Telegram Web Link
Clarity is freedom
"Life is a big fat gigantic stinking mess, that's the beauty of it, too."❣️

~Gayle Forman
अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..

यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
फफूंद❣️
आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलंय आपल्याला कुणालाही ठाऊक नसतं. काही तरी एक निर्णय घेणं आणि त्यानुसार ‘राह पकड़ तू एक चला चल' म्हणत चालत रहायचं एवढंच आपण करू शकतो. या सगळ्यात काय बरोबर आणि काय चुक वेळ आणि व्यक्तीसापेक्ष असतं.. यश मिळेपर्यंत सगळंच चुकीचं ठरवल्या जात असतं अन् यश मिळाल्यावर सरसकट सगळंच बरोबर ठरवलं जातं. सहा-सात वर्षे अभ्यास करून एखादा व्यक्ती क्लास वन झाला तर त्यांनी सहा-सात वर्षे वाया घालवली असं कुणी म्हणत नाही. याउलट त्यांच्या patience आणि consistency साठी त्याचं कौतुक केलं जातं. त्याचवेळी याउलट चार-पाच वर्षे अभ्यास करून कुठलीही नोकरी न मिळालेल्या व्यक्तीला मात्र 'वेळ वाया घालवला' वगैरेचं लेबल चिटकवलं जातं.. अशी रीत असते या जगाची.. त्यामुळे या जगाला कितपत मनावर घ्यायचं ते आपलं आपण ठरवलं पाहिजे.. नाहीतर आपला फुटबॉल झालाच म्हणून समजावं...
सुखाला भाषा असते.. दुःख मात्र अव्यक्त असतं...

#जगण
"Your actions reveal how badly you want something. If you keep saying something is a priority but you never act on it, then you don’t really want it. It’s time to have an honest conversation with yourself. Your actions reveal your true motivations."

Atomic Habits by James Clear 
एका मित्राचा हा मेसेज.. Waiting period प्रत्येकाच्या आयुष्यात असतो.. आपला खरा कस लागतो तो अनिश्चितेच्या काळात.. सध्या परीक्षा कधी होईल या अनिश्चिततेला सगळेच जण सामोरे जात आहेत पण यातही काही लोक या वेळेचा खूप productive उपयोग करीत आहेत. Joining न आलेल्या लोकांचे त्रास आम्ही अनुभवले आहेत.. पण कधी कधी काही गोष्टी आपल्या नियंत्रणापलीकडच्या असतात त्यांचा स्वीकार करणं हाच एकमेव पर्याय असतो. आतमध्ये आल्यानंतरही या अनिश्चितता आपली साथ सोडत नाहीतच त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेऊन जगावं, जमेल तसं constructive काहीतरी करत रहावं हेच खरं!
Forwarded from Niranjan's Blog☘️
         बरेच जण म्हणतात, परीक्षा समोर असल्याशिवाय अभ्यास होत नाही. तसे असेल तर ठेवा परीक्षा समोर. आयोग परीक्षा घेणार नसला तरी तुम्ही स्वतःची परीक्षा घेऊ च शकता. किंवा तुमच्या ग्रुप मध्ये मिळून तुम्ही एकमेकांची परीक्षा घेऊ शकता. आणि त्या परीक्षेतील यश-अपयशामुळे तुम्हाला प्रत्यक्षात पोस्ट मिळणार नसेल तरी तुम्ही त्या पोस्ट च्या एक पाऊल जवळ नक्की जाल आणि तुमचे एक वर्ष वाया जाणार नाही आणि तसे न वाटल्याने तुमचे हे गैरसमजातून आलेले depression येण्याचा मार्ग नक्की बंद होईल. त्यामुळे स्वतःचे वेळापत्रक तयार करा. त्यात तुम्ही देणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा तुम्हीच ठरवा. त्या तारखांच्या अनुषंगाने अभ्यास करा. आणि त्या तारखांना आयोगाचे जुने पेपर किंवा एखाद्या क्लास चे नवीन पेपर सोडवून mock परीक्षा द्या. त्याचे मार्क काढा. त्यावरून तुमच्या तयारीचा अंदाज बांधा. आणि त्याचा feedback घेऊन पुन्हा तयारीला लागा. त्यामुळे अभ्यासाचे planning, revision चे वेळापत्रक, परीक्षेची मानसिकता, आणि प्रत्यक्ष परीक्षेचा सराव या सर्व गोष्टी नियमित झाल्या असत्या. आणि यातून कोरोना ने निर्माण केलेली अनियमितता तुम्ही तुमच्या पुरती कमी करू शकला असता. अजूनही करू शकाल. आणि जेंव्हा केंव्हा हे सर्व सुरळीत होईल तेंव्हा तुम्ही जोमाने त्यात उतरू शकाल. हे असं पूर्ण शक्य होईल असं नाही. पण जे प्रयत्न करतील ते न कारणाऱ्यांपेक्षा चांगल्या परिस्थिती मध्ये असतील आणि जे हा प्रयत्न यशस्वीपणे करतील ते तर यशाच्या बरेच जवळ गेलेले असतील.

