Telegram Web Link
Live stream started
Live stream finished (39 minutes)
Niranjan's Blog☘️
काही General प्रश्न असल्यास विचारू शकता. आज रात्री 9 वाजता बोलूयात थोडावेळ.
उर्वरित प्रश्नांबद्दल आपण उद्या सकाळी 8.15 वाजता बोलूयात.
Live stream started
Live stream finished (37 minutes)
🌿 काही आवडलेल्या पुस्तकांची यादी


द अल्केमिस्ट-पाऊलो कोईल्लो

भालचंद्र नेमाडे- कोसला, बिढार, हूल, जरीला, झूल, हिंदू

वि.स.खांडेकर यांच्या
विविध कादंबऱ्या विशेषतः ययाती आणि अमृतवेल

रवि आमले यांची पुस्तके

जी.ए.कुलकर्णी यांचे विविध कथासंग्रह

अनिल अवचट- प्रश्न आणि प्रश्न, आणखी काही प्रश्न

भुरा-प्रा.शरद बावीस्कर

रस-अनौरस- राजन खान

Unposted letters- Mahatria Ra

अरूण साधू- सिंहासन, मुंबई दिनांक
प्रयास सेवांकुर, अमरावती व
नयी तालीम समिती, सेवाग्राम, द्वारा

2016 नंतर सेवाग्राम परिसरात प्रथमच होत आहे, तीन दिवसांचे निवासी राज्यस्तरीय सेवांकुर प्रेरणा शिबिर.

शिबिरार्थींची अपेक्षित संख्या 250 (संपूर्ण राज्यातून, किमान २०-२२ जिल्ह्यांमधील)

(ज्यांना स्वतःच्या आयुष्यात काही वेगळे करायचे आहे व इतरांच्याही आयुष्यात काही वेगळेपण आणायचे आहे, अशा मनाने युवा असणाऱ्या सर्वांसाठी.)
वयाची वरची मर्यादा नाही.

*दि. 23-24-25 ऑगस्ट 2024*

स्थळ - *नयी तालीम परिसर, सेवाग्राम आश्रम, सेवाग्राम, वर्धा, जि. वर्धा.*

सहभाग राशी - *आपल्या क्षमतेनुसार.*

(शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी येथे नोंदणी करावी.
*नोंदणीची अंतिम तारीख 15 ऑगस्ट*
https://bit.ly/Sevankur-Sevagram_2024
Niranjan's Blog☘️
प्रयास सेवांकुर, अमरावती व नयी तालीम समिती, सेवाग्राम, द्वारा 2016 नंतर सेवाग्राम परिसरात प्रथमच होत आहे, तीन दिवसांचे निवासी राज्यस्तरीय सेवांकुर प्रेरणा शिबिर. शिबिरार्थींची अपेक्षित संख्या 250 (संपूर्ण राज्यातून, किमान २०-२२ जिल्ह्यांमधील) (ज्यांना…
हे शिबीर खूप छान असतं, मी कॉलेजला असताना केलं होतं. यावेळी सेवाग्राम मध्ये होत आहे ही तर एक पर्वणीच आहे. करीयर सोबतच सामाजिक भान, जगासमोरची आव्हानं, आपण काय करू शकतो या गोष्टींबद्दल खूप छान चर्चा येथे होते तसेच आपापल्या क्षेत्रात खूप चांगलं काम केलेल्या लोकांना ऐकता-बोलता येतं. शक्य असल्यास नक्की जा तसेच कॉलेज मध्ये शिकणारे, नुकतेच शिक्षण पुर्ण झालेले अशा लोकांना आवर्जून माहिती द्या.
(#Forwarded)
एखादयाला आयुष्य वर्थ लिव्हिंग न वाटनं यात काही आश्चर्यकारक नाही. वाटू शकतं. त्याला फूटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांचे दाखले देऊन आपण किती प्रिव्हिलेज आहो हे सांगण्यातही काही अर्थ नाही. ठराविक टप्प्यानंतर असल्या मोटिव्हेशनचा फोलपणा लक्षात आलेला असतो. खरंतर दिवसातले चोवीस तास आणि हप्त्यातले सात दिवस आयुष्य कुणालाच वर्थ लिव्हींग वाटत नसतं. आपण ही काय करतोय ही फिलिंग एखादया ऑफिस क्लर्क पासून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पर्यंत कुणालाही कुठेही गाठू शकते. Existential crisis पासून कुणाचीच सुटका नाही. एवढं सगळं असूनही लोकं आत्महत्या करत नाही. अगदी टोकाला जाऊन मागं फिरतात. कारण त्यांच्या आयुष्यात मागे खेचनारं काहीतरी शिल्लक असतं. भलेही त्यांनी ते कबूल करो वा ना करो. वरकरणी कितीही कोरडं भासलं तरी आपल्या आयुष्यात कुठेतरी ओल शिल्लक आहे हे नेणिवेच्या पातळीवर की असेना आपल्याला माहीत असतं. प्रत्येकाने आपापल्या आनंदाच्या जागा निवडलेल्या असतात. तिथं सुकून असतो. सभोवतालचा विसर फक्त दारूच पाडू शकते असं नाही. ती नशा कशातही असू शकते. अगदी कशातही. कुमार सानूचं गाणं, एखादया मित्रासोबतच्या गप्पा, नदीच्या घाट. अगदी काहीही. माणूस फक्त तेव्हढेच क्षण जगतो, बाकी एरव्ही तो फक्त जिवंत असतो. पण हे क्षण अनुभवण्यासाठी जिवंत राहणं गरजेचंय. म्हणून वाटेत हजार मरण्याची कारणं असली तरी माणूस ह्या जगण्याच्या चार क्षणांसाठी चालत राहतो. हा सौदा परवडतो म्हणून आपण निवडलेला असतो. नाहीतर सारं जग आत्महत्या करून मोकळं झालं असतं. त्यामुळे ह्या जगण्याच्या जागा शोधल्या पाहिजे. त्या टोकाच्या क्षणी मागे फिरण्याची कारनं वाढवली पाहिजे. जॉब, पैसा, जबाबदाऱ्या या खूप उपऱ्या प्रेरणा आहे. त्यांच्या आधारे आयुष्य कडेला जाणं कठीण आहे. मागे एक मिम बघितला. त्यात थ्री इडियटच्या टेम्प्लेट खाली लिहलं होतं. ‘’अटेंडन्स की चिंता मत करो, क्लास मे कोई क्रश बनाओ अटेंडन्स अपने आप बढे जायेगी’’. आयुष्य लंबी शाळा घेणारं आहे, तिथं बोर व्हायचं नसेल तर आपण आपल्या क्रश शोधल्या पाहिजे. या प्रवासाचा सौदा परवडेल अशा मुक्कामाच्या जागा शोधल्या पाहिजे.

