Forwarded from ✨Mission 2024
स्पर्धा परीक्षा तयारीच्या काळात पुण्यात राहिलो होतोच आता उद्यापासून नोकरीतलं पुणे अनुभवायचं आहे.. एकेक वर्तुळ पुर्ण होत असतं आयुष्यात.. आजच रंगनाथ पठारेंची सातपाटील कुलवृत्तांत संपवली.. त्यात ते शेवटाला सांगत होते.. विश्वाच्या पसाऱ्यातल्या कितीतरी वर्तुळांमधले एक एक ठिपके आहोत आपण... असंच काहीतरी.. बरंच काही.. अनुभवत रहायचं.. जगायचं.. पुढे जात रहायचं...
#जगणं
#जगणं
For an ecosystem, the transition zone is most productive but in life the transition zone is most futile and even destructive.
Forwarded from ✨Mission 2024
Answer key येईल परवा वगैरे पण तोवर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 चे सर्व पेपर्स मुळ स्वरूपात पाहणे, detailing करणे अभ्यासाच्या सुरुवातीसाठी खूप उपयुक्त ठरेल तेव्हा काय होईल, कसं होईल यात न पडता चालता-बोलता एवढं करून घ्या पुढचे दोन दिवस.
Forwarded from ✨Mission 2024
● Prerequisites for mains preparation
• Clarity
• Syllabus Decoding
• Hold over PYQs
• Proper Schedule
• Notes Making
• Provision for test solving
And after furnishing these requirements, we just need to stick to the.....
Revision, Revision, Revision
• Clarity
• Syllabus Decoding
• Hold over PYQs
• Proper Schedule
• Notes Making
• Provision for test solving
And after furnishing these requirements, we just need to stick to the.....
Revision, Revision, Revision
वर्षांमागून वर्षे जात राहतात पण मनाशी बांधलेली काही स्वप्नं अन् संकल्प तसेच राहतात.. ना ते पुर्ण झालेले असतात ना ते सुटून जातात.. ते तसेच राहतात.. जणू काही आपल्या आत खूप आतपर्यंत रूतून बसल्यासारखे.. आपलाच एक भाग होऊन गेल्यासारखे भासतात अगदी.. कधीतरी अगदी आपली स्वप्नं आणि आपण वेगळे आहोत की एकच आहोत असा प्रश्न पडावा एवढी एकरूपता साधली जाते.. अशातच अजून एक नवीन वर्ष आपल्या पुढे येऊन ठेपतं तेव्हा मनात एक काहूर आपसूकच येऊ लागतं.. कुठलीतरी अनामिक हूरहूर मनात रूंजी घालू लागते... असं बरंच काही असतं आणि कदाचित असणारही असेल पण तरीही स्वप्नं सुटणार नाहियेत.. तीच तर आयुष्याला सुंदर बनवतात बाकी स्वप्नं तरी दुसरी काय असतात आपली आयुष्य सुंदर बनवण्यापलीकडे🌱