         तसेच हा जो वेळ तुम्हाला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही इतर परीक्षांचा अंदाज घेऊ शकता, तुम्हाला कोणती परीक्षा सोपी जाईल ते शोधू शकता. एखाद्या अगदी वेगळ्या परीक्षेची मूलभूत तयारी करायला देखील हा वेळ सत्कारणी लावू शकता. तसेच तुम्हाला तुमचे पूर्वीचे निर्णय यांचे पुनर्विलोकन करायला देखील ही एक उत्तम संधी आहे. फक्त हे करताना तुमचे अगोदर चे ध्येय हे सर्वात महत्वाचे आहे हे विसरू नका आणि फक्त विपरीत परिस्थितीमुळे त्या ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमचे मूळ ध्येय हे बहुतांश आणि इतर सुस्पष्ट कारणाशिवाय तेच राहायला हवे.

          तिसरा मुद्दा म्हणजे, स्पर्धा परीक्षा हा अंतिम पर्याय नाही. इतर करिअर सारखे ते एक करिअर आहे आणि ते इतर करिअर इतके च साधारण आहे. अभ्यास करतानाच्या या सर्व पोस्ट बाबतच्या कल्पना आणि अधिकारी झाल्यानंतरची वास्तविकता यामध्ये प्रचंड तफावत आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण खूप काहीतरी उदात्त किंवा मोठे किंवा वेगळे करत आहोत ही कल्पना तुम्ही सेवेमध्ये आल्यावर पहिल्या काही वर्षात पूर्णतः विरून जाते. याचं वेगळेपण किंवा मोठेपण हे निकाल लागल्या पासून ते जॉईन होई पर्यंत च्या सत्कारापूरतेच आहे. त्या नंतर ही सेवा इतर नोकऱ्यांसारखी नोकरी होऊन जाते. किंबहुना ती इतर नोकऱ्यांसारखीच आहे. प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे काहीजण असतात तसेच सरकारी नोकरी मध्येही असतात. त्याचा अर्थ सरकारी नोकरी म्हणजे उल्लेखनीय कामाचा मूलमंत्र हा समज पूर्णपणे फोल आहे. त्यामुळे स्पर्धा परिक्षेकडे तुम्ही rationally एक संधी म्हणून पाहिले पाहिजे. आणि याला समांतर इतर अनेक संधी जगात आहेत याची स्वतःला आणि आपल्या स्वकीयांना जाणीव करून द्यायला पाहिजे. या संधी तुम्ही तपासल्या पाहिजेत. त्यांच्याकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. त्यामधील एखादी संधी तुम्हाला सामावून घेत असेल तर तुम्ही खुल्या आणि प्रसन्न मनाने ती स्वीकारायला पण पाहिजे. मला स्वतःला बऱ्याचदा मी सहकारी संस्थांचा सहायक निबंधक होतो त्या पदावर किंवा engineer म्हणून टाटा मोटर्स मध्ये होतो त्या नोकरी मध्ये जास्त समाधानी असलो असतो का असा प्रश्न अधून मधून पडत असतो. 

          चौथा मुद्दा म्हणजे तुम्ही स्वतःला कशावरून judge करणार. तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला लायक आहात म्हणून तुम्ही त्याची तयारी करू लागता. तुमच्या या क्षमतेवर तुमचा आंतरिक विश्वास असायला हवा. तुमची क्षमता ही स्पर्धा परीक्षेच्या निकालाची पाईक नको. जगासाठी एकवेळ ती तशी असेल तरी हरकत नाही पण स्वतःसाठी मात्र ती तशी बिलकुल असता कामा नये. एखादी परीक्षा उत्तीर्ण होणे, किंवा एका ठराविक पगाराची नोकरी मिळणे याने तुम्ही स्वतःची किंमत करणे यासारखा मूर्खपणा नाही. तुमची स्वतःची योग्यता, talent हे आंतरिक असते. तुमचा त्या योग्यतेवर विश्वास हवा. एखादी नोकरी मिळणे हा त्या योग्यतेचा एक परिणाम असू शकेल. पण ती नोकरी तुमच्या योग्यतेचा मापदंड निश्चितच नसेल. एखाद्या कलेक्टर पेक्षा देखील बुद्धिमान असणारे अनेक जण शिपाई म्हणून आयुष्य घालवतात.  बऱ्याचदा अंतर फक्त योग्य संधीचे असते.
Forwarded from Niranjan's Blog☘️
त्यामुळे अगोदर स्वतः परीक्षेच्या तराजू मध्ये स्वतः ला तोलणे बंद करा मग हळूहळू जग पण तुम्हाला तसे तोलणे बंद करेल किंवा तुम्हाला जगाचा फरक पडणे देखील बंद होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची क्षमता, तुमची तयारी, मानसिकता, बाहेरील स्पर्धा, परीक्षेचा कालावधी, परीक्षेचे दिवस, परीक्षेची खोली, अगदी तुम्हाला बसायला मिळालेला बेंच, परीक्षा घेणारे लोक, पेपर काढणारे, पेपर तपासणारे, मुलाखत घेणारे, त्या वेळची तुमच्या भोवतालची परिस्थिती, नशिबाचा भाग, तुमचे आरोग्य, तुमचे कुटुंब, तुमचे मित्र अशा हजारो गोष्टींचा फरक पडतो. यश आलं तर ते नक्की कशामुळे आणि अपयश आले तर ते नक्की कशामुळे हे छातीठोकपणे खरे कोणीच सांगू शकणार नाही. म्हणून परीक्षेच्या यश-अपयशावरून स्वतःला, स्वतःच्या क्षमतेला Judge करणे पूर्णतः सोडून द्या. तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास नसला तर जरी तुम्ही यशस्वी झाला तरी असमाधानी राहाल आणि जर तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल तर तुम्ही जरी अयशस्वी झाला तरी समाधानी मात्र नक्की व्हाल.आणि समाधानी असणं हे परमोच्च यश आहे.  

          जसे तुमच्या क्षमतेला परीक्षेच्या आणि लोकांच्या मतांच्या तराजू मध्ये तोलू नका तसेच तुमच्या यशालाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे हे यश नाही तर यशाकडे जाणाऱ्या अनेक मार्गपैकी फक्त एक मार्ग आहे हे तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जगातील यशस्वी लोकांच्या कथांमध्ये किती जण स्पर्धा परीक्षा किंवा त्या क्षेत्रातले आहेत. स्पर्धा परिक्षे च्या जगाबाहेर देखील टॅलेंट ला तितकेच किंबहुना थोडे जास्तच महत्व आहे. यश म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आणि पूर्ण क्षमतेने करणे. आणि याउपर यशस्वी होणे हे कोणाच्याही जीवनाचे ध्येय किंवा मूळ नसते. जीवन आणि जगणे हे मूळ आहे. यश किंवा अपयश ही तात्कालिक आणि तात्पुरती अवस्था आहे. त्यामुळे त्याचे गरजेपेक्षा जास्त अवडंबर नकोच.

       आणि आता पाचवा मुद्दा. अनेक जणांकडून ऐकायला मिळतंय की स्पर्धा परीक्षा देणारे आत्ता depression मध्ये आहेत. अनेक जण असतीलही. ते अगदी साहजिक आहे. पण वर दिलेल्या चार मुद्द्यांचा सारासार विचार केला तर depression यायचं काही कारण नाही. आणि समजा आलंही असेल depression तर योग्य दिशेने विचार करून आपण ते दूर लोटू शकतो. डिप्रेशन येण्यामध्ये वावगं काही नाही. ती एक मनाची अवस्था आहे. बऱ्याचदा ती गोष्टीचा योग्य दिशेने विचार न केल्याने उत्पन्न होते. आणि योग्य दिशेने विचार केला की ही अवस्था सुधारता ही येते. विचार ही सुद्धा एक सवय आहे. आपण जसे विचार करतो तशी सवय लागत जाते. आणि इतर सवयी सारखी ही सवय देखील प्रयत्न केले तर बदलता येते. डिप्रेशन हा आपल्या मनाचा एक समज आहे. परिस्थितीला आणि इतरांना आपण स्वतःपेक्षा जास्त महत्व देऊ लागलो की डिप्रेशन यायची शक्यता असते. Pain आणि suffering मधला फरक कळाला की मग आपण डिप्रेशन किंवा negative विचारांपासून दूर राहू शकतो किंवा त्यांच्यावर मात करू शकतो. Rational thinking, सारासार विचार करणे ही जर आपण सवय बनवली तर negative विचारांवर आपण मात करू शकतो. आणि आत्महत्या किंवा त्यासारखे कोणतेही कृत्य हा कशाही वरचा उपाय नाही हे आपल्याला समजू शकेल. आत्महत्येने कोणाचा कोणताच प्रश्न सुटत नाही. एकवेळ हत्येचे समर्थन करता येईल पण आत्महत्येचे समर्थन नाहीच. जीवनाचे गमक हे प्रयत्नांमध्ये आहे , यशामध्ये नाही. संपूर्ण प्रयत्नामध्ये समाधान आहे, यश हा फक्त त्याचा परिणाम आहे. त्यामुळे कोणतेही टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या आजूबाजूचे लोक आठवा, आपण कुठून कुठपर्यंत आणि कसे आलोय तो प्रवास आठवा. डोळे उघडून जगातील अनंत संधिकडे एकवार नजर टाका, आणि पुन्हा एकदा नव्याने नव्याच्या तयारीला लागा.

         काळ कठीण आहे. जिवंत असणे हेच आत्ता महत्वाचे आहे. संपूर्ण कुटुंबे जगातून नाहीशी होत असताना आपण 1-2 वर्षाचा हिशोब करून हातपाय गाळून बसणे कितपत योग्य आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे असते त्या लढवय्या वृत्तीची आज जगाला नितांत गरज असताना, जगाला मार्ग दाखवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आपण आपल्या एवढ्याश्या समस्यांचा बाऊ करून बसणे योग्य नाही. गरज आहे ती त्या समस्यांना धीराने सामोरे जाण्याची आणि त्यातून मार्ग काढण्याची. 

  ~ अमोल मांडवे सर(DySP)

(सरांच्या 'वाटाड्या' या ब्लॉगवरून साभार)

@niranjan_blog☘️
कधीकधी आपण अगदी निशब्द होऊन जातो आयुष्यात. तसं पाहिलं तर कामापुरतं बोलणं चालणं सुरू राहतं. आयुष्याची गाडी आपल्या गतीने चालत राहते खरी पण आपण कुठेतरी हरवलेले असतो.. बोलत असलो तरीही अव्यक्त असतो.. काही गोष्टी मनाच्या तळाशी तशाच साचून राहणार असतात बहूदा.. बोलक्या माणसांचं निशब्द होऊन जाणं फार त्रासदायक असतं.. आयुष्यात हसणं असतं तशी आसवंही असतातच.. फरक एवढाच आहे की आसवं कधीच कुणाला एकटं सोडत नाहीत.. ते आनंदात असले नसले तरीही दुःखात नक्की सोबत करतात.. कितीही अवघड वाटत असलं तरीही कधीतरी सगळंच मागे पडणार असतं पण तरीही मागे पडेपर्यंत मात्र पुरता कस लागत असतो माणसाचा.. अशात आसवंच सोबत करीत असतात..

आसवांबद्दल साहीर ने लिहून ठेवलंय ना...

कभी ख़ुद पे कभी हालात पे रोना आया

बात निकली तो हर इक बात पे रोना आया


कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त

सब को अपनी ही किसी बात पे रोना आया



"बात निकली तो हर इक बात पे रोना आया" ही ओळ तर अगदी आतपर्यंत जाते...

#जगण
Niranjan's Blog☘️
निष्पर्ण जरी आज मी! आयुष्यात काहीवेळा बराच काळ असंच एकाकी अन् निष्पर्ण अवस्थेत रहावं लागतं.. अशा काळात मातीमध्ये मुळं घट्ट रूजवून मोठ्या ताकदीने उभं रहावं लागतं.. या काळात टिकून राहणारेच काळ बदलला की बहरतात🍁 ~निरंजन🌿 @niranjan_blog☘️
ये पतझड़ का मौसम घड़ी दो घड़ी हैं
नये फूल कल फिर डगर में खिलेंगे
💚

तेच ठिकाण.. तेच झाडं... बदलली ती फक्त वेळ.... वेळ बदलतो.. परिस्थिती बदलते.. बस्स टिकून राहता आलं पाहिजे...
वपु म्हणतात ना,

"खर्च झाल्याच दुःख नसत.. हिशोब लागला नाही की त्रास होतो.."


बहुधा त्यामुळेच बऱ्याचदा हिशोब लावत नाही म्हणून सुखी असतो माणूस...

#जगण
💙
Action is the best remedy📈
2025/07/04 19:56:59
Back to Top
HTML Embed Code: