Telegram Web Link
कोणत्याही वयात मनावर होणारे आघात हे प्रत्येकाला वेगळा अनुभव देऊन जातात. कणखर मन त्या आघाताचा सामना हिंमतीने करत तर जरा कमकुवत मन या आघाताच्या विळख्यात सापडत, त्यातून बाहेर पडू शकत नाही.

लहानपणी होणारे मानसिक आघात हे जन्मभर त्रास देऊ शकतात याचे अत्यंत प्रभावी चित्रण ऋषिकेश गुप्ते यांच्या  "जारण" सिनेमात केले आहे.

स्त्रियांचे मानसिक त्रास हा विषय आपल्या समाजात अत्यंत विचित्र पद्धतीने बघितला जातो. स्त्रियांची शारीरिक व मानसिक ठेवणं ही त्यांच्या अनेक मानसिक आजारांचे मूळ ठरते. सुरवातीपासूनच स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक तसेच लग्न, शारीरिक ठेवणं, मातृत्व या सर्व कसोट्यांवर तिला तोललं जाण तिच्या जगण्यातला आनंद हिरावून घेत.

सिनेमात मुख्यत्वे करून दोन स्त्री पात्र आहेत, एक ग्रामीण काहीशी अशिक्षित वाटणारी गंगुटी (अनिता दात्ये-केळकर) आणि उच्चशिक्षित, शहरी व सुखवस्तु  राधा (अमृता सुभाष) व दोघीही मानसिक आजाराच्या त्रासातून जाताना दाखविल्या आहेत. दोघींची आयुष्य एकमेकींशी गुंतलेली आहेत. त्यापॆकी राधा या पात्राला उपचार मिळून ती ठीक होते मात्र गंगुटीचे आयुष्य अकाली संपते.

आपल्या समाजात मानसिक आरोग्याबद्दल असणारे गैरसमज आणि पुरेश्या उपचार सुविधा ना मिळणं याच्यातून अगदी साधे मूड डिसऑर्डर जसे नैराश्य व चिंता यांनाच तर लोक घाबरतात तर छिन्नमनस्कता सारख्या गंभीर आजारांवर तर बोलायलाच नको. या सर्व मानसिक आजारांचे नीट निदान व त्यावर वेळेत मदत मिळणं हे सर्व नशिबाचा भाग आहे. यावर शहरी व सुशिक्षित लोकच यावर व्यक्त होत नाहीत तर ग्रामीण भागात काय हाल असतील?

सिनेमा म्हणून जारण उत्कंठावर्धक आहे. फोटोग्राफी, पार्श्वसंगीत, अभिनय, व दिग्दर्शन या सगळ्याच आघाडीवर सिनेमा उत्तम आहे. अंधश्रद्धेचा शेवटचा थोडा भाग मला पटला नाही, यापेक्षा विद्या बालनचा भूल भुलैय्या जास्त विज्ञानवादी ठरतो. असे असूनही मराठीत एवढा महत्वाचा पण दुर्लक्षित विषय एवढ्या प्रभावीपणे आणण्यासाठी "जारण" च्या टीमचे आभार. अमृता सुभाष यांनी "राधा" अतिशय सुंदर रित्या साकारली आहे. अनिता दाते केळकर भाव खाऊ भूमिकेत आहे. ती काही क्षणापुरती येते व छाप सोडून जाते. बाकी सर्वच कलाकार प्रभावी आहेत. मराठीत असा प्रयोग झाला याचा अभिमान आहे.

विज्ञानाच्या प्रगती मुळे मेंदूची रहस्य उलगडत आहेत त्यामुळे अनेक दुर्धर मानसिक आजारांवर उपाययोजना शक्य आहेत मात्र ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्याने ते मान्य करायला हवं. जारण मध्ये मानसिक आघातामुळे येणारी गंभीर अशी मानसिक अवस्था दाखवली आहे. मानसिक आघात अनुभवणाऱ्या सर्वच व्यक्तींना इतके टोकाचे त्रास होत नाहीत पण प्रत्येकाच्या मनावर व शरीरावर नक्कीच परिणाम होतात.

"मानसिक आघात समजून घेताना" या माझ्या पुस्तकात याच विषयावर मी सविस्तर पण सामान्य लोकांना कळेल असे लिहिले आहे. यासोबत यावरच्या उपाययोजना देखील दिल्या आहेत.

मानसिक आघात व त्यामुळे होणाऱ्या मानसिक गुंता गुंतीवर अजून बोलणे गरजेचे आहे. जारण हा सिनेमा त्या साठी नक्कीच काही प्रमाणात मदत करेल.
सिनेमा मोठ्या पडद्यावर जाऊन बघा.

मराठी सिनेमा : जारण
#mentalhealth #trauma #grief
#JarannMarathiMovie
#Keep
पुरूष जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातील आई जन्म घेते.....

जागतिक_पितृदिन_विशेष
daf3d750-5c4f-4366-aba5-6c19b4c99f78.pdf
670.3 KB
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा Question Format
daf3d750-5c4f-4366-aba5-6c19b4c99f78.pdf
670.3 KB
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा

प्रश्नपत्रिकेचा नमूना व प्रश्नपत्रिकेसंबंधी विशेष सूचना
5_6231189688917432534.pdf
1.1 MB
महाराष्ट्र वनसेवा (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम
नगरपरिषद गट क व ड पदभरती.
बहुप्रतिक्षित MIDC वेळापत्रक अखेर जाहीर
🧑‍🏫 कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती.

उद्यान अधिक्षक

उद्यान निरिक्षक

पात्रता, जागा, वेतन

Watch and Subscribe👇👇👇👇👇

https://youtu.be/zENpPNK4FI4

https://youtu.be/zENpPNK4FI4

नवी मुंबई महानगरपालिका उद्यान अधिक्षक/ उद्यान सहायक टेस्ट सिरीज one liner व notes 👇👇👇
Download App Sadar e Agri Platform

https://fhvug.on-app.in/app/oc/679179/fhvug?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Join telegram 👇👇👇

https://www.tg-me.com/Agrimpsc1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
निरभ्र आकाशासारखे नीरव शांतता पेलणारं!
विचार थांबला की सगळं नीरवच की!


Movie 🎥- अस्तू
#Keep
*सगळं काही कोसळतंय वाटतं तेव्हा...*

कधी कधी जीवनात असा टप्पा येतो की जिथे प्रत्येक गोष्ट हातातून निसटतेय असं वाटू लागतं. आपण ज्यावर विश्वास ठेवतो, ज्यासाठी झटतो, ज्यांच्यावर प्रेम करतो — सगळंच हळूहळू ढासळतंय, कोसळतंय, अस वाटू लागत. हे क्षण केवळ दुःखद नसतात, तर ते आपली ओळख, आत्मभान आणि अस्तित्व यांनाच हादरवून टाकतात.

संपूर्ण आयुष्य उध्वस्त होतंय असं वाटतं. मित्र दूर जातात, स्वप्ने अपुरी राहतात, शरीर थकलेलं आणि मन हरवलेलं असतं. प्रत्येक दिवस हा एक नवीन लढा वाटतो — स्वतःशीच. प्रश्नांच काहूर उठलेलं असतं:
"का असं होतंय माझ्याबरोबर?",
"माझ्यात काहीतरी शिल्लक उरलंय का?"
या प्रश्नांना थेट उत्तरं नसतात, पण त्यांच्यातच पुढील प्रवासाची दिशा दडलेली असते.

जीवनात जेव्हा आपण तुटतो, तेव्हाच आपण पुन्हा नव्यानं तयार होत असतो. आतून भक्कम होण्यासाठी अनेकदा आपल्याला मोडावं लागतं.
कधी कधी आपण "माझं सगळं संपलं" असं समजतो, पण खरेतर ते संपणं नसतं — ते एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्या क्षणी, आपण “जुने आपण” नसतो — तर “नवीन आपण” तयार होत असतो.

तुटलेली माणसंच जास्त खोल असतात. त्यांना दुःखाची किंमत माहिती असते. त्या माणसांनी वेदना अनुभवलेल्या असतात, पण तरीही त्यांचं हसू खरं असतं. आपण तुटतो, पण प्रत्येक वेळी थोडं अधिक समजून, अधिक संयमी होऊन परत उभं राहत असतो.
"दुःख शिकवतं, सुख विसरवतं."हीच जीवनाची विसंगती आहे.

कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. जसे ऋतू बदलतात, तसेच आयुष्यातील प्रसंगही बदलतात.
तुमचं कोसळणं, हे तुमचं अपयश नसून तुमचं बदलणं आहे. ते ओळखता आलं, की आपलं दुःखही आपल्याला अधिक सुसंवेदनशील, अधिक जिवंत बनवतं. दुःख हे तुमचं शत्रू नसून शिक्षक असतं.

जीवन तुम्हाला संपवत नाही, ते तुम्हाला शून्यापासून नव्यानं घडवत असतं. थोडा वेळ लागेल, थोडं दु:ख होईल, पण तुम्ही यातून नक्की बाहेर पडाल , अधिक भक्कम.
#Keep
2025/07/07 03:23:20
Back to Top
HTML Embed Code: