Telegram Web Link
राजपत्रित नागरी सेवा (राज्यसेवा) आणि संयुक्त गट ब/क परीक्षा 2024 या परीक्षांसाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? यासंदर्भात आज सायंकाळी 7 वाजता बोलूयात.
👍31
Live stream started
Live stream finished (1 hour)
👍4💯4
उद्यापासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुलाखतींसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐
2
James Clear
6👍2
संधी मिळणं न मिळणं कदाचित नशीब असेल पण संधी मिळूनही आपण त्या संधींचा योग्य वापर न करणं हा नाकर्तेपणा असतो.

#कटूसत्य
👍33💯64
आपल्याला आवडो न आवडो, पटो न पटो पण वास्तव हेच आहे की, आपले आयुष्य अनिवार्यपणे आपल्या कमावतेपणाशी जोडलेलं आहे. या गोष्टीची स्पष्ट जाणीव असायला हवी. बाकी या जगात खूप चांगल्या गोष्टी आहेत. खूप चांगली माणसं आहेत. नाती आहेत. मैत्री आहे, प्रेम आहे, अजून आयुष्य खूप सुंदर आहे.... ब्ला.. ब्ला.. ब्ला... असं बरंच काही आहेच आहे. पण, हे सगळं फार काळ तुमची साथ देऊ शकत नाही जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसाल. स्वावलंबी व्हायला पाहिजे. खूप गरजेचं आहे. ज्यांना कुणावर अवलंबून राहण्याची चॉईसच उपलब्ध नाही ते स्वावलंबी होतातच परंतू स्वावलंबी होण्याची सर्वात जास्त गरज कुणाला असेल तर ती कुणावर तरी अवलंबून राहून जगू शकणाऱ्या व्यक्तीला असते. कारण हे जग त्या व्यक्तीला त्या गरजेची कधी जाणीवच होऊ देत नाही आणि दुर्दैवाने कधीतरी जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असू शकते. खरंतर जग खरंच सुंदर आहे, यात काहीच शंका नाही. जगात खूप काही छान आहे, सुंदर आहे. नाती, मैत्री, प्रेम सारं काही भरभरून आहे. तुम्ही ते कधीतरी अनुभवलं असेल, अनुभवत असाल, पुढेही अनुभवाल. अडचण एकच आहे की जेव्हा तुम्ही बराच काळ कमावते नसता तेव्हा कधीतरी याच जगाचं एक विद्रूप चित्र तुम्हाला पहायला मिळतं. तुम्हाला ते चित्र प्रचंड त्रास देतं, तोडून टाकतं अगदी आतून. ते चित्र कधीतरी पाहिलेल्या माणसाला मग नव्याने सर्व गोष्टी पाहणं खूप अवघड जातं. त्यामुळे हाताशी वेळ आहे तोवर जीवतोड मेहनत करून कमावतं व्हायला हवं. जगाच्या भाषेतलं यश मिळवायला हवं. एकदा यश मिळाल्यावर मग स्वतःच्या भाषेतलं, स्वतःच्या व्याख्येतलं आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करता येतील. यश मिळेपर्यंत आपलं यश हीच आपली अनिवार्य प्रायोरीटी असायला पाहिजे. बाकी तसं जग सुंदर आहेच...

~निरंजन🌿
@niranjan_blog
👍4221
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं Deep Fake!

अभ्यासाच्या बाबतीत आपण Deep Fake सारख्या तंत्राचा वापर तर करत नाही या याबद्दल स्वतःला विचारायला हवं कधीतरी.. Deep Fake म्हणजे अशी बनावट चित्र, व्हिडीओ जी हुबेहूब खरीच वाटतात.. खरं-खोटं ओळखणं अवघड जातं.. पण मग हे अभ्यासाच्या बाबतीत कसं? जसं की आपण अभ्यास करतोय असं आपल्याला वाटतंय तर खरं पण खरं पाहता आपण अभ्यास करत नसतो अशी अवस्था.. म्हणायला तर आपण तासंतास अभ्यासिकेत असतो परंतू टेबलावरचा मोबाईल हातातल्या पुस्तकापेक्षा जास्त सक्रिय असतो.. कधी कधी तर अभ्यासिका ही अभ्यासिका न राहता कॉलेज होऊन गेलेली असते.. आपण अभ्यासाच्या नावाखाली सेकंड कॉलेज लाईफ जगू लागलोय की काय अशी शंका यावी अशी अवस्था असते.. आता या कॉलेज लाईफ शब्दात काय काय अनुस्यूत आहे हे ज्याचं त्याला व्यवस्थित कळतं. तर एकूण काय की आपण फसवत असतो अभ्यासाच्या नावाखाली.. इतरांना नाही.. स्वतःलाच.. पण कळत नाही.. कळलं तरी वळत नाही.. कुणी सांगणारं नसतं आजुबाजुला.. असलं तर आपल्याला त्याचं ऐकायचं नसतं.. अशी सगळी अवस्था असते.. हे असतं स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं Deep Fake.. कित्येक जण त्याला बळी पडतात.. आपण तर त्यात नाहीत ना याबद्दल स्वतःला विचारायला हवं.. दुसरे सांगू शकत नाहीत.. स्वतःलाच करायला हवं हे.. आपलं स्वतःचं आयुष्य आहे, निर्णय स्वतःचे आहेत तर जबाबदारीही स्वतःचं स्वीकारायला हवी.. सुत्र साधं सोपं आहे.. अभ्यास करण्याच्या काळात व्यावसायिक दृष्टीकोण(professionalism) ठेवून जगायला हवं.. म्हणजे आपल्या कामाशी काम.. आणि अभ्यास एके अभ्यास.. स्वतःला सांगून ठेवायचं आपलं काहीतरी स्टेटस तयार होईपर्यंत ना व्हाट्सएपला स्टेटस टाकणार ना स्वतःची स्टोरी सक्सेस स्टोरी बनेपर्यंत फेसबुक-इन्स्टाग्रामला कुठली स्टोरी टाकणार ना स्वतःला 'पोस्ट' मिळेपर्यंत कुणाच्या पोस्टला लाईक आणि शेअर करण्याचा मोह करणार.. मोह खूप सारे असतात.. पण पुढे ते जातात जे मोहाला बळी पडत नाहीत तर त्यावर मात करतात.. Real आयुष्य घडवायला निघालेल्यांना virtual जगात अडकून चालत नाही. जगातलं Deep Fake इतरांना फसवत असेल पण स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं Deep Fake आपल्याला स्वतःलाच फसवतं त्यामुळे सजग रहायला हवं. त्यासाठी खूप शुभेच्छा!

