही आर्थिक सक्षम व्हावेत हीच सदिच्छा❤️
यानिमित्ताने जे लोक नव्यानेच नोकरीत रूजू झाले आहेत किंवा लवकरच रूजू होणार आहेत त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर आज रात्री 9.30 वाजता 'आर्थिक साक्षरता' या विषयावर एक सेशन होईल. आपले स्वागत आहे. नोकरीतील दोन वर्षांच्या अनुभवातून personal financial management बद्दल जे काही थोडं फार शिकलोय ते सांगायचा प्रयत्न करेन. तुमचे काही प्रश्न असल्यास त्याबद्दलही बोलू.
-निरंजन कदम
सहायक राज्यकर आयुक्त

❤100👍21💯21😍3
Niranjan's Blog☘️
आजपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा💐💐💐 या आर्थिक वर्षात तुम्हाला हवा तो जॉब मिळून तुम्ही आर्थिक सक्षम व्हावेत हीच सदिच्छा❤️ यानिमित्ताने जे लोक नव्यानेच नोकरीत रूजू झाले आहेत किंवा लवकरच रूजू होणार आहेत त्यांच्यासाठी आपल्या चॅनलवर…
Session मध्ये आपण ज्यांना स्पर्श करणार आहोत त्यापैकी काही मुद्दे:
Term Insurance
Health Insurance
Salary account
Auto Sweep facility
Emergency Fund
S.I.P.(Mutual funds, ELSS)
Investment in shares/bonds
NPS
Govt facilities for home/car advances
Income tax planning
Books to read
YouTube channels
Important web platforms
Loans, EMI, Credit cards
Digital security
तुम्ही यामध्ये मुद्दे सुचवू शकता.
Term Insurance
Health Insurance
Salary account
Auto Sweep facility
Emergency Fund
S.I.P.(Mutual funds, ELSS)
Investment in shares/bonds
NPS
Govt facilities for home/car advances
Income tax planning
Books to read
YouTube channels
Important web platforms
Loans, EMI, Credit cards
Digital security
तुम्ही यामध्ये मुद्दे सुचवू शकता.
👍110😍26❤12
*अर्थयोग*
©भगवंत चेचे
*कित्येक दिवस विचार करत होतो की, आर्थिक नियोजन आणि तत्सम विषयावर जे गेल्या काही वर्षापासून परिचित व्यक्ती ,मित्रमंडळी ना आपण जे सांगतो त्याबद्दल समाजमाध्यममधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे .पण मुळात आळशी स्वभाव न टायपिंग चा कंटाळा त्यामुळे त्याची सुरुवात होत नव्हती . नवीन वर्षांत मात्र अर्थयोग या लेखमालेतून याची सुरुवात करतोय...*
*आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक विषयी काही गोष्टी स्वतः गुंतवणूक सुरू करताना माहिती झाल्या नंतरच्या कालावधीत जिज्ञासेपोटी काही पुस्तकं वाचली ,चर्चासत्रात भाग घेतला. या क्षेत्रातील तज्ञाना भेटलो. अनेक वेबसाईटस वरील आर्टिकल्स , यू ट्यूब वरील व्हिडिओस पाहिलें . अनेक जुन्या समजुतीस तडा गेला. नवनवीन सकल्पना समजून घेतल्या. जे जे वाचले पाहिले आणि अनुभवले त्या त्या गोष्टींचा प्रचार प्रसार कुटुंबातील लोक, मित्र, संपर्कातील व्यक्ती कार्यालयातील सहकार्यामध्ये "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सर्व जना " या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे करत होतोच परंतु फेसबुक, वॉट्सप सारख्या ताकदीच्या समाजमाध्यमातून मराठी भाषेतून या प्रकारचं लिखाण फार काही जास्त नजरेत येत नव्हते हे कुठेतरी खटकत होते.सबब हा खटाटोप.*
*आपण सर्व जीवन जगत असताना नेहमी आपले जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्नशील असतो त्यासाठी कुणी व्यवसाय करत कुणी नोकरी करत त्यातून होणाऱ्या अर्थार्जनातुन आपलं कुटुंब अवलंबून असते. भारतीय समाज बचतीबद्दल अत्यंत सजग आहे. परंतु बचत केलेल्या धनाच्या गुंतवणुकीबद्दल त्याच्या कल्पना पूर्वापार चालत आलेल्या आहेत. त्यात पिढ्यानपिढ्या काही बदल होत नाहीत. गुंतवणूक क्षेत्रात अनेकविध पर्याय असताना भारतीय समाजमन काही एल आय सी , स्थावर मालमत्ता, सोने, मुदत ठेवी (FD) यांच्या पलीकडे विचार करायला तयार नाही. विशेषत: आर्थिक साधनामधील (Financial instruments) गुंतवणूकिबद्दल फ़ार मोठ्या प्रमाणात उदासीनता आहे. अर्थात सेबी(Securities Exchange Board of India) च्या "म्युच्युअल फंड सही है " अभियानापासून म्युच्युअल फंडामधील मासीक गुंतवणूक जवळपास सात हजार कोटी प्रति माह झाली आहे ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे.आणि यातूनच एकविसाव्या शतकातील पिढ्या कोठे गुंतवणूक करतील याचा अंदाज यावा. तरीही गुंतवणूक करणाऱ्यांचे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 2 ते 3% आहे. पाश्चिमात्य देशात हेच प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत आहे. म्युच्युअल फंड आणि शेयर बाजारातील गुंतवणूकिबद्दलच्या सर्व बाबींचा आढावा या लेखमालेतील पुढील लेखामध्ये आपण घेणार आहोतच. पण गुंतवणूक करण्यापूर्वी काही अश्या बाबी ज्या गुंतवणूकिएव्हढ्याच महत्त्वाच्या आहेत. या लेखात अशा काही बाबी..*
*सर्वप्रथम गुंतवणूक सुरू करताना पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'विमा'. विम्याचे प्रकार कोणते?*
*विमा का घ्यावा₹? कोणी घ्यावा ?कसा घ्यावा ?कोणता घ्यावा? त्याचे फायदे तोटे काय?*
*आपल्या आजूबाजूला आपले अनेक मित्र ,परिचित आपल्याला एल आय सी (आयुर्विमा महामंडळ) च्या योजना विकताना आढळतात. एल आय सी ने नेमलेले अभिकर्ते (एजंट) हे त्यांच्या कमिशनसाठी काम करत असतात .हल्ली अश्या एजंट चे पीक प्रचंड फोफावले आहे जे की, घरातील प्रत्येक सदस्यांच्या नावे, मुलांच्या नावाने भावनिक करून विविध योजना विकतात , भारतीय माणूस मूल मुलांचे शिक्षण असल्या गोष्टींचा विचार केला की प्रचंड भावनिक होतो. आणखी हे एजंट आपल्या जवळचे असल्या कारणाने किंवा हे असा काही पिच्छा पुरवतात की आपल्यापैकी अनेक जण केवळ त्रास नको म्हणून अशा योजना खरेदी करताना दिसतात .हे सर्व विमा विक्रेते ज्या विमा योजना आपल्या ला गळ घालून विकतात त्या मध्ये
नेमका कुठल्या प्रकारचा विमा आपण खरेदी करतोय आणि कशासाठी याबाबत सारासार विचार केला जात नाही.सामान्यतः फक्त भरलेली रक्कम योजनेचा कालावधी आणि मिळणारी रक्कम याव्यतिरिक्त त्या योजनेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाआम्हांस नसते. अशा प्रकारच्या योजना मनी बॅक किंवा इंडोमेन्ट प्लन असतात यामध्ये गुंतवणूक आणि विम्याची सांगड घालून योजना तयार केलेली असते*
*विम्याचे प्रकार*
*साधारणपणे आयुर्विमा (जीवनविमा) आणी साधारण विमा असे दोन प्रकार आहेत अर्थात त्यामध्ये अनेक उपप्रकार आहे.*
*सदरच्या लेखात आयुर्विमा या वर*
*कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे जर आकस्मिक निधन झाले तर अश्या वेळी कुटुंबातील सदस्य भावनिक आणि आर्थिकदृष्टीने कोलमडून जातात. भावनिक हानी कधीही भरून न येणारी असते परंतु कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने होणारी आर्थिक हानी आपण मुदत विम्याचा वापर करून भरून काढू शकतो.*

👍77❤8
*कमावत्या व्यक्तीच्या जाण्याने त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्यांचा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत बंद होतो .म्हणून आपल्या अनुपस्थितीत आपल्या कुटुंबातील व्यक्तींची हेळसांड होऊ नये, किंबहुना आपण हयात असताना ज्या प्रकारच्या सोयी सुविधा, मुलांना शिक्षण मिळायला हवे ते आणि तसेच आपण हयात नसताना त्यांना मिळाले पाहिजे. म्हणून प्रत्येक कमावत्या आणि ज्याच्यावर कुटुंबातील इतर सदस्य आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत अशा व्यक्तीने मुदत विमा(Term insurance) घेणे ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे.*
*आपल्याकडे गुंतवणूक आणि विमा यातील मूलभूत फरक सुद्धा अनेकांना कळत नाही.त्यामुळे विम्याच्या नावाखाली अनेक चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक केली जाते.*
*विमा हा केवळ आणि केवळ कमावत्या व्यक्तीचाच हवा आणि तो ही फक्त मुदत विमा किंवा शुद्ध विमा च हवा . कुटुंबातील इतर सदस्य ज्यांच्यावर कुटुंबातील इतर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नाहीत अशा सदस्यांना विमा छत्र आवश्यक नाही.*
*आपल्याकडे सर्रास मुलं आणि घरातील इतर सदस्यांच्या नावाने विमा खरेदी केला जातो.*
* मुदत विमा हा व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या साधारणत10 ते 20 पट हवा म्हणजे साधारणपणे 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्याने कमीतकमी रुपये पन्नास लाख ते एक कोटी एवढा मुदत विमा घेतला पाहिजे. पन्नास लाखाच्या मुदत विम्यासाठी 30 ते 35 वयोगटातील व्यक्तींना सर्वसाधारणपणे आठ ते दहा हजार रुपये प्रतिवर्षी एवढया कमी किमतीत हा विमा आपण खरेदी करू शकतो. जीवनविमा कमी वयात खरेदी केला तर अत्यंत कमी प्रिमियम लागतो. शिवाय चाळिशीपूर्वी खरेदी केल्यास वैद्यकीय तपासणी शिवाय विमा दिला जातो.*
*सुदैवाने जर ह्या विम्याच्या मुदतीत जर त्या व्यक्तीला काहीही झाले नाही तर आपण भरलेल्या प्रिमियम पैकी कुठल्याही रकमेचा परतावा आपल्याला मिळत नाही.मुदतविमा खरेदी करण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण केवळ या गोष्टींमुळे मुदत वीमा घेण्याचे टाळतात.*
*परंतु असे करणे हे सर्वात मोठी चूक असेल कारण आपण गुंतवणूक आणि विमा यामध्ये गल्लत करून विम्यासाठी खर्च केलेल्या पैशातून परताव्याची अपेक्षा करतो.*
*ज्या विमा योजनेत परतावा मिळतो अशा योजना ह्या गुंतवणूक व विमा यांची सांगड असते.अश्या योजना तुलनेने महाग असतात आणि परताव्याचा दर पण साधारणपणे पाच ते सहा टक्के एवढाच असतो जो की वाढणाऱ्या महागाई दराच्या एवढा सुदधा नाही म्हणजे आपण गुंतवणूक केलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम अशा योजनेत मिळते. म्हणजे धड गुंतवणूकही साध्य होत नाही आणि पुरेसं विमाछत्र देखील मिळत नाही.म्हणून सुजाण गुंतवणूकदार विमा आणि गुंतवणूक या गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या ठेवतात.*
*मुदत विम्याचा कालावधी*
*वर उल्लेख केेल्या प्रमाणे विमा हा कमावत्या व्यक्तीला विमछत् असणे गरजेचे आहे.साधारणपणे भारतीय लोक साठीच्या आसपास निवृत्त होतात त्यामुळे हा कालावधी तुमच्या निवृत्तीच्या आसपास हवा.निवृत्तीनंतर कोणी आर्थिकदृष्ट्या अवलंबून नसल्याने*
*विम्याची आवश्यकता नाही
मुदत विमा खरेदी करण्यासाठी दोन पर्याय आहेत*
*पहिला ऑफलाइन म्हणजे विमा एजंट किंवा प्रत्यक्ष विमा कंपनीकडून विमा खरेदी करणे.LIC आणि इतर अन्य खाजगी कंपन्या या सर्व मुदत विमा योजना विकतात.परंतु LIC च्या अशा योजनांमध्ये कमिशन हे कमी असल्यामुळे ते मुदत विम्यासाठी आग्रही दिसत नाहीत.*
*दुसरा पर्याय ऑनलाईन,हा अतिशय सोपा सुलभ आणि स्वस्त पर्याय आहे. ज्या कंपनीचा विमा खरेदी करायचा आहे त्या कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन खरेदी करता येतो.पॉलिसीबझार सारख्या वेबसाईटच्या मदतीने हे काम अत्यंत सोपे झाले आहे.*
*विशेष म्हणजे अशी विमा योजना एजंट द्वारा घेतल्या जाणाऱ्या योजनेपेक्षा स्वस्त असतात.कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचे कमिशन एजंट ला दिले जात नाही.*
*नुकताच व्हॅलेंटाईन दिवस आपण सर्वांनी अत्यंत उत्साहात साजरा केला ज्यामध्ये आपल्या प्रियजनाप्रति असलेला स्नेह आपण वेगवेगळ्या रूपाने व्यक्त केला. पण कल्पना करा की जर आपणच नसू तेंव्हा याच आपल्या अत्यंत जिवाभावाच्या आपल्यावर अवलंबून असलेल्या प्रियजनांची काय अवस्था होईल. म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून आपण मुदत विमा घेयुयात आणि एक सर्वोत्तम भेट देऊया.*
*या नवीन वर्षात अर्थसाक्षर होण्याकडे पहिले पाऊल टाकूयात आणि पहिली गुंतवणूक म्हणून मुदत विमा खरेदी करूयात आणि आपल्या निकटवर्तीयांना ही जागरूक करूया.*
पुढील लेख -साधारण विमा (General insurance

👍149❤25💯14😍2
अर्थयोग
© भगवंत चेचे
अर्थयोग च्या पहिल्या भागामध्ये आपण मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स बद्दल जाणून घेतलं. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे .खरंतर पहिलाच प्रयत्न असल्याने आणि विषयाची रुक्षता पाहता प्रतिसाद कसा मिळेल याबद्दल थोडासा साशंक होतो परंतु मित्रमंडळी ,सहकारी , वरिष्ठ या सर्वांनी दिलेले अभिप्राय तसेच पुढील लेख लिहिण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन प्रेरणादायी आहे.
पर्सनल फायनान्स म्हणजे वैयक्तिक वित्तीय नियोजन .या मधला पहिला टप्पा म्हणजेच मुदत विमा याबद्दल आपण जाणून घेतलं या भागात आपण साधारण विमा प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत .आयुर्विमा वगळता इतर सर्व विमा प्रकार हे साधारण विमा प्रकारामध्ये येतात.
प्रस्तावनेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आधीच या सदरात वैयक्तिक मुदत विमा व त्याची आवश्यकता यावर सविस्तर चर्चा केली होती आणि या सदरात पूर्वी सांगितल्याप्रमाणे साधारण विमा व आर्थिक नियोजनातील त्याचे महत्त्व याविषयी ...
आयुर्विमा हा जीवनविमा आहे. तर बाकी सर्व प्रकारचे विमाछत्र साधारण विमा या प्रकारात मोडतात .आरोग्य विमा, पिक विमा ,मालमत्ता विमा हे साधारण विम्याचे उपप्रकार आहेत.
वैयक्तिक आर्थिक नियोजनातील दुसरी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे आरोग्यविमा किंवा वैद्यकीय विमा होय. मुदत विमा घेताना आपण पूर्वअट बघितली होती की मुदत विमा फक्त कमावत्या व्यक्तीचा आणि ज्याच्यावर कुटुंबातील इतर सदस्य आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतील अशाच व्यक्तीने मदत विमाछत्र घेणे आवश्यक असते.
या सदरामध्ये
आरोग्य विमा कोणी घ्यावा? कसा घ्यावा? कुठे घ्यावा ?किती घ्यावा ?
कुटुंबातील आजारी व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रतिपूर्तीसाठी अत्यंत आवश्यक असा घटक म्हणजे आरोग्यविमा होय .
कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणामध्ये वैद्यकीय उपचारासाठी होणारा खर्च आपल्या गुंतवणूकिमधून, संचिता मधून करावा लागू नये म्हणून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य विमा आवश्यक आहे ;अन्यथा एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चाची भरपाई आपल्याला बचत आणि गुंतवणुकीमधून करावी लागते असे करताना जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक केलेली असते त्या उद्दिष्टांशी तडजोड करण्यावाचून आपल्यासमोर काहीही पर्याय राहत नाही.
म्हणून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा वैद्यकीय विमा असणे ही दुसरी सर्वात महत्त्वाची गुंतवणूक होय.
आरोग्य विम्यांमध्ये रुग्णालयातील वास्तव्य, डॉक्टरांच्या भेटी, औषधे,वेगवेगळ्या चाचण्या साठी , सर्जिकल उपकरणे ,शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टरांची फी,अंग प्रत्यारोपण इत्यादी खर्चाचा समावेश होतो.
याशिवाय आवश्यकता असल्यास बाह्यरुग्ण विभागात होणारा खर्च ( OPD) प्रसूतीसाठी चा उपचार खर्च इत्यादी बाबी त्या त्या कुटुंबातील आवश्यकतेनुसार घेता येतात.
सर्व शासकीय साधारण विमा कंपन्या आणि खासगी साधारण विमा कंपन्या आरोग्य विमा छत्र किंवा वैद्यकीय विमा योजना सेवा पुरवतात.
आपल्याकडे आर्थिक नियोजनामध्ये मुदत विम्याच्या एवढाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक दुर्लक्षित घटक म्हणजे आरोग्यविमा होय. कारण म्हणजे स्वतःचे आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे गृहीत धरलेले सुदृढ आरोग्य.
एकूण लोकसंख्येच्या वैद्यकीय विमा घेणाऱ्या लोकांचे प्रमाण केवळ वीस टक्के आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारतर्फे दिला जाणारा आणि खाजगी कंपन्यातर्फे त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा छत्राचा समावेश आहे.याउलट पाश्चिमात्य देशात हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत आहे.
वैद्यकीय उपचारांमधील नवीन तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे एकत्र आयुर्माणामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी बदलत्या जीवनशैलीमुळे आहारामुळे आणि बैठ्या कार्यालयीन कामामुळे आपले शरीर विविध रोगांचे घर बनत चालले आहे.त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांचा पुरेशा आरोग्य विमा ही आधुनिक काळाची गरज आहे. कारण आरोग्यसेवांचा महागाई दर सर्वसाधारण महागाई दराच्या तुलनेत नेहमीच अधिक असतो आणि तसा तो येणाऱ्या कालावधीमध्ये असण्याची शक्यता आहे.
शिवाय अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे ही वैद्यकीय उपचार सामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहेत.
आरोग्य विमा दोन प्रकारे घेता येतो पहिला प्रकार ...
फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा
नावातच सांगितल्याप्रमाणे संपूर्ण कुटुंबासाठी आपण एकच आरोग्य विमा घेऊ शकतो आणि कुटुंबातील सर्व सदस्य त्याचा लाभ घेऊ शकतात .आरोग्य विम्यासाठी कुटुंबाच्या व्याख्येत पती-पत्नी आणि 18 वर्षाखालील दोन मुले यांचा समावेश होतो काही कंपन्या तीन मुलांसाठीही विमा देतात. याव्यतिरिक्त 18 वर्षावरील मुले आणि कुटुंबातील इतर सदस्य यांचा आरोग्यविमा वेगळा आणि वैयक्तिक काढणे सोयीस्कर ठरते.

👍55
फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्यामध्ये ज्या रकमेचा विमा घेतलेला असतो त्यासाठी वर्षातून केवळ एक वेळा विमा खरेदी करून कुटुंबासाठी आवश्यक तेवढे विमाकवच खरेदी करता येते.
अत्याधुनिक उपचारपद्धती बदलती जीवनशैली आणि वाढत्या महागाई दर हे घटक लक्षात घेता वैद्यकीय विमा पुरेसा असणे गरजेचे आहे .आरोग्य विमा कमी वयात घेतल्यास भरावा लागणारा प्रीमियम पण कमी लागतो .
पती पत्नी आणि दोन मुले अशा व्यक्तींच्या कुटुंबाकरिता वैद्यकीय गरजेनुसार आणि आर्थिक कुवतीनुसार पाच लाख रुपये दहा लाख एवढा असणे आवश्यक आहे.
पाच लाखाचा विमा कवच संपूर्ण कुटुंब करता घेण्याचे झाल्यास रुपये दहा ते बारा हजार प्रति वर्ष एवढी येऊ शकते .विमा खरेदी करण्यापूर्वी झालेले आजार (प्री एक्सझिस्टिंग डिसीजेस )म्हणजे विमा घेताना असलेल्या आजारांसाठी विमाकवच लगेच मिळत नसले तरी विमा घेताना नमूद केल्यास सदर आजारांच्या उपचारावरील खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी विमा कंपनीच्या योजनेचा काही कालावधी हा प्रतिक्षा कालावधी ( वेटिंग पिरियड)म्हणून गणला जातो. अशा आजारांसाठी वैद्यकीय उपचार खर्च या प्रतिक्षा कालावधीत मिळत नाही परंतु हे सर्व आजार या योजनांमध्ये प्रतिक्षा कालावधीनंतर समाविष्ट केले जातात. असा प्रतिक्षा कालावधी आजार , कंपनी परत्वे वेगवेगळा असतो. साधारणपणे हा कालावधी दोन ते तीन वर्षे एवढा असू शकतो. विमा खरेदी करताना अशा आजारांची यादी आणि प्रतिक्षा कालावधी जेवढा कमी तेवढे ठीक.
समजा एखाद्या वर्षात कुटुंबातील एका व्यक्तीसाठी आरोग्य विम्याची संपूर्ण रक्कम वापरली गेली तर त्याच व्यक्तीसाठी दुसऱ्या कुठल्याही आजारासाठी आणि बाकी सदस्यांना तेवढेच विमाछत्र
उपलब्ध होते.
दुसरा प्रकार
वैयक्तिक आरोग्य विमा
अठरा वर्षावरील मुले आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये विमाकवच फक्त ठराविक व्यक्ती साठी वापरले जाते. अर्थात ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य पाहता आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी ची आवश्यकता अधिक असल्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आकारले जाणारा प्रीमियम हा तुलनेने अधिक असतो.
आरोग्य विमा
घेण्यासाठी आपल्याकडे सांगितल्या जाणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे ज्या कार्यालयात नोकरी करतो अशा कार्यालयातर्फे दिले जाणारे आरोग्य विमा कवच.
परंतु हल्ली खासगी क्षेत्रातील वारंवार नोकरी बदलण्याची मानसिकता पाहता आणि सरकारी क्षेत्रातील प्रतिपूर्ती साठीच्या अटी व शर्ती पाहता नि वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती साठी लागणारा वेळ पाहता आपला स्वतःचा वैद्यकीय विमा असणे अपरिहार्य आहे .
असे म्हणतात.
You should buy health insurance when you least need it.
विमा कंपनी वैद्यकीय खर्चाची भरपाई दोन प्रकारे करतात .
पहिल्या प्रकारांमध्ये ज्या रुग्णालयाशी विमा कंपन्यांचा करार झालेला असतो अशा रुग्णालयात उपचार घेतल्यास (नेटवर्क हॉस्पिटल) उपचारासाठी झालेल्या खर्चाची पूर्तता विमा कंपनी थेट रुग्णालयाला करते. यालाच कॅशलेस सुविधा असे म्हणतात .
आणि ज्या रुग्णालयासोबत या विमा कंपन्यांच्या करार झालेला नसतो अशा वेळी त्यांना नो नेटवर्क हॉस्पिटल असे म्हणतात. वैद्यकीय उपचाराकरिता होणारा खर्च आपल्याला करावा लागतो आणि या खर्चाची भरपाई विमा कंपनी आपल्याला करते.
त्यामुळे आरोग्य विमा खरेदी करताना विमा कंपनीचा विमा आरोग्यविमा खरेदी करत आहोत त्या कंपनीचा करार आपल्या नजीकच्या , सोयीच्या , चांगल्या रुग्णालयासोबत झालेले आहेत ही बाब लक्षात घेतली पाहिजे .अर्थात विमा कंपन्या मोठ्या शहरातील जवळपास सर्व मोठ्या रुग्णालयाशी करारबद्ध असतातच.
वैद्यकीय विमा खरेदी दोन प्रकारे करता येतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन .
ऑनलाइन प्रकारांमध्ये खरेदी करताना अशा कराराबद्दल रुग्णालयाची यादी आपल्याला पाहता येते .ऑफलाईन खरेदी करताना जेव्हा आपण ज्यांच्याकडून अशा प्रकारचा विमा खरेदी करतो तेव्हा याबाबतची सर्व प्रकारची चौकशी केल्यानंतर आणि सर्व प्रकारच्या दस्तावेज वाचल्यानंतर खात्री झाल्यावरच विमा खरेदी करावा. विमा खरेदी करताना
नामांकीत कंपनीचा जास्तीतजास्त रुग्णालयाशी करारबद्ध असलेला, आहे याची काळजी घ्यावी.
विमा कंपनीच्या दावा पुर्ततेच्या आकडेवारी(क्लेम सेटलमेंट रेशो) तपासून जास्तीत जास्त दावा पूर्तता असणाऱ्या कंपनीचा वीमा खरेदी करावा.
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी त्या त्या ठरावीक कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन आपण विमा खरेदी करू शकतो किंवा पोलिसीबजार , ई टी मनी यासारख्या कंपन्याच्या वेबसाईटच्या मदतीने कुठलेही अनेक योजनांचा तुलनात्मक आढावा घेऊन अतिरिक्त कमिशन न देता आपल्याला विमा खरेदी करता येते. वैद्यकीय उपचाराकरिता खर्चाकरिता वैद्यकीय विमा न वापरल्यास किंवा तशी आवश्यकता न भासल्यास, प्रोत्साहन म्हणून विमा कंपन्या प्रतिवर्ष दहा टक्क्यापर्यंते बोनस देतात म्हणजे पाच लाख रुपये विमा कवच पुढील वर्षी तेवढ्याच किमतीत वाढून पाच लाख पन्नास हजार रुपये होईल. असा प्रोत्साहन बोनस पन्नास टक्क्यांपर्यंत मिळतो.

👍29❤18
शिवाय आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रिमियम ची वजावट आयकर कायद्याच्या कलम 80 (ड) नुसार घेता येते.
नुकताच आपण जागतिक महिला दिन साजरा केला .महिला सबलीकरणाविषयी बरेच बोलले लिहिले आणि वाचले गेले. आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक आणि इतर आर्थिक बाबींमध्ये महिलांना पुरुषांच्या तुलनेत अजून खूप मोठा पल्ला पार करायचा आहे. गुंतवणूक इत्यादी गोष्टी गृहिणीच काय उच्चपदस्थ अधिकारी महिला देखील भाऊ, मित्र ,पती यांच्यावर अवलंबून असतात. विमा म्युच्युअल फंड शेअर बाजार या अतिशय जटिल संकल्पना आहेत असे सर्वसाधारण महिलांचे मत आहे. ते आपले काम नाही असे बहुतांश महिलांना वाटते. बचतीबद्दल अत्यंत सजग असलेल्या महिला गुंतवणुकी बाबतीत मात्र उदासीन दिसतात .
महिला सबलीकरणतील अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. त्यासाठी सुरुवात म्हणून कुटुंबातील सर्वांसाठी आरोग्य विमा घेण्यास पुढाकार घेऊन कुटुंबांतील आकस्मिकपणे येणाऱ्या आजारपणामुळे वैद्यकीय उपचार खर्चापासून वाचवू शकते .ही सोय आरोग्य विम्याचा स्वरूपात उपलब्ध आहे असा विमा खरेदी केल्यास आपले संचित आणि बचत ज्या उद्दिष्टांसाठी आपण केलेले आहे त्यासाठी तिचा वापर होईल.

💯39👍28❤6
*अर्थयोग - How to plan your funds?*
*तारीख -दिनांक ६ एप्रिल
*वेळ - रात्री ९.३० वाजता
*वक्ते - श्री. भगवंत चेचे
(राज्यकर अधिकारी तसेच Financial Planning चे अभ्यासक)
*सर २००९ batch चे राज्यकर निरीक्षक असून, सध्या वस्तू व सेवाकर कार्यालय पुणे येथे राज्यकर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा financial planning चा सखोल अभ्यास असून, यशदा पुणे येथे financial literacy and personal finance या विषयावर सरांचे lectures झाले आहेत.

👍85❤18