(#Forwarded)
Comparison ही खतरनाक गोष्ट आहे. Comparison च्या नादात भल्याभल्यांना आपल्या strengths चा विसर पडतो. प्रत्येकाच्या आपल्या स्वतःच्या म्हणून काही strengths असतात. त्यांची जाणीव होणं, जपणूक होणं गरजेचं आहे. हे नाही झालं तर आपण copy paste culture चा भाग होऊन जातो. गर्दीत हरवून जातो. स्वतःच्या strengths ओळखणे, जपणे जमायला लागलं की आपसूकच आपल्यातल्या weakness वरही काम करता येतं. ही प्रक्रिया सतत सुरू राहते. Success ही खूप व्यापक संकल्पना आहे. परीक्षेत पास होणं, पोस्ट मिळवणं त्यातला एक भाग आहे. नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे, परंतू तरीही फक्त पोस्ट मिळवणं म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं नक्कीच नाही. यशाचे अनेक आयाम असतात ते हळूहळू कळू लागतात. कुणालाच एकाचवेळी सर्वच आयामांवर काम करणं शक्य होत नाही. मला वाटतं ते गरजेचही नाही. एक एक आयाम सुधारता आला पाहिजे. Priorities ठरवता आल्या पाहिजे. सर्वच वेळी, सर्वच गोष्टी आपल्याला हव्या तशाच असाव्यात हा अट्टाहास उपयोगाचा नाही. एका वेळी एक पाऊल पुढे जाता आलं म्हणजे म्हणजे आपण जिंकत असतो. आयुष्यात चढ-ऊतार असतातच. कुणाचाही प्रत्येक दिवस happening वगैरे नसतो. कित्येकदा अनेक दिवस, महिने, वर्षे खूप त्रासदायक असतात आणि हे कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाचंच असतं. आयुष्य खूप काही देत असतं आपल्याला ते स्वीकारता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. चालताबोलता जमेल तसं आपल्यासोबतच इतरांचंही जगणं सुंदर करता आलं पाहिजे.