~निरंजन🌿
@niranjan_blog
💯59👍2924
110💯32👍25
Victor Frankl says, "When a person can't find a deep sense of meaning, they distract themselves with pleasure" But he faces the real problem when he feels even the pleasures are also meaningless...
195👍44💯16
काल एक खूप छान शेर ऐकायला मिळाला..

"कभी कभी हमने जी को बहलाया है..

जो हम ना समझ सके वो औरो को समझाया है
"

कधी कधी @niranjan_blog वरील जुन्या पोस्ट वाचल्यावर मलाही असंच वाटतं.. माणसांचं असंच असतं.. तो बोलेल तेच करेल किंवा करेल तेच बोलेल याची शक्यता फार कमी असते.. कदाचित त्यामुळेच निदा फाजली म्हटले असतील,

"हर आदमी में होते हैं, दस बीस आदमी, जिसको भी देखना हो कई बार देखना"
💯25397👍61😍17
आपल्या क्षमतेपलीकडच्या अडचणी आपल्याला येत नसतात हे ज्याने कुणी म्हटलं असेल त्याने माणसांच्या सहन करण्याच्या क्षमता खूप वाढवून ठेवल्यात हे नक्की...
👍149💯8244
जसं आहे ते हे असं आहे आणि हे असंच आहे.. आपलं आहे.. आपल्यालाच निस्तरायचं आहे.. आपलं आयुष्य... जसं आहे तसं... जगायचं म्हणा.. एन्जॉय करायचं म्हणा किंवा निस्तरायचं म्हणा.. काय फरक पडतो.. यातलं काहीही म्हटलं तरीही चालेल पण थांबून चालत नाही.. पुढे जात रहायचं.. पुढे जात राहणं हेच आपलं आयुष्य... पुढे जात राहणं हेच आपलं जगणं...

#जगण
169👍36💯34😍1
पुण्यातल्या गल्ल्या लिहितं करतात दरवेळी.. मागच्या दोन दिवसांत चालता फिरता बरेच जण भेटले.. अगदी दोन-तीन मिनिटांचा संवाद तोही अचानक भेटल्यावर झालेला पण तोही पुरेसा ठरतो कधीतरी.. कुणी त्यांच्या पहिल्यावहिल्या मुलाखती विषयी सांगत होतं, कुणी नव्यानेच भेटलेल्या नोकरीविषयी, कुणी move on होऊन नव्याने सुरू केलेल्या व्यवसायातून स्वकमाईने घेतलेल्या दुचाकीविषयी, कुणी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाविषयी, कुणी मनातल्या द्विधेविषयी, कुणी घुसमटीविषयी तर कुणी अडचणींच्या भल्यामोठ्या डोंगराविषयी... तसंच एका अभ्यासिकेत जाणं झालं.. भलीमोठी, प्रशस्त अभ्यासिका अन् पुस्तकांमध्ये माना खुपसून आयुष्य घडविण्यासाठी झगडणारे खूप सारे मित्रमैत्रिणी... ते सगळं चित्र पाहून मनात पहिला विचार आला होता तो एकच... सुटलो आपण कसेबसे या सगळ्यातून.. ते यशाच्या कथा, ते हारतुरे नि सत्कार अन् ते नावापुढे लावलेल्या मोठमोठ्या पदांची नावं वगैरे हे सगळं राहू देत बाबा बाजूला आपण या सगळ्यातून काहीतरी घेऊन सुखरूप सुटलो हेच खूप आहे.. तुम्हीही काहीतरी चांगलं घेऊन लवकरच या सगळ्यांतून सुटावं याच सदिच्छा

~निरंजन🌿
575💯84👍76😍24
17 Dec मुख्य परीक्षेबद्दल रात्री 10 वाजता बोलू आज.
👍1
Live stream started
Live stream finished (1 hour)
2025/07/09 19:12:29
Back to Top
HTML Embed Code: