Telegram Web Link
उद्याच्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा💐💐💐
👍51
काही गोष्टी करायला घेईपर्यंत खूप अवघड वाटतात. आपल्याला जमणारच नाही असं वाटतं. सोडून द्यावसं वाटतं. अशावेळी अनुभवी लोकांना बोलून सल्ला घेतला की जरा मदत होते. मनातला गुंता जरा सैल होऊ लागतो. गोष्टी आधी मनात जुळून याव्या लागतात, मनात जमायला लागतात मगच त्या प्रत्यक्षात जमतात. भिती, टेन्शन हे बऱ्यापैकी मानसिक असतं ते एकदा बाजूला करता आलं की सुरुवातीला अवघड आणि किचकट वाटणाऱ्या गोष्टीही आपल्याला जमू लागतात. आपण एकदा सुरुवात केली अवघड गोष्टी आधी जेवढ्या अवघड वाटत होत्या तेवढ्या त्या अवघड नाहीत हे कळू लागतं. जमू लागतं आपल्याला. हळूहळू हे सवयीचं होतं. हीच खरी प्रक्रिया असते यशाची. मनात जिंकता आलं की प्रत्यक्षातही जिंकता येतं.

@niranjan_blog☘️
279👍69💯66😍1
👍409💯9
मनाला आतून पोखरणाऱ्या भुंग्यापासून सुटका करून घेण्यासाठी आपण वरवरची मलमपट्टी करीत असतो.. जे आत पोखरतंय त्याला काहीच करता येत नाही पण आपण काहीतरी करतो आहे असं वाटावं म्हणून.. मनाचं समाधान म्हणून काही ना काही करीत राहतो.. माणसाचं हे असं बरंच काही सुरू असतं.. काही करावं तर फारसा उपयोग नाही पण न करावं तर मनाला चैन नाही अशी काहीशी अवस्था असते..
223💯59👍51
आयुष्याची कहाणी मोठी विलक्षण असते. सुखदुःखाबद्दल सांगताना संत तुकोबाराय म्हणतात,
"सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे।"

गदिमा म्हणतात, "एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे ।
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ।।"

तुकड्या तुकड्यांमध्ये आपण सुखी किंवा दुःखी असतो पण आयुष्य हे अशा अनेक तुकड्यांना एकत्र बांधून ठेवतं.. आपण कधीतरी सुखी असतो तर कधीतरी दुःखी असतो पण एकंदरीत आयुष्यात आपण ना आपण सुखी असतो ना दुःखी असतो. आपण फक्त जगत असतो. कुठल्याही विशेषणांविना, कुठल्याही ओझ्याविना, कुठल्याही बंधनाविना, कुठल्याही अपेक्षेविना.. आपण फक्त जगत असतो..

#जगण
💯21294👍54
"आता संपलंय सगळं" असं म्हटलेले कितीतरी 'काल' मागे टाकत आपण 'आज'चा दिवस जगत असतो..
💯21974👍29
वाचनीय पुस्तक
👍52💯65
Content and Intent both are equally important!
💯9325👍9


संकल्प ते सिद्धी

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालांमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐
👍12451
महाराष्ट्र अभ्यास दौरा.. एक सुंदर अनुभव..

https://www.niranjanblog.in/2023/12/blog-post.html?m=1
57👍13
68👍14💯11
PC: Nikhil Patil Sir(DDI)
67👍26💯3
मुक्ततेच्या नादात आपण नवनवीन जाळ्यांमध्ये अडकत जातो... काही जाळे आपल्याला जणू काही वारशातच भेटलेले असतात पण त्यापेक्षाही जास्त त्रासदायक जाळे असतात ते आपण स्वतःच निर्माण करत असतो.. कधी कधी कळत नाही ते ही एक वेळ ठीक असतं पण काही मात्र आपण सगळं कळत असूनही तयार केलेले जाळे असतात... आपण स्वतःच अडकत जातो... आधी आपण त्या जाळ्यांना सोडत नाही मग नंतर नंतर ते जाळे आपल्याला सोडत नाहीत...

#जगण
👍21592💯48😍16
एका मेंटॉरचं खूप आवडलेलं वाक्य..

"सो कॉल्ड सुंदर माणसं यशस्वी होतातच असं नाही परंतु यशस्वी माणसं नक्कीच सुंदर दिसू लागतात..."

यातला शाब्दिक अर्थ तर सुंदर आहेच परंतू मतितार्थ सुद्धा खूप सखोल आणि रीलेव्हंट आहे..
👍339214💯93😍18
Live stream started
Live stream finished (32 minutes)
अपना गम लेके कहीं और न जाया जाए
घर में बिखरी हुई चीज़ों को सजाया जाए

जिन चिरागों को हवाओं का कोई खौफ़ नहीं
उन चिरागों को हवाओं से बचाया जाए

बाग़ में जाने के आदाब हुआ करते हैं
किसी तितली को न फूलों से उड़ाया जाए

ख़ुदकुशी करने की हिम्मत नहीं होती सब में
और कुछ दिन अभी औरों को सताया जाए

घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूँ कर लें
किसी रोते हुए बच्चे को हँसाया जाए |

~निदा फाजली साहब
👍13396
2023 ला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आज रात्री 10 ते 12 या वेळेत आपण विविध विशेष session आयोजित केले आहे. यामध्ये आपल्यातल्या कवींना सादरीकरणाची संधी मिळेल. तसेच आपले इतर काही अधिकारी मित्रही आपल्याला 2024 राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी तसेच बोलण्यासाठी उपस्थित राहतील. तर भेटूया आज रात्री 10 वाजता.
👍612
2025/07/09 16:37:47
Back to Top
HTML Embed Code: