👆Niranjan's Blog च्या सुरुवातीच्या काळात विविध गोष्टींबाबत record केलेल्या audios मुद्दाम शेअर करतोय, नव्याने join झालेल्या लोकांनी नक्की ऐकावेत.
माणसाचं मन म्हणजे एक अजबच गोष्ट आहे.. एखाद्या संकटात असताना बरोब्बर सज्ज करतं माणसाला त्या संकटाशी दोन हात करण्यासाठी पण तेच मन सगळं सुरळीत चाललेलं असताना मात्र नको नको ते थेरं करू लागतं, काल्पनिक भितीच काहूर उभं करतं.. म्हणून तर मनाला फार मनावर घेऊन चालत नाही..
👍9❤2
12th Fail..
एखादा सिनेमा आवर्जून पहावासा वाटणं आणि पाहिल्यावर त्याबद्दल लिहावसं वाटणं फार कमी वेळा होतं. 12th fail हा सिनेमा तसा एक अपवाद. हा सिनेमा असा काही खूप भारी आहे अशातला भाग नाही.. पण ती गोष्ट आहे एका स्वप्नं पाहणाऱ्या आणि ते स्वप्नं पुर्ण करणाऱ्या तरूणाची.. कदाचित डोळ्यात स्वप्नं घेऊन चालणाऱ्या तरूणाईबद्दलच्या आपसूक आकर्षणामुळे हा चित्रपट पहायला हवं असं वाटलं असेल. यातल्या गोष्टी आपल्याला रीलेट होत जातात आणि जे रीलेट होतं ते माणसाला खूप भावतं.. स्वप्नं आणि वास्तव वेगळं असतं ही वास्तववादी भूमिका थोडा वेळ तरी बाजूला ठेवावी लागते जेव्हा कुणीतरी राब राब राबून वास्तवावर मात करून स्वप्नं साकार करतं. आपल्या आजुबाजुलाही अशी काही माणसं असतात. त्यांच्या संघर्षाला दरवेळी सलाम करावासा वाटतो. स्पर्धा परीक्षा: एक मृगजळ वगैरे चर्चा सुरूच राहतील पण याच स्पर्धा परीक्षेने कितीतरी अस्तित्वाच्या शोधात भटकत असणाऱ्या तरुण-तरूणींना काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यापैकीच एक म्हणून त्याबद्दल नेहमीच मनात कृतज्ञता राहते.. 12th fail तशीच एक गोष्ट आहे कदाचित म्हणूनच हा चित्रपट आवडला!
~निरंजन🌿
👍12❤1
बऱ्याच गोष्टी तेवढ्याच किचकट असतात जेवढं आपण त्यांना मनावर घेतो.. मनावर घेणं सोडल्याने गोष्टी सुरळीत होतात असं नाही परंतू मनावरचं ओझं आणि आपली त्यातली गुंतागुंत नक्कीच कमी होऊ लागते.
#जगणं
#जगणं
👍7❤6
Dear 2023 Mains Aspirants,
2023 Mains म्हणजे अजून बाकी असलेल्या सर्वच मुख्य परीक्षांना सामोरे जाणाऱ्या मित्रमैत्रिणींनो,
मनातली जी काही चलबिचल असेल ती जरा बाजूला सारून व्यवस्थित नियोजन करा. तयारीसाठी पुरेसा वेळ तुम्हाला उपलब्ध आहे. बरं नियोजन तुम्ही करालच. मला बोलायचं आहे ते तुमच्या मनातल्या चलबिचलीबाबत.. तर पहिलं म्हणजे 2022 च्या हुकलेल्या संधीचं ओझं आता सोडून द्या. दुसरं म्हणजे 2024 च्या बाबतीतलं मनोमन रचलेलं खूप भारी जाहिरात वगैरेचं चित्रही जरा बाजूला ठेवा. 2024 च्या परीक्षा या तुमच्यासाठी post dated cheque आहे हे लक्षात ठेवा. सध्या महत्त्वाचं आहे ते आपल्या हाती आहे ते. बाकी आपण म्हणतोच ना, हातचं सोडून पळत्याच्या नादाला लागायचं नाही.. तसंच काहीसं आहे हे.
खरं म्हणजे 2023 हा 'संधी काळ' आहे. यातला मतितार्थ समजून घेतलात आणि जिद्दीने कामाला लागलात तर यश तुमचंच आहे. फक्त जागांची संख्या किंवा तथाकथित भारी पदांच्या जागा असल्या म्हणजे जाहिरात चांगली नाही तर ती वाईट हे फार चुकीचं चित्रण आहे. आपल्याला पद मिळवायचं आहे आणि तेवढं मिळालं तर तीच जाहिरात आपल्यासाठी सर्वात चांगली असते.
एकूण काय तर मागचं ओझं सोडून द्या, उद्याच्या भरवशावर बसू नका. हाती असलेल्या संधीचं सोनं करा. खूप छान तयारी करण्यासाठी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

👍1