~निरंजन🌿

@niranjan_blog☘️
⭕️ #Interviews

Important topics for Opinion Based Questions

1. SC/ST Reservation Sub-categorisation
2. Non creamy layer criteria (Pune Probationary IAS case)
3. Divyang Reservation
(Pune Probationary IAS case)
4. Pune drugs issue
5. Hit and run cases
6. कल्याणकारी योजना-रेवडी कल्चर-शासकीय तिजोरीवरील भार-Fiscal Prudence-FRBM Act-Welfare State-DPSP
7. NEET exam issue
8. अग्निवीर योजना
9. मणिपूर हिंसाचार
10. निवडणूक रोखे योजना
11. लाडकी बहिण योजना
12. वायनाड भुस्खलन ( आपत्ती व्यस्थापन)
13. ऑलिंपिक
14.कोणतेही विधेयक मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा लोकसभा अध्यक्षांना कितपत अधिकार पाहीजे?
15. शहरातील पुर परिस्थिती, नियोजनातील कमतरता , उपाययोजना
16.छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे गरज आणि वास्तविकता
17.सार्वत्रिक निवडणुका आणि जातीय समीकरणे
18.जातनिहाय जनगणना करावी का? फायदे - तोटे?
19. Delhi coaching center accident?
20. राज्यपाल पदाची आवश्यकता?
21. जुनी पेंशन/नवी पेंशन योजना
22. किमान आधारभूत किंमतला कायदेशीर हमीची मागणी
23. केंद्रीय आणि राज्य अर्थसंकल्प तरतुदी
24. आंतरजातीय विवाह आणि समाज मान्यता
25. India Population 2024 opportunities & threats
26.Government Retirement age 58 or 60
27.Uniform Civil Code & Maharashtra
28.Artificial Intelligence & Administration
29.Kolhapur Atikraman Issue & opinion
30.Latest increased activites of Terrorism
31.Growing Indian Economy & Challenges
32. मराठा आरक्षण - SEBC , सगेसोयरे , OBC आरक्षण
33. Objective vs written pattern
34. Naari shakti vandan अधिनियम.
महिला आरक्षण.
35.Governance & AI ( +ve & -ve)
36. Windows Crash याला पर्यायी व्यवस्था.
37. विशाळगड प्रकरण(सांप्रदायिकता)
38. Urban नक्षलवाद
39. हमास - इस्त्राईल war (India Stand)
40. सरकारी कर्मचाऱ्यांना संघात जाण्यास परवानगी
41. Delhi Pollution (52⁰ Temp.)
42. Go Green - Go Electric ( Cycling, Public Transport - Strong)
43. संविधान दिन Vs संविधान हत्त्या दिन
44. Constitutionalism ( concept in laxmikant 7th edition )
45. सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वर्षात वाढ करावी का?
46. New bills replacing IPC , CrPC their need and the way they were passed in parliament
47. MP suspension from parliament and attack on parliament
48. Microsoft technical glitch:airline across globe affected
50. One side MH la agriculture leadership award 2024 madhe best agriculture state mhnun award milala ani dusrya side la MH til shetkari आत्महत्या
51. बैलगाडा शर्यत
52. Broadcasting service (regulation) bill 2024
52.. एक देश एक निवडणूक..
53. Right To Education Act... changes..Implementation
54. Shakti pitha mahamarg issues
मुलाखत तयारी संबंधी मागील वर्षी झालेल्या चर्चासत्रांच्या recordings येथे उपलब्ध आहेत. #Interviews
👇👇👇

https://www.tg-me.com/+tMHxrIpcVgtmZWM1
✴️ राज्यसेवा 2023 मुलाखती विशेषतः प्रथम टप्प्यात मुलाखती असलेल्यांसाठी महत्त्वाचे:

सर्वांनाच वेळ कमी मिळालेला आहे.

अगदी मोजके लोक सोडले तर इतर सर्वच लोक पुढच्या प्रिलिम्सची तयारी करीत होते.

फार कमी जणांना मॉक देता आले असणार आहेत, त्यातही एकापेक्षा जास्त मॉक तर नाहीच.

विशेष तयारी झालेली नसताना मुलाखतीला जाताना confident राहणे हे खरे आव्हान आहे आणि ते जवळपास सर्वांसाठीच आहे त्यामुळे panic होऊन self goal करू नका.

मुलाखतीला जाईपर्यंत जेवढी तयारी करता येईल तेवढी नक्की करा. तयारीचा फायदा नक्कीच होतो.

प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये काही प्रश्नांची उत्तरं आली नाही तरीही घाबरू नका, तिथेही लक्षात ठेवा विशेष तयारी करावी इतका वेळ यावेळी कुणालाच मिळालेला नाही त्यामुळे आपण घाबरून जायचं कारण नाही. जेवढं जमेल तेवढं बेस्ट द्यायचा प्रयत्न मात्र नक्की करायचा.

तयारी बाबत साशंकता असली तरीही
interview etiquettes and grooming बाबत compromise व्हायला नको. Be the best.

❇️ Finally Confidence, Conviction and Clarity is the key.

#Interviews
Forwarded from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18
Niranjan's Blog☘️
A Gentle reminder राज्यसेवा-2025
2024 किती महत्त्वाचे आहे याबाबत reminder म्हणून पहायला हवं याकडे.. चर्चितचर्वनात किती वेळ घालवायचा आणि 2024 च्या मेरीट लिस्टमध्ये आपण असलोच पाहिजे या आपल्या प्रिय ध्येयासाठी किती जास्तीत जास्त वेळ देता येईल हे पहायचं सगळं आपल्या हाती आहे.

निर्णय आपले आणि परिणाम आपले
2025/07/06 06:33:35
Back to Top
HTML Embed